Skip to main content

हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर

लेखक विनोदपुनेकर यांनी शुक्रवार, 06/12/2019 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
हैद्राबाद बलात्कार आणि पोलीस इनकॉउंटर डॉ. प्रियांका रेड्डी या एका भगिनींवर पाशवी बलात्कार झाला नंतर स्वाभाविक आणि नेहेमी प्रमाणे जनमाणसातून त्या चार नराधमांना भर चौकात फाशी ते अजून बाकी देशातील बलात्कार प्रकरणातील शिक्षेचे दाखले देत त्यांना कठोर शिक्षा (खरे तर मरण) द्यावी हि सगळ्या भारतीयांची अपेक्षा ते हि लवकरात लवकर हि अपेक्ष होती कारण दिल्ली तील निर्भया बलात्कार आरोपी आजपर्यंत कोर्ट कचेरी त्यांचा जगण्याचा अधिकार आदी कारणांनी जिवंत आहे त्यात त्या निर्भयाची आई कोर्ट कचेरीत अजूनही तिला न्याय मिळावा म्हणून कोर्टात फेऱ्या मारत आहे. त्यात आज पोलीस कोठडी संपत असताना सादर चारही आरोपी पहाटे तीन वाजता जिथे पाशवी बलात्कार करून निर्घृण हत्या केली गेली त्या ठिकाणी आरोपीना घेऊन गेले असता त्यांचा एन्काऊंटर करण्यात आला स्वाभाविक सर्वसामन्य जनतेने याचे स्वागत केले इतके कि सादर घटना स्थळी पोलिसावर फुलवर्षाव व फटके फोडून स्वागत केले गेले पण नेहमीप्रमाणी श्रीमती मनेका गांधी, अरविंद केजरीवाल आदिनीं सादर इनकॉउंटर विरोधात आवाज उठवत आरोप चालू केले आहेत माझे म्हणणे इतकेच आहे कि हे दुष्कर्म त्या चौघांनी केले असणारच इतकी खात्री आल्याशिवाय त्यांना यमसदनी पोलीस पाठवनार नाहीत खरे तर झाले तर खूप अभिनंदनीय आहे ...... हॅट्स ऑफ हेंद्राबाद पोलीस .

वाचने 67067
प्रतिक्रिया 161

प्रतिक्रिया

In reply to by आनन्दा

मलाही अशा प्रकारे पहाटे तीन वाजता आरोपिंना नेऊन ते पळून जात होते असे म्हणून त्यांना ठोकणे आवडलं नाही हैदराबादेतील त्या डॉक्टर युवतीशी आरोपीनी जे कृत्य केलं ते माणुसकीला काळीमा फासणारे होते, अतिशय वेदनादायक ती घटना होती, चीड़ आनणारे असेच होते. समस्त भारतीयांच्या मनात आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी असे वाटत होते. काही देशांमधे अशा घटनांचे आरोपी निश्चित झाल्यावर, आरोपींना जाहीर गोळ्या घातल्या जातात किंवा अन्य क्रूर शिक्षा दिली जाते तशीच शिक्षा याही प्रकरणात द्यावी असे अनेकांना वाटत होते. आज तसेच घडले आहे. अर्थात आता या विषयी न्यायिक चौकशी होईल, व्हायला पाहिजे. पोलिसांच्या कार्यवाहीवर प्रश्न उठतील. उठले पाहिजे. न्यायव्यवस्थेवर असलेल्या देशात असे घडावे का ? हे अतिशय वाईट आहे. आज अनेकांना चांगले वाटले असेल आरोपींना ठोकले म्हणून. पण पोलिसांनी येत्या काळात जर काही हिशेब पूर्ण करायचे म्हणून कोना निरपराधला ठोकलं तर मग पोलिसांच्या नावाने बोंब मारू नका. आपल्याकडे न्यायपालिका आहे,एक व्यवस्था आहे तिचा आदर झाला पाहिजे, काही बदल आवश्यक आहेत, पण पोलिसांच्या कृत्याचं मी समर्थन करणार नाही. न्यायपालिकेत निवाङा होऊन त्यांना फाशीचा निकाल मला बघायला आवडला असता. विलंब करणारी न्यायव्यवस्था आणि आजची पोलिसांची भूमिका भविष्यात मोठे वाद करणार हे निश्चित. -दिलीप बिरुटे

मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली पाहिजे. कुणी तक्रार करो ना करो. मी पाचवीत असतांना, सार्वजनिक गणेशोत्सवात मिळालेला पुरस्कार , डब्यात चेंडू टाका, ह्या स्पर्धेत, परत करायच्या विचारात आहे. पण 2 गोष्टी अडल्या आहेत. 1. पुरस्कार कुठे परत करायचा? 2. नक्की मला पुरस्कार म्हणून काय मिळाले होते ते आठवत नाही. बहुतेक "शामची आई" असेल. त्याकाळी हीच प्रथा होती.

In reply to by मुक्त विहारि

मी पाचवीत असतांना, सार्वजनिक गणेशोत्सवात मिळालेला पुरस्कार , डब्यात चेंडू टाका, ह्या स्पर्धेत, परत करायच्या विचारात आहे. ???

जर खरच ते चौघे पळून जाते होते आणि स्वरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या चालवल्या असतील तर ठिक आहे..... पण जसं सगळ्यांना वाटतय तसा जर हा इंस्टंट न्याय असेल तर अशा एनकाऊंटरच समर्थन होऊ शकत नाही. अशा एनकाऊंटर चं समर्थन हे आपली न्यायव्यवस्था कमकुवत असल्याचं समर्थन आहे. न्यायालयाने दिलेली फाशीची/ जन्मठेपेची शिक्षा हा न्याय आहे. एनकाऊंटर करुन न्याय देण्याची वेळ आपल्या देशावर येऊ नये हिच अपेक्षा. पोलिसांना मदतच करायची होती तर तपास जलद गतीने करुन योग्य ते पुरावे न्यायालयासमोर सादर करायला पाहिजे होते.

In reply to by सालदार

हा प्रकार सरळ वाटत नाही. पोलिस बंदोबस्तात नेलेले आरोपी, फार तर पळून जाण्याचा प्रयत्न करतील, पण ते पोलिसांच्या जीवाला कसला धोका निर्माण करू शकतील असे वाटत नाही. तसेच पहाटे चार वाजताची वेळही संशयास्पद आहे. खरोखर न्यायसंस्थेला आपल्या गतीबाबत तातडीने काहीतरी केले पाहिजे.

In reply to by स्वधर्म

स्वधर्म आणि सालदार यांच्याशी सहमत, त्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे याबाबत दुमत नाहीच पण तात्पुरत्या उन्मादातून सगळीकडे जर हा प्रकार रूढ झाला तर मात्र अवघड होऊन बसेल. (या वरून गंगाजल चित्रपट आठवला)

In reply to by स्वधर्म

पोलीस सांगतच आहेत ना, की आरोपी पळून जात होते म्हणून. पोलीस खरे सांगतच नाहीयेत असे का मानायचे? निर्भया, उनाव, आसाराम, सेनगर, कठुआ - न्यायालयीन प्रक्रिया सुरू होऊन ह्यातील कोणत्या पीडिता महिला, मुलींना न्याय मिळाला? निर्भया मेली, तिचे आई वडील रोज मानसिक मरणे मरत असतील, आरोपी जगताहेत ना? अजून काही प्रकरणे इतक्यातच वर्तमानपत्रातून आली होती. अशी कृत्ये करणाऱयांना कायद्याची भीती राहिलेलीच नाहीये, हा मूळ मुद्दा आहे. आधी अशी व्यवस्था पैदा करा की अशा घटनाच घडणार नाही आणि मग theoretical - असं व्हायला हवं आणि तसं व्हायला हवं, आरोपीचे हक्क वगैरे गप्पा मारा. ( जनरल लिहीत आहे, तुम्हांला उद्देशून नव्हे) जबरदस्त जरब, वचक बसवायची गरज आहे.

In reply to by हस्तर

नाही कोण म्हणतंय? पण पळून जाण्यात यशस्वी झाले असते तर पोलिसांना त्याही बाजूने बोल लावला असतात ना?

In reply to by यशोधरा

आणी दहशतवादी सोडून अन्य कोणीही पोलिसांच्या तावडीतून पळून जात असता सगळे च्या सगळे फक्त मारलेच जाण्याची किती विदा उपलब्ध आहे ? बाकी जे बेकायेशीररित्या मारले म्हणून आरडाओरड करत आहेत त्यांची गरज असे आरोपी मारण्या इतकीच महत्त्वपूर्ण असल्याने त्याचा विरोधही चूकच

In reply to by सालदार

>>>>>>>पोलिसांना मदतच करायची होती तर तपास जलद गतीने करुन योग्य ते पुरावे न्यायालयासमोर सादर करायला पाहिजे होते. न्यायालयावर डोळे बंद करुन विश्वास ठेवावा ईतकी लायकी भारतीय न्यायालय व्यवस्थेची नाही आहे. लोअर कोर्टापासुन सुप्रिम कोर्टा पर्यंतच्या न्यायाधीशांनी कबुल केलेल आहे की सोशल मिडीयाचा खुप दबाव त्यांच्यावर असतो. हल्लीच पाहाण्यात आलेल्या एका केस मध्ये पोलिसानी आपले काम चोख बजावत लहान मुलींना शिकार बनवणार्या आरोपीला पकडले व त्यावर वाँटर टाईट केस बनवली. एका शेतमजुर असलेल्या लहान मुलीचा बलात्कार करुन खुन केलेला होता त्याने. पण कोर्टाला आरौपीवर दया आली. मग काय आरोपी बेल वर सुटला आणी मोकाट सुटलेल्या ह्या आरोपीने तिन अजुन जीव घेतले. आता कोर्ट मान्य करणार नाही की कोर्टाकडुन चुक झालेली आहे. ना कोणी कोर्टाला जाब विचारायची हिंम्मत करेल! म प्र मध्ये २०१७ मध्ये एक ९ वर्षाची मुलगी बेपत्ता होते. शाळेतुन घरी येणारी मुलगी शाळेकडुन विलासपुरला जाणारी २.०० ची दुपारची बस चुकली म्हणुन चालत निघते पण घरी पोहोचत नाही. पोलिस चौकशी अंती फाईल बंद होते. २०१८ वर्षाखेर व २०१९ मार्चला अजुन दोन लहान मुली तश्याच नाहीश्या होतात. आता मात्र पोलिस कसुन तपासणी करतात. त्यांना सापडतो एक गुन्हेगार ज्याने २०१७ लाच एका दुसर्या गावातल्या शेत कामगार लहान मुलीला बलात्कार करुन ठार मारलेल होत. गुन्हा दाखल झालेला पण कोर्टानेच बेल दिली. बेल दिल्यावर ह्या आरोपीने अजुन तिन मुलींचा बलात्कार करुन निघ्रुण खुन केला !!

In reply to by डँबिस००७

न्यायालयाच्या लायकिबद्दल तुमच्याशी १००% सहमत आहे. पण आधीची न्यायव्यवस्था एवढी गचाळ असताना आणखी एक समांतर न्यायव्यवस्था आपण बनविण्यास प्रोत्साहन तर देत नाही आहोत हे तपासणे गरजेचे आहे. पोलिसांच्या हातात न्यायाचे कोलित देणे खुप महागात पडेल असे वाटते.

In reply to by सालदार

न्यायव्यवस्था एवढी गचाळ असताना आणखी एक समांतर न्यायव्यवस्था आपण बनविण्यास प्रोत्साहन तर देत नाही आहोत हे तपासणे गरजेचे आहे. पोलिसांच्या हातात न्यायाचे कोलित देणे खुप महागात पडेल असे वाटते सहमत. -दिलीप बिरुटे

अपरात्री तिथे ते का गेले? याला एक उत्तर ऐकलं ते असं की क्राईम सीन रि-क्रिएट करताना टाईमलाईनही पाळतात. म्हणजे त्या त्या वेळी त्या त्या ठिकाणी घेऊन जाणे आणि मूळ गुन्हा कसा घडला ते दृश्य समजून घेणे. यामागे बहुधा दिवसाच्या / रात्रीच्या ज्या वेळी गुन्हा घडला त्या वेळची त्या ठिकाणी असलेली स्थिती (अंधार, प्रकाश, गर्दी इ) याचा अंदाज यावा म्हणून असू शकेल. प्रतिहल्ला केला तरच गोळ्या घालणे हे तत्व पाळल्यास ते नुसते (इजा न करता) पळून गेले असते तर कसं थांबवता आलं असतं? ते तसे पळून गेलेले योग्य ठरलं असतं का? तेव्हा लोकांनी पोलिसांवर टीका जास्तच तीव्र केली असती. अर्थातच यातून एन्काऊंटर ही एक स्टँडर्ड प्रोसेस म्हणून योग्य ठरत नाहीच. फक्त काही मुद्दे (त्यांनी हल्ला केला असता तरच गोळ्या घालणे, आणि मध्यरात्रीच तिकडे का गेले इतक्यापुरता मर्यादित मुद्दा)

म्हणून हो. मारले गेले, मस्तच झाले, मारणे योग्य होते की न्हवते ते न्यायालय ठरवेल तत्पूर्वीच त्यांना दोषी अथवा निर्दोष ठरवणे घटनाबाह्य ठरते.

लोकांना इतका विचार करायची सवय लागलीय की, जी पिडीत आहे तीच्या हक्कांची किती सहज पायमल्ली झाली आहे तिच्याबरोबर च्या कुटुंबियांच्या सामान्य जीवनाची पायमल्ली झाली आहे, याचा कुणीच का विचार करत नाही. केवळ व्यवस्थेत असे काही करणे बसत नाही म्हणून ज्या पद्धतीने पिडीतेला न्याय मिळालेला आहे त्यावर आक्षेप घेणार्यांना मुळात ही व्यवस्था व मिळणारी शिक्षा हीच अपूर्ण व सदोष वाटत नाही का? ज्या पद्धतीने सामान्य माणसांकडून आज या एन्काऊंटरला समर्थन मिळतेय ते पाहून तरी डोळे बंद केलेल्या न्याय व्यवस्थेच्या डोळ्यात झणझणीत अंजन पडावे. ती पिडीता नराधमांचे पाशवी अत्याचार सहन करत गुदमरून मेली. अस्तित्वात असलेल्या न्यायाप्रमाणे याही आरोपींना फाशी मिळाली असतीही. पण पिडीतेला कणाकणाने मरताना झालेल्या यातनांची भरपाई खटक्यात मिळणार्या फाशी ने कशी भरुन निघणार? दिल्लीच्या निर्भयाला तर अजुनही न्याय मिळालेला नाही. शिवाय एक आरोपी तर कमी वयाचा फायदा घेऊन सुटला ही.असली तकलादू न्याय व्यवस्था आहे. माझे तर एन्काऊंटरनेही समाधान झालेले नाही. फटक्यात मेले सगळे. बलात्कार प्रकरणात न्याय व्यवस्था ही पिडीतेच्या बाजूने काही आश्वासक पाऊल उचलू शकली तर भविष्यात पोलिसही असली पावले उचलणार नाहीत. तसंही आत्ता पोलिसांनी मुद्दाम केलंय की नाही माहित नाही पण जरी केलं असेल तरी मी म्हणेन भले शाब्बास!

हा जर डोमेस्टिक सर्जिकल स्ट्राईक मानला .... तर ह्याचे श्रेय हायद्राबाद पोलिसांना की मुख्यमंत्री केसीआर ला ?

In reply to by मुक्त विहारि

नै ओ, ५६ इंची छाती बडवणारी जमात व त्याचे चाहते, त्यांच्या पक्षाच्या मु मं च्या राज्यात असं काही झालं असतं, तर गजर गाड्याचा करत असते..

In reply to by mrcoolguynice

पोलिसांना राजकीय पाठबळ असल्याशिवाय इतक्या हाय प्रोफिल केस चे आरोपी असे इनकॉउंटर करणे खरेच शक्य आहे ?

In reply to by विनोदपुनेकर

मग् उत्तर प्रदेशातील उंनाव घटने नंतर, तिथले मुख्यमंत्री काय धोरण घेतील ? तिथले पोलीस दल सध्या, हाताच्या पंज्याची , (तर्जनी व मधल्या बोटांची नलकांडी) पिस्तुल करून , तोंडाने धांय धांय, आवाज काढून एन्काऊंट करत आहेत (प्रत्यक्ष शस्त्रे दारुगोळा नसल्याने)

In reply to by mrcoolguynice

आमच्या ओळखीच्या "चंपाबाई" पण असाच द्वेष करायच्या. मोदी इथेच राहिल्या पण चंपाबाईला मात्र नारळ मिळाला.

In reply to by मुक्त विहारि

नाही हो आजीबाई, मला अजिबात दुःख झाले नाही व त्या मतदार संघात माझे मतदान नाही.

In reply to by mrcoolguynice

ताकाला जाऊन भांडे लपवायची, तुमच्या सारखीच चंपाबाईला पण खोड होतीच. आणि त्या पण तुमच्या सारख्याच आमच्या वर खूप प्रेम करायच्या. गेल्या बिचार्‍या..... अर्थात मोदी द्वेष तुमच्या इतका अंगात भिनला असेल, असे वाटले नव्हते. तब्येतीची जरा काळजी घ्या. बायदवे, उद्दाम सचिन पोटे, कधी भेटले तर आमचा नमस्कार नक्की सांगा.

In reply to by mrcoolguynice

मुख्यमंत्र्याचं कौतुक होऊन त्यांचे सीट्स भविष्यात वाढतील असे वाटते. नाय झालं तर झाल्या घटनेचा फायदा काही झाला नाही असे म्हणावे लागेल. किमान अजुन काही ठोकठाक व्हायला पाहिजे असे वाटते. -दिलीप बिरुटे

Ok.. प्रश्न ते लोक मेल्याचा नाही, प्रश्न मानावाधिकारांचा पण नाही. ते लोक तसेही मरणारच होते, आज नाही तर दोन वर्षांनी. पण आजच त्यांना मरावं लागेल असे काय त्यांना माहीत होतं हा प्रश्न आहे. साधारण सोशल मीडिया वरती प्रतिक्रिया पहिल्या तर हे सहज समजेल की ती एन्काऊंटर फेक होती याबद्दल समर्थन करणाऱ्या एकाच्याही मनात शंका नाही. प्रश्न हा आहे की आपण केवळ ते मेले, त्यांना शिक्षा मिळाली म्हणून आनंद व्यक्त करून शांत बसायचे का? ती गोरक्षक होती वगैरे खूप पुढचे मुद्दे आहेत, ती गोरक्षक होती हे ऐकायच्या खूप अगोदर, जेव्हा मी ही बातमी ऐकली तेव्हाच यात काहीतरी काळेबेरे आहे याबद्दल माझ्या मनात खात्री होती. का? १. पोलीस रोज असे अनेक गुन्हे बघतात, त्यामुळे त्यांनी राग येऊन असे कृत्य केले असे होणे अशक्य आहे. २. अन्य कोणत्याही बाबींपेक्षा पोलीस आपल्या नोकरीची अधिक काळजी करतो, जनता जनार्दन सेवा वगैरे नंतर, पहिली नोकरी, बढती वगैरे, म्हणजेच इथे, ज्या वेळेस सगळ्या जगाला ही फेक एन्काऊंटर आहे हे कळणारे, तिथे पोलीस असा हात घालणे अशक्य. ३. याचाच अर्थ असा होतो की कोणीतरी वरच्या माणसाने दबाव / प्रोत्साहन देऊन जबाबदारी घेण्याची हमी दिल्याशिवाय हे कृत्य होणार नाही. आता प्रश्न असा आहे, की हा वरचा माणूस कोण असेल, आणि त्याने हे पाऊल का उचलले असेल? हे दोन प्रश्न मला सकाळपासून छळतायत. मानवाधिकार वगैरे गेले चुलीत, पण या प्रकरणात या लोकांचा बळी देऊन कोणाला वाचवायचा तर प्रयत्न होत नाहीये ना? ती गोरक्षक होती का हे मला माहीत नाही, असेल तर कदाचित या प्रकाराला धार्मिक रंग असू शकतो. प्रत्यक्ष गृहामंत्र्याने या प्रकारची पाठराखण करणे हे या सगळ्या प्रकरणाची गुंतागुंत वाढवणारे आहे.

In reply to by आनन्दा

तुमच्या घरच्या व्यक्ती बाबत असा प्रसंग घडला असता तर? (माझ्या मनात पण तुम्ही म्हणता तसे प्रश्न येऊन गेले. पण मी तुम्हाला विचारला, तोच प्रश्न स्वतःला विचारला. ...उत्तर वेगळे आले....झालं ते उत्तमच झाले. ..कारण एक संदेश असा पण गेला आहे की, जास्त सुरसुरी आली तर निकाल वेगळा पण लागू शकतो. )

In reply to by मुक्त विहारि

मी तिथे असतो तर मीही भावनावश होऊन तसाच विचार केला असता. मी कुठे त्यांना दोष देतोय? पण मी तिथे नाहीये, आणि त्यामुळे मी भावना बाजूला ठेवून विचार करू शकतोय. प्रियंकाच्या खऱ्या गुन्हेगाराला अजून शिक्षा झालेली नाही असे माझे मत आहे. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे?

In reply to by आनन्दा

आणि जोपर्यंत माणूस, ह्या पृथ्वीवर आहे, तोपर्यंत ह्या घटना होतच राहणार. त्यामुळे, ह्या घटना सतत घडू नयेत, इतपत तरी काळजी घेतली पाहिजेच. पण पुचाट कायदे ...हो ह्या बाबतीत कायदे पुचाटच आहेत...आणि आमच्या घरात नाही ना घडलेले, ही निष्क्रिय सामाजिक मानसिकता, अशा घटनांना कळत नकळत, प्रोत्साहनच देत असते. इथे प्रश्न फक्त त्या एका "स्त्री" पुरता मर्यादित नाही. आपण माणूस म्हणून जगण्यासाठी नालायक आहोत, हेच आपण परत परत सिद्ध करत आहोत. किंबहुना गुन्हेगार लोकांना पण "स्त्रिया बद्दल" आदर असतो. तितका पण आपला पांढरपेशा समाज देत नाही. त्यामुळे ह्या घटना टाळायच्या असतील तर एकच उपाय आहे, कठोर कायदे आणि त्वरित कारवाई. (विषय गुन्हेगारी बद्दल निघालाच आहे तर, तुरूंगात ह्या गुन्हेगारांना, चमडी-वाले, कस्पटासमान वागणूक मिळते....कृपया माहितीचा स्रोत विचारू नये. मला माझा जीव प्यारा आहे.)

In reply to by मुक्त विहारि

यात माझा मूळ मुद्दा येतच नाही. प्रियंकाचा खरा गुन्हेगार अजून मोकाट आहे, असे माझे म्हणणे आहे, आणि तोपर्यंत या सेलिब्रेशनला काहीही अर्थ नाही.

In reply to by मुक्त विहारि

4 पैकी 3 मायनर असल्याने त्यांची नावे उघड करता येत न्हवती परिणामी त्यांची जी नावे प मिडी यात दिली गेली ती काल्पनिक होती म्हणून ते तसे म्हणत असावेत

In reply to by जॉनविक्क

तसेही मला म्हणायचे नाहीये. पण सामान्यपणे एखादे प्रकरण आपल्या अंगावर शेकायला लागले की साक्षीदारांना संपवायचा मार्ग सर्वसामान्यपणे वापरला जातो. विशेषतः प्रकरणात हायप्रोफाईल माणसे गुंतलेली असतील तर. त्यामुळे तडकाफडकी एन्काऊंटर अनेक प्रश्न निर्माण करते. ती व्यक्ती कोण आहे हे सांगणे खूपच कठीण आहे. आपण १०० किमीवर बसून काहीच माहिती काढू शकत नाहीत. पण झालेला घटनाक्रम संशयास्पद आहे, आणि त्यामुळे या प्रकरणात अजुन कोणीतरी उच्चपदस्थ अडकलेला असण्याचि शक्यता आहे असे माझे सकृतदर्शनी मत बनलेले आहे.

In reply to by आनन्दा

ती महिला पशुवैद्यकीय डॉक्टर होती आणि हैद्राबाद आणि आसपासच्या अनधिकृत कत्तल खान्यांसंदर्भात आवाज उठवत होती ही बाब विचारात घेतली तर बाकीचे चित्र अधिक स्पष्ट होते...

इतक्या सगळ्या चर्चा, कुचर्चा, तर्क, वितर्क वाचून, पाहून, ऐकून वाटते की बलात्कार पीडितांच्या आणि ओघाने त्यांच्या कुटुंबियांच्या नशिबात बलात्कार आणि क्लेशकारक मृत्यूनंतरही शांतता नाही. सगळेच ह्या प्रकरणाला वेगवेगळे रंग देण्यात, फाटे फोडण्यात मश्गुल आहेत. जाणारी गेली जीवानिशी...

तुंम्ही पिडीतेबाबत मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याशी सहमत आहे. ९९% लोकांच्या मनात क्षोभ आहे. आरोपीला कसलीही शिक्षा झाली, तरी गेलेला जीव आणि भोगलेल्या यातनांची भरपाई कदापि होऊ शकणार नाही. पण या प्रकरणातून थोडा वेगळा मुद्दा पुढे येत आहे. य़ाचा परिणाम भयंकर होऊ शकतो. खाली आनंदा यांनी तो खूप व्यवस्थित मांडला आहे. त्यांनी मांडलेल्यातील एक जरी शक्यता खरी असेल, तर यात पाचवी हत्त्या कायद्याची झाली आहे. इतर निर्भया वगैरे प्रकरणातले खरे आरोपी वेळकाढू न्यायसंस्था आणि ढिसाळ तपास हे आहेत. पोलिसांच्या कामात आरोपी पकडणे आणि त्याला व्यवस्थित लवकरात लवकर पुराव्यांसहित न्यायालयात हजर करणे, याचे मूल्य आरोपीला खतम करण्यापेक्षा खूप खूप अधिक आहे. कसाबला फाशी देण्याबाबत पोलिसांवर असाच दबाव होता, पण मुंबई पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळून त्याला कायदेशीर न्यायालयासमोर हजर करून मग त्याला फाशी झाली. यामुळे समाजात न्यायाचे राज्य असल्याचा संदेश जातो. इथे कसला संदेश जातो ते आपणच पहा.

In reply to by स्वधर्म

फ्रेंच राज्यक्रांती , हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे, जनतेचा जर ह्या घटनेला विरोध नसेल, तर राज्यकर्ते योग्य तो बोध घेतील, अशी भाबडी आशा आहे.

In reply to by स्वधर्म

यामुळे समाजात न्यायाचे राज्य असल्याचा संदेश जातो. इथे कसला संदेश जातो ते आपणच पहा.
स्वधर्म, पोलीस खोटे सांगत आहेत, ह्या गृहीतकावर विसंबून पुढचे सारे बोलले जाते आहे का? पोलीस खरेच सांगत आहेत, ह्याचा काही पुरावा मजपाशी नाही पण ते खोटेच सांगताहेत असा पुरावा पुढे आलाय का? जर पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीनी पळून जायच्या प्रयत्नात पोलिसांच्या बंदुका हिसकावल्या असतील, त्या चालवायचा प्रयत्न केला असेल, त्यांच्यावर दगडफेक केली असेल तर पोलिसांनी काय करणे अपेक्षित आहे? त्यांना स्वसंरक्षणाचा अधिकार नसावा का? तुमचा न्यायाचा मुद्दा लक्षात घेतला तरीही पोलीस विनाकारण स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतील का, असेही वाटते. एकूणातच सगळे जण आता भयानक अराजक निर्माण झाले आहे वा होणार आहे अशा थाटात अहमहमिकेने बोलत आहेत, का बरे? लगेच सगळीकडे पोलीस एन्काऊंटर्स करणार आहेत की काय? अशा घटनाच होऊ नयेत म्हणून जे कडक व प्रभावी उपाययोजना करायला हव्यात त्याविषयी कोणी ब्र काढत नाही. उलट आता ह्या प्रकरणाला धार्मिक रंगही देत आहेत. आजकाल कोणत्याही दिवसाचे वर्तमानपत्र पहा, ह्या अशा बातम्या असतातच, एक दिवस असा नाही की नसतात. ६१ वर्षाच्या थेरड्यापासून ते १६ वर्षाच्या पोरट्यापर्यंत सगळेच ही मर्दुमकी गाजवताना दिसतात. ज्यांच्यावर हा अन्याय होतो त्या मुली, स्त्रिया, त्यांचे कुटुंबीय ह्यांना न मिळणाऱ्या किंवा अति विलंबाने मिळत असलेल्या न्यायाचे काय? इथे कसला संदेश जातो मग? त्यांचा उध्वस्त झालेला आत्मविश्वास, जगायची उमेद, समाजातून नाकारले जाणे, दाखवली जाणारी बोटे, मागून केली जाणारी कुजबुज, डिप्रेशन ह्या सगळ्याला कधी न्याय मिळणार? मिळायला हवा की नको?

In reply to by यशोधरा

ज्यांच्यावर हा अन्याय होतो त्या मुली, स्त्रिया, त्यांचे कुटुंबीय ह्यांना न मिळणाऱ्या किंवा अति विलंबाने मिळत असलेल्या न्यायाचे काय? इथे कसला संदेश जातो मग? त्यांचा उध्वस्त झालेला आत्मविश्वास, जगायची उमेद, समाजातून नाकारले जाणे, दाखवली जाणारी बोटे, मागून केली जाणारी कुजबुज, डिप्रेशन ह्या सगळ्याला कधी न्याय मिळणार? मिळायला हवा की नको? +१

In reply to by श्वेता२४

+2

In reply to by यशोधरा

जे झालं ते सद्य परिस्थितीत योग्यच झाल बाकी चर्चांना, तर्कांना काही अर्थ नाही. आरोपी पळून गेले असते तर.. जो मेसेज हवा होता तो मेसेज गेला आहे. न्याय व्यवस्थेने न्याय देऊन असे काही झाले असते तर अधिक योग्य होते यात शंकाच नाही. सहा महिन्यात केसचा निकाल लागूच शकला असता का? परत वर्षानुवर्षे वकिलांच्या आर्गुमेंट सहन करा. त्या कुटुंबाचे काय? एकंदरीत न्यायव्यवस्थेत सुधारणा करणे गरजेचे आहे. ले़खात दिशा हे नाव वापरावे.

In reply to by श्वेता२४

मला तरी वाटते कि निर्भया किंवा कोपर्डी मधील आरोपीना आतापर्यंत जर न्यायव्यवस्थेने फाशी किंवा घटनेप्रमाणे कुठलीही शिक्षा आजपर्यंत दिली गेली असती तर कदाचित आज सगळ्यांनी हैद्राबाद पोलिसांवर फुले उधळण्याऐवजी ते टीकेचे धनी झाले असते जनमानसात एकाच मुद्दा आहे कि आरोपी असूनही इतके वर्ष सरकारी पाहुणे बनून राहतात आणि पीडित च्या कुटुंबावर आलेली वेळ आणि रोज उगवणारा दिवस आपण कल्पनाही करू शकत नाही

In reply to by श्वेता२४

नाहीतर त्यांचे काम उद्या सर्वसामान्य जनता ही करेल,सांगता येत नाही. जनतेच्या भावना आता बलात्काराच्या घटनांबाबत अधीक संवेदनशील होत आहेत. )
हे काम जनता नक्कीच करते...... अक्कु यादव आठवतो का कुणाला? https://allthatsinteresting.com/akku-yadav

- बलात्कार पिडीतेच्या नावाचा उल्लेख टाळावा. - आपल्या वैयक्तिक आयुष्यात कुठल्याही मुलीचा/स्त्री चा उपभोग्य वस्तू सारखा उल्लेख विनोदाने सुध्दा करू नये. मित्र-सहकारी अशी टवाळी करत असतील तर स्पष्ट शब्दात विरोध करावा. - स्त्रियांनी पुरूषांच्या, समाजाच्या सुधारणेचा हट्ट जरूर धरावा पण त्यासाठी स्वतःची सुरक्षितता (व्यक्ति, स्थल, कालसापेक्ष) टांगणीला लावू नये. समाजात अनेक प्रकारचे लोक असतात त्यांचे अपब्रींगिंग आपल्या सारखे नसते. नेहमीच्या ओळखीची व्यक्ति भरोश्याची आहे असल्या भ्रमात राहू नये. - वैयक्तिक फ्रस्ट्रेशन पोलीस, न्यायपालिका, राजकारणी अशांवर काढू नये. - मानवी हक्क पिडीत व्यक्ति पेक्षा गुन्हेगारांना जास्त असू शकत नाहीत. उघड उघड जे गुन्हेगार आहेत त्यांचे कसले आलेत अधिकार. उन्नाव च्या गुन्हेगारांचा अधिकार??? - अश्या दुर्घटना.. अपघात कुणाही बरोबर होवू शकतात सो इतरांबाबत संवेदनशील आणि स्वत: अलर्ट राहू.

बहुतांश सामान्य लोकंना आनन्द झालेला आहे आणि हे पूर्णपणे न्यय व्यवस्थेचे अपयश दर्शविते. उन्हाळी सुट्टी वगैरे ब्रिटिश कालिन लाड बंद करून न्यायव्यस्थेने (आता तरी) दर्जा ऊंचावणे मनावर घ्यावे. अन्यथा हे प्रकार वाढतच जाणार आहेत.

एन्काउंटर्ची बातमी कळल्यावर आनंद होण्याऐवजी मनात पहिली शंका आली की जे मारले गेले ते 'खरंच' गुन्हेगार होते का? (खरे गुन्हेगार असल्याची खात्री पटली असती तर मात्र नक्कीच आनंद झाला असता) आतापर्यंतचा गंभीर आणि नृशंस गुन्ह्यांचा इतिहास बघता एवढी तत्काळ कृती किंवा 'न्यायदान' कधीच झालेले नाही. त्यामुळे झाल्या प्रकारात मूळ आरोपी/आरोपींना वाचवण्याकरता दुसर्‍याच कोणाचा तरी बळी दिल्याची शक्यता जास्त वाटते. जर माझी शंका चूकीची असेल तर आनंदच आहे, पण निर्दोष व्यक्तीला चारित्र्यहनन होवून जीव गमवावा लागणं हे ही दुर्दैवीच!

१- जर एनकाउन्टर फेक असेल म्हणजे ते आहे की नाही हे अजुन सिद्ध झालेले नाही पण ते जर उद्या फेक होते असे जर चौकशीअंती सिद्ध झाले तर फार चुकीचा संदेश समाजात जाईल यात काहीच शंका नाही. म्हणजे अशा भविष्यकालीन घटनांमध्ये पोलिसांकडुन समाज याच प्रकारच्या इमोशनल मॉब जस्टीस ची अपेक्षा करेल. आजही खुप आश्चर्य वाटले जेव्हा वकील वगैरे असलेल्या अनेकांनी हे जे झाले हेच योग्य होते असे म्हटलेले आहे. मायावती यांनी हैद्राबाद पोलिसांकडुन युपी पोलिसांनी प्रेरणा घेतली पाहीजे असे ही म्हटलेले आहे. जर असे झाले तर पोलिसही न्याय प्रक्रियेची अवहेलना करुन तिला पुर्णपणे डावलुन स्वतः फिल्मी स्टाईल य देण्यास प्रेरीत होतील. असे जर झाले तर ते लोकशाहीच्या घटनेच्या न्यायाच्या मुळ हेतुलाच तुडवुन लावण्यासारखे होइल. असा समाज हा सुसंस्कृत समाज नव्हे तर रानटी समाजासारखा होइल जिथे प्रत्येकजण वाट्टेल तसा निर्णय घेऊन न्याय करेल. २- अगोदरच ब्रुटल असलेली भारतीय पोलिस व्यवस्था आणखीनच ब्रुटल होउन अनिर्बंध होऊन जाईल. जर चौकशीच करायची नाही, बाजुही मांडायची नाही सत्य असत्याचा निवाडाच करायचा नाही तर मग पोलिसांचीही गरज काय ? म्हणजे पोलिस या व्यवस्थेचीही गरज का असावी ? मग सुदान सारख्या देशात जिथे सिस्टम पुर्णपणे अपयशी होते तिथे मग पोलिसही काय न्याययंत्रणा ही काय ? कशाचीच गरज राहणार नाही. तिथे मग अनेक़जण शस्त्र बाळगतात स्वत:च्या सिक्युरीटी फोर्स असतात. मग असा समाज हा अपेक्षित समाज आहे का ? म्हणजे याने जे प्रश्न आहे ते निकालात निघतील की अजुन चिघळतील ? ३- जर आरोपी शक्तीशाली राजकीय व्यक्ती असते किंवा कुठल्याही मनी पॉवर मसल पॉवर बाळगणारे असते तर अशी घटना घडली असती का ? याची दाट शंका वाटते. ४- एक हायपोथेटीकल उदाहरण समजा यातील एका आरोपीच्या भावाने वा नातेवाईकाने संतापाच्या भावनेच्या भरात जर एखाद्या एनकाउन्टर करणार्‍या पोलिसावर सुडाने हल्ला करुन त्याला ठार मारले. व त्याने जर हे म्हटले की त्याचा भाऊ निर्दोष होता त्याच्यावर अन्याय्य झाला. व जर कोर्टात केस गेली असती तर तो खरा निर्दोष असल्यामुळे त्याला न्याय मिळाला असता. तर मग अशी व्यक्तीगतरीत्या केलेल्या न्यायदानाची साखळी किती दिर्घ असु शकते किती भयावह असु शकते याची कल्पनाच केलेली बरी. मग यात कोणी कोणालाच उत्तरदायी राहणार नाही प्रत्येकाला स्वतःला जो योग्य वाटेल तो न्याय असे चालेल का ? असे निवाडे रोज होतील. असा समाज तग धरु शकेल का ? सुसंस्कृत वगैरे जाऊ द्या त्याचे मूळात अस्तित्व तरी टिकेल का ? अजुन अनेक प्रश्न आहेत पण एक गोष्ट आवर्जुन स्पष्ट करतो की मला या केसमधील बलात्कारी आरोपींचे कुठलेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्याही समर्थन अजिबात करावयाचे नाही. यातील पिडीतेविषयी पुर्ण सहानुभुती बाळगुन आहे. मात्र या प्रकारची प्रश्नांची हाताळणी अनेक नवे प्रश्न निर्माण करेल असेही मनापासुन वाटते.