Skip to main content

शिवसेनेची झोप की जाणिवपुर्वक राजकीय गोगपिद?

लेखक माहितगार यांनी बुधवार, 13/11/2019 09:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान २१ ऑक्टोबर २०१९ निकाल २४ ऑक्टोबर २०१९ . २४ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भाजपा आणि शिवसेना युतीस मतदान करणारी जनता दोहोत अगदीच सरकार बनु न शकण्या इतपत काही बिनसण्याची शक्यता आहे याबद्दल महाराष्ट्रीय सर्वसामान्य जनता अनभिज्ञ होती की मतदार बावळट होता ? २४ ऑक्टोबर नंतर शिवसेना नेते ५०:५० फॉर्म्युलॅच्या गोष्टी करतात भाजपा अध्यक्ष अमित शहांनी आश्वासन दिल्याचे म्हणतात. पण एकुण वाक्य रचनेवरुन मुख्यमंत्रीपद्दवर ५०:५० टक्के करण्याचे आश्वासन न देता अस्पष्टता ठेवली असण्याची शक्यता असू शकते. एखादी गोष्ट स्पष्ट न करणे यास मराठीत गोगपिद (गोमा गणेश पितळी दरवाजा) असा वाक्प्रचार आहे. शिवसेना नेतृत्वासोबत बोलताना अमित शहांनी गोगपिद केले असेल किंवा नसेल पण त्यानंतर म्हणजे १३ ऑक्टोबर २०१९ चा टाईम्स नाऊ या इंग्रजी टिव्ही चॅनलवरची अमित शहांची मुलाखत व्हिडीओ पुढे आला आहे ज्यात ३८मिनीटे ३८ सेकंदपासून पत्रकार नाविका कुमार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी कोण असतील तर अमित शहा केवळ देवेंद्र फडणविसच असतील हे अत्यंत सुस्पष्टपणे सांगताना दिसतात. सर्वसामान्य मतदाराने दोघांचेही मुख्यमंत्रीपदी दावे ऐकले तरी गोष्टी न ताणता तोडगे निघतील कुणितरी नमते घेईल असाच सर्वसामान्य मतदार विचार करेल. पण ज्यांना आपल्या भूमिका टोकाच्या आहेत हे माहित असते त्यांना १३ ऑक्टोबर पर्यंत परस्परांच्या भुमिका जुळत नाहीत आणि टोकाच्या आहेत त्यांनी त्या टोकाच्या आहेत हे जनतेस / मतदारांना सुस्प्ष्टपणे का नाही सांगितले असा प्रश्न आहेच. अमित शहांना आधी माहित नसेल तरी १३ ऑक्टोबरला टाईम्स नाऊ पत्रकाराकडून आदीत्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदावरील दाव्या बाबत समजलेले होते. आणि अमित शहांच्या मुलाखतीची वार्ता शिवसेना प्रमुखांच्या कानावर गेली असणार त्यांनी मतदारांना तोंडघशी घालण्यापुर्वी आपापसात चर्चा का केली नाही ? हा प्रश्न व्हॅलिड रहातोच पण.. शिवसेना प्रमुख निकाला नंतर ज्या पत्रकार परिषदा घेत फिरत आहेत त्या एकाही पत्रकार परिषदेत १३ ऑक्टोबरच्या अमितशहांच्या मुलाखतीतील भूमिकेचा उल्लेख का करत नाहीत ? सर्वसामान्य जनतेचे सर्वच राजकीय भाष्यांवर लक्ष नसेल पण शिवसेनेच्या राजकीय नेतृत्वापैकी कुणाचेच लक्ष नसेल तर १३ ऑक्टोबर पासून झोपले होते किंवा १३ ऑक्टोबरची मुलाखत जनतेपासून सोईस्कर लपवत आहेत ? महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ? ३८ व्या मिनीटापासून पुढे पहावे

वाचने 85789
प्रतिक्रिया 204

प्रतिक्रिया

५० :५० चे सूत्र आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असे जर अगोदरच ठरले असेल तर शिवसेनेने १२४ (आणि भाजपने १६४) जागांवर निवडणूक लढवण्याचे कसे मान्य केले? तब्बल ४० जागा कमी लढवून शिवसेनेस अर्धा वाटा देण्याचे भाजपने अगोदरच ठरवले असेल असे अजिबात वाटत नाही. (त्यातून लढवलेल्या जागांपैकी ४५ % जागीच (५६/१२४) त्यांचे उमेदवार निवडून आले याउलट भाजपचे (१०५/१६४) ६५ % जागी उमेदवार निवडून आले आहेत.) आणि असे झाल्यानंतरसुद्धा १०५ : ५६ हि टक्केवारी ६५ :३५ येते. मग जवळ जवळ दुप्पट जागा निवडून आणल्यावर शिवसेनेचाच मुख्यमंत्री असला पाहिजे हि मागणी सुद्धा अनाकलनीय आहे. जर श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांना वचन दिले होते कि मी एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री आणेनच तर त्यांनी १४४ जागा निवडून आणायला हव्या होत्या १२४ जागा लढवल्या तर १४४ येणे शक्य नाहीच. बरं एक ना एक दिवस शिवसेनेचा मुख्यमंत्री आणेनच असे वाचन दिले होते तर तो दिवस आजच आणि आत्ताच असा दुराग्रह कशासाठी? हा केवळ "अहंगंड" आहे असे स्पष्ट दिसते आहे.

In reply to by सुबोध खरे

जेव्हां जेंव्हा निकालात स्पष्टबहुमत नसते व स्पष्ट पराजयही नसतो तेंव्हा कोण चूक कोण बरोबर हा विषयच अस्थानी होतो. तार्किक मुद्देसूदता आकडेमोड याची राजकीय उपयुक्तता संपुष्टात येते. मागील निवडणुकीत युती तोडून शिवसेनेला दुखावले, मेगा भरती करून काँग्रेस व रा काँग्रेसला डिवचले पण उघड पाठिंबा देणाऱ्या(व छुपा विरोध करणाऱ्या) शरदपवारांना ED तर्फे हात लावायचे धाडस करून भाजपने घोडचूक केली व तीन कट्टर विरोधक तयार केले ज्यातील एकालाही भाजपा नको आहे आणी हेच समान सूत्र आहे. त्यामुळे विरोधक एकत्र येणार हे जर कोणी समजून घ्यायला तयार नसेल तर त्यास कमालीची राजकीय अपरिपक्वता म्हटले जाईल. आता फक्त विरोधकांची मोट बांधली कशी जाईल याचेच कुतूहल आहे. भाजपाने परतीचे दोर जवळपास कापूनच टाकले आहेत असे समजू शकतो (समजणे योग्य कारण हे राजकीय प्रकरण आहे व भाजपाही पलटी मारू शकतो पण त्याचे स्वागत कोण करणार हा विषय उरतोच ) .काही लोकं खासगीत असेही म्हणतात की भाजपाला 80 पर्यंत रोखायचेच डावपेच खेळले गेलेत पण भाजपाने तरीही 100 पार केली ही फार मोठी गोष्ट आहे. भाजपा हाय कमांडला याचा अंदाज आधीच आला असल्याने, सुरुवातीलाच सेनेसोबत युती, व निकाला नंतर राममंदिर निकालाची वाट व नंतर राज्यपालांतर्फे भाजपा सोडून इतरांना जुळवाजुळव करायची संधी न देता त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करणे या खेळया केल्या, मोदी पहिल्यांदा निवडून आले असताना त्या लाटेवर शिवसेनेला लाथाडणारा भाजपा दुसर्यावेळीही मोदी निर्विवादपणे निवडून आल्यावरही सेनेशी अधिकृत निवडणूकपूर्व युती करतो ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे.

In reply to by जॉनविक्क

>निकाला नंतर राममंदिर निकालाची वाट इतका पूर्वग्रह असेल असे वाटले नव्हते मुळात हा निकाल भाजपाला "लोकसभा निवडणुकी पूर्वी हवा होता" त्यावर श्री कपिल सिब्बल यांनी गदारोळ केला त्यानंतर हा निकाल भाजपाला "विधानसभा निवडणुकीपूर्वी हवा होता" तसेही झाले नाही आणि तुम्ही हा निकाल निवडणुकीच्या निकालानंतर म्हणताय? सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्याही राजकीय फायद्यानुसार चालत नाही हे अनेक वेळेस सिद्ध होऊनहि त्यांचा निवाडा एका य:कश्चित राज्याच्या विधानसभेच्या निकाला नंतर भाजपाला "आणता येतो" असे आपल्याला वाटत असेल तर धन्य आहे.

In reply to by सुबोध खरे

सर्वोच्च न्यायालय हे कुणाच्याही राजकीय फायद्यानुसार चालत नाही हे अनेक वेळेस सिद्ध होऊनहि माझी नाही पण काही लोकांची अशी चर्चा आहे १४ नवं लाच कसा राहुल गांधी डोस मिळाला ? शिव सेनेच्या अपील ला कोर्टाने लांबणीवर कसे टाकले ? सलमान च्या गाडीचा ड्राइवर कोण ?

In reply to by हस्तर

१४ नवं लाच कसा राहुल गांधी डोस मिळाला ? १७ नोव्हेंबर ला सरन्यायाधीश श्री रंजन गोगोई निवृत्त होत आहेत यामुळेच १)अयोध्या २) राहुल यांच्या विरुद्धची अवमानना याचिका ३)शबरीमाला, ४) माहिती अधिकार व सरन्यायाधीश कार्यालय आणि ५) राफेल अशा निकाल राखून ठेवलेल्या याचिकांचा निकाल त्या अगोदर दिला गेला आहे. हे सर्वत्र वृत्तपत्रात मोठ्या ठळक बातम्यात येत असताना आपल्याला माहिती नसावे? https://www.indiatoday.in/india/story/action-packed-week-at-sc-with-mor… राहिली गोष्ट --शिवसेनेची याचिका --ती जर न्यायालयापुढे सादर केली तरच त्यावर न्यायालय निकाल देईल ना? https://www.indiatoday.in/india/story/shiv-sena-supreme-court-plea-maha… अभ्यास वाढवा एवढेच मी म्हणेन

In reply to by हस्तर

आपल्याला समजून घ्यायचेच नसेल तर न्यायालयीन प्रक्रियेबद्दल आपल्याला घोर अज्ञान आहे एवढे बोलून मी खाली बसतो.

In reply to by हस्तर

राहुल गांधी हे 'प्रौढत्वे निज शैशवास जपणे ' या बाण्याचे आहेत. तसे त्यांनी आपल्या बोलण्याने आणि वागण्याने वारंवार सिद्ध केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ठोठावण्यासाठी बाल दिनाची निवड केली.

In reply to by हस्तर

१४ नवं लाच कसा राहुल गांधी डोस मिळाला ? सरन्यायाधीश श्री रंजन गोगोई यांचा काळ आपल्या पदावर राहण्याचा शेवटचा कामाचा दिवस होता. ( अर्थात त्यात त्यांनी कोणताही खटला सुनावणीस घेतला नाही). परंतु ९ तारखेला अयोध्या खटल्याचा निकाल दिल्यानंतर ११ १३ आणि १४ असे फक्त तीन कामाचे दिवस शिल्लक होते त्यात त्यांनी बाकी चार फार महत्त्वाचे खटल्यांचे निकाल दिले. यात राहुल गांधींचा निकाल आणि राफेल चा निकाल हे एकमेकांशी संबंधित होते म्हणून १४ लाच दिला गेला. बाकी एकंदर त्यांची उच्च दर्जाची बुद्धिमत्ता पाहिली तर बाल दिनाच्या दिवशीच त्यांना "ताकीद देऊन" माफी दिली हा काव्यात्मक न्यायच म्हणावा लागेल. कारण एवढं सगळं नाटक होऊनही अजून ते न्या जोसेफ यांच्या निकालपत्रात एक खुसपट काढून राफेल साठी "संयुक्त खासदार समिती" JPC बसवा असेच म्हणत आहेत. काही लोक सुधारणार नाहीत हेच खरं. सुदैवाने भारतीय जनतेने त्यांना आपले पंतप्रधान म्हणून निवडले नाही हि जनतेच्या सुज्ञपणाची ग्वाहीच आहे

In reply to by सुबोध खरे

की आमचा एक आपण मानलेला पूर्वग्रह सोडून इतर काहीही मतव्यक्त करण्याजोगे सापडू नये. राहिले भाष्य आमच्या (तुम्ही मानलेल्या) पूर्वग्रहाचे, तर इतकेच म्हणेन पूर्वग्रह सोडा आणी अभ्यास वाढवा, म्हणजे वाहत्या गँगेत हात धुणे कशाला म्हणतात हे आपणास आपोआप उमजुन येईल.

In reply to by जॉनविक्क

राम मंदिर निकालाची सुनावणी १६ ऑक्टोबर ला पूर्ण झाली आणि यानंतर अभ्यास करून निकाल लिहिण्यासाठी न्यायालयाने निकाल राखून ठेवला. १०४५ पानी निकाल लिहिण्यासाठी हा कालावधी घेतला गेला. त्याचा आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आणि तिच्या निकालाचा काहीही संबंध नाही. केवळ जोडायचा म्हणून बादरायण संबंध जोडणे हा पूर्वग्रह सोडून दुसरे काहीही नाही. याउपर आपल्याला समजून घ्यायचेच नसेल तर न्यायालयीन प्रक्रियेबद्दल आपल्याला घोर अज्ञान आहे एवढे बोलून मी खाली बसतो.

In reply to by हस्तर

पण ठरलेले न्हवते ते सरकार स्थापन करायचे की नाही याबाबत अधिकृत जाहीर धोरण. आणि त्याअनुषंगाने भाजपाने निकालानंतर काही चाली खेळल्या असतील नसतील हा ही वेगळा मुद्दा पण कोवळ्या बालगोपालासारखे समोरच्याला तुम्हला कोर्टाचे कामकाज समजत नाही म्हणायला उभे राहणे ही गोष्ट हास्यास्पद मानायलाही मी फारच म्हातारा आहे विनोदाच करायचे आहेत तर वेगळा धागा काढाना आम्ही काय तो अपरिशीट केला नाय का कधी ? उगा भाजपाच्या गाढवपणावर तुलनेत कमालीचे मौन आणी शिवसेनेवर उठसूट आसूड, आणि शरद पवार सारख्या मॅच विनर दुर्लक्षित करणे हे सामान्य मतदारांच्या कौलाचा मान राखणे नक्कीच न्हवे

In reply to by जॉनविक्क

आणि त्याअनुषंगाने भाजपाने निकालानंतर
निकालानंतर च्या जागी 2019 निवडणूक निकालानंतर असे वाचावे

In reply to by सुबोध खरे

वाहत्या गँगेत हात धुणे म्हणजे काय हे माझे विधान हे दुर्लक्षित करून आपणास लिखाण करत सुटायचे असेल तर याला अज्ञान न्हवे दांभिकता म्हणतात एव्हडे बोलून आशा अर्धवट सिलेक्टिव्ह रीडिंग मतांवर मला उभे राहूनही उत्तर द्यायची गरज भासत भासली नाही हे नमूद करून आता आपण खाली बसावे हेच नम्रपणे सुचवू इच्छितो.

एक ना एक दिवस सेनेचा मुख्यमंत्री आणेनच असे म्हणणारे उद्धव बाळासाहेबांचे " कोम्ग्रेसशी कधीच तडजोड करणार नाही " हे वाक्य सोयीस्करपणे विसरतात

१. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या सहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे. अन्यथा निवडणूक निकाल लागण्याची प्रक्रिया चालू असतानाच, सर्व पर्याय खुले असण्याची घोषणा झाली नसती. ती घोषणा, एका प्रदीर्घ घटनेतील एक टप्पा असावी असेच माझे मत बनले. शिवसेनेच्या हातात कोणतीच हुकमाची पाने नव्हती हे आता कळल्यावर, शिवसेनेचा आक्रमकपणा पाहून माझे हे मत जास्त पक्क झालंय. मनसे शिवसेनेचा कट्टर शत्रू. त्यालापण शिवसेनेची मते जाताहेत हे जाणवल्यावर माझा हा संशय जास्तच बळावला. हे तपासायला पुण्याचे उदाहरण पुरेसे आहे. अजून लढवलेल्या जागांवरची टक्केवारी जाहीर झाली नाहीये. ती मिळाली असती तर जास्त पुराव्यानिशी माझे मत मांडता आले असते. असो. २. त्यामुळे जिथे भाजपाचा उमेदवार उभा होता तिथे शिवसेनेची बरीच मते राकाँ व काँग्रेसला गेली आहेत. कारण या दोघांचा निवडणूक निकालानंतर पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांचे आमदार निवडून आले पाहिजेत ही तर शिवसेनेचीच गरज बनते व भाजपाचे १४४ आमदार होऊ नयेत ही जबाबदारी ठरते. ह्या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांच्या फायद्याच्या असल्याने त्यांनीही तोंडभरून आश्वासने दिली असणे शक्य आहे. ३. १९६७ पर्यंत काँग्रेसला विरोधकांची भिती वाटत नव्हती. पण लोहियांची विरोधी पक्षांची युती बनवून काँग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याची निती यशस्वी होते म्हणल्यावर, विरोधकांची एकजूट होऊ नये यासाठी डावपेच आखणे हे काँग्रेसचे मुख्य धोरण बनले.  त्यानुसारच पवारसाहेब राजकारण करतात व त्यात ते सद्या तरी सर्वात प्रविण आहेत असे वाटते. यावरून महाराष्ट्रात युती भारी पडतेय म्हणल्यावर त्यात फूट पाडणे हेच महाआघाडीचे दिर्घकालीनधोरण असणार यात काही संशय नाही.  थोडक्यात महाराष्ट्रातील निवडणूकांत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रीत लढणे व शिवसेना व भाजपाने वेगवेगळे लढणे हा एक मार्ग आहे जो महाआघाडीला सत्तेपर्यंत नेऊ शकतो.  जर युती तुटली असेल तर ती फक्त ताणली जात राहील एवढेच फक्त पहावयाचे आहे व परत जोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सरकार यावयाची जरूरी नाही. ४. परत निवडणुका झाल्या तर त्या शिवसेना व भाजपाने एकत्रीत लढवू नयेत एवढीच महाआघाडीची इच्छा किंवा धेय्य असावे असे वाटतेय. यासाठी प्रथम राज यांना बाजूला केले. या राजच्या त्रासातून शिवसेना खूप मागे खेचली गेली. बाळासाहेबांची पुण्याईही कामी येऊ शकली नाही. त्याचा फायदा त्यांना २०१४ पर्यंत झाला. फोडा व झोडा पध्दतीत नेहमी रागीट माणसाला हाताशी धरले जाते. कारण रागाच्या भरात त्याच्यावर कबजा मिळवणे सोपे असते. त्यामुळे यावेळी राऊतांद्वारे शिवसेनेला जाळ्यात पकडण्यात आलेय. राऊतांवरचा ऊध्वजींचा विश्वास हे हत्यार वापरले गेलंय. ५. पण मोदी उदयानंतर सगळंच गणित फिसकटायला लागलेय. शिवसेनेच्या बळावर मोठे होण्याची अगतिकता भाजपाची राहिलेली नाही. भाजपचे वाढते बळ त्याचा पुरावा आहे. त्यामुळे परत निवडणुका झाल्या व शिवसेना वेगळी लढली तर त्यांची आघाडीला गेलेली मते परत फिरतील.  भाजपकडे यावेळेस इच्छूक जास्त झाले होते व जागा २०१४ पेक्षा कमी झाल्या होत्या. पण परत निवडणुका झाल्यास, लढायच्या जागा १५६ वरून २८८ झाल्यामुळे बंडखोरांचा प्रश्न सुटेल. भाजपातील लाॅयल कार्यकर्ते त्यामुळे खुष झाल्याने पुढच्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढेल, जी शहांची नेहमीचीच रणनिती आहे. ६. जर शिवसेनेने पुढील निवडणुकीत महाआघाडीशी हात मिळवणी केली तर भाजपाला ते हवेच असेल. ध्रुविकरण भाजपाला नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे.  काँग्रेस विरोधातील आपला अवकाश शिवसेना आपणहून सोडून देत असेल तर भाजपा नक्कीच खूष होईल. भाजपा यापध्दतीनेच मोठी होत आली आहे. मात्र यासाठी संधीची वाट बघत बसायला लागते व त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तो मोदी शहांकडे नक्कीच आहे असे वाटते. ७. थोडक्यात, भाजपा, काँग्रेस व राकाँ यांचे पुढील धोरण निव्वळ वेळकाढूपणाचे असेल असे वाटते. यासाठी एखादी कोर्टकेस वगैरे सारखा उपाय योजणे हा मार्ग मस्त. जो काँग्रेस नेहमीच अवलंबते. फक्त कोणाकडे तरी बोट दाखवता आले की झाले. राऊतांनी बोलणी पवारांशी केली. ते आता पवारांकडे बोट दाखवत असतील. पवार बोट दाखवताहेत काँग्रेसकडे. काँग्रेस बोट दाखवतीय केरळ काँग्रेसकडे. ८. पण जास्तीचं काहीही न देता शिवसेना जवळ येत असेल तर भाजपा ही संधी साधेल असं वाटते. दीड दोन महिने फडवणीस संपले संपले असं वाटत असताना परत उभे राहतात, असं बऱ्याच वेळेस झालंय. यावेळेसही हे होऊशकते. यावेळेसही फडणवीस यांनी समारोपाच्या वेळी युतीच सरकार बनवेल असं म्हणूनच ते थांबले आहेत. ९. असंच होणं योग्य असेल. कारण राजकारणात डाव ओळखून प्रतिडाव टाकावा लागतो. बाकी सगळे गौण याचे भान राखावे लागते. जर युती तुटावी हा डाव असेल तर युती टिकवनणे हाच प्रतिडाव असतो. शिवसेना कशी वागली याबाबत सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना येणारा राग नेत्यांना पोटात ठेवावा लागतो. भाजप पुढेमागे युती तोडेलही. पण ती सोयीची वेळ ते ठरवतील. पवार साहेबांनी त्यांच्या सोयीने निवडलेली वेळ भाजपाने साधणे शहाणपणाचे ठरणार नाही. अर्थात हे सर्व राजकारणी माझ्यापेक्षा नक्कीच हुषार असणार म्हणा. :)

In reply to by शाम भागवत

चांगल्या पद्धतीनं मांडलेला अन्वयार्थ! पटतोय! :-) अडचण अशी आहे की साहेबांनी आपली वाक्यं फिरवली तर नवल वाटणार नाही. ते नेहमीच एखादी पळवाट बाळगतात परत फिरण्यासाठी. राजकीय कोलांटउड्या त्यांच्यासाठी नव्या नाहीत. सेनेचे तसे नाही. त्यांनी आक्रमकता एवढी दाखवली आणि त्यात इतकं बोलून गेलेत, की त्यातून परत मागे फिरणे म्हणजे सपशेल हार मानणे यावर शिक्कामोर्तब होईल. परत फिरायला वाट न ठेवल्यामुळे सेनेची स्थिती अडचणीची झालीये. सेनेला परत भाजपाकडे जायचं असेल तर आता त्यांना भाजपाच्या अटी मान्य कराव्या लागतील, जे काही फार सुखावह नसणार. अर्थात् तुम्ही म्हणता तसा, सेनेनं ठरवून असा प्रयत्न केलेला असेल तर ते ठीकच आहे. पण मग या पेक्षा ते एकला चलो रे मधे असते तर जास्त बरे झाले असते. कॉ/राकॉ सोबत जाऊन त्यांनी भाजपाला रान मोकळं दिल्यासारखं होईल. एकुणात सेनेला आणि भाजपला जास्त वाढू न देण्याचे साहेबांचे डावपेच यशस्वी ठरतांना दिसत आहेत.

In reply to by राघव

शरद पवारान्चे आजचे बोलणे ऐकुन शिव्सेना नक्की हताश झाली अस्णार

In reply to by ओम शतानन्द

श्री शरद पवार यानी पत्रकारांना खूष ठेवून( कोट्यातून घरे देणे सारख्या अनेक गोष्टी करून) प्रकाशझोतात राहण्याची कला चांगली साधली आहे. अन्यथा त्यांच्या इतका overrated (अवाजवी महत्त्व दिला गेलेला) राजकारणी देशात दुसरा नसेल. साहेब काहीही करू शकतात इतके भंपक वाक्य दुसरे नसेल. स्वतः तीन वेळेस मुख्यमंत्री झाले पण एकंदर कारकीर्द ६ वर्षेच होती. एकाही कारकिर्दीत सलग पाच वर्षे काही त्यांना पूर्ण करता आलेली नाहीत एवढेच नव्हे तर आयुष्यात एकदाही त्यांना स्वबळावर बहुमत मिळेल एवढे आमदार काही निवडून आणता आलेले नाही. इतक्या वेळेस त्यांनी दिल्लीत वाऱ्या केल्या आणि श्रीमती सोनिया गांधी यांच्या भेटी घेतल्या पण सोनिया गांधीनी काही त्यांना भीक घातलेली नाही. त्यामुळे संदिग्ध वाक्ये बोलून मीडिया तर्फे आपला उदो उदो त्यांनी चालवला आहे. त्यां च्याकडून काहीही ठोस येत नाही हे पाहून शिवसेनेला तोंडघशी पडल्याची भावना आलेली आहे आणि त्यांचे अनेक आमदार अस्वस्थ झालेले आहेत.

In reply to by ऋतुराज चित्रे

मुख्य मंत्री पदाची टर्म बाकी लोकांना पण करता नव्हती आली त्यात मनोहर जोशी ,अशोक चव्हाण व बाकी दिग्गज होते स्वबळावर आमदार निवडून आणणे फडणवीस ह्यांना पण एकदपण जमले नाही ते पण मोदींचा पाठिंबा असताना दर वेळी टेकू लागला

In reply to by हस्तर

हो पण मनोहर जोशी, अशोक चव्हाण किंवा फडणवीस काहीहि करू शकतात असा त्यांच्या कट्टर समर्थकांचाही दावा नव्हता किंवा त्यांचा असा उदो उदो झालेला नाही.

In reply to by सुबोध खरे

He will be back, no worries!

In reply to by शाम भागवत

मध्यंतरी मिपा वर नव्हतो .. पण आपल्या प्रतिक्रिया संयमित वाटतात ... बाकी कोणी कोणत्याही पक्षाला समर्थन करत असेल , कोणत्या हि नेत्याला समर्थन करीत असेल तरी आपण संतुलित बोलले पाहिजे हे यातून दिसतेच. Mate भिन्न असणे म्हणजे वाईट नक्कीच नाही .. त्यामुळे संतुलित प्रतिक्रिया , टोकाची भांडणे नसणे, हि चर्चे ची चांगली लक्षणे आहेत

In reply to by शाम भागवत

आणि मुद्दा क्रमांक 4 मध्ये वंचित चा मुद्दा राहिला . जसे राज che उदा , फोडा फोडी तडजोडी ची उदा आहेत .. जसा डाव आघाडी खेळली , तसाच डाव भाजपा वंचित च्या माध्यमातून खेळली असे पण नमूद करतो ...नाहीतर भाजपा चे आणखीन नुकसान हे नक्की झाले असते ..

In reply to by गणेशा

लढवलेल्या जागांनुसार पक्षांची टक्केवारीची वाट बघतोय. मग नक्की सांगता येईल. वंचितचा फायदा झाला असू शकेल पण बंडखोरीचे नुकसान त्यापेक्षा जास्त असावे हा एक अंदाज आहे. मला अभ्यास करायला लागेल. :)

In reply to by शाम भागवत

वेगळाच धागा काढतोय. २०१९ ची विधानसभा निवडणूक, मतदान टक्केवारी. तिथेच चर्चा करूयांत.

In reply to by शाम भागवत

१. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या सहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे.
असे काही नसावे. सत्तासुंदरी प्राप्त करण्यासाठी वेळ येईल तसे राजकारणी बदलतात. ठरवून असेच होईल मग मी तसेच करेन असे कधी होत नाही. त्यातही शक्यत इतक्या असतात अन इतक्या लवकर बदलतात की ते काय करत आहेत हे त्यांनाही समजत नाही. ( आकाशातला बाप त्यांना क्षमा करो.)

हा विडिओ निवडणुकीच्या धामधुकीत शिव सेनेने ने पाहणे शक्य नाही ,हा विडिओ मागचे १५ दिवस पण कोणाला सापडला नव्हता

In reply to by हस्तर

अजून कोणाला पण सापडला नव्हता, म्हंजे नक्की कोणाला? जर माझ्यासारख्या सामान्य माणसाला लक्षात राहू शकतो, तर एवढ्या मोठ्या राजकीय पक्षाला, त्यांच्या थिंक टँकला, कार्यकर्त्यांना लक्षात राहणार नाही असं तुम्हाला म्हणायचंय काय?

In reply to by राघव

राजकिय पक्षाला हजार डोळे हजार कान असतात. त्यामुळे शिवसेनेला हा विडीओ माहित होता तो सुद्धा भाजप अध्यक्षाचा होता कोणा ऐ-यागै-याचा नव्हता

तुमच्या केव्हा लक्षात राहिला ? मागचे १५ दिवस दिसला कोणाला हा विडिओ ? काल viral झालाय ,त्याच्या आधी दाखवा मागच्या १५ दिवसात

In reply to by हस्तर

हाहा.. हे चांगले आहे. मुलाखत कधीही दिलेली असो, वायरल कधी झाले ते महत्त्वाचे. शाह तर वर्षभरा पूर्वीच म्हणाले होते की निवडणूक एकट्याने लढवावी. मग तरीही सेना विश्वास का ठेवते त्यांच्यावर? दबावाचा वापर करून या ना त्या प्रकारे फायदा लाटण्याचा हा प्रकार आहे. असो. आता घोडेबाजार जवळच आहे. बघूयात.

In reply to by राघव

मुद्दा हा आहे कि हा विडिओ एवढ्या दिवसात कोणाला माहीत पण नव्हता ,भांडण झाले तेव्हा पण नाही ,मग शिव सेनेला कुठून दिसणार जर तुम्हाला एवढे दिवस दिसला नाही व काल अचानक दिसला

In reply to by हस्तर

आज संध्याकाळी ए एन आय ला अमित शहांनी दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक प्रचारसभेत देवेंद्र फडणविसच मुख्यमंत्री असतील याची वाच्यता केली असताना शिवसेनेने एकदाही हरकत का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित केला आणि आत्ता थोड्या वेळा पुर्वी उद्धव ठाकरे उपस्थित असलेल्या जाहिर सभेत देवेंंद्र फडणविस मुख्यमंत्री असतील हे सांगणारे मोदींच्या भाषणाची ऑडीओ भाजपा प्रवक्ते संबित पात्रांनी रिपब्लिक टिव्हीवर वाजवून दाखवली. त्या शिवाय आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या दाव्याची पोस्टर्स निवडणूक निकालानंतरच कशी काय लावली गेली हा देखिल प्रश्न उपस्थित केला.

महाराष्ट्रीय जनतेशी हि फसवा फसवी का चालू आहे ? अहो हे सगळं जनतेच्या भल्यासाठी आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी चालु आहे, इतकी साधी गोष्ट कळतं नाही ? :))) ५ वर्ष युतीत सडुन दाखवले, मग राजिनामे खिशातच ठेवुन दाखवले, अफजखानाची फौज असे कोणी तरी कोणाला तरी म्हणुन दाखवले इ.इ.इ आणि अनेक ! आता फक्त कुंथुन दाखवले हेच म्हणायचे बाकी ठेवले आहे ! :))) बादवे... वाचाळवीरता करायला मेंदु वापरावा लागतच नाही, हे अनेक { सर्व पक्षिय बरे का ! ] नेत्यांना २०२० समोर येउन ठेकले आहे तरी अजुन समजत नाहीये... :))) असो... भाजपा आयटीसेल काम करतोय हे असे व्हिडियो "वेळेवर" पसरले की लगेच समजते ! हा गुण त्यांच्याकडुन घेण्यासारखा आहे. हे बघा मंडळी कोण खरं आणि कोण खोटं ते मला काय बी समजत नाय बघा, म्या पडलो अडाणी माणुस... हल्लीच मी खोट बोलणारी अवलाद नाही अशी कोणी तरी स्वत: बद्धल बतावणी केल्याची अफवा माझ्या कानावर पडली होती ! अजुनही मला कळतं नाही की वरचं खरं की सध्या चाललयं ते खरं ? :))) जाता जाता :- अजित पवार पहिले अडीच वर्ष मुख्यमंत्री होतील आणि नंतरच्या अडीच वर्षाचे गाजर कोणाला तरी देण्यात येइल, शिवाय गॄहमंत्री पद आणि महसुल मंत्री पद देखिल कॉग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जाईल असे होउ शकेल का ? तुम्ही विचार करुन बघा ! ;) { टिपी म्हणुन हो... }

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Hara Hara Hara Hara Mahadev | Naan Kadavul | Ilaiyaraaja Live In Concert Singapore

माझ्या मते युती तोडणे हि शिवसेनेची गरज आहे. मुळात त्यांन्नी ती निवडणूकीच्या आधीच तोडणे अपेक्शीत होते, पण आघाडी बनल्यामुळे त्यांच्यासमोर युती करण्याशिवाय पर्याय ऊरला नाही. शिवसेना हा प्रादेशीक पक्ष आहे, त्यात आता छोटा भाऊ बनल्याने युतीत राहून हळूहळू पक्ष अस्ताला जाण्याची शक्यता जास्त. त्यापेक्षा एकदाच फारकत घेऊन आणी त्याची पुढच्या निवडणूकीत किंमत मोजून पुढे सरकणे ठाकरेंना जास्त सोयीचे वाटले असेल. ह्या सगळ्या खेळात रा.कॉ. आणी काँ. मात्र खुष असतील, पुन्हा निवडणूका झाल्यास आणी सेना भाजप वेगळे लढलयास आघाडीला पेपर सोपा जाईल.

एक गोष्ट आज दिसते आहे की छगन भुजबळ राष्ट्रवादीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. अजितदादा पवार यांचा राग त्यामुळेच आहे. शरद पवार एक दगडात अनेक पक्षी त्यातून मारणार आहेत. सेना हा अपमान सत्तेसाठी कसा मुकाट्याने झेलते अथवा नाही हे पाहण्यासारखे असेल. या सरकारचा रिमोट कुणाच्या हातात असेल आणि त्या तालावर कुणाला नाचावे लागेल याबद्दल कोणतीही शंका आता राहणार नाही.

हा व्हिडीओ 13 व्या मिनिटाला मराठी मधून नंतर 16 व्या मिनिटापासून 2 मिनिटे हिंदीतून फडणवीसचे ऐका, 27 व्या मिनिटाला उध्दवच्या तोंडून ऐका. हे लोकसभा इलेक्शनच्या वेळी युती झाली तेव्हा आहे. त्यावेळी कोणी ऑब्जेक्शन घेतले नाही कारण भाजप ला गरज होती. गरज सरो वैद्य मरो या उक्ती नुसार लोकसभेची गरज संपल्यावर सेनेला बाजू केले.

In reply to by कपिलमुनी

गूड , आता या परस्पर विरोधी दाव्यांची गोळा बेरीज मतदारांनी आणि महाराष्ट्रीय जनतेने कशी करावी

In reply to by कपिलमुनी

हा vedio येथे दिल्याने धन्यवाद . खरे तर हा vedio पण मुळ धाग्या ला वरती चिकटवला पाहिजे . आता पर्यंत मला वयक्तिक शिवसेना कदाचीत खोटे बोलते आहे अशी शंका येतो होती .. भाजपा पेक्षा शिवसेना च जास्त चुकीची वाटत होती . ह्या vedio नंतर माझे मत पुर्ण वेगळे झालेले आहे

In reply to by गणेशा

उद्धव ठाकरे = पुरुषोत्तम राम आणि अमित शहा = चाणक्य कृष्ण ? असे कूणा कुणाला वाटतय ? ज्यांना असे वाटते त्यांच्यासाठी प्रश्न पुरुषोत्तम राम आणि चाणक्य कृष्ण समोरासमोर आल्यास बरोबर कोण या यक्ष प्रश्नाचे हिंदूत्वीय उत्तर काय ?

In reply to by जॉनविक्क

तुम्ही तितके महापराक्रमी नसाल कृष्णनीती वापरावी लागेल. बाकी रामावर द्यूत खेळात अन्याय झालाअसता हे सत्य पण त्याने पत्नीस पणाला कधीही लावले नसते हे ही तितकेच सत्य कारण त्याने प्रसंगी चुकीचे असूनही विवेकपूर्ण निर्णयच घेतले, उदा. एकपत्नीव्रत , धोब्यामुळे सीतेला पुन्हा वनात सोडणे, वनवासात जायचा निर्णय घेणे, वालीचा वध करणे वगैरे वगैरे वगैरे... थोडक्यात **मधे लिटरली दम नसेल तर रामासारखे आचरण ठेवायचा सामान्य व्यक्तीने प्रयत्न करू नये, असेल तर कृष्णासारखा कपटीपणा दाखवू नये इतके साधे सोपे उत्तर आपल्या यक्षप्रश्नाचे आहे.

In reply to by माहितगार

तुम्ही हे का बोलता आहात तेच कळाले नाही .. Vedio मुळे कोण खरे खोटे बोलते ते कळाले . खरे बोलणारा राम च असतो असे काही नाही आणि राजकारण करणारा कृष्ण असतो असे हि काही नाही ...

दैनिक सकाळमधली ही ९ नोव्हेंबरची बातमी. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा डाव: उद्धव ठाकरे लोकसभेच्यावेळी मी युतीसाठी दिल्लीला गेलो नव्हतो, ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी त्यास नकार दिला. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते. याची आठवण शहा यांना करून दिली असता त्यांनी ते मान्य केले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून ही चर्चा झाली होती. नंतर अमित शहांनी फडणवीसांना याबाबत माहिती दिली. भाजपत याबाबत नाराजी पसरू नये यासाठी आत्ता ही माहिती जाहीर करू नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असे फडणवीस म्हणाले. आता ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला. हे आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते." ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ उद्धव यांच्या सदर दाव्याचे खंडन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे अजुन वाचायला मिळाले नाही.

दैनिक सकाळमधली ही ९ नोव्हेंबरची बातमी. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा डाव: उद्धव ठाकरे लोकसभेच्यावेळी मी युतीसाठी दिल्लीला गेलो नव्हतो, ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी त्यास नकार दिला. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते. याची आठवण शहा यांना करून दिली असता त्यांनी ते मान्य केले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून ही चर्चा झाली होती. नंतर अमित शहांनी फडणवीसांना याबाबत माहिती दिली. भाजपत याबाबत नाराजी पसरू नये यासाठी आत्ता ही माहिती जाहीर करू नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असे फडणवीस म्हणाले. आता ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला. हे आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते." ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ उद्धव यांच्या सदर दाव्याचे खंडन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे अजुन वाचायला मिळाले नाही.

दैनिक सकाळमधली ही ९ नोव्हेंबरची बातमी. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गोड बोलून शिवसेनेला संपवण्याचा डाव: उद्धव ठाकरे लोकसभेच्यावेळी मी युतीसाठी दिल्लीला गेलो नव्हतो, ते मुंबईत आले होते. चर्चेत आम्हाला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी त्यास नकार दिला. शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचे मी बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिले होते. याची आठवण शहा यांना करून दिली असता त्यांनी ते मान्य केले. शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत बसून ही चर्चा झाली होती. नंतर अमित शहांनी फडणवीसांना याबाबत माहिती दिली. भाजपत याबाबत नाराजी पसरू नये यासाठी आत्ता ही माहिती जाहीर करू नका. वेळ आली की मी माझ्या पक्षाला सांगेन, असे फडणवीस म्हणाले. आता ते शब्दखेळ करण्यात हुशार आहेत. त्याचा अनुभव मी आत्ता घेतला. हे आम्हाला गोड बोलून संपवण्याचा प्रयत्न करत होते. देवेंद्र फडणवीस माझे चांगले मित्र होते. त्यांच्याकडून मला हे अपेक्षित नव्हते." ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ उद्धव यांच्या सदर दाव्याचे खंडन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे अजुन वाचायला मिळाले नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

उद्धव यांच्या सदर दाव्याचे खंडन देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे अजुन वाचायला मिळाले नाही. संजय राऊत सामन्यातून ( जे शिवसेनेचे अधिकृत मुखपत्र आहे) गेली पाच वर्षे दर एक दिवसाआड भंपक दावे करत आले आहेत . त्याचे खंडन करत बसले तर राज्य कसं चालवायचं. तिथे केंद्रात श्री राहुल गांधी राफेल मध्ये घोटाळा झाला म्हणून दोन वर्षे कंठशोष करत आले. त्यांचा प्रत्येक दावा फेटाळत बसले असते तर आतापर्यंत राफेल कागदावरच राहिले असते. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सज्जड दम देऊन गप्प बसवले आहे. SC lets off Rahul Gandhi in contempt case, but makes serious comments against former Congress chief https://www.firstpost.com/india/supreme-court-verdict-live-updates-cji-…

जनता जनार्दन ने डिंग्या मारणाऱ्या भापा आणि सेनेला एका फटक्यात भुतलावर उतरवले आणि आयुष्यात पुन्हा महाराष्ट्राचे एग्जिट पोल करणार नाहीत इतपत चॅनेल वाल्यांचे डोळे पांढरे केले . भापा आणि सेना आता पर्यंत स्वबळा वर कधीच सत्ता स्थापन करू शकली नाही व त्यांना युती करण्याशिवाय पर्याय नाही तरी ते पाया ची नखे जमीन वर खरडून एकमेंकावर भूंकत आहे आणि त्यांचे तमाम समर्थक सोशल मिडियावर आपलाच पक्ष कसा योग्य आहे हे दुसऱ्याला शब्दलांछन करुन पटवून देत आहे . 30 वर्ष एकत्र राहून एकमेंकाना संपविन्यासाठी अनैसर्गिक युती करण्याचा प्रयत्न दोघांनी केला , तरी 'आमचाच पक्ष खरा !!! ' यावरून वाद . मी तर या दोन्ही पक्षाला वठणी वर आणण्यासाठी यांच्या विरोधातच मतदान करणार .

In reply to by शाम भागवत

होणारच !!! भापा सेने ने क़ाय दिवे लावले आहेत ते आपण पाहतोय , मग मतदारांनीं समंजसपणा का दाखवावा ??? घरकाम करणारे , रिक्शावाला , दूकानदार अशा ज्या लोकांशी आपला दैनंदिन संपर्क येतो त्यांच्या समोर भापा सेने चा विषय काढला की बघा कसे ते दोन्ही पक्षानां कचा कच शिव्या घालतात !!!!! आणि मला तर वाटतंय एग्जिट पोल वाल्यांनीं मिपावरील भाजप समर्थकांचे प्रतिसाद वाचून सर्वे केला असेल म्हणून तोंडावर पडले असतील :) :) :) कट्टर मुस्लिम देशानीं वेढलेल्या ईसरायल मध्ये सुद्धा खुप मुश्किल ने एखादी पार्टी बहुमत ने सरकार स्थापन करण्यात यशश्वी होते . आताचे पंतप्रधान सुद्धा बहुमत सिद्ध करण्यात सिद्ध करू शकले नाही . थोडक्यात सोशल मीडियाने फक्त मोदीजीनां पुन्हा संधी दिली पण फर्नांडिस आणि आठा / उठा ला ग्राउडं रियालीटी ओळखूनच घटस्फोट घ्यावा !!!

In reply to by ट्रम्प

आणि मला तर वाटतंय एग्जिट पोल वाल्यांनीं मिपावरील भाजप समर्थकांचे प्रतिसाद वाचून सर्वे केला असेल म्हणून तोंडावर पडले असतील :) :) :)
:)

प्रा.डॉ. सरांनी म्हटल्याप्रमाणे उत्तम चर्चा झाली आहे. खरे तर हा धागा काढण्या आधी काही पुढचे प्रश्न मला पडले होते. इतर धाग्यांवर चर्चा झाली आहे का माहीत नाही. झाली असल्यास दुवे द्यावेत नसल्यास उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. * असे गृहीत धरा की शिवसेना + राष्ट्रवादी + काँग्रेस आघाडी बनवून सत्तेत येण्यास यशस्वी होतात १) पण धर्मनिरपेक्षता वाद आणि हिंदूत्व विषयक भूमिका संसदेत परस्पर विरोधी मतदान आणि भुमिका घेतात असे झाल्यास काँग्रेसच्या पुढच्या लोकसभेतील निवडणूकीत -आणि ज्या राज्यांमध्ये अद्याप काँग्रेस सरकारे निवडून येतात- त्यांचा हक्काचा अल्पसंख्यांक मतदार वर्ग काँग्रेस सोबत राहील की काँग्रेसची साथ सोडण्याची शक्यता वाढेल २) समजा काँग्रेसने राष्ट्रीयस्तरावर शिवसेनेस वेगळी हिंदूत्ववादी भूमिका घेण्यास प्रोत्साहन देऊन लोकसभेत भाजपा विरुद्ध शिवसेनेचे उमेदवारही उभे केले तर (महाराष्ट्रा व्यतरीक्त ) इतर राज्यातील किती हिंदूत्ववादी मतदार वर्ग उद्धव ठाकरेंच्या बळावर काँग्रेस फोडू शकेल. ३) जर शिवसेनेचा हिंदूत्ववाद चुकीचा नाही तर संघ आणि भाजपाचा हिंदूत्ववाद चुकीचा कसा याचे कोणते उत्तर काँग्रेस पुढील काळात पुढे करेल - या मुद्द्यावर शिवसेना काँग्रेस सोबत जाऊनही काँग्रेसचा प्रचार खोडण्यात भाजपाला मदत होईल का ? ४) दुसर्‍या बाजूस शिवसेनेच्या हिंदूत्ववादाशी काँग्रेससाठी तडजोड केल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा किती हिंदूत्ववादी मतदार तरी सुद्धा शिवसेने सोबत राहील किती भाजपाकडे वळेल ? ५) धर्मनिरपेक्ष असलेले इतर दोन पक्ष पर्याय उपलब्ध असताना नव्याने अंशतः धर्मनिरपेक्ष होऊ घातलेल्या शिवसेनेच्या वेगळ्या अवताराची / पर्यायाची महाराष्ट्रार राकॉ आणि काँग्रेसला स्पर्धा होईल की शिवसेनाच मागे पडेल बेसिकली या नव्या होऊ घातलेल्या राजकीय समिकरणाने कुणाची कोणती घरे आणि कोणते घाट बदलतील

शिवसेनेने किंवा कोणत्याही पक्षाने येथली चर्चा तिर्‍हाईत दृष्टीने वाचायला हवी. योग्य अंजन डोळ्यात जाईल. (बाकी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाला कोणीही वाली राहिला नाही याची खंत आहे)