Skip to main content

शिव सेनेचे काय होणार ?

लेखक हस्तर यांनी गुरुवार, 31/10/2019 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय २०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल

वाचने 59270
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

शिवसेनेत फूट पडून २०-२५ आमदार भाजपाच्या बाजूला येतील, हीही शक्यता आहेच की. फडणवीस शांत आहेत असे दिसते आहे पण ते काही शांत बसलेले नसणार.

किती तरी वर्ष महारष्ट्र नी एकपेक्षा अनेक पक्षांची सरकारे बघितली पण एवढं नालायक पण कधीच बघितला नाही. फक्त दुसरे च सत्र चालू आहे एकसंघ राजवटीचे . सेना आणि bjp ह्या राजकीय पक्षांचे. किती ही गैर जिम्मेदार वागणूक. ह्यांना राज्याच्या हिता पेक्षा स्वतःच्या इगो ची जास्त काळजी आहे. हिंदू वादी स्वतःला label चिकटवून घेतलं आहे आणि राज्यातील बहुसंख्य असलेल्या हिंदू समाजाच्या हाताशी खेळायला ह्या दोन नालायक राजकीय पक्षांना काहीच वाटत नाही. Bjp सर्व दोष सेनेला देवू शकत नाही bjp सुद्धा तेवढीच जबाबदार आहे. राष्ट्रपती राजवट लागू होवून नंतर निवडणूक झाली तर bjp आणि सेना ह्या दोन्ही पक्षांचे नामोनिशाण ह्या राज्य मधून मिट वले जाईल.

शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांकडून विचारणा करण्यात आली आहे. आता शिवमहाआघाडी होणार काय ?

In reply to by धर्मराजमुटके

पवारांनी पाठिंब्या साठी खालील अटी घातल्या आहेत. १. हा पोरखेळ नाही.स्वतः मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी लागेल. उंटावरुन शेळ्या हाकता येणार नाहीत. २. तुमच्यावर दोन रिमोट कन्ट्रोल असतील. एक माझ्या कडे आणि दुसरा सोनियाकडे. ३. तुमच्या कुत्र्याचे मुस्काट दाबावे लागेल. ४. मागच्य वेळेस भाजपाच्या विरुद्ध निवडणूक लढत असताना केंद्रातील तुमच्या मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगितले नव्हते. तसे आता चालणार नाही. आधी अरविंद सावंतांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल.

टीव्ही वरील सोपं ऑपेरा ची दुकान जी चालतात / कथा रखडत जातात त्या मागचे मुख्य कारण असते कि आधीच करार करताना/ किंवा कुटुंबामध्ये गोष्टी ठरवताना स्पष्टपणा नसणे .. गोष्टी संदिग्ध ठेव्याच्या ,, मग नंतर हे घोळ.. युती मध्ये कोणाचे किती आले तर सत्ता कशी वाटपायची यावर काही नक्की ठरले नवहते काय? कि दोन्ही पक्षांना हे आधीच ठरवणे सोयीचे नवहते जे काय असेल हा तमाशा व्हायला नको होता - शिवसेनेला आपण जिकली, कशी भाजपाची जिरवली असे आत्ता वाटत असले पण त्यांचा "चंद्रशेखर " होऊ शकतो आणि त्यांची सत्तेसाठी लाचारी उघडी पडू शकते हे कळत नाही का ? आधीच बाळासाहेबांनंतर मराठी माणसाच्या मनातून शिवसेना उतरली त्यात हे राडे - मग भाजपने करायला तरी काय पाहिजे होत? कधी नव्हे ते १००+ जागा मिळाल्या ते सुद्धा महाराष्ट्रात ते करताना शिवसेनेचे लोढणे होईल असे वाटले नसले दुर्दवी . आता निवडणूक झालाय तर सुक्या बरोबर ओलं जळत तशी परस्थिती भाजपची होणार - राष्ट्रवादी ला फायदाच बसून गम्मत बघा, अजूनही जनतेने त्यांना स्वीकरलेलं नाहीये पण या उन्मादात लोक ते विसरणार . - काँग्रेस काय चालू आहे .. दुकान एकूणच थंड आहे नाहीतरी

हो बरोबर भाजपला भोवलेली अजून एक चूक.. सातारकर भाजपात? लोक हसत राहिली ,,त्यांनी खरा तर "स्वयंभू" स्वतत्र राहाव कोणत्या पक्षात कसे काय जमणार ! वंशजांचं!

शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या मर्सिडीझ साठी पठाणी व्याजावर कॉ+ रा कॉ महा आघाडी कडून कर्ज घेतले आहे. त्याचे पठाणी व्याज त्यांना दर महिन्याला हप्त्याहप्त्याने द्यावे लागणार आहे. त्याचे पहिले डाऊन पेमेंट अरविंद सावंत या अवजड उद्योगमंत्र्यांच्या राजीनाम्याने भरावे लागले आहे. (महाआघाडीने मुळातच शिवसेनेस रालोआ( NDA) मधून बाहेर पडा असे निर्वाणीचे पत्र दिलेले आहे.) यानंतर आम्ही म्हणून तिथेच गाडी चालवायची, आम्हाला नको त्या रस्त्यावर ती न्यायची नाही, अशा अनेक अटी घालून ते शिवसेनेस जेरीस आणून शेवटी उद्धव ठाकरे यांचे एच डी कुमारस्वामी करणार यात शंका नाही. श्री मोदी आणि शहा हे बोलत नाहीत परंतु कधीही "गोष्टी विसरत नाहीत". तेंव्हा फेरनिवडणूक होतील तेंव्हा शिवसेनेस परत आपल्या बरोबर घेतील याची शक्यता फारच कमी आहे. त्यातून शिवसेनेने हिंदुत्ववादाची गाय सोडून निधर्मांधांची बकरी पिळायला घेतली आहे. तेंव्हा उद्या लग्नात आम्हाला गोमांसाचा नैवेद्य हवा म्हणून ते अडून बसले तर शिवसेनेची फार मोठी अडचण होणार आहे. आज केवळ भाजपला विरोध म्हणून काँग्रेसने त्यांना टेकू दिला तरी उद्या तो नक्कीच काढून घेणार आहेत कारण मतभेद "मूलभूत विचारात" आहेत. ( येथे कोण बरोबर कोण चूक असा मुद्दा नाही प्रत्येक जण आपल्या जागी बरोबर असेल). बाकी शरद पवार यांच्या इतका धूर्त आणि पाताळयंत्री नेता महाराष्ट्रात नाही. सर्वात प्रथम ते शिवसेनेकडून किमान समान कार्यक्रम लिहून मागतील. त्यानंतर गृह ( आपले खटले प्रलंबित करण्यासाठी) किंवा महसूल( पैशावाचून सगळंच अडतं) सारखी महत्त्वाची खाती मागतील. मुळात जर राज्यपालांनी त्यांच्याकडे सरकारला साथ देणाऱ्या पक्षाच्या आमदारांची यादी लेखी स्वरूपात मागितली तर या कटकटी मर्सिडीझ मध्ये बसायच्या अगोदरच सुरु होतील. त्या तून काँग्रेसची( राष्ट्रवादीची संस्कृती वेगळी नाही) संस्कृती हि च "खा आणि खाऊ द्या" अशी असल्यामुळे काँग्रेसचे आमदार आपली अर्थपूर्ण कामे करण्यासाठी सेनेच्या मंत्रांकडे अशक्य मागण्या करतील आणि त्या पूर्ण करणे कठीण आणि न करणेहि कठीण. उदा. एखाद्या रस्त्याचे कंत्राट आपल्या माणसाला देण्याचे ठरवले असेल आणि एखादा आमदार ते कंत्राट माझ्या माणसालाच मिळायला हवे म्हणून अडून बसला तर असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती होईल. आतापर्यंत अशी कामे झाली नाही तर भाजपच्या नावाने सामना मध्ये गरळ ओकून गप्प बसता येत होते. आता "सरकारही आपलेच आणि वृत्तपत्रही आपलेच." श्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवल्याने (आम्हाला अडीच वर्षे मुख्यमंत्री पद आणि ते सुद्धा पहिली अडीच वर्षेच मिळाले पाहिजे अशी मागणी) त्यासाठी द्यायला लागणारी किंमत त्यांना आयुष्यभर छळत राहील अशीच परिस्थिती आहे. मी बाळासाहेबांना वचन दिले आहे कि एक दिवस मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल हे वारंवार म्हणत होते. तो आत्ताच आणि आजच झाला पाहिजे का?मुळात आपले १२४ पैकी केवळ ५६ आमदार निवडून आले तर मुख्यमंत्री आमचाच आणि तो आत्ताच असा हट्ट धरणे किती समंजसपणाचे आहे. आणि हि पहिलीच वेळ आहे का? पूर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हता का? शिवसेना पाच वर्षातच संपणार होती का? आता महाआघाडी मुंबई महापालिकेत सुद्धा भाजपला सोडचिट्ठी द्या म्हणून हटून बसणार तिथे २२७ पैकी शिवसेनेच्या ८४ आणि भाजपच्या ८२ जागा आहेत. तेथे आता काँग्रेसच्या ३१ आणि राकॉच्या ९ नगरसेवकांच्या "आधारावर" शिवसेनेस काम करावे लागेल आणि हे लोक सुद्धा आता आपला वाटा ओरबाडून मागतीलच. उद्या एखाद्या विधेयकाला भाजप ने विरोध केला तर ते पास करण्यासाठी हे ४० नगरसेवक शिवसेनेस त्यांच्याच न्यायाप्रमाणे ५०-५० "द्या" म्हणून सांगतीलच. आणि हा खेळ जोवर शिवसेना सरकार चालवेल तोवर ते खेळणार कारण "आहेत त्या दिवसात मिळेल तितके पोट भरून घ्या" हीच मनोवृत्ती असणार आहे. एकंदर असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ अशी स्थिती करून ठेवली आहे.

In reply to by सुबोध खरे

खरे डॉक्टर, तुमच्या या संदेशाशी सहमत आहे. शिवसेनेने काँग्रेस व/वा पवारांचा पाठींबा आजिबात घेऊ नये या मताचा मी आहे. त्यापेक्षा सेनेने कुणालाही बाहेरून पाठिंबा द्यावा आणि दोनेक वर्षांत पक्ष मजबूत करून मध्यावधी निवडणुका घ्याव्यात. मात्र एक गोष्ट इथे प्रामुख्याने उठून दिसते, ती म्हणजे शिवसेना वगळता बाकी कोणीच मुख्यमंत्रीपदाचा काटेरी मुकूट धारण करायला तयार नाही. त्यामुळे बाहेरून पाठिंबा द्यायचा तर तो कोणाला हा यक्षप्रश्न आहेच. म्हणून बहुधा शिवसेना मुख्यमंत्रीपदाबाबत आक्रमक दिसते आहे. काहीही असलं तरी पुढील दोन वर्षं सेनेस पक्ष मजबूत करायला भरपूर मेहनत घ्यावी लागेल. आ.न., -गा.पै.

बहुतेक बारामतीचे काका , कॉम्ग्रेस सोबत संसार थाटतील सेना त्याना बाहेरून पाठिंबा देईल.

In reply to by विजुभाऊ

असे होणार नाही. बारामतीचे काका इतके दुधखुळे नाहीत. कारण चुकून माकून हे सरकार उभे राहिले तर पहिल्या काही दिवसातच कोसळेल उंट होऊन गाडी ओढण्यापेक्षा उंटाच्या गाडीत बसून उंट हाकणे जास्त सोयीचे, आरामाचे असते एवढा अनुभव तर राजकारणात त्यांना आहेच. मग (शिवसेनेस) त्यापेक्षा भाजपच्या सरकारात उपमुख्यमंत्रीपद (आणि इतर मंत्रीपदे) काय वाईट होते? "तुला नाही, मला नाही, घाल कुत्र्याला" असे भांडण काय कामाचे

In reply to by विजुभाऊ

असे होण्याची शक्यता कमी आहे. मग ज्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदा साठी एवढी अडेलतट्टू भूमिका घेतली तिचे काय? चर्चेद्वारे महायुतीत १६ मंत्रिपदे अशीही मिळाली असती बाहेरून पाठींबा दिल्यावर तीपण मिळणार नाहीत. मंत्रिपद मिळवण्याची महत्वाकांक्षा असलेल्या व निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांत असंतोष पसरेल व फाटाफूट होण्याची शक्यताही वाढेल. एकवेळ भिन्न विचारसरणीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर कॉंग्रेसच्या पाठींब्यावर बेभरोशी-अल्पजीवी सरकार स्थापन करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतलेला शिवसेनेला परवडेल पण राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या संयुक्त सरकारला बाहेरून पाठींबा देणे त्यांना कदापि परवडणार नाही. मी मतदानाचा पहिल्यांदा अधिकार बजावल्या पासून बाळासाहेबांच्या शिवसेनेचा कट्टर मतदार होतो. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंची निवड बाळासाहेबांनी केली तेव्हापासून कट्टरपणा नाहीसा होऊन केवळ शिवसेनेचा सहानुभूतीदार मतदार राहिलो. पूर्वी संघटनेच्या जोरावर शाखा शाखांमधून चालणारी शिवसेना आता सामना मधून वाचाळवीर चालवत असलेले बघून तर आजपर्यंत सेनेशिवाय कुठल्याही पक्षाला मत न दिलेल्या माझ्यासारख्या कित्येक बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्या मनात तिच्याविषयी घृणा उत्पन्न झाली नसेल तरच नवल. वानखेडे स्टेडीयमची खेळपट्टी उखडून झाल्यावर पुढे बरीच वर्षे काहीतरी उखडण्यासाठी हात शिवशिवत असलेल्या काही नतद्रष्टांनी आता संघटनेचा पायाच उखडून टाकला आहे. उद्धव ठाकरेंना विनाशकाले विपरीत बुद्धी झाली आहे एवढे नक्की.

In reply to by गड्डा झब्बू

अहो असे वादग्रस्त विधान सार्वजनिक न्यासावर करायचे नसते. बाळासाहेबांची पुण्याई, आई भवानीचा आशीर्वाद, मराठी बाणा आणि स्वाभिमान कुठे गेला?

In reply to by सुबोध खरे

आमच्या नेते मंडळींनी बेताल विधाने करण्यास मागेपुढे पाहिले नाही मग आम्ही मतदारांनी आमच्या भावना व्यक्त करण्यात का मागे हटावे. >>>बाळासाहेबांची पुण्याई, आई भवानीचा आशीर्वाद, मराठी बाणा आणि स्वाभिमान कुठे गेला? >>> हे सर्व काही बाळासाहेबांबरोबरच पंचतत्वात विलीन झाले असे म्हणायची पाळी आणली आहे आमच्यावर त्यांच्या वारसदारांनी. कुठे आमचे नित्यस्मरणीय बाळासाहेब आणि कुठे हा नित्यतिरस्करणीय संजय राउत. यापुढे भाजप, शेकाप, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, मिम, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी गेलाबाजार नोटा समोरचे बटण दाबीन पण शिवसेना आणि मनसेला कधीही मत देणार नाही.

निवडणूकी नंतर फडणवीस मुख्यमंत्री होणार हे भाजपा ने प्रचाराच्या वेळी अनेकदा जाहिर पणे सांगितले होते. अगदी मोदी आणि शहांनी सुध्दा जाहीर सभेत बोलताना फडणवीसच मुख्यमंत्री होतील असेच म्हणाले होते. "मी परत येईन" अशी भाजपाची जाहिरातही बर्‍याच वेळा पाहिली होती. ज्यावेळी त्यांच्या गळ्यात गळे घालून निवडणुक लढवली तेव्हाच का बरे अक्षेप घेतला नाही? मग जनतेची फसवणूक कोणी केली? सत्याची बाजू कोणाची आहे? भाजपाने ५०:५० चे आश्वासान दिले तरी केव्हा होते? २४ ऑक्टोबर च्या आधी की नंतर? पैजारबुवा,

वरचे सगळे नविन रिप्लाय वाचले.. त्यातल्या बर्याचस्या रिप्लाय मध्ये , भाजपा बरोबर आणि शिवसेना, कॉन्ग्रेस , पवार सगळे चूकच हेच जाणवले.. असो. थोड्या वेगळ्या कोणातुन लिहितो. मुळात गेल्या ५ वर्षापुर्वी भाजपा आणि शिवसेनेची भांडणे चव्हाट्यावर आली होतीच. त्यात खुद्द सेनाप्रमुखांनी युतीत आम्ही २५ वर्षे सडलो असे वक्तव्य केले होते. त्यामुळे मुळात युती करण्याअगोदर भाजपा आणि शिवसेना यांना हे मुद्दे आठवलेच पाहिजे होते.. मग चुक शिवसेनेची असली तर भाजपाची पण तितकीच होती. बहुमता मध्ये जर युती आली तर आपसात बोलुन थोडे नमते घेवुन थोडे अधिक-उने चे राजकारण त्यांना जमले पाहिजे होते. भाजपाला विकासाच्या मुद्द्यावर निवडनुक लढवता आली नाही, त्यामुळे त्यांचे समर्थक कितीही ही भाजपाच्या बाजुने बोलत असले तरी विकासाच्या बाजुने काहीच जास्त बोलायला नसल्याने एकटे लढल्यास आपला पराभव होउ शकतो, असे भाजपा ला कदाचीत आधीच वाटले असेल असे मला वाटते. त्यामुळेच त्यांनी युती केली असेल. त्यामुळे युती न करता भाजपा १४५+ राहिली असती हे मला पटत नाही, उलट आता आलेले काही सीट्स जे ४-५ हजाराच्या आतिल फरकाने जे आलेत ते सुद्धा पडले असते. त्यामुळे पराभव होईल असे आधी वाटत असेल तर निदान सत्ता स्थापन होतच नसेल तर २.५ वर्षे मुख्यमंत्री पण इतर खाती आपल्या कडे ठेवुन त्यांनी जनतेचा आदर ठेवला असा संदेश द्यायला हवा होता. आणि जर बहुमतात येवुन सत्ता स्थापण करायचीच नसेल तर मग वेगळेच लढायचे होते ना ? म्हण्जे शिवसेना आपल्याला फरफटत पाठिंबा देइनच ही भावनाच कशाला ठेवली पाहिजे होती.. म्हणजे सोबत फक्त स्वताच्या पदाच्या लोभासाठीच असा ही संदेश समाजात जातोच. त्यामुळे शिवसे शिवसेने मात्र जी भुमिका शेवट पर्यंत घेतली, ती माझ्यासाठी आश्चर्यकारक होती, कारण माझय म्हणण्याने, भाजप + शिवसेना हेच सत्तेत बसतील असे वाटत होते. मुळात त्यांनी येव्हड्या टोकाची भुमिका घेण्यात कदाचीत २०१४ पासुनची त्यांची भाजपा बरोबर चाललेली फरफट असेल असे आता वाटत आहे. त्यामुळे हे कारण पुढे करुन आम्हाला तुम्हीच नको असेच ह्यांच्या मनात मागे असेल, मुख्यमंत्री पद हे कारण ही असु शकते.. आणि ही शक्यता नाकारता येत नाही.. शरद पवार हे तळागाळात पोहचलेले नेत्रुत्व आहे, त्यांचा उभा पक्ष फोडुन , त्यांचे राजकारण संपले अशी वल्गना भाजपा करत राहिली.. कोणी कितीही धुर्त, पाताळयंत्री म्हणाले तरी आज या देशात त्यांच्या इतका राजकारणी माणुस शोधुन सापडणार नाही... राष्ट्रावादी संपली, अतिआत्मविश्वास, अहम हे सारे त्यांनी एका वारामध्ये जमिन दोस्त केले.. आणि वयक्तीक पणे मला तरी ते योग्यच वाटते आहे. गोव्यात, मेहबुबा मुफ्ती बरोबर भाजपाने काय केले हे आपण पाहिलेच आहे, त्यामुळे ते तेंव्हा पाताळयंत्री, साम दाम दंड भेद वापरणारे वाटत होतेच,, त्यामुळॅ आपण काही केले तरी चालतय, मात्र इतर धुर्त . पाताळयंत्री हे बोलणे मला योग्य वाटत नाही. त्या पेक्शा , सगळे एकाच माळेचे मणी असे मला वाटते.. ( थोडेशे वयक्तीक : जरी यावेळेस मी राष्ट्रावादी ला वोट नाही करु शकलो, तरी मला नक्कीच शरद पवार यांचा एक राजकारणी म्हणुन आदर वाटतो, असेच माझे मत बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या बद्दल पण होतेच. हे तिनही माझे सर्वात आवडीचे नेते आहेत. आणि सद्य परिस्थीत अहंकाराला जमिनीवर आणण्यासाठी शरद पवारांची गरज होतीच) मुळात आपल्या मित्रपक्षांबरोबर व्यवस्थीत राहुन नंतर येणार्‍या काळात सत्ता स्थापुन पवारांना आणि कॉन्ग्रेस ला वर डोके न काढुन देण्याची ही संधी भाजपा आणि शिवसेने ने गमावली आहे. आणि त्यामुळे आपल्याला विकासा वर बोलता न येणे, राष्ट्रावादी ला नावे ठेवुन त्यांचेच नेते पळवणे , आणि आपण हात वर केला तरी निवडुन येइल अशी भावना ठेवणे यामुळे मतदारांनी ही वेळ भाजपा वर आणली आहे असे माझे स्पष्ट मत आहे, भले शिवसेना हे त्याचे कारण झाले असले तरी त्यांना पण ही परिस्थीती माहित आहे..

In reply to by गणेशा

टक्केवारीच्या आधारावर बोलायचे झाले तर भाजपा व शिवसेना वेगवेगळी लढली असती तर त्या दोघांची मते वाढली असती व मनसे, राष्ट्रवादी व काँग्रेसची मते कमी झाली असती अस दिसतंय. तसेच पुढच्या वेळेस भाजपा व शिवसेना वेगवेगळी लढली तर दोन्ही पक्षात बंडखोरी अजिबात होणार नाही. पाय खेचण्याचा प्रश्नच शिल्लक राहणार नाही. हे दोन्ही यावेळचे प्रश्न पुढच्या निवडणूकीत दोघांचेही सुटणार आहेत. :) मी मायबोलीवर पुण्याच्या स्थितीबद्दल बोलताना जे लिहिल आहे ते खाली डकवतोय. ते उदाहरण म्हणून पहायला हरकत नाही. असाच अभ्यास खरतर इतर ठिकाणांचा केला पाहिजे. पण अजून निवडणूक आयोगाने सांख्यकीय डाटा उपलब्ध केलेला नसल्याने महत्वाची बाब म्हणजे लढवलेल्या जागेनुसार मिळालेली मतांची टक्केवारी काढता येत नाही. उदा. २०१४ ला लढवलेल्या जागांनुसार भाजपाला 31.15% मते मिळाली होती तर सगळ्या महाराष्ट्राचा विचार करता ती 27.8% होती. यावेळेस महाराष्ट्राचा विचार करता ती २५.७% आहे पण लढवलेल्या जागांनुसार अजून टक्केवारी कळलेली नाही. असो. ---------------------------------------------------- शिवसेनेची भरपूर मते (अंदाजे ८०% तरी) मनसे कडे वळली आहेत. २०१४ ला १००९४१ (५१.१५%) मते होती मेधाताईंना. ती थोडी १०५२४६ (५२.५%) वाढली आहेत यावेळेस. मात्र म॑नसेच्या शिंदेसाहेबांची मागील निवडणूकीतील २१३९२ वरून थेट ७९७५१ वर गेली आहेत. पुढच्या निवडणूकीत भाजप व शिवसेना वेगळे लढले की मनसे कडे गेलेली मते परत शिवसेनेकडे येतील. मग मनसे परत ७९७५१ वरून २१३९२ वर. त्याबरोबर पाटलांचा लीड परत मेधाताईं एवढा म्हणजे ६५००० होईल. २०१४ साली शिवसेनेला ३६२७९ मते होती. त्यातली फारच थोडी पाटलांकडे आली आहेत. त्यावेळेस इतर दोन भिडूंनी मिळवलेली मते खालीलप्रमाणे काँग्रेस ६७१३ राका २८१७९ ट्क्केवारीच्या आधारावर अभ्यास करताना सापडले आहे हे. काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी एकदिलाने निवडणूक लढवलीय. शिवसेना व भाजपाने एकमेकांचे प्रचंड पाय ओढले आहेत. भाजपाची मते काँगेस व राष्ट्रवादीला गेलेली दिसत नाहीयेत तर ती नोटा किंवा अपक्षांकडे जास्त गेली आहेत. या निवडणूकीत एकमेकांचे पाय ओढले तरी पुढच्या निवडणुकीत स्वतःच्या पायावर उभे राहूनच निवडणूक लढवायला लागणार आहे. एकंदरीत धमाल चाललीय. मस्त ध्रुवीकरण चाललंय.

- हातात आलेली संधी दोघांनी घालवली हे मान्य आणि परत त्यात तमाशा झाला - भाजपाला हि सेनेची गरज होती हा हि तर्क पटला परंतु शेवटी आकडे बघता सर्वांपेक्षा दुप्पट जागा जिंकलेल्या पक्षाने मुख्यमंत्री पद का घालवावे याचे उत्तर "भाजपणाने नमतं घयायला पाहिजे होत" असे जे म्हणतात त्यांनी दयावे ! हे म्हणजे मी २० रुपये घालतो तू ८० घाल पण घेतलेल्या लाडवातील ८० मी खाणार असले - ५ वर्षे नांदताना किती त्रास दिला.. तोड्याची होती ना युती - मला तरी शिवसेनेचा आततायी पणा वाटतोय आता उगाच मराठी शिवसेना / मोदी शाहह गुजराथी म्हणून भाजप गुजराथी असले विचित्र तर्क लढवणे हे शोभत का - राहता राहिला पवार साहेबानाचा बद्दल चा "आदर",, हं काय बोलायचं शिकलेले आणि मुरब्बी माणूस सुरवातीला जनतेला घेऊन चालणार नेता खूप आदर होता पण जातीचं राजकारण तसेच खुसपट काढत देशासाठी जेवहा ३७० किंवा पाकिस्तान विरुद्ध घेतलेल्या खंबीर भूमिकेला सुद्धा विरोध या गोष्टी पाहून आता तो आदर राहिला नाही . - घराणेशाही बद्दल ओंगळ पणा चालू आहे त्यात एकट्या पवारांना दोष देता येणार नाही .. थोडा फार कम्युनिष्टांच्यात ( शिल्लक असतील तर) आणि भाजपत ( मूळ) कमी एवढेच - भाजप वर जनता नाराज आहे हे खरे आणि त्यानं झटका दिला हे पण चांगले पण जनतेला ना राष्ट्रवादीला १००+ दिल्या ना काँग्रेस ला. हे कसे विसरयाचे ? - भाजपाची महाराष्ट्रातील आजची परिस्थिती पाहून वाजपेयींचे १३ दिवसाचे सरकार आठवते !

चौकस जी तुमचे मते कळाली आणि ती ही त्या त्या मुद्द्यांवर योग्य आहेतच. - शिवसेना जास्त चुकीची होती हे मान्य आहेच, पण फक्त सीट्स जास्त म्हणुन मुख्यमंत्री आमचाच पाहिजे नाहितर युती नकोच हे पण माझ्या मते चुकीचेच. १०० सिट्स असणे म्हणजे आम्हीच विजेते हे ही चुकच. मुळात विकासावर न बोलता, विकास न दाखवता १०० प्लस येवु शकतात हेच चुकीचे असे माझे वयक्तिक मत. उलट विकासावर लढले असते आणि मग १०० प्लस आणले असते तर लोकांच्या दृष्टीने तेच मुख्यमंत्री पदाला योग्य हे ते म्हणु शकले असते. पण हे १०० प्लस कसे आले, शिवसेने पेक्शा जवळ जवळा ३० जागा जास्त लढुन, इतर मित्र पक्षांना पण आपल्या चिन्हावर लढण्यास सांगुन. आणि राष्ट्रवादीतील आमदारांना फोडुन आपल्याकडे आणुन. बर हे नेते नुसते आले का ? तर त्यां बरोबर त्यांचे काही कार्यकरते, नगरसेवक असली लाईनच आत आली. मग १०० प्लस आणले हे जरी आकडे म्हणुन खरे असले तरी, नैतिकता, विकासावर निवडुन आणले, कोर भाजपाचे किती आणले आणि निवडुन येणार्या मुळीतुन किती आले हे ठोस ते तरी सांगु शकतील का हा प्रश्न आहेच. त्यामुळे मोठा पक्ष असला म्हणुन, तोच पुर्ण राज्यभर मान्यता पावलेला पक्ष असा अर्थ नाहीच होत. असो. हा वादादीत मतांचा मुद्दा असु शकतो यावर थांबतो. -- खिशात राजिनामे असुन युती तोडता आली नाही, कारण त्यांना माहीत होते १२२ पासुन बहुमत जास्त दूर नाही त्यामुळे रडतखडत जगा आणि योग्य वेळी डाव टाका, ते चुकीचेच असले तरी आता हेच राजकारण चालते , मग हे चुकीचे म्हणायचे असेल तर २०१४ ला पवारांचा घेतलेला पाठिंबा, गोव्याचे सरकार, काश्मिर चे मेहबुबा बरोबरचे सरकार ही कुठली नितिमत्ता ? त्यामुळे शिवसेना चुक समोर दिसत असली तरी त्याचे मुळे हे २०१४ पासुन होणार्‍या फरफटीत आहे असे मला वाटते.. -- गुजराथी, मराठी, हिंदु, मुसलमान असल्या गोष्टींचा विट आला आहे जनतेला, अहो विकासा वर बोला नाही तर घरी बसा, २०१४ ला कॉग्रेस - रा.कॉ. ला घरीच बसवले होते, उलट आता ३० % पण लोकल विकासावर भाजपा सामोरे आले असते तरी तेच जिंकले असते. -- पवार , ३७० ला राष्ट्रवादीने विरोध केला नाही, ना त्या विरोधात त्यांनी मतदान केले. (पाकिस्तान बद्दलचा मुद्दा मी कधी ऐकला नाही, मध्यतंरी शरद पवार काहीतरी त्यावरुन बोलत होते ते, पण मी ऐकले नाही). पवारांना विरोध करुन,स्वता मोदी ही २०१४ नंतर बारामतीला गळाभेट घेवुन गेलेच, त्याबरोबर भाजपा सरकारनेच त्यांना देशातील २ नंबरची पदवी दिली, आणि वसंत साखर कारखान्याजवळ मोदिंनी त्यांना राजकिय गुरु असे हि संबोधले, नव्हे त्यांचय करंगळीला धरुन राजकारण शिकले असे ही वाक्य जोडले. त्यामुळे पवार यांच्या बद्दल विरोधक पण सिस्थीत राहतात, तर मग त्यांच्याबद्दल एक राजकारणी म्हणुन ओढा वाढतोच. (वयक्तीक: मी बारामतीचा, माझ्या घरातील, माझ्या आजुबाजुला असणार्‍या त्या(९० च्या दशकात) तरुंणा ना दिलेला रोजगार, शेती बद्दल आणि त्या पुरक उद्योग धंद्याबद्दल शेतकर्‍यांना दिलेले ज्ञान आणि ते उद्योग, तेथील स्तिथी, ह्यामुळे पण कदाचीत त्यांच्याबद्दल मत असण्याचा भाग असेलच. तरीही असे समजु नये मी डोळे झाकुन मत देतो, अटलबिहारी वाजपेयी यांच्या साठी मी शरद पवार यांच्या विरोधात बारामती मतदार संघात मत दिलेले मला आजही आठवते. असो अटल बिहारी मोठे की शरद पवार यात मी पडणार नाही, दोन्हीही माझ्या साठी चांगलेच, आणि त्याच बरोबर मुंबईत राहिल्याने पाहिलेले बाळासाहेब ही आणि त्यांचे बोलणे मला आवडीचे) - घराणे शाही, कोण मोठे कोण छोटे असल्या पेक्षा आपण काय केले आणि काय करणार यावरच वोट दिले पाहिजे... बाकी काय .

In reply to by गणेशा

शरद पवार साहेब व मोदीजी हे दोघे सध्याच्या काळातले खरे मुरब्बी नेते आहेत. संघटन कला, प्रशासन कौशल्य, इव्हेंट मॅनेजमेंट, माणसांची पारख, स्मरणशक्ती व हजरजबाबीपणा वगैरे गुण दोघांचेही तोडीस तोड आहेत. परमेश्वराने त्या दोघांना राजकारण करण्यासाठी खूप गुणसंपत्ती बहाल केलेली आहे व त्या दोघांनी स्वबळावर त्यात वाढही केलेली आहे. फक्त त्या दोघांची राजकारण करण्याची पध्दत वेगवेगळी आहे. पवारसाहेब तात्कालीन फायद्याला महत्व जास्त देतात तर मोदीजी दिर्घकालीन फायद्यासाठी अल्पकालीन फायदा सोडायला तयार असतात असे मला वाटते. त्याचा परिणाम असा होतो की, पवारांचे बरेच सहकारी ५ वर्षात बदलेले दिसतात. तर तसे काही घडताना मोदींजींच्या बाबतीत दिसत नाही. थोडक्यात राजकारण करण्याच्या पध्दतीत दोघेही आपापल्या जागी श्रेष्ठ आहेत. असो.

In reply to by गणेशा

पूर्वग्रह स्पष्ट दिसतो आहे. पण हे १०० प्लस कसे आले, शिवसेने पेक्शा जवळ जवळा ३० जागा जास्त लढुन, पण ३०च जागा (१९%) जास्त लढून ४९ (८७%) जागा जास्त कशा आल्या हो? (१०५ वि ५६) हवेतून पडल्या का? आणि मतांची टक्केवारी भाजप २५.७५ % आणि शिवसेना १६.४१ % म्हणजे ५७ % मते जास्त मिळाली भाजपला. बाकी जाणत्या राजाने "पावसात भिजून एवढं दैदिप्यमान यश" प्राप्त केलं वगैरे वगैरे मीडियात आपला उदो उदो करून घेतला आहे. त्यांना जागा "५४ च" आहेत आणि मतांची टक्केवारी" १६. ७१ टक्के "आहे. आकडेवारी खोटं बोलत नाही. शब्द कसेही फिरवा.

In reply to by हस्तर

राष्ट्रीय आणि स्थानिक प्रश्न यावर मतदार फार वेगळा विचार करतात. असं नसतं तर राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि आता महाराष्ट्र येथे प्रचंड मोदी लाट असताना भाजपला सत्तेपासून वंचित का राहायला लागले असते. हा पण काकासाहेबांनी आपलाच "उदो उदो" करण्यासाठी केलेला "प्रचार" आहे आणि आश्चर्य म्हणजे भले भले त्याला बळी पडताना दिसतात. असे नसते तर काँग्रेसला कुणीही पावसात भिजत प्रचार न करता ४४ जागा मिळाल्या असत्या का? काही महिन्यापूर्वी बालेकिल्ल्यातील एकुलती एक जागा (नांदेड) (४८ पैकी) केवळ मिळवणारा काँग्रेस पक्ष आज किंग मेकर म्हणून काका साहेबाना "पण" खुंटीवर टांगून कसा बसला आहे?

In reply to by गणेशा

-"- बोलता, विकास न दाखवता १०० प्लस येवु शकतात हेच चुकीचे असे माझे वयक्तिक मत..." ह कौल जन्तेन दिला जन्तेल कोइन्ग्रेस्स पहिजे अस्ति तर चित्र उलत अस्त ! - पवार साहेबांच्या पूर्वीच्या कार्याबद्दल (पुलोद वैगरे) आदर आहेच, जसा यशवंरावबदल होता पण आणीबाणीत ते जेव्हा मूग गिळून गप्प बसले तेव्हा आदर कमी झाला तसेच पवारांनी महाराष्ट्रात जे घाणेरडे जातीचे राजकारण केले त्याबद्दल काय? ३७० बद्दल बोलले नाहीत मग काय उपकार केले? एवढया मोठ्या "राष्टवादी" नेत्याने यात सकारात्मक भाग घेतला असता तर मान जास्त वाढला असता . - भाजपचे सोयीचे राजकारण ( मेगा भरती , मुफ्ती वैगरे) हे गैर आहेच भाजप ची काँग्रेस कडे वाटचाल असेही वाटते कदाचित आधी सत्ता मगच कार्यक्रम राबवणे शक्य यामुळे तसे केले असेल... काँग्रेस ची अमर्याद सत्ता सहन करणाऱ्या आंधळ्या जनतेला आता भाजपाची अमर्याद सत्ता बोचू कशी शकते ? थोडी तरी संधी द्या ? खुलासा मी भाजपचा समर्थक नाही आणि आंधळा भक्त तर नाहीच नाही फक्त सुदृढ लोकशाही मध्ये सतत एकाच पक्ष ( काँग्रेस) आणि एकाच विचार हे यौग्य नाही आणि भाजप ने काही यौग्य निर्णय+ वाजपेयी, अडवाणी मोदी सारख्यांची देशनिष्ठ यामुळे सध्या पारडं त्यांचं झुकतं माझ्य मनी... एवढेच

हा अत्यन्त सौम्य भासणारा व्यक्ती वयक्तिमत्व शिवसेनेस पूरक नसूनही सगळ्यांना पुरून उरला आणि आता त्याला पक्षाबाहेरील शतृसोबत दोन हात करायची संधी मिळते आहे, काय होईल ते काळच जाणो पण भाजपशी काडीमोड घ्यायची धमक दाखवून त्याने कोणतेही राजकीय नुकसान करून घेतले नाही हे 100% सत्य.

ती काँगी वा राकाँगी ला एका मर्यादेपलीकडे जुमानेल हा प्रश्नच येत नाही. नेत्यांमागील विविध गोष्टींचा ससेमीरा चुकवणे वा लांबवणे यापलीकडे शिवसेना फार भीक घालणार नाही आणी इतक्या तरुण वयात सत्ताकेंद्र बनायची संधी तो अथवा आदित्य सोडत असेल तर तर त्यांनी राजकारण सोडून द्यावे. मागच्या वेळी भाजपाने युती करता करता तोडली त्याचा अतिशय व्यवस्थित वचपा शिवसेनेने काढला आहे. याक्षणी सरकार स्थापन झाल्यानंतरच्या अडचणी हा मुद्दाच नाही मग भलेही 13 दिवसात सरकार गडगडले तरीही

अगदी शेवटच्या घटकेला पवारांनी तथाकथित वाघाचा 'पोपट' केला. ;)) सत्ता स्थापन करायच्या आधी ही अवस्था, पुढे सत्ता स्थापन केल्यावर काय होईल.

शिव सेनेचे काय होणार ? सार्वजनिक वस्त्रहरण झाले ! :))) स्वतःच्या पायावर कुर्‍हाड कशी मारुन घ्यायची याचे प्रात्यक्षिकच सेनेने करुन दाखवले ! :))) P1 P2 जाता येता भगवा आणि शिवाजी महाराज यांच्या नावाचा बाजार मांडणारे आता भगवा दहशतवाद असा जगावेगळा शोध लावणार्‍यांच्या पक्षाशी घरोबा करायला चाललेले दिसले आहेत ! गळ्यात गमछा आणि खाली लुंगी घालुन केम छो ची पोस्टरबाजी करणारी ही मंडळी मराठी जनते समोरच आता उघडी पडली आहेत !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Fire Power Demonstration By Sudarshan Chakra Corps Of Indian Army With BM 21 & Pinaka Missiles

आपण बाळ ठाकरे यांचा पप्पु आहोत असे उद्धवने सिद्ध केले आहे.

१८+ "लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार" चा गुन्हा दाखल करावा शिवसेने ने कांग्रेस-राष्ट्रवादी वर

In reply to by एकुलता एक डॉन

काम के ना काज के, दुश्मन अनाज के ..... काल सकाळीच त्या राण्यांच्या जेष्ठ पुत्रांनी व्यक्तव्य केले होते कि या संज्या राऊतला लवकरच शिवसैनिकच चोपतील म्हणून.... त्याचा एवढा धसका घ्यायचा का राव सेनेच्या या वाचाळवीर ढाण्या वाघाने? आमच्या भाषेत एक म्हण आहे ......XXची नाही पत, पण नाव गणपत... अगदी तस्से झाले हो या राउताचे.

In reply to by सुबोध खरे

सगळेच लटकत बसले आहेत हे खरे. भाजपा मनादेशा ऐवजी जनादेशाचा मान राखायला शिकणार का हा प्रश्न आहे. पंजाब, काश्मीर, बिहारमध्ये तर त्यांना काहीच वाटले नाही महाराष्ट्राबाबत दुजाभाव का ? आख्या आशियामधील सर्वोत्कृष्ट पक्षीय कार्यालय दिल्लीत बांधणाऱ्या, व विनाकारण मुंबईतील रिजर्व बँक ऑफिस अहमदाबादला हलवणाऱ्या भाजपा फक्त निरंकुशतेचा खंदा समर्थक असेल तर ते राज्यपातळीवर योग्य वाटत नाही