आज १६ डिसेंब्रर २०११. आज १९७१ च्या पाकिस्तान युद्धातील भारतिय विजयाला चार दशके झाली.
३ डिसेंबर १९७१ रोजी पाक सरकारने युद्धाला सुरुवात केली. पाकी हवाईदलाच्या विमानांनी आपल्या ११ हवाई तळांवर आणि रडार केंद्रांवर हल्ले चढविले आणि पाठोपाठ भारताला युद्ध घोषीत करावे लागले आणि या युद्धाला सुरुवात झाली. १३ दिवस चाललेल्या युद्धात पाकला नामुष्की पत्करावी लागली, बांगला देश हे नवे राष्ट्र जन्माला आले. मोठ्या वल्गना करणार्या कुरापती पाकला अवघ्या १३ दिवसात दाती तृण धरुन शरण यावे लागले. ले. ज. ए.ए.के. नियाझी यांनी ढाका येथे १६ डिसॅंबर रोजी शरणागती पत्करली, ९०,००० पाक सैन्य शरण आले.
या युद्धात पाकतर्फे भारतावर दबाव आणण्यासाठी अमेरिकेचे सातवे आरमार आले होते. एंटरप्राईज या युद्धनौकेचा मोठा गाजावाजा झाला होता मात्र इंदिराजींच्या मुत्सद्देगिरीमुळे त्या आरमाराला हात चोळीत जावे लागले.
सॅम माणेकशा, 'स्पॅरो' जगजीतसिंग अरोरा, अॅडमिरल नंदा आणि एअर चीफ मार्शल पी सी लाल यांच्या अधिपत्याखाली भारतिय सेनांनी पराक्रम गाजविला आणि अवघ्या तेरा दिवसात पाकचा निकाल लावला. या युद्धात अनेक भारतिय सैनिकांना व सेनाधिकार्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. या युद्धातील असामान्य पराक्रमासाठी मेजर होशियार सिंग, सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल (मरणोत्तर), लान्स नाईक अल्बर्ट एक्का (मरणोत्तर) व फ्लाईंग ऑफिसर निर्मजित सिंग सेखों (मरणोत्तर) यांना परवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. पैकी अरुण खेत्रपाल केवळ २१ वर्षांचा व अवघ्या सहा महिन्यंपूर्वी सैन्यात अधिकारी म्हणुन दाखल झाला होता. बसंतरच्या निकराच्या युद्धात प्राणांची पर्वा न करता लढताना युद्धाच्या अखेरच्या दिवशी त्याला हौतात्म्य प्राप्त झाले. त्याची आई आज ८९ वर्षांची आहे, तिच्या डोळ्यातले अश्रू आजही खळत नव्हते. मेजर होशियारसिंग यांचा मुलगा सैन्यात ले. कर्नलच्या हुद्द्यावर आहे. आय बी एन लोकमतवरील कार्यक्रमात त्यांना व या युद्धात पराक्रम गाजविलेल्या अनेक अधिकार्यांना पाहायची संधी मिळाली.
युद्ध झाले तेव्हा मी लहान होतो. मात्र या युद्धाच्या अनेक आठवणी आहेत. रोज रेडीओवरच्या बातम्या, सकाळी बाबा वर्तमानपत्र वाचत असताना डोके घालुन घालुन बातम्या व फोटो पाहायची उत्सुकता, शाळेत एकमेकांशी युद्धाच्याच गप्पा आणि 'आपणच जिंकणार' असा एकमेकांना दिलेला दिलासा, संध्याकाळची काळोखी - युद्धकाळात मुद्दाम केलेला अंधार, मोटारींनाही महामार्गांवर दिवे न लावण्याच्या सूचना, मुंबईवर हवाई हल्ल्याच्या अफवा आणि आकाशात उडालेले लाल दिवे, युद्ध जिंकल्यावर शाळेत सर्वांनी केलेला जयघोष, मग अनेक दिवस रेडीओवर येणार्या भारतिय सैनिकांच्या पराक्रमाच्या हकिगती...
काही काळातच '१९७१ चे अभिमन्य' या नावाचे एक पुस्तक वाचनात आले होते. लेखक/ लेखिका आठवत नाही मात्र मेजर रमेश दडकर, कॅप्टन प्रकाश पेठे, फ्लाईट लेफ्टनंट भडभडे अशा अनेकांच्या पराक्रमाच्या कथा त्यात होत्या. रविवारी रेडीओवर लागणार्या 'गंमत जंमत'कार्यक्रमात ऐकलेली आय एन एस कुकरी या विनाशिकेचे अधिपत्य करणार्या व पाकिस्तानी पाणबुडीने केलेल्या हल्ल्यात बुडालेल्या 'कुकरी' बरोबर जलसमाधी घेणार्या कॅप्टन महिंद्रनाथ मुल्लांची कथा चटका लावुन गेली होती.
आज चाळीसाव्या स्मृतिदिनी १९७१ च्या सर्व वीरांना विनम्र अभिवादन
वाचने
12100
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
ले. ज. ए.ए.के. नियाझी यांनी शरणागती पत्करली,
त्या सुमारास माझा जन्मही झाला
....१९७१ चे युद्ध - पाकवरील विजयाचा ४० वा स्मृतिदिन..!!!!
अभिवादन!
छान लेख. माझी भर/दुरुस्त्या.
वस्तुस्थिती ही की ३
In reply to छान लेख. माझी भर/दुरुस्त्या. by मन१
असहमत
In reply to छान लेख. माझी भर/दुरुस्त्या. by मन१
माझ्याकडच्या माहितीची भर घालतोय.
In reply to असहमत by सर्वसाक्षी
विनम्र अभिवादन.
१९७१ चे अभिमन्यु चे लेखक सु ग
In reply to विनम्र अभिवादन. by आत्मशून्य
पुढाकार....
लेख मस्तच
काय पडले पदरात?????? बांगला
काय साध्य झाले?
In reply to काय पडले पदरात?????? बांगला by अविनाशकुलकर्णी
खास करून शेजार्यांशी
In reply to काय साध्य झाले? by चौकस२१२
या युध्दातील सर्व वीरांना
काहीही हं
In reply to या युध्दातील सर्व वीरांना by जाई.
बांगलादेश..
भारताने पुढाकार घेण्याचा निर्णय काही महीने आधीच घेतला होता.
?
छे !छे !
त्या युद्धाचं प्रत्यक्ष वर्णन
अतिशय माहितिपुर्ण धागा अन
मुजीबुर रहमान यांची हत्या का
काही प्रश्न चिन्ह
मूर्ख पनाची व्याख्या इथे आहे
प्रेयसी पत्वण्यास भाडोत्री गुंड