लेखक क्रांती यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले. मिपा दिवाळी अंक २०१९ अनुक्रमणिका कुंभमेळा अरुण परतता की चंद्र मंदावलेला इथुनतिथुन साऱ्या सारख्या दु:खवेळा जिथुन हरवले मी आणि अस्तित्व माझे, चिरविव्हल व्यथांचा जन्म हा कुंभमेळा कलकलकल वाहे द्वेषगंगा विखारी दुरुन निघुन जाता पावले खेचणारी नितळ निखळ पाणी शोधता ठाव नाही खळबळत उराशी पातके येति सारी घणघणघण घंटा वाजती यातनांच्या ठणकठणक झांजा पाशवी वासनांच्या कलकलत पिशाच्चे वेढती जीवनाला किरकिरत सभोती सावल्या भावनांच्या अनवरत मनाला आस खंतावण्याची प्रखर तमतळाशी जात मंदावण्याची भिजुन विझुन गेली चेतना, जिद्द मेली अबल क्षत परांनी उंच झेपावण्याची विटत सुकत गेला निश्चयाचा तजेला अगणित तमछाया घेरती जाणिवेला जिथुन हरवले मी आणि अस्तित्व माझे, चिरविव्हल व्यथांचा जन्म हा कुंभमेळा अनुक्रमणिका वाचने 5250 प्रतिक्रिया 7 प्रतिक्रिया माई, तुझ्याकडलं शब्दवैभव अफाट यशोधरा शनिवार, 26/10/2019 13:59 माई, तुझ्याकडलं शब्दवैभव अफाट, अचाट आहे! किती प्रत्ययकारी लिहितेस.. मानवाचे सारे आयुष्य कवितेत पाषाणभेद शनिवार, 26/10/2019 15:48 मानवाचे सारे आयुष्य कवितेत उतरले आहे. खुप सुरेख! पद्मावति शनिवार, 26/10/2019 16:07 खुप सुरेख! सुरेख बरखा गुरुवार, 31/10/2019 22:55 नितळ निखळ पाणी शोधता ठाव नाही खळबळत उराशी पातके येति सारी खुप सुरेख! सुंदर वृत्तबद्ध कविता चित्रगुप्त रविवार, 03/11/2019 00:16 वृत्तबद्ध कविता हल्ली फार कमी वाचायला मिळतात. अप्रतिम रचना झालेली आहे. हे अगदी ओळखीचे वृत्त आहे (वदनि कवळ घेता... किंवा .... कलकलकल हंसे फार केले सुटाया...) परंतु त्याचे नाव विसरलो आहे. कृपया कळवावे. मालिनि वृत्त बहुदा श्वेता२४ बुधवार, 06/11/2019 11:50 कविता खुप आवडली उत्तम रचना. सुरेख. अलकनंदा मंगळवार, 19/11/2019 13:53 उत्तम रचना. सुरेख.
माई, तुझ्याकडलं शब्दवैभव अफाट यशोधरा शनिवार, 26/10/2019 13:59 माई, तुझ्याकडलं शब्दवैभव अफाट, अचाट आहे! किती प्रत्ययकारी लिहितेस..
सुरेख बरखा गुरुवार, 31/10/2019 22:55 नितळ निखळ पाणी शोधता ठाव नाही खळबळत उराशी पातके येति सारी खुप सुरेख!
सुंदर वृत्तबद्ध कविता चित्रगुप्त रविवार, 03/11/2019 00:16 वृत्तबद्ध कविता हल्ली फार कमी वाचायला मिळतात. अप्रतिम रचना झालेली आहे. हे अगदी ओळखीचे वृत्त आहे (वदनि कवळ घेता... किंवा .... कलकलकल हंसे फार केले सुटाया...) परंतु त्याचे नाव विसरलो आहे. कृपया कळवावे.
प्रतिक्रिया
माई, तुझ्याकडलं शब्दवैभव अफाट
मानवाचे सारे आयुष्य कवितेत
खुप सुरेख!
सुरेख
सुंदर वृत्तबद्ध कविता
मालिनि वृत्त बहुदा
उत्तम रचना. सुरेख.