Skip to main content

सागराचे मनोगत

लेखक जागु यांनी सोमवार, 23/03/2009 11:33 या दिवशी प्रकाशित केले.

घेउनिया माझ्या शिंपल्यातील मोती
खुलविता सौंदर्य तुम्ही शरीरावरती
मग मला काहो कुरूप करीता ?
माझ्या भोवती कचरा पसरवूनी !

नेतो मी तुम्हा पैलतिरांवरी
झेलून तुमचा भार खांद्यावरी
मला का तुम्ही अडकवीता ?
घालुन बांध माझ्या भोवताली !

माझ्यातील जीव मारूनी
तुमचे तुम्ही पोट भागवती
माझ्या साठी काय हो देता ?
घाण आणि प्रदुषणा वाचूनी !

माझ्यातून तुम्ही तेल शोषूनी
उद्योग तुम्ही भले उभारती
अतिरेकी मज स्पर्शुन जाती
तुम्ही कुठे करीता माझी रखवाली ?

वाळू चे माझ्या ढिग उपसती
लुटता माझे अवयव तुम्ही
सोशितो तुमचे सगळे छळ
नारळी पुनवेच्या एका श्रीफळावरती.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6296
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

कविता तर मस्तच आहे, वेगळा विषय आणि आशय. शेवटच्या दोन ओळी तर अगदीच डोळ्यांत अन्जन घालणार्‍या!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}


अगदी खरोखर माझे मनोगत ... :)

घेउनिया माझ्या शिंपल्यातील मोती
खुलविता सौंदर्य तुम्ही शरीरावरती
मग मला काहो कुरूप करीता ?
माझ्या भोवती कचरा पसरवूनी !

ही वस्तुस्थिती आहेच...पण

वाळू चे माझ्या ढिग उपसती
लुटता माझे अवयव तुम्ही
सोशितो तुमचे सगळे छळ
नारळी पुनवेच्या एका श्रीफळावरती.

हा कळसच... अप्रतिम... वा वा असेच लिहित रहा...

(सागरमय) - सागर :)


नारळी पुनवेच्या एका श्रीफळावरती.

सागरावर एकच सण
आणी एकच कविता.

बहोत ना-ई॑साफी हे ये !!

अजुन येऊ द्यात!!

सुहास..
(द गुड)