Skip to main content

कट्टा - रविवार दिनांक २२ सप्टेंबर 2019

लेखक प्रशांत यांनी शुक्रवार, 20/09/2019 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा मालक नीलकांत ह्यांच्या पुण्यनगरीतील आगमनाप्रीत्यर्थ कट्टा आयोजित करण्यात आलेला आहे रविवार दिनांक २२ सप्टेंबर 2019 वेळः सकाळी १०:०० वाजता स्थळः आपले नेहमीचेच पाताळेश्वर, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. मिसळपाव मुक्त संस्थळ असल्याने यायचा जायचा आणि खादाडीचा खर्च प्रत्येकाने आपला आपला करावयाचा आहे.

वाचने 54209
प्रतिक्रिया 120

प्रतिक्रिया

२२ सप्टेंबर म्हणजे परवाच की! थोडा आधी धागा काढला असतात तर येण जमवता आलं असतं... असो, पुन्हा कधीतरी... कट्ट्यास शुभेच्छा!

येतोय.

येतो पण जेवणास जमणार नाही कारण आधीच घरी कार्यक्रम ठरला आहे .

विधानसभा निवडणुकीत 'झोनल ऑफिसर' म्हणून कार्यरत आहे, रविवारीही काम आहे. यायला जमणार नाही. नीलकांतसेठ आपल्याबरोबर मिपाचा १२ वर्षाचा संसार झाला पण आपली काही भेट होईना...:( ता.क. वर वल्ली येतोय म्हटल्यामुळे तसाही मूड गेलाच होता, खुप भेटी झाल्या यांच्या. कंटाळा आला प्रशांत आणि वल्लीचा. ;) मिपा कट्ट्याला शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे

In reply to by महासंग्राम

आपण फक्त कारकुन असतो त्या निवडणूक अधिकार्‍याच्या दृष्टीने. नाय ऐकलं की अमुक धमुक कलमानुसार कार्यवाहीची धमकी. लोकसभेत हेच काम होतं. विधानसभेलाही तेच. काल नुसतं एकाला नुसतं ड्युटीचं ऑर्डरमुळे हार्टटॅक आला म्हणे. :( इंजॉय करतो हेही काम. गाणी, शायरी आणि तिच्याशी गप्पा. अजिबात तान येत नाही. :) ''उसकी याद कुछ इस तरहसे मेरे दिलसे लिपटी है जैसे गुलाब के फुल पर किसी तितली को निंद आजाए'' -दिलीप बिरुटे (मनमौजी)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"तिच्याशी गप्पा" ???? कोण हो सर "ती" ? पिवळ्या साडीतील रिना अगरवाल कि निळी साडीवाली. असे काही असेल तर स्वयंसेवक म्हणून आम्हालाही ईलेक्शन ड्युटीला बोलवा. ;-)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आँ? इकडे कोणीच क्राउड पुलर नाही? पहिले याची व्यवस्था झाली की मग शो स्टॉपर, सिक्युअरटी वगैरे लागतील. एकूण काय तर भटकंती/सायकलीवाले नकोत?

येतो पण जेवणास जमणार नाही शरद

In reply to by शरद

मला तुम्हाला भेटायचं हो सर. कधी भेट होईल माहिती नाही. -दिलीप बिरुटे (शरद सरांचा जालविद्यार्थी) :)

थोडं उशिरा जॉईन होईल पण नक्की जमवतो

In reply to by अत्रुप्त आत्मा

ए पांडू , ठाकुरलित काय .... *डी घालायला रविवार घालवतो का रे ? ये रे ये रे पांडू , बोलावतो पुण्याचा बंडू , .......

वाहव्वा, कट्ट्यास शुभेच्छा. भेटीगाठी, गप्पाटप्पा (पक्षी उखाळ्यापाखाळ्या), खादाडी आणि फटू सह कट्टा वृत्तांत आलाच पायजेले . चला, आता इनो ची सोय करणे आले.

अपडेट प्लीज. कोण कोण ? कसं कसं ? कुठे कुठे ?? काय काय ? -दिलीप बिरुटे

In reply to by कंजूस

दहा मिपाकर आलेत म्हणजे खुप आले. रविवार त्यात...फार मोठा त्याग आहे. धन्यवाद. मिपाकरांचे तिन्ही लोकात कट्टे झाले पाहिजेत. खादाडी झाली पाहिजे. ''तिन्ही लोक आनंदाने भरुन खाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुं दे रे '' :) -दिलीप बिरुटे (खादाड मिपाकर)

कट्टा मस्त झालेला आहे ! एकूण १० जण (माझ्यासह), त्यातील एकमेव महिला यशोधरा . ओळखी, परिचय, गप्पाटप्पा, मिपा स्थापनेचा इतिहास, मिपासुधारणा सूचना , दिवाळी अंक ..... धमाल ! व्यक्तिगत कारणाने मला जेवणास थांबता आले नाही. पुढे घरी येऊन ही झलक लिहीली ! सर्व कट्टेकरीना धन्यवाद !

वृत्तांत कोणीतरी लिहिलच. तूर्त हा हजेरीपट : नीलकांत, प्रशांत प्रकाश घाटपांडे, प्रचेतस, लोथार मथायस, कंजूस, यशोधरा, महासंग्राम , कुमार१ आणि हो ..... समीर शेलार हे चोखंदळ वाचक ! (कोणी उशीरा आले असल्यास किंवा माझ्याकडून विसरले असल्यास क्षमस्व)

In reply to by हेमंतकुमार

घरातील साफसफाईचे काम निघाल्यामुळे, आणी प्रमुख भुमिका रामा गड्याची माझ्याकडे असल्यामुळे जमवता आले नाही.

कुठे पळाले बाकीचे कट्टेकरी ? येउद्यात अजून... ☺️

मस्तच झाला कट्टा. मजा आली. डॉ. कुमार१, कंकाका, लोथार मथायस, घाटपांडे ह्यांची प्रथमच भेट झाली. छान गप्पा रंगल्या होत्या. सगळ्यांत कंकाका, तुमचं खरंच कौतुक आहे. तुम्ही मुंबईहून कट्ट्याला आलात आणि परतीच्या गाडीसाठी लगेच तुम्हाला निघावे लागले, खूप थोडा वेळ थांबायला मिळणार असूनही तुम्ही आवर्जून आलात. खरंच ग्रेट!

मला पण यायचे होते, पण नाही जमले. आता कट्टा वृतांताविषयी उत्सुकता आहे. फुटुसह कट्टा वृतांत आलाच पाहिजे !

फोटो १ डावीकडून श्री डॅा कुमार १, यशोधरा, समीरसूर, लोथार मथायस, प्रशांत, प्रकाश घाटपांडे, महासंग्राम, मालक नीलकांत, प्रचेतस. फोटो २ डॅा कुमार १ आणि प्रेचतस.

In reply to by कंजूस

खूप तरुणाई असायची मिपा(कट्या)वर. इथे तर निलकांत जी आणी महासंग्राम जी सोडले तर बाकीच्यांना लवकरच तिकीटदरात 50% सवलत सुरू होईल असे वाटतेय, कुठं न्हेउन ठेवलंय मिपा माझे ? हलकेच घ्या वे :)

In reply to by कंजूस

मस्तच झालेला दिसतोय कट्टा. हुज हू कळले. एक आगंतुक सूचना - किमान दोन मिपाकरांनी जेव्हीद्वि व्रत करावे असे सुचवितो. कृपया हल्के घेणे आणि सुचने मागची भावना लक्षात घेणे

एक दुरुस्ती: पहिल्या फोटोत 'समीरसूर' असे नजरचुकीने लिहिलेले दिसते. ते गृहस्थ 'समीर शेलार' आहेत. (समीरसूर हे अन्य मिपाकर असून ते कट्ट्यास नव्हते).

In reply to by हेमंतकुमार

मी क्षणभर गोंधळलो पण नंतर लक्षात आले की नजरचुकीने माझे नाव लिहिले गेले असावे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल ध्यनवाद. कट्टा छानच झालेला दिसतोय. मला शक्यच नव्हतं. यायला नक्कीच आवडलं असतं. पुढच्या वेळी जरा ३-४ दिवस हातात ठेवून कट्टा ठरल्यास जमू शकेल. वर्णनदेखील सुरेख! जेवण कुठे घेतलं? आई शप्पथ, मी फोटो खरंच निरखून पाहिला; म्हटलं आपण चुकून गेलो तर नव्हतो कट्ट्याला!!!??! पण तो मी नव्हतोच. संपादित

मित्रहो, कट्टा संयोजक प्रशांत हे आज कामात मग्न असल्याने त्यांच्या सूचनेनुसार आपल्यासमोर वृत्तांत सादर करतो. अर्थात फोटो त्यांचेकडेच असल्याने ते सवडीने इथे चढवण्याची जिम्मेदारी सर्वस्वी त्यांचीच आहे याची नोंद घ्यावी ! ...... शनिवारी पहाटे गावाहून आलो होतो. प्रवासात बुडालेली झोप आता सकाळी भरून नाही काढता येत. मग आन्हिके उरकली अन मिपाकडे धाव घेतली. सर्वात वरचा धागा पाहिला : मिपाकट्टा पुणे ! आता अंगात एकदम संचार झाला. मागच्या शनिवारवाडा कट्ट्याला दीड वर्ष उलटले होते. तेव्हा पुढच्या कट्ट्यासाठी मी आसुसलेलाच होतो. घरी हे कानावर घातले आणि थोडा विरस झाला. नेमके रविवारी दुपारी माझ्याकडेच पाहुणे जेवायला ठरले होते. पण, कट्ट्याची वेळ हा माझ्यासाठी सुखद आधार होता- सकाळी १०. तेव्हा मला गप्पाटप्पांचा आनंद लुटता येणार होताच. त्यातून खुद्द मालक मंडळी येणार याचाही आनंद होता. आपल्या सर्वांसाठी हे मनमोहक आणि मोफत संस्थळ उपलब्ध करून देणाऱ्या द्वयीन्ना प्रथम पाहण्यास मी जाम उत्सुक होतो. कट्ट्याचे स्थळ पाताळेश्वर हे देखील साद घालत होते. शालेय जीवनातील सहलीनंतर मी तिकडे कधी फिरकलो नव्हतो. हे जरी मिपाचे पारंपारिक कट्टास्थळ असले तरी मी मिपाकर झाल्यानंतरचा हा इथला पहिलाच कट्टा असावा. सकाळी सव्वादहाला मी तिथे हजर झालो. आत शिरता शिरताच एका दृश्याने लक्ष वेधून घेतले. एक ज्येष्ठ गृहस्थ मांडीत एका मांजरीला घेऊन कुरवाळत बसले होते. का कोण जाणे, पण असे वाटून गेले की असावेत हे मिपाकर ! मग गेलो जवळ अन टाकला खडा... अन बसलाही बरोबर ! एव्हाना तुम्ही ओळखलेच असेल की हे सद्गृहस्थ म्हणजेच आपले जानेमाने कंजूस ! मुंबईहून भल्या पहाटे निघालेल्या या तरुण तुर्काने इथे पहिला नंबर लावला होता! बरं, काल रात्रीच त्यांनी रेल्वे आरक्षण तट्ट असल्याचे जाहीर केले होते. आता मला प्रश्न पडला की यांना मांजरीसकट बरा ट्रेनमध्ये प्रवेश मिळाला ! मग त्यांनीच खुलासा केला की त्या मांजराचे आधारकार्ड मुंबईचे नसून पुण्याचेच आहे !! मग त्या मांजरीस अलविदा करून आम्ही दोघे अन्य मंडळींच्या स्वागतास सज्ज जाहलो. ( क्रमशः)

. तुमच्या ताजमहालासारखा आमचा सुद्धा बिबि का मकबरा पुण्याचा कट्टा ठरतो आहे पाहून मला सुद्धा वाटायला लागले कि आपणही मिपाकरांना भेटायला पाहिजे. म्हणून शनिवारी मी "मिळून मिसळून" या मिपाकरांच्या व्हॉट्स ऍप ग्रुप वर रविवारी सकाळी ठाणे येथे "मेतकूट" या हॉटेलात नाश्त्यासाठी कोणी येऊ शकेल का असा संदेश पाठवला. त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही चौघे जण सकाळी ९ वाजता मेतकूट मध्ये भेटलो. उजवीकडून डावीकडे मी, खटपट्या, मोदक आणि अत्रन्गि पाऊस असे चौघे भेटलो. सुरुवात कांदा भजीनी झाली मग भाजणीचे धिरडे, दडपे पोहे, अळू वडी आणि अपा यांची फर्माईश म्हणून बटाटा भजी असे सुग्रास खाऊन वर चहा कॉफी पिऊन भरल्या पोटाने आणि तृप्त मानाने मंडळी साडे अकरा वाजता रवाना झाली.

.... पुणे : भाग २ कंजूस आणि माझी ही प्रथमच भेट. आमची ओळखपाळख होत नाही तोवरच प्रचेतस हजर झाले. चला, दो से भले तीन ! मग आम्ही हळूच त्या ‘पाताळात’ प्रवेश केला. आता ही मोहक पुरातन लेणी पहायची आणि साथीला त्याचा इतिहास कोळून प्यालेले आपले प्रचेतस. दुधात साखरच म्हणाना. त्या प्रवेशद्वाराशीच असलेला शिलालेख मला तरी अदृश्यच होता. पण प्रचेतस यांनी त्यावर एक नजर टाकताच तो एकदम लख्ख दिसू लागला ! तिथल्या सुखद गारव्याचा आम्ही अनुभव घेतोय तोच मिपाचे मधल्या फळीतील दमदार फलंदाज (कप्तानासह) तिथे अवतरले. आतला शांत परिसर समीर यांच्या दमदार आवाजाने थरारून गेला ! गेली ११ वर्षे निव्वळ मिपावाचनमात्र असणारे हे चोखंदळ वाचक. ....... प्रिय कट्टेकरिंनो, या वृत्तांताची गाडी मी २ स्थानके चालवत आणली आहे. आता चक्रधराची जागा अन्य कोणी घेऊन ती फुडे हाकत रहावी ही इनंती !

वा! छान झाला की कट्टा... संपूर्ण वृत्तांत वाचायला आवडेल. @कंजूस काका -फोटो छान! @कुमार१ - वृत्तांताची छोटेखानी झलक आवडली.

जव्हेरगंज, टर्मिनेटर, समीरसूर आणि अन्य सर्व प्रतीसादकांचे आभार ****************************** भाग ३ : आता कट्टासंघातील ८ खेळाडू हजर झाले होते. नावे वर लिहिलीच आहेत. त्यातील प्रकाश घाटपांडे हे अजून एक तरुण तुर्क ! लेण्यांवर एक दृष्टीक्षेप टाकून आम्ही पाताळातून पुन्हा धरतीवर आलो ! आता नव्या भेटीगाठीनी खूप मस्त वाटत होते. गोलाकार उभे राहून गप्पा चालू असतानाच नववे खिलाडी लोथार मथायस दाखल झाले. हे आपले पुणेकर त्या जर्मन पायचेंडूपटूच्या इतक्या प्रेमात पडले की ते स्वताचेच खरे नाव विसरून गेलेत ! आता आम्ही सर्व ९ पुरुष मंडळी टवाळ होऊ लागणार इतक्यात यशोधरा अवतरल्या ! अशा तऱ्हेने कट्टा दशक पुरे झाले होते. आता थोडे आत येऊन काळ्या कातळावर जमेल तसे बूड टेकवून कट्टासभा सुरु झाली. ( क्रमशः)

In reply to by हेमंतकुमार

लोथार मथायस सगळ्यात शेवटी आले. येता येता ते पाताळेश्वराच्या कुंपणापलीकडून आपल्या घोळक्याकडे बघत होते, तेव्हा आपण म्हणालो सुद्धा की कोणी मिपाकर दिसताहेत! बाकीच्या मिपाकरांना शोधताहेत म्हणून. :)

बर्‍याच दिवसांनी कट्ट्याविषयी वाचायला, ऐकायला मिळालं. बरं वाटलं

मस्त वृतान्त आणि त्यावरील प्रतिक्रिया. खासकरून उपस्थितांच्या, त्यातूनही भस्म न झालेल्यांची. मजा आली. वाचायला. पुढील कट्ट्याला शुभेच्छा, धन्यवाद.

अहो, नुसत्या शुभेच्छांनी नाही भागणार सुधीरभाऊ. पुढच्या कट्ट्यास तुमची उपस्थिती आवश्यक ! आमाला आवडेल ना तुमच्या मांडीला मांडी लावून बसायला आनि ते रंजन का गुंजन पुन्हा एकवार कराया !!

जल्ला मेला आज पायला धागा २ दिस आजारी होतो त्यामुळे. :( लयीच घाईत झाला पण एका धाग्यात झाला :) {उगाच बाहेरच्या लोकांनी अफवा पसरवाल्यात मेल्यांनी पुणेकरांबद्दल :) }

आता प्रत्येकाचा परिचय, इथले नाव, घरचे नाव, काय काय ‘उद्योग’ करतो....इ.इ. चे प्रांजळ कथन सर्वांनी केले. याची सांगता अर्थातच नीलकांत यांनी केली. या सर्व गोष्टींची नोंद मिपा आयोगासमोर ‘इन क्यामेरा’ झालेली आहे ! ती इथे जाहीर करण्यास मिपा घटनेनुसार सक्त मनाई आहे. फक्त पुढील कट्ट्यास उपस्थित राहणाऱ्यांनाच ती माहिती मिळू शकते ! तर मंडळी, असा हा परस्पर परिचय आणि स्नेह वाढविणारा सुरेख कट्टा. ‘श्रीगलेमा’च्या सुंदर मेजवानीनंतर मोजक्या मिपाकरांनी अनुभवलेला. मिपाला आता एक तप पुरे होऊन गेलेले आहे. आभासी जगाच्या इ-पडद्यावर आपण सगळे वावरत आहोतच. त्यातून एकमेकाबद्दल थोडीफार माहिती कळते, व्यक्तिमत्वाचा जरा अंदाज येतो खरा. पण, प्रत्यक्ष भेटीची सर या जालवावराला नाहीच. म्हणूनच भेटीगाठी आवश्यक. खादाडी झाली का, झाली असल्यास काय खाल्ले वगैरे गोष्टी गौण आहेत, नाही का? या संदर्भात माझ्या एका आवडत्या इंग्लीश अवतरणाने या वृत्तांताचा शेवट करतो: You can learn more about a person in an hour of play than in a year of conversation. कट्टा संयोजक, उपस्थित सभासद आणि इथले सर्व वाचक यांना धन्यवाद !

In reply to by हेमंतकुमार

१००% सहमत... आभासी दुनियेतील व्यक्तिरेखा आणि प्रत्यक्ष भेटीतला अनुभव ह्या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत. रच्याक: मी मिपाकर झाल्यापासून मालक नीलकांत ह्यांचे काहीच लेखन वाचनात आले नाहीये, तेव्हा त्यांना नम्र विनंती की, कृपया ह्या कट्ट्याचा वृत्तांत त्यांनी शब्दबद्ध करावा....

खूपच छान सुंदर मी रविवारी दिवस भर एका कार्यक्रमात होतो नाहीतर यायला खूप आवडलं असतं