✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सरकार पाडण्यामागे पवार ह्यांचा हात कसा ?

ह
हस्तर यांनी
Tue, 11/12/2019 - 19:17  ·  लेख
लेख
बघा मुद्दे पटले तर १) विखे पाटील :- लोकसभा निवडणुकीच्या वेळी जुना वाद उकरून काढला वर सुजय विखे ने संग्राम जगताप ला पाडले ,आता जर भाजपचे सरकार आले असते तर इथे पण विखे नक्की मंत्री झाले असते व ताकत वाढली असती २) फडणवीस :- आतून मैत्री असेलहि पण एकतर विखे ह्यांना घेऊन नाराज केले आणि समक्ष आव्हान दिले ,गेम तर होणारच ३) ED :- ची नोटीस देऊन आगाऊ पणा करायची गरज नव्हती ,डिवचले तर गेम करणारच ४) चिवसेना :- आमचे १७५ आमदार आहेत हे आक्रमक पणे कोणीही सांगणार नाही विनाकारण ,दिल्ली शी शिव सेनेचा संपर्क कमी ,मग कोणी पाठिंबा दिला ? राष्ट्रवादी असणारच , परत ५ वर्ष आधी जाहीर पाठिंबा दिला होता भाजपला राष्ट्रवादी ने विधानसभा २०१४ ला ,आत्ता मुद्दाम कोणालाच नाही ,भाजप ला नाही कारण १ ते ३ ,आणि शिव सेनेला सौम्यपणे कारण सांगून मनाई केले कारण ५ ५) पुनर्निवडणूक :- झाली तर (पाऊस पडणार नाही तरी पण ) जागा वाढू शकतात कारण भाजप आणि शिवसेना ह्यांचे भांडण बघून लोक विटले आहेत जेव्हा राज्यपालांनी काल बोलावले तेव्हा शरद पवार स्वतः गेले नाहीत ,व सकाळीच राष्ट्रवादीने वेळ वाया ना घालवता जास्त वेळ मागितली ,८:३० पर्यन्त थांबण्यास काहीच त्रास नव्हता कारण काँग्रेस तास पण पाठिंबा दिला असता व देवेंद्र किंवा शिवसेने कोणीतरी साहेबांचा शब्द मानलाच असता उगाच फेर निवडणूक करण्यापेक्षा ,किंवा जास्त वेळ संध्याकाळी पण मागता आली असती ,तसेच राज्यपाल यांनी काँग्रेस ला पण आमंत्रण दिले नाही जणू त्यानं पाठिंबा मिळणारच नाही व दुपारीच राष्ट्रपती राजवट जाहीर केली अर्थात ठरलेले असू शकते आता पब्लिक च्या डोळ्यात फक्त फक्त राष्ट्रवादी आहे शिवसेनेचा चा गेम झालाय आणि भाजप खोटारडी आहे ,जनतेच्या मते ,काँग्रेस मूग गिळून गप्प आहे तेव्हा फायदा कोणाला ? पवार ह्यांना
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
51418 वाचन

💬 प्रतिसाद (93)

प्रतिक्रिया

आजमितीला अगदी उद्याला सुद्धा

सुबोध खरे
गुरुवार, 11/14/2019 - 11:50 नवीन
आजमितीला अगदी उद्याला सुद्धा कोणताही पक्ष जर १४५ आमदारांच्या संमतीचे सह्यांचे पत्र घेऊन राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापन करू शकतात. तेंव्हा राष्ट्रपती राजवट आली म्हणजे काही भयंकर घडलंय असे समजणाऱ्या लोकांनी अभ्यास वाढवणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments

हाच तर आक्षेप आहे

Rajesh188
गुरुवार, 11/14/2019 - 12:28 नवीन
आमदारांचे सही असलेले पत्र आणा हीच अडवणूक वाटते. सरकारी ऑफिस मध्ये गेल्यावर जशी कागदपत्रांची लिस्ट वाढते आणि एका टेबल वरून दुसऱ्या टेबल वर पाठवतात तो प्रकार . सरकार स्थापन करण्याचा दावा केल्या नंतर विधानसभेत बहुमत सिद्ध करायला सांगणे योग्य आहे. आणि असेच केंद्रात आणि राज्यात बहुमत सिद्ध झालेलं आहे. राज्यपाल न समोर बहुमत सिद्ध करायची गरजच काय . कशाला पाहिजेत सह्यांची पत्र
  • Log in or register to post comments

कारण शोधताय

चौकस२१२
गुरुवार, 11/14/2019 - 18:25 नवीन
कसली अडवणूक? सगळ्या पक्षांना तेच सांगितले ना? उगाच सेना कशी चुकली नाही याची कारण शोधताय तुम्ही आणि भाजपचं कसे जबाबदार असणार याची री ओढताय.. बार भाजप च नक्की काय चुकलं? त्याचा पण काही तर्क सांगत नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

काहींच्या काही

सुबोध खरे
गुरुवार, 11/14/2019 - 12:36 नवीन
काहींच्या काही राज्यपाल हे विधानसभेत जात नाहीत. तेंव्हा त्यांच्या समोर बहुमत सिद्ध करणे हे शक्य नाही बाकी एम आय एम च्या दोन आमदारांनी किंवा म न से च्या एका आमदाराने सांगितले कि माझ्याकडे १४५ आमदार आहेत आणि ते मी विधानसभेत सिद्ध करतो तर त्यांना सरकार स्थापन करू द्यायचे का?
  • Log in or register to post comments

५ वर्ष आधी तसे झाले होते

हस्तर
गुरुवार, 11/14/2019 - 12:43 नवीन
५ वर्ष आधी तसे झाले होते म्हणून बहुतेक लोकांचा अपेक्षा वाढल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

राज्यपालांनी काय करावे याचा

सुबोध खरे
गुरुवार, 11/14/2019 - 12:49 नवीन
राज्यपालांनी काय करावे याचा विकल्प घटनाकारांनी त्यांच्या तारतम्यावर सोडलेला आहे (DISCRETION). तेंव्हा त्यांनी असं करावं तसं करावं म्हणून मुक्ताफळे उधळणाऱ्यानी विचार करावा आणि अभ्यास वाढवावा हि विनंती
  • Log in or register to post comments

सर्वात मोठ्या पार्टी का सरकार स्थापन करण्यास

Rajesh188
गुरुवार, 11/14/2019 - 13:01 नवीन
सर्वात मोठा पक्ष असेल त्यांना सरकार स्थापन करण्यास सांगणे ही रीत आहे.तो करू शकला नाही तर 2 नंबर chya पक्षाला संधी दिली जाते. ह्यात मनसे आणि mim नाही बसत. आता पर्यंत राज्यात आणि केंद्रात ज्या ज्या पक्षांची जेवढी सरकारे स्थापन झाली त्या सर्व पक्षांनी बहुमत एवढ्या आमदार किंवा खासदार chya सहीचे पत्र राज्यपाल/ राष्ट्रपतींना दिले होते हे तुम्ही छाती ठोक पने सांगू शकता का? मग कोर्टात जे खटले ह्या विषयावर दाखल झाले आणि माननीय न्यायालयाने काय मत व्यक्त केले हे नेट शोधून कॉपी पेस्ट करून टाकायला नको
  • Log in or register to post comments

राज्यपाल हे केंद्रातील सत्ताधारी

Rajesh188
गुरुवार, 11/14/2019 - 13:11 नवीन
राज्यपाल हे केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या हिताचेच निर्णय घेतात असा इतिहास आहे. म्हणून च सर्वोच्य न्यायालयाने ह्या विषयावर मत व्यक्त केले होते. बहुमत हे विधानसभा मध्येच सिद्ध करायला सांगावे . राज्यपाल ना सहीचे पत्र देवून नाही
  • Log in or register to post comments

सेनेने अडवणूक करण्याचे हेच कारण असावे

Rajesh188
गुरुवार, 11/14/2019 - 14:09 नवीन
राष्ट्र वादी आणि काँग्रेस ची युती किती तरी वर्ष टिकली . दोन्ही पक्षांनी एकमेकावर कठोर टीका सुद्धा केली नाही . ह्याला काय कारण असेल . पाठच्या सरकार मध्ये मुख्य मंत्री पद आणि महत्वाची खाती bjp कडेच होती. ज्यांच्या जीवावर सरकार चालत आहे त्यांना किंमत n देणे . त्यांच्या मंत्र्यांची ,आमदारांची कामे अड वून ठेवणे असले प्रकार bjp नी केले त्यात लोकांचे नुकसान झाले. म्हणूनच ह्या वेळी सेने नी अडवणूक केली. तशी अडवणूक केली नसती तर आता पण कमी महत्वाची खाती दिली असती . सेनेच्या मंत्र्यांच्या निर्णयांना कचऱ्याची टोपली दाखवली असती . ह्याच्या वर चर्चा न होता फक्त सेना कशी चुकीची आहे ह्या वरच focus केला जात आहे. उदयन राजे चे स्टेटमेंट आठवा राष्ट्रवादी विरोधी वागल्या मुळे उदयन राजा नी सुचविलेली कामे राष्ट्र वादी नी केली नाहीत त्या मुळे त्यांचे लोकांमधील स्थान डळमळीत झाले म्हणून ते bjp मध्ये गेले . Same असेच bjp नी सेने विषयी केले.
  • Log in or register to post comments

100 % सत्य !!!!!!!

ट्रम्प
गुरुवार, 11/14/2019 - 17:35 नवीन
1 ) रा/ कॉ च्या कुठल्याच नेत्यांनी आज पर्यंत मी पुन्हा येईन !! मी पुन्हा येईन !!!!!! असे फाजिल आत्मविश्वास ने म्हणले नव्हते . 2) त्यांच्या कुठल्याही नेत्यांनी पुत्रप्रेमा पोटी आघाडी तोड़ली नव्हती . 3) त्या दोन्ही पक्षांनीं होलसेल मध्ये रस्त्यावरचा माल उचलून एवढ्या प्रमाणात खोगीरभरती केली नव्हती . खर म्हणजे हरियाणा मधील लोजपा फॅक्टर महाराष्ट्रात अवलंब केले असते तर भापा ची एवढी इज्जत गेली नसती . तिथे लोजपा च्या पायांचे तीर्थप्राशन कारायचे आणि इथे शेने ला लाथा घालायच्या हा दुट्टप्पीपणा सोवळ ओवळ संभाळणाऱ्या पक्षाने केल्या मुळे सामान्य लोकांना जास्त खुपत आहे . महाराष्ट्रातील भापा चे हक्काचे मतदार पूर्वी पासून कमी आहेत आणि आता पर्यंत चे मिळवलेले यश हे फ्लोटिंग मतदारानीं मिळवून दिले आहे . त्याच फ्लोटिंग मतदारांनीं महाराष्ट्रात मोदीनां लोकसभेला घवघवीत यश मिळवून दिले आणि फर्नांडिस , आठा व उठा ला आस्मान दाखविले , तरी सुद्धा महाराष्ट्रातील भापा आणि शेने ला अक्कल आली नाही आणि एकत्र यायचे सोडून रोज एकमेकांच्या नावाने शिमगा करत आहेत . त्यामुळे येत्या निवडणूक मध्ये फ्लोटिंग मतदारानीं रा / कॉ चे अजून जास्त उमेदवार निवडून आणले तर आश्चर्य वाटणार नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

निवडणुकांतील टक्केवारी पाहिली

शाम भागवत
गुरुवार, 11/14/2019 - 18:01 नवीन
निवडणुकांतील टक्केवारी पाहिली तर भाजपाचा जनाधार वाढत चाललेला दिसतो. प्लोटिंग मते ही फक्त ३% असतात असे समजले जाते. जर भाजप १८% वरून २५% च्या पुढे गेला आहे. लढवलेल्या जागांचा विचार करता ही टक्केवारी ३१.५% च्या पुढे जाते. तुम्ही मांडलेली माहिती मला नवीन आहे. जर मला त्याचा सोर्सची लिंक दिलीत तर आभारी असेन. विवडणूक आयोगाची लिंक असेल तर जास्त उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

लिंक बिंक आपल्याकड़े न्हाय बॉ !!!!!!

ट्रम्प
गुरुवार, 11/14/2019 - 19:04 नवीन
स्टेटिकल डाटा माझ्याकड़े नाही , पण मतदान मध्ये 25 % पर्यंत भाजपचा शेअर वाढत गेला आहे तर " कहाँ से आते हैं ये लोग ? " ज्या प्रमाणे सपा , रीपा चे परंपरागत मतदार आहेत व ते फक्त त्यांच्याच पक्षाला मत देतात त्याच प्रमाणे भाजप चा निवडणुकीत हमखास परिणाम करु शकणारा असा मतदार वर्ग नसताना 25 % पर्यंत मजल मारली तर त्या 25 % वाल्यांना फ्लोटिंग का म्हणू नये . आता स्टेटिकली मी सिद्ध करू शकत नाही !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

लिंक बिंक आपल्याकड़े न्हाय बॉ !!!!!!

ट्रम्प
गुरुवार, 11/14/2019 - 19:33 नवीन
स्टेटिकल डाटा माझ्याकड़े नाही , पण मतदान मध्ये 25 % पर्यंत भाजपचा शेअर वाढत गेला आहे तर " कहाँ से आते हैं ये लोग ? " ज्या प्रमाणे सपा , रीपा चे परंपरागत मतदार आहेत व ते फक्त त्यांच्याच पक्षाला मत देतात त्याच प्रमाणे भाजप चा निवडणुकीत हमखास परिणाम करु शकणारा असा मतदार वर्ग नसताना 25 % पर्यंत मजल मारली तर त्या 25 % वाल्यांना फ्लोटिंग का म्हणू नये . आता स्टेटिकली मी सिद्ध करू शकत नाही !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

तुम्ही तर अगदी मूलभूत प्रश्न

शाम भागवत
गुरुवार, 11/14/2019 - 22:20 नवीन
तुम्ही तर अगदी मूलभूत प्रश्न विचारलाय. जरा संगतवार उत्तर द्यायला लागेल. उद्यापर्यंत देतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

शिवसेना काय आहे हे सर्वजण बघत आहेत

जॉनविक्क
गुरुवार, 11/14/2019 - 17:43 नवीन
आश्चर्य त्यांचेच वाटते की जे सेनेवर टीका करत आहेत. इतकी मोठी अखिळाडू वृत्ती आणी त्याचे सोयरसुतक नसलेले निर्लज्ज व थिल्लर प्रदर्शन एक संवेदनशील मतदार म्हणून अत्यन्त क्लेशदायक होऊ लागले म्हणून इच्छा नसतानाही काही गोष्टी इथे लिहाव्या लागल्या हा अप्रत्यक्ष लोकशाहीतील समजूतदारपणाचा फार मोठा पराभव वाटतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

शिवसेना काय आहे हे सर्वजण बघत

सुबोध खरे
Fri, 11/15/2019 - 10:10 नवीन
शिवसेना काय आहे हे सर्वजण बघत आहेत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापलेली आणि वाढवलेली पण वंशपरंपरागत चालू असलेली जहागिरी आहे. मा. रा. रा. आदित्य ठाकरे जी ना मुख्यमंत्री झालेलं पाहायचा होतं पण काही दुद्धाचार्यानी काडी घातली आहे. जगदंब जगदंब आई भवानी काय करेल ते खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

शिवसेना काय आहे हे सर्वजण बघत

जॉनविक्क
Fri, 11/15/2019 - 16:21 नवीन
शिवसेना काय आहे हे सर्वजण बघत आहेत
तुम्ही तुमचे बघणेही यात घुसडल्याबद्दल समाविष्ट केल्या बद्दल अनंत आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

मुळात युती चालू कशाला ठेवली.

चौकस२१२
गुरुवार, 11/14/2019 - 18:20 नवीन
त्यांच्या मंत्र्यांची ,आमदारांची कामे अड वून ठेवणे असले प्रकार bjp नी केले हे जर खरे असेल तर सेनेने मुळात युती चालू कशाला ठेवली...लढ्याचा होता ना स्वतंत्र? दुसरे असे राजेश कि तुम्ही याचे उत्तर टाळता आहात कि ५६/१०५ पैकी ५६ वाल्याने मुख्यमंत्री पद आपल्यालाच हा हट्ट धरणे कसे योग्य ठरते? सर्वसामान्य तर्कट बसता का निदान निम्मे निम्मे तरी आले असते तर हा हट्ट समजू शकतो बरं सत्तेत साथीदार असताना सेनेचे लोक असं बोलायचे कि वाटायचे कि हे युतीतील साथीदार आहेत कि विरोधक आणि तुमची अपॆक्षा ती काय मग? १०५ वॉल्य्यानी सेनेला दादा पूता करून डोकवयवर चढवून ठेवायचे? गेल्या काही दिवसात सेनेनं मारलेल्या कोलांटउड्या इतक्या हास्यास्पद आहेत कि हसण्याच्या पलीकडे आहे ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

असं आहे की १९९९ साली शिवसेना

आदेश007
गुरुवार, 11/14/2019 - 20:16 नवीन
असं आहे की १९९९ साली शिवसेना भाजप सरकारची पहिली टर्म पूर्ण झाली. १९९९ च्या निवडणुकीत शिवसेना ६९ आणि भाजप ५६ अशा सीट मिळाल्या. काँग्रेसला ७५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ५८ सीट मिळाल्या. ३० अपक्ष होते त्यातील बरेच शिवसेना भाजप सरकारला पाठिंबा द्यायला तयार होते. पण प्रमोद महाजन गोपीनाथ मुंढेनाच मुख्यमंत्री करा म्हणून अडून बसले. एक महिना चर्चा चालू होती पण महाजन यांच्या हट्टामुळे शेवटी फिस्कटली. तो पर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने इतर अपक्ष जमा केले आणि शिवसेना भाजपची सत्ता गेली. तेंव्हा कमी सीट मिळाल्या तरी मुख्यमंत्री पदाचा हट्ट करायची पद्धत कुणी सुरू केली हे तुम्हीच पाहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकस२१२

पूर्वग्रह दूषित प्रतिसाद

सुबोध खरे
Fri, 11/15/2019 - 09:57 नवीन
पूर्वग्रह दूषित प्रतिसाद पहिली ५ वर्षे पूर्ण शिवसेनेचा मुखमंत्री होता दुसऱ्या पूर्ण पाच वर्षात पण आमचाच मुख्यमंत्री हवा या शिवसेनेच्या हट्टामुळे भाजप शिवसेनेस विरोधी पक्षात बसावे लागले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदेश007

: )

चिर्कुट
Mon, 11/18/2019 - 06:50 नवीन
मग आता - पहिली ५ वर्षे पूर्ण भाजपा चा मुखमंत्री होता. दुसऱ्या पूर्ण पाच वर्षात पण आमचाच मुख्यमंत्री हवा या भाजपाच्या हट्टामुळे भाजपास विरोधी पक्षात बसावे लागले. जशास तसे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

राष्ट्र वादी आणि काँग्रेस ची

सुबोध खरे
Fri, 11/15/2019 - 09:55 नवीन
राष्ट्र वादी आणि काँग्रेस ची युती किती तरी वर्ष टिकली . दोन्ही पक्षांनी एकमेकावर कठोर टीका सुद्धा केली नाही . ह्याला काय कारण असेल . साधं आहे. "खा आणि खाऊ द्या" संस्कृती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

सेनेने स्वतंत्र निवडणूक का लढवली नाही.

Rajesh188
गुरुवार, 11/14/2019 - 21:24 नवीन
राजकारणी लोक डावपेच करण्यात सामान्य लोकांपेक्षा एक पावूल पुढे असतात. कधी कधी त्यांचे डावपेच राजकारणाच्या विश्लेषण करणाऱ्या जाणकार लोकांना सुधा खोटे ठरवतात. आपण आपल्याला जेवढे समजले तसाच अंदाज व्यक्त करणार. Bjp नी शिवसेना संपवण्याची पद्धतशीर तयारी केली होती सत्तेत असून सुद्धा सत्तेत सेनेचा प्रभाव कमी केला जात होता ह्याची जाणीव सेनेला होवू लागली असेल. म्हणून च सेना विरोधी पक्षा सारखी वागत होती असा एक माझा अंदाज . बरोबर असेल असं मी म्हणतं नाही. लोकसभेच्या निवडणुकीत bjp ला भरघोस यश मिळाले होते. एका पाठोपाठ घटनाऱ्या घटने मुळे मोदी जी लोक प्रियतेच्या शिखरं वर होते . प्रसिद्ध माध्यमांना मोदी शिवाय काहीच दिसत नव्हत . अशा परिस्थतीमध्ये सेनेला bjp विषयी आढी असून सुद्धा युती तुटणे बिलकुल फायद्याचे नव्हते. तो आत्मघात झाला असता.. युती tutavich अशी bjp ची मनीषा होती. त्यामुळे तयारी म्हणून काँग्रेस ,राष्ट्रवादी मधील प्रभावी नेत्यांना(ज्यांची त्यांच्या मतदार संघात वैयक्तिक छाप आहे) bjp नी भरती केली होती. युती तुटलीच तर त्यांना bjp नी वापरले असतं. ह्यांची पूर्ण जाणीव असलेल्या शिवसेनेची न कुरकुर करता आणि जास्त विरोध न करता युती केली आणि bjp ला बेसावध ठेवले. युतीचं फायदा होवून सेनेला बऱ्या पैकी जागा मिळाल्या. काँग्रेस,राष्ट्रवादी शी आघाडी करून bjp ला आपण धडा शिकवू शकतो आणि bjp चे पितळ उघडे पाडू शकतो अशी स्थितीत पोचल्या वर उघड बंड केले. हे माज विश्लेषण आहे. चुकीचं असू शकत. तुम्हाला काय वाटतं ह्या मता वर
  • Log in or register to post comments

फक्त (आपल्याच) पन्नासेक

कंजूस
Fri, 11/15/2019 - 03:57 नवीन
फक्त (आपल्याच) पन्नासेक आमदारांचे पत्र घेऊन सरकार बनवतो म्हणत राऊत,बाळराजे,अजितदादा कतारमध्ये उभे आहेत. सोनूतै तयार नाहीत. त्याच किंगमेकर ठरल्या.
  • Log in or register to post comments

बातमी बदलली.

कंजूस
Fri, 11/15/2019 - 05:38 नवीन
बातमी बदलली. उद्धव, पवार, अहमद पटेल यांच्यात समझौता झाला. फक्त मुख्यमंत्री ठरायचाय. - भाजपला दणका.
  • Log in or register to post comments

सामान्यपणे त्या तिघन्चे सरकार

आनन्दा
Fri, 11/15/2019 - 09:27 नवीन
सामान्यपणे त्या तिघन्चे सरकार येइल असाच अन्दाज आहे. पण तसे सरकार येणे हे शिवसेनेसाठी फारच वाईट ठरेल. कारण १. कोंग्रेसचा मतदार प्रामुख्याने वंचित भागातून येतो. २. राकॉ चा मतदार हा मुख्यत्वेकरुन मराठा आणि अन्य प्रस्थापित जातीमधून येतो. ३. शिवसेनेचा मतदार हा मुख्यत्वेकरुन मराठी, कुणबी आणि हिन्दुत्ववादी मराठा - ज्याला पवार आवडत नाहीत असा आहे. अश्या परिस्थितीत जर पवार आणि ठाकरे एक झाले, तर शिवसेनेचा हा हिन्दुत्ववादी मतदार मोठ्या संख्येने भाजपाकडे जाऊ शकतो. हिंदुत्ववादी मतदार हा प्रामुख्याने काँग्रेसचा विरोधी मतदार असतो. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांपेक्षा देखील कोंग्रेसविरोधी मते या विषयात महत्वाची ठरतात. नेते लोकांना जरी या आधाडीने आनंद झाला तरी शिवसेना व्हिक्टिम कार्ड किती चांगल्याप्रकारे खेळते यावर शिवसेनेचे भविष्य अवलंबून आहे. याउलट भाजपाकडे आयते व्हिक्टिमकार्ड आलेले आहे, ज्यचा वापर करुन तो आपली पहिले मते तर राखेलच, पण त्याचसोबत शिवसेनेच्या वाट्यातली नाराज मते देखील घ्यायचा प्रयत्न करु शकतो. आता अन्य काही गोष्टी १. शेतकरी मुद्दा - भाजपाची मुख्य ताकद शहरी भागात आहे (जिथे शिवसेनेची देखील ताकद आहे), जिथे कर्जमाफी हा मुद्दाच नाहीहाउलट कर्जमाफी म्हणले की वसकन अंगावर येणारेच लोक जास्त आहेत. २. अश्या परिस्थेतीत सत्ता घेऊन कर्जमाफी दिली, तरी त्यातून नेमके पदरात काय पडेल हे सांगणे कठीन आहे. त्याची अंमलबजावणी तर कठीणच, कारण न्यायलये आणि कॅग यात मोडता घालू शकतील (कायदेतज्ज्ञानी याबाबात शहानिशा करावी कृपया). ३. बदलत्या परिस्थितीत कोंग्रेसशी जुळवुन घेणे, आणि हिंदुत्ववादी मतदार राखणे या दोन दगडांवर पाय ठेवायला शिवसेनेला ज्या कोलांट्या मारायला लागतील त्याची कल्पना करता शिवसेना अधिकाधिक हास्यास्पद होत जाऊन कालांतराने राज ठाकरे च्या पंक्तीत जाऊन बसेल ४. खरेच जर युती तुटली, आणि भाजपा ने मनसे शी आघाडी केली, तर मुंबै महानगरपालिका देखील शिवसेनेच्या हातातुन जाईल. राज ने भाजपाशी युती केली, तर ठाकरेना मानणारा हिंदुत्ववादी मतदार त्यांच्यामागे जाउ शकतो. त्यामुळे एकंदरीत हे सरकार हा मानसिक समाधानासाठी शिवसेनेसाठी ज्वालामुखीवर बसुन पोळी भाजण्याचा प्रकार आहे असे माझे मत आहे. खरेच जर तसे झाले तर पुढच्या पाच वर्षात राज ठाकरेनी पुन्हा उभारी घेतली तर आश्चर्य वाटायला नको. किंबहुना, मला तर कायमच असे वाटतेय की हा सगळा चाललेला प्रकार म्हणजे राज ठाकरेंच्या सभांचे आघाडीने चुकते केलेले बिल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

एवढं साथ गणित नाही त्या पाठी

Rajesh188
Fri, 11/15/2019 - 13:29 नवीन
काँग्रेस ची खूप वर्ष सत्ता देशात होती bjp आता आली आहे. काँग्रेस ,राष्ट्रवादी नाव वेगळी असली तर त्यांचा मतदार एकच आहे व्यक्ती बघून मतदान होते . कोणत्याही विभागात 100 लोक राहत असतील तर त्या मधील 7 ते 8 लोकच सक्रिय राजकारणात असतात बाकी त्यांच्या पाठी चालतात . खूप वर्ष सत्ता असल्या मुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ल पारंपरिक राजकीय कार्यकर्ते आहेत ते बाकी पक्षा कडे नाहीत ग्रामीण भागात समस्या एकच प्रकारच्या असतात पण त्या मुळे त्या लोकांना स्वतः कडे वळवण्यासाठी उपाय पण एकच असतो. शहरात ( मोठ्या ,) तसे नाही दहिमिसल झाली असल्या मुळे समस्या असंख्य असतात आणि उत्तर पण अनेक हिंदुत्व हे सर्व शहरी लोकांना एक करू शकत नाही कारण जगात सर्व ठिकाणी असलेला ज्वलनत प्रश्न स्थानिक लोक आणि परप्रांतीय लोक ह्यांना धर्म एक करू शकत नाही . महाराष्ट्र मध्ये अशी अवस्था मुंबई पुण्या मध्ये आहे हिंदू पण दहीमिसल वाला स्थानिक हिंदू स्वीकारत नाही. कर्ज माफी हा ग्रामीण प्रश्न आहे पण शहरात राहणारे पण ग्रामीण नाळ असणारी लोक शहरात सुधा बहु संख्येने आहेत ह्याचा विसर नसावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

काँग्रेस, शिवसेना व उद्धवचं धाडस

गामा पैलवान
Fri, 11/15/2019 - 17:39 नवीन
आनन्दा, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या घरोब्याची उदाहरणं देतांना तत्कालीन परिस्थितीकडे दुर्लक्ष होतंय का? जुनी काँग्रेस इंदिरेची होती. तिच्यात नाही म्हंटलं तरी इंदिरेला पक्ष वाढायला हवा होता. आजची काँग्रेस पप्पूची आहे. पप्पूस पक्ष वाढवायची काडीइतकीही अक्कल नाही. मग काँग्रेसच्या नेत्यांनी सोनियासाठी कशाला काम करायचं? उद्धव काय वाईट आहे? निदान पवारांसारखा वापरून फेकून देणारा तरी नाहीये. उद्धवसोबत जाऊन स्वत:चा सवतासुभा राखता येतो. पवारांच्या सोबत गेलं तर तोही राखणं मुष्कील! मग काँग्रेसही फुटू शकते ना? आज पवार व काँग्रेस मिळून शिवसेनेला पाठींबा कशासाठी देताहेत? नाही दिला तर नवनिर्वाचित विधानसभा एकदाही न भरता बरखास्त होईल या भीतीने. आज या क्षणी निवडणुकांना परत सामोरं जायची हिंमत फक्त उद्धवकडे आणि केवळ उद्धवकडेच आहे. मला वाटतं आजच्या घडीला हे धाडस मुख्यमंत्रीपदाचा दावा सांगायला पुरेसं आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

मराठा मतदार !!!

ट्रम्प
Fri, 11/15/2019 - 21:34 नवीन
हि निवडणूक मराठी मतदारानींच चारशंकू करुन ठेवली यात शंका नाही !!! जो मराठा मतदार लोकसभेला मोदीसाहेबांच्या पाठीमागे भक्कम उभा राहिला त्याच मतदारानीं चार ही पक्षांची शर्यत लावून दिली . पुण्यातील वडगाव शेरी मतदार संघातील भाजप चा उमेदवार फक्त 4560 मतानीं पडला ( राष्ट्रवादी च्या माजी आमदार ला भाजप मध्ये जाहिर प्रवेश दिला , त्या राकॉ च्या आमदराच्या पाठोपाठ त्याचे कार्यकर्ते सुद्धा भाजप मध्ये गेले , रात्रीत व्हाट्सएप चे डीपी घड्याळ ऐवजी कमळ झाले तरी भाजपचा उमेदवार पडला ) गेल्या वेळेस च्या आठ जागा पैकी सहा जागा भाजप नी जिंकल्या त्यातले चार जण काठावर पास आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे भाजपचा जनाधार या वेळी कमी झाला . विधानसभा निवडणूक मध्ये अस क़ाय घड़ल की भाजपा सेने ला अब की बार 225 (लोकप्रिय घोषणा) पार न करता दोघांची सीटे कमी करुन रा / कॉ च्या पदरात टाकली . काँग्रेस तर दिल्लीच्या राजाच्या पाठिंब्या शिवाय लढली तरी गेल्या वेळेपेक्षा जास्त उमेदवार निवडून आले . त्याच प्रमाणे राष्ट्रवादी चे जवळ जवळ निम्म्मे सेनापती भाजप च्या आश्रयला पाळाले होते , भ्रष्टचारा मुळे बदनाम होती तरी गेल्या वेळेपेक्षा जास्त सीटे निवडून आली !!! याच्या अगदी उलट भाजप , दिल्ली तून सगळे मंत्रिमंडळ दिमतीला होते तरी गेल्यावेळे पेक्षा कमी सीटे !!! कुठे तरी वाचले होते की भाजप शेने चे बरेच से आमदार चारपाच हजारांच्या फरकाने निवडून आले आहेत , म्हणजे याचा अर्थ पेपर खूपच अवघड गेला होता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

वडगाव शेरी

बबन ताम्बे
Sat, 11/16/2019 - 08:04 नवीन
विद्यमान भाजप आमदारांबद्दल नाराजी होती. फार काय कामे केली नाहीत पाच वर्षांत.मी त्याच मतदारसंघात रहातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

अगदी बरोबर !!!!

ट्रम्प
Sat, 11/16/2019 - 11:53 नवीन
विद्यमान आमदार नी वार्ड मध्ये काय ! काय !! कामे केली ? जनमानस आता पुन्हा अनुकूल आहे का ?याचा तापास आय टी सेल चा ढिंढोरा पिटणाऱ्या भाजप ने करायला नको ? किती दिवस अजून मोदींच्या नावाने जोगवा घेवून फिरत बसणार ? विद्यमान आमदार , मुख्यमंत्री यांनी मतदार घड़वायला नको ? वडगाव शेरि माधिल भाजप च्या त्या आमदार कड़े कोणी सार्वजनिक हिताची कामे घेवून गेले की " तुमच्या एरियात मला मतदान झालेले नाही !! मग मी तुमची कामे का करू ? " असे गर्मी ने ऊत्तर द्यायचा. परिणामी राष्ट्रवादी च्या नेत्यांनी भाजप साठी आवाहन करुन देखील मतदारानी भाजप च्या मुळीक ला घरी बसविले आणि राकॉ च्या टिंगरे ला निवडून आणले . त्यामुळे सत्तेतून आलेली गुर्मी तुमचा नाश करु शकते हे भाजप च्या वरिष्ठ नेत्यांना कधी समजणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

करेक्ट !!

बबन ताम्बे
Sat, 11/16/2019 - 15:26 नवीन
काम न करणाऱ्या आमदाराला, नगरसेवकाला पुढच्या निवडणूकीत घरीच बसवावे. काही नाही केले तरी पक्षाच्या,नेत्यांच्या नावावर निवडून यायचे दिवस गेले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

राज्यपाल हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर च निर्णय घेतात

Rajesh188
Fri, 11/15/2019 - 14:16 नवीन
राज्यपाल हे केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर च निर्णय घेतात हा देशाचा इतिहास आहे निवृत्ती सोय म्हणून च ह्या पदाचा वापर केला आहे. सक्रिय राजकारण करू शकत नाहीत अशा पक्षीय नेत्यांना राज्यपाल पद दिले जाते.. शिव आघाडी सरकार बनवण्यात यशस्वी होतेय असे दिसले की राज्यपाल मार्फत bjp अडथळा आणयचा प्रयत्न करेल हे भाकीत आत्ताच करतो
  • Log in or register to post comments

कसा राज्यपाल मार्फत bjp

हस्तर
Fri, 11/15/2019 - 15:10 नवीन
कसा राज्यपाल मार्फत bjp अडथळा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

भाजप अडथळा आणण्याचा प्रयत्न

सुबोध खरे
Fri, 11/15/2019 - 19:45 नवीन
भाजप अडथळा आणण्याचा प्रयत्न करणारच. कारण तो तर विरोधी पक्ष असेल.त्यांचं कामच आहे ते. श्री फडणवीसांना सुद्धा श्री शरद पवारानी भरपूर अडचण करण्याचा प्रयत्न केला मराठा आरक्षण, कर्जमाफी सारखे अनेक प्रश्न उभे करून. फडणवीस त्याला पुरे पडले हि गोष्ट वेगळी. आता येणाऱ्या आघाडीत असा परिपकव ( mature ) मुख्यमंत्री मला तर फक्त श्री "उद्धव ठाकरे"च दिसतात. कदाचित एकनाथ शिंदे हे उमेदवार असू शकतील परंतु त्यांची भाजपशी असलेली जवळीक काँग्रेस/ राष्ट्रवादीला पचणार नाही. बाकी संजय राऊत, अजित पवार, आदित्य ठाकरे इ सर्व प्यादीच आहेत. आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण दिग्गज आहेत परंतु त्यांच्या पदाला कोणी पाठिंबा देणार नाहीत. किन्वा अशोक चव्हाण. पण ते आदर्शच्या कलंकातून अजून तरी सुटलेले नाहीत आणि न्यायालयाने ठपका ठेवला असल्याने त्यात कोणीही राजकारणी हात घालण्याची शक्यता कमीच आहे पाहू या काय होतंय ते.
  • Log in or register to post comments

सगळ्या राजकीय

धर्मराजमुटके
Fri, 11/15/2019 - 20:40 नवीन
सगळ्या राजकीय गोष्टींमागे पवार साहेबांचा हात आहे हे महाराष्ट्रात अनेकानेक वर्ष चालत आलेले आवडते वाक्य आहे.
  • Log in or register to post comments

आता संयम सुटत चालला आहे जनतेच्या

Rajesh188
Fri, 11/15/2019 - 22:42 नवीन
एका सेना ,bjp च का फाटलं ह्याची सर्व कारण शोधण्यात सर्व राजकीय विश्लेषक लोकांनी उलट सुलट विचार मांडून डोकं बधीर केले जनतेच्या . त्यात सेना आणि bjp ची उलट सुलट आरोप प्रत्यारोप कशाचा कशाला मेळ नाही. नंतर पवार साहेबांनी काडी घातली आणि आम्ही पाठिंबा देतो असे सांगून शिवसेनेला वेडे केले. अजुन राष्ट्र वादी ,काँग्रेस,सेनेची चर्चा च चालू आहे . काही निर्णय नाही .. अक्षर शां फालतुगिरी चालू आहे . आता संबंधित यंत्रणेने आपल्या अधिकाराचा वापर करून हे नाट्य थांबवावे. Vaitak आलंय आता
  • Log in or register to post comments

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या

सुबोध खरे
Sat, 11/16/2019 - 09:43 नवीन
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या हेतूंबद्दल काँग्रेसला अजूनही खात्री वाटत नाही त्यामुळे ते शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करण्यास काँग्रेस चालढकल करत आहे -- आजची लोकसत्तेची ठळक बातमी.
  • Log in or register to post comments

+1

जॉनविक्क
Mon, 11/18/2019 - 10:32 नवीन
ग्रेसची अस्तित्वाची लढाई चालू आहे त्यामुळे, ते ताकही फुंकून प्यायच्या मूड मधे आहेत. सेनेशी त्यांची युती होणे आणी स्थिर सरकार 5 वर्षे मिळणे ही भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाची बाब ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एक परखड विश्लेषण

मराठी_माणूस
Sat, 11/16/2019 - 15:16 नवीन
एक परखड विश्लेषण https://mumbaimirror.indiatimes.com/opinion/columnists/shobhaa-de/the-ballad-of-the-besieged-mumbaikar/articleshow/72079503.cms
  • Log in or register to post comments

सेक्रेड गेम्स महाराषट्रा

हस्तर
Mon, 11/18/2019 - 12:26 नवीन
सेक्रेड गेम्स महाराषट्रा पोलिटिक्स https://www.youtube.com/watch?v=jNzf9kSCKWk
  • Log in or register to post comments

साहेब दिल्लीला श्रीमती

सुबोध खरे
Mon, 11/18/2019 - 19:36 नवीन
साहेब दिल्लीला श्रीमती सोनियांना भेटून आले पण महाराष्टाच्या सत्ता स्थापनेबद्दल काहीच बोलणी झाली नाहीत. https://timesofindia.indiatimes.com/india/sharad-pawar-meets-sonia-gandhi-to-discuss-government-formation-in-maharashtra/articleshow/72110350.cms मग साहेब काय दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल गप्पा मारायला गेल्या होत्या? सोनिया बाई आता त्यांना चकरा मारायला लावत आहेत का? जुनं उट्ट काढण्यासाठी?
  • Log in or register to post comments

No discussion on Maharashtra

सुबोध खरे
Mon, 11/18/2019 - 19:37 नवीन
No discussion on Maharashtra government formation, says Sharad Pawar after meeting Sonia Gandhi
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा