FATF Asia-Pacific Group puts Pakistan in 'enhanced blacklist': Officials
Financial Action Task Force (FATF) ही संस्था जागतिक स्तरावर "दहशतवादाचा वित्तपुरवठा आणि काळाबाजार (terror financing and money laundering)" यांच्यावर नजर ठेवते. यासाठी तिने, दहशतवादाचा वित्तपुरवठा आणि काळाबाजार, यांच्या संबंधात 'देशांनी राबवलेली कायदेव्यवस्था व तिचे पालन' यासंबंधात मानंदड बनवलेले आहेत. सतत नजर ठेऊन मिळविलेल्या माहितीच्या आधारे FATF व तिचे गट, धोकादायक देशांची यादी प्रसिद्ध करत असतात. FATF च्या The Asia Pacific Group (APG) या गटात आशिया, ऑस्ट्रेलिया आणि प्रशांत सागरात असलेले ४१ देश येतात. या गटाच्या कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) येथे नुकत्याच झालेल्या सभेत, खालील मुद्दे मान्य करण्यात आले : १. एकूण ४० मानदंडांपैकी (parameter) पाकिस्तानने ३२ मानदंडंचे पालन केलेले नाही २. अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्या (देशाने केलेल्या कारवायांचे परिणाम मोजणार्या) ११ मानदंडांपैकी १० मध्ये पाकिस्तानची कामगिरी खालच्या स्तराची (low) असल्याचे नमूद केले गेले. या निरिक्षणांच्या आधारे APG ने पाकिस्तानचे नाव "करड्या यादीतून (gray list)" काढून "वर्धित काळ्यासूचीत (enhanced blacklist)" टाकले आहे. यापूर्वीच, पाकिस्तानला FATF कडून आपला व्यवहार सुधारण्यासाठी १५ महिन्यांच्या मुदतीची नोटीस मिळालेली आहे. तिची मुदत, दोन महिन्यांनी, ऑक्टोबर २०१९ मध्ये संपत आहे. त्या वेळेपूर्वी पाकिस्तान समाधानकारक कारवाई न करू शकल्यास, त्याचे नाव करड्या यादीतून (gray list) काढून काळ्या यादीत (black list) हलवले जाईल. करड्या यादीत असलेल्या देशाला जागतिक स्तरावर (उदा : जागतिक बँक, आयएमएफ, इ) वित्तसहाय्य मिळवणे कठीण होते आणि काही थोडेसे अर्थसहाय्य मिळालेच तर ते अधिक व्याजदराने आणि कडक अटींसहच मिळते. काळ्या यादीत गेल्यावर तर ते तुटपुंजे अर्थसहाय्यही बंद होते. ऑक्टोबर २०१९ पर्यंत पाकिस्तानाने FATF च्या मानदंडांची पूर्तता करणे वास्तवात शक्य दिसत नाही. तेव्हा, आताच आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान "दिवाळखोर देश" होईल, असेच दिसत आहे.वर्गीकरण
वाचने
12968
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाकिस्तानचा अजून एक विनोद :
पाकड्यांची आर्थिक दॄष्ट्या
In reply to पाकिस्तानचा अजून एक विनोद : by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-चंद्रयानाने पाठवलेल्या फोटो मध्ये चंद्रावरील खड्डे अगदी स्पष्ट दिसतात. इस्त्रोला असेच एक यान महाराष्ट्राच्या वर टेहाळणी करण्यासाठी पाठवायला सांगायला हवे, कारण इथे पडलेले खड्डे आमच्या राज्यातील कोणत्याच पक्षाच्या राजकारण्यांना कधी दिसलेच नाही आणि आजही दिसत नाहीत !
झक्कास झालंय!
आआधीच मंदी आहे दादा म्हणूनच युध्द म्हणजे चांदी म्हणावी लागेल
In reply to झक्कास झालंय! by राघव
पाकिस्तान हा देश ग्राह्य का धरायचा
तुलना तर भारताची चिनशी होऊ शकत नाही
In reply to पाकिस्तान हा देश ग्राह्य का धरायचा by Rajesh188
>>>>>>पाकिस्तान काहीतरी
पाकिस्तान हा देश ग्राह्य का धरायचा
जर का समजा पाकिस्तान दिवाळखोर
काय होईल
In reply to जर का समजा पाकिस्तान दिवाळखोर by उगा काहितरीच
पाकिस्तानच्या हलाखीच्या
In reply to जर का समजा पाकिस्तान दिवाळखोर by उगा काहितरीच
पाकिस्तान ची शकले झाली तर pok
पाकिस्तानी लोक कधीच सुधारणार
पाकिस्तानची दुरवस्था होणे भारताच्या फायद्याचे नाही
युद्ध करायचं झालं तरी त्याला
In reply to पाकिस्तानची दुरवस्था होणे भारताच्या फायद्याचे नाही by Rajesh188
उत्तम
पाकिस्तानला हे महागात पडेलच
खरे साहेब ,
भारत-पाकिस्तान युद्ध...
पाकिस्तान शी चीन ची मैत्री
आपण जसे पाकिस्तान ला ग्राहय धरत नाही
In reply to पाकिस्तान शी चीन ची मैत्री by Rajesh188
पाकिस्तान शी मैत्री करून चीन
In reply to पाकिस्तान शी चीन ची मैत्री by Rajesh188
पाकिस्तान शी मैत्री करून चीन काय फायदा होत असेलहे म्हणजे, आजूबाजूला, अनेक दशके सतत रामायणाचे पारायण होत असताना, "रामाची सीता कोण?" असे विचारण्यासारखे झाले. ;) :) अभ्यास वाढवा ! (यापेक्षा इतर काहीही करून, काहीही साध्य होणार नाही, म्हणून इतकाच सल्ला.)