मनाच्या कुपितले या सदरातला हा सलग तेरावा लेख
पाऊस दाटलेला माझ्या घरावरीही हा
काल हे गाणे पुन्हा ऐकले. ऐकून बरे वाटले बाकी मी मराठी गाण्यांचा डाय हार्ड फॅन आहे हे तुम्ही जाणताच, त्यामुळे असे अर्थवाही, माझ्यासारखी पाल्हाळ न लावता
थोडक्यात अर्थ सांगणारे गाणे आवडणारच ना , बाकी मी काल झालेल्या पहिल्या पावसात देखील मनसोक्त भिजलो आता टाइप करताना देखील १० -१५ दा शिंकतोय.
हा आता तुम्हाला हा प्रश्न पडला असणार म्हणा की तू पावसात भिजलास त्याचा आम्हाला काय फायदा. तुझ्या अंगात मस्ती होती म्हणून भिजलास आता भोग फळ कर्माची. होय हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मला अचानक माझा स्वतःचा अभिमान वाटला का तर आजही मी माझ्यातलं लहानपण जपू शकलो, आणि कॉलेजकुमार आहे याचा बाउ न करता मनसोक्त भिजून आजारी पडू शकलो, सातवी आठवीतल्या मुलांबरोबर खेळलो देखील . बाकी माझे बरे आहे म्हणा मला पावसात भिजण्याची संधीतरी मिळते. नाहीतर मुंबैकर, जरा पाऊस पडला की यांच्या काळजात धस्स... असो पण त्याला नैसर्गिक नव्हे बातम्यांचा पाऊस कारणीभूत आहे असे मला वाटते. हा यावरून आठवले सध्या अवकळी पावसाचा काळ आहे ना आणि हे अवकळी पाऊस त्रास देतातच ना. खरेतर पाऊस ही गोष्ट अशी आहे की ती प्रत्येकवेळी फायद्याची असतेच असे नाही
आता बघा ना रविवारी पाऊस पडला तर तो झक मारायला कोणाच्या फायद्याचा ठरणार आहे, च्यायला एक सुट्टी बुडली म्हणून आपण शिव्याच घालणार ना, किंवा तुम्ही ट्रॅफिकमध्ये आहात आणि सुरू झाला पाऊस तर काय ये रे ये रे पावसा म्हणत बसणार नाही ना...
हा बाकी आपण घरात असताना पाऊस आला. भजी खाऊनं झाली की आपल्यातला कवी जागा होतो ही गोष्ट वेगळी पण असू दे की हो अहो जिथे साहित्य संमेलनाला अमेरिकेत जावे लागले तीथे असे आपल्यासारखे कवीच साहीत्यविश्व तारणार तेव्हा चालायचेच, आपल्यात लपलेला सुप्त राक्षस असतो तो पडतो कधीकधी बाहेर आणि महत्त्वाचे म्हणजे त्याचा त्रास आपल्याला कुठे होतो, आता कोण कुठला मी, जरा पावसात भिजलो म्हणून शिरिश कणेकरांसारखे लिहायला लागलो ,आता मला काही जमत नाही ही गोष्ट सोडा. पण वाचायचा त्रास तुम्हीच घेताय ना मग मला काय पडली आहे त्याची....
बाकी यावर्षी गोरगरीबांना सुखावणारा पाऊस पडो वा न पडो हा अवकळी पाऊस धुमाकुळ घालणार हे नक्की... अहो असे आश्चर्याने काय वाचताय मी काय भविष्यवेत्ता नाही जरा पी सी वरून उठा बाहेर बघा केवढा पाऊस पडतोय
कुठे काय विचारता अहो जरा टीव्ही लावा की बघा केवढ्या बातम्यांच पावुस पडतोय अगदी उत्तर प्रदेशातून पडतोय. आयला समजले नाही काय आता चॅनेल सर्फ करताना कुठे तरी तुम्ही मतदरसंघांची लक्षणे (भाकिते) पाहिले असतीलच व ऍज युजवल तेथे उत्तर प्रदेशातील गेला बाजार बिहारातील काही चालू असेल आहे की नाही मॉडर्न पाऊस. च्यायला आपण हा पावुस बिनभोबाट सहन केला म्हणून आपल्याला काही नाही (बक्षीस हो) आणि नको त्या जागी पाऊस पाडुनही (ते मध्ये कृत्रीम पावसाचे झालेले तसे)त्या चॅनेलवाल्याना पैसे.. मानले बाबा, पण यात आश्चर्य ते काय जिथे महात्म्याच्या कपड्यांचा लिलाव होतो आणि जनतेला व्यसनाला लावून मिळालेल्या पैशातून एखादा आपल्याच वस्तू कारण नसताना दुसऱ्याकडून विकत घेतो . त्या देशात हे म्हणजे काय कीस झाड की पत्ती बाकी आता एक १० दीवसात बाजार भरणार आहे मोट्ठा इंडीयन पळपुटा लवाजमा (आय पी एल)म्हणून, तिथे अगोदरच पाऊस पडलेला आहे पैशांचा पण तो आपल्याला दिसला नाही ना( सरकार ज्या प्रकारे योजनांचा पाऊस पाडतेना तस होत म्हणे तो असे मला बातमीदारा़कडून समजले) म्हणून आता धावांचा पाऊस पडणार आहे म्हणे आणि त्यासाठी खास परदेशातून तज्ञांची टीम बोलवली आहे म्हणे त्यामुळे यशाची १००००००००००००% खात्री, शिवाय भारतीय जमीन उपजावू नाही असा आदेश पवार साहेबानी दिल्यामुळे आता त्यासाठी जंगलाची निवड केलेली आहे बाकी बायका आय पी एल बघतात कारण त्याना तो युवराज किंवा धोनी आवडतो ना म्हणून पण पुरुषाचे काय म्हणून तेथे उत्तम उत्तम नृत्यांचा पण पाऊस पडणार आहे म्हणे त्यामुळे आता आपण टीव्हीवर बघून ठरवू की पाऊस बघू भारी आहे की नाही(तेवढाच चान्स मारुन घ्यायचा) . हा विसरलोच की सध्या भारतात इंडीयन पोलिटीकल लीगपण सुरू आहे ना, आयला मग इथे तर पाऊसच पाऊस -भांडणांच पाऊस, आश्वसनांचा पाऊस राजकीय खेळ्यांचा पाऊस. आता सगळेजण एकच म्हणणार.. जेथे जाइ तेथे पाऊस सोबती..... बाकी आता अजून एक पाऊस जोरात सुरू आहे.. लेखांचा पाऊस, प्रत्येक जण केतकर झाला आहे आणि प्रत्येकाला एका एका पक्षाने विकत घेतले आहे त्यामुळे काय सुंदर लेखांचा पाऊस पडतो आहे, आणि हो हा पाऊस विशिष्ट प्रकारचा आहे बरका म्हणजे तो वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या वेळी पडतो म्हणजे एका गावचे(पेपरातले) दुसऱ्या गावात(पेपरात) एक दोन दिवसानी जशेच्या तसे येते अर्थात वाढलेल्या शुद्धलेखनाच्या चुकांसह(माझ्यासारखे, पण माझ्याकडे मनोगत जाणणारा शुद्धलेखन चिकित्सक तरी आहे त्यांचे काय) ... हा आणि हो सध्या अजून एक पाऊस पडतोय तो म्हणजे मेल्सचा. समजा तुम्ही भाजपा वा तत्सम पक्षाचे असाल तर गांधीविरोधी मेल येइल आणि गांधीवादी असाल तर पण गांधींचीच मेल येइल पण वरुणची शेवटी गांधीना पर्याय नाही म्हणे.......... बाकी हा पाऊस सध्या फार जोरात आहे याची जाणीव आम्हाला जास्त होत आहे कारण सध्या आमचा मेलबॉक्स असा पुर्ण भरला आहे .हा सध्या आणखी एक पाऊस चालू आहे अगदी तुमच्या शेजारी वा तुमच्या घरातच चालू आहे वैयक्तीक खरडींचा, त्याचे काय आहे सध्या मंदी चालू आहे. त्यामुळे संगणकावर काहीच काम नाही. बर पैसा भरती आहे की कंपनी मग करा टाइमपास, यु नळीवर तरी कीती वेळ फुकट व्हीडीवो बघणार मग येतात त्रास द्यायला पण तात्यांसारखांचा करडा वॉच असल्याने त्यांचे जास्त चालत नाही हा भाग वेगळा
पण या सगळ्याचे वैशिष्ट म्हणजे हे सगळे पाऊस वळिवाचे आहेत, म्हणजे काय तर कधी पडतील कधी कमी होतील आणि कुठे पडतील हे साक्षात देवदेखील सांगू शकत नाहीत.(नो वॉरंटी) पण सध्या एक मोसमी पाऊस पडतो आहे हा मोसम दर पाच वर्षानी येतो त्याला पैशाचा पाऊस असे म्हणतात. या पावसात मात्र सगळ्याना भीजता येते अगदी गुपचुपपणे आणि हो हे बाकीचे पाऊस थांबतील तरी पण हा पावुस थांबणार नाही कारण हा पावुस विचार करून पाडला जातो, आणि झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही हे आपण जाणतोच तेव्हा जोपर्यंत एका पेगवर मते वीकली जातात तोपर्यंत हा पावुस पडत राहणार आहे अगदी कोणी जगभरातले सगळे शास्त्रज्ञ आणले तरी हा पावुस सतत पडत राहणार आहे त्याना पण तो थांबवता येणार नाही....
बर आता हे पाऊस पुराण थांबवतो, कारण यापैकी एखाद्या पावसात तुम्ही भिजून घ्याल असे मला माझे मन सांगत आहे तेव्हा उगाच मध्ये कशाला या, जावा मजा करा खुप भीजून घ्या, हा काळ तुमचा माझा प्रत्येकाचा आहे तेव्हा भीग जावो
आणि हो एक विशेष सुचना पावसात भिजताना थोडे पाणी नदीत पण जाइल याची व्यवस्था करा कारण मग ते पाणी नदीत आणि मग गंगेत जाइल आणि मग हे सुगीचे दीवस संपले की नंतर वाहत्या गंगेत हात धुवायला गंगा वाहती राहील बाकी चलतो
"हे गंधीत वारे फीरणारे, घन झरझर उत्कट झरणारे........................ '
थांबा थांबा फाट्यावर मारू नका जातो बाय..........................
विन्या भाकीतवाला
वाचने
2792
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
आभार
In reply to छान by योगी९००
ठीक
ह्म्म.. ते
वैयक्तीक
In reply to ह्म्म.. ते by भाग्यश्री
विनायक ने
हं, आत्ताच
निषेध ! निषेध !! निषेध !!!