गंमत घ्यावी..
ज्या प्रश्नांना उत्तर नसते, वा ज्यांचे ना उत्तर सुचते,
चौरस घेउन कागद काही, लिहून घ्यावे सुबक नेटके.
करून होडी त्या सा-यांची, पाण्यावरती सोडुन द्यावी.
काठावरती बसून आपण, त्या होडीची गंमत घ्यावी..
कुणी खोडकर खट्याळ मुलगा त्या होडीला उचलुन घेइल.
हसेल क्षणभर.. पान जाळिचे शीड म्हणूनी वरती ठेविल.
फुंकर घालुन हलके हलके पाण्यामध्ये लोटुन देइल ..
त्या पानाचा भार केवढा?? इवली होडी कशास साहिल?
डुबकी मारील एखादी वा लटपट लटपट पुढेहि जाइल..
नवीन पाणी नवा किनारा, दूरदूर वा-याने न्यावी ..
काठावरती बसून आपण, त्या होडीची गंमत घ्यावी..
बैरागी कुणि घाटावरचा, त्या होडीच्या घड्या उघडुनी,
ओल्या भिजल्या शब्दांनी तो भिजवुन घेइल अपुली वाणी.
वैशाखाच्या वणव्यामध्ये गाइल मग तो पाउसगाणी.
त्या गाण्यांचे मृद्गंधासम, वारा घेउन येइल अत्तर..
सूरांमध्ये, गंधामध्ये सापडेल बघ तुजला उत्तर!
नवीन होडी पुन्हा एकदा..पुन्हा एकदा सोडुन द्यावी..
काठावरती बसून आपण त्या होडीची गंमत घ्यावी..
वा, वा. कल्पना फार आवडल्या.
भावार्थ खरेच सुंदर ..
वाह ...
वाह. खासंच!!
विनाउत्तराच्या अथवा उत्तर
सुन्दर कविता
+1
अप्रतिम
मनापासून धन्यवाद सर्वांनाच.
सुंदर कल्पना!
प्राची अश्विनींच्या कवितांचा सुगंधही सर्वदूर पोहोचू देत
खूप खूप धन्यवाद माहितगार...
सुरेख
सुरेख!!
छान कविता. कल्पनाही खूप
वाह
तुमच्या सर्वांच्या