Skip to main content

जाईची कळी

लेखक जागु यांनी मंगळवार, 24/03/2009 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
जाईची कळी सायंकाळी उमलली रात्र सुगंधी करण्या काळोखी जागली वार्‍यांच्या मंद झुळकेने लाजली दवबिंदुंच्या स्पर्शाने शहारली चंद्रप्रकाशी पुलकीत झाली रातराणी सखी जाहली पक्षांच्या भुपाळी त डोलली केशरी किरणांच्या कुशीत शिरली अलगद परडीच्या कडेवरून धन्य झाली इश्वरचरणी अर्पुन.
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2634
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

जागु.... तू ग्रेट्ट्ट्ट्ट आहेस! किती सुन्दर वर्णन कर्तेस गं "जाई" चं... खूप सुन्दर!!! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

प्रत्येक शब्द न् शब्द मस्तच!

तुमच्या साध्या,सोप्या सरळ भाषेत येणार्‍या प्रत्येक कवितेस आमचा सलाम!!! केशरी किरणांच्या कुशीत शिरली झकास... सुहास.. (द गुड)

जाईच्या कळीसारखीच नाजूक आणि सुगन्धी कविता खूप आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

आवडली कविता. मीनल.