APG ने पाकिस्तानचे नाव "वर्धित काळ्यासूचीत (enhanced blacklist)" टाकले

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in काथ्याकूट
23 Aug 2019 - 1:16 pm
गाभा: 

FATF Asia-Pacific Group puts Pakistan in 'enhanced blacklist': Officials

Financial Action Task Force (FATF) ही संस्था जागतिक स्तरावर "दहशतवादाचा वित्तपुरवठा आणि काळाबाजार (terror financing and money laundering)" यांच्यावर नजर ठेवते. यासाठी तिने, दहशतवादाचा वित्तपुरवठा आणि काळाबाजार, यांच्या संबंधात 'देशांनी राबवलेली कायदेव्यवस्था व तिचे पालन' यासंबंधात मानंदड बनवलेले आहेत. सतत नजर ठेऊन मिळविलेल्या माहितीच्या आधारे FATF व तिचे गट, धोकादायक देशांची यादी प्रसिद्ध करत असतात.

FATF च्या The Asia Pacific Group (APG) या गटात आशिया, ऑस्ट्रेलिया आणि प्रशांत सागरात असलेले ४१ देश येतात. या गटाच्या कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) येथे नुकत्याच झालेल्या सभेत, खालील मुद्दे मान्य करण्यात आले :

१. एकूण ४० मानदंडांपैकी (parameter) पाकिस्तानने ३२ मानदंडंचे पालन केलेले नाही

२. अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणार्‍या (देशाने केलेल्या कारवायांचे परिणाम मोजणार्‍या) ११ मानदंडांपैकी १० मध्ये पाकिस्तानची कामगिरी खालच्या स्तराची (low) असल्याचे नमूद केले गेले.

या निरिक्षणांच्या आधारे APG ने पाकिस्तानचे नाव "करड्या यादीतून (gray list)" काढून "वर्धित काळ्यासूचीत (enhanced blacklist)" टाकले आहे.

यापूर्वीच, पाकिस्तानला FATF कडून आपला व्यवहार सुधारण्यासाठी १५ महिन्यांच्या मुदतीची नोटीस मिळालेली आहे. तिची मुदत, दोन महिन्यांनी, ऑक्टोबर २०१९ मध्ये संपत आहे. त्या वेळेपूर्वी पाकिस्तान समाधानकारक कारवाई न करू शकल्यास, त्याचे नाव करड्या यादीतून (gray list) काढून काळ्या यादीत (black list) हलवले जाईल.

करड्या यादीत असलेल्या देशाला जागतिक स्तरावर (उदा : जागतिक बँक, आयएमएफ, इ) वित्तसहाय्य मिळवणे कठीण होते आणि काही थोडेसे अर्थसहाय्य मिळालेच तर ते अधिक व्याजदराने आणि कडक अटींसहच मिळते. काळ्या यादीत गेल्यावर तर ते तुटपुंजे अर्थसहाय्यही बंद होते.

ऑक्टोबर २०१९ पर्यंत पाकिस्तानाने FATF च्या मानदंडांची पूर्तता करणे वास्तवात शक्य दिसत नाही. तेव्हा, आताच आर्थिक डबघाईला आलेला पाकिस्तान "दिवाळखोर देश" होईल, असेच दिसत आहे.

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Aug 2019 - 1:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाकिस्तानचा अजून एक ताजा विनोद :

पाकिस्तानी मंत्री रहमान मलिक याने, "काश्मिरसंबंधात पाकिस्तानच्या बाजून बोलल्यामुळे चिदंबरमना अटक झाली आहे" असे विधान केले आहे. =)) =)) =))

पाकिस्तानची काळ्या बाजरासंबंधीची कामगिरी लेखात दिलेल्या कामगिरीवरून सिद्ध झाली आहेच, तेव्हा त्याने काळाबाजाराच्या बाजून बोलणे आश्चर्यकारक नाही. पण, आंतरराष्ट्रिय समुदाय स्वतःची पँट वारंवार काढून घेत असताना, तोंडावर पडेपर्यंत दुसर्‍याचे वाकून बघण्याची पाकिस्तानची सवय जात नाही ! =)) =)) =))

आता, असा पाकिस्तानचा (परत परत मिळणारा) पाठींबा कॉन्ग्रेस आणि चिदंबरम यांना किती फायद्याचा आहे जी तोट्याचा, हे त्यांनीच ठरवावे. ;)

पाकड्यांची आर्थिक दॄष्ट्या वाजवली गेल्याने मला लयं म्हणजी लयं आनंद झाला हाय बघा ! :)

पाकिस्तानी मंत्री रहमान मलिक याने, "काश्मिरसंबंधात पाकिस्तानच्या बाजून बोलल्यामुळे चिदंबरमना अटक झाली आहे" असे विधान केले आहे.

नो मोअर लुंगी डांन्स ! :) चिदुचा उल्लेख आल्यामुळे इथे विषयांतर करत आहे !

NDTV & Chidambaram Accused of Money Laundering Scam of Rs. 5500 cr.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-चंद्रयानाने पाठवलेल्या फोटो मध्ये चंद्रावरील खड्डे अगदी स्पष्ट दिसतात. इस्त्रोला असेच एक यान महाराष्ट्राच्या वर टेहाळणी करण्यासाठी पाठवायला सांगायला हवे, कारण इथे पडलेले खड्डे आमच्या राज्यातील कोणत्याच पक्षाच्या राजकारण्यांना कधी दिसलेच नाही आणि आजही दिसत नाहीत !

राघव's picture

23 Aug 2019 - 1:34 pm | राघव

ग्रे लिस्ट मधे आल्यापासूनच पाकिस्तानला मिळणार्‍या पैशाचा ओघ बर्‍यापैकी आटला होता.. किंबहुना ग्रे लिस्ट मधे अमेरिकेमु़ळेच पाकिस्तान गेलं असावं असा माझा कयास आहे. ब्लॅक लिस्ट म्हणजे गर्ता अधिकच खोल होत जाईल कारण अशा राष्ट्रांना जे पैसा पुरवतील तेही कडक रडार वर येतील. एकदम जबराट झालंय हे काम!
म्हणजे भारतानं या डिसेंबर पर्यंत जरा शांततेनं कळ काढली तर पाकिस्तानचे स्वतःच सूप वाजणे सुरू व्हायला सुरूवात होऊ शकेल.

पण मग याचा दुसरा अर्थ असा नाही का, की पाकिस्तान काहीतरी खुसपटं काढत मोठी आगळीक करण्याचा प्रयत्न करेल?

फक्त ही चांदी किती महाग पडेल हे आत्ताच सांगणे अवघड आहे पण काही ना काही किंमत मोजावी लागणार हे नक्की

भारताची आणि पाकिस्तानची तुलना होऊच शकत नाही .
आकारमान 880254 sq km आहे आणि भारताचे 3287283sq km आहे .
अर्थ व्यवस्था
पाकिस्तान वार्षिक सका ल उत्पादन 404 अब्ज अमेरिकन डॉलर.
भारताचे वार्षिक उत्पादन.3663अब्ज अमेरिकन डॉलर .
अशा फालतू देशाची भारता बरोबर तुलना होवूच शकत नाही

तरीही चीन - भारत सिमेवर काही दशके एकहि गोळी झाडली गेली नाहीच ना ?

थोडक्यात उपद्रवमूल्य सर्वात महत्वाची बाब ठरते. बाकी विकास , GDP, आकारमान वगैरे वगैरे तुलनेने दुय्यम बाबतीत तर व्हिएतनामही अमेरिकेसमोर ग्राह्य धरता येत नाही.

डँबिस००७'s picture

23 Aug 2019 - 2:09 pm | डँबिस००७

>>>>>>पाकिस्तान काहीतरी खुसपटं काढत मोठी आगळीक करण्याचा प्रयत्न करेल?<<<<<
तसाही पाकिस्तान काहीतरी खुसपटं काढतच आहे. LOC वर पाकिस्तान सीझफायरचे उल्लंघन करत आहे .
ह्याचे जोरदार प्रतीउत्तर भारत देत असताना सिमेवरचे बंकर उध्वस्त करत आहे. त्यामुळे पाकिस्तानला नुकसानच होत आहे !! आता मोठी आगळीक करण्यासाठी प्रयत्न केला तर पाकिस्तान नेस्तनाबुत होईल !!

भारताची आणि पाकिस्तानची तुलना होऊच शकत नाही .
आकारमान 880254 sq km आहे आणि भारताचे 3287283sq km आहे .
अर्थ व्यवस्था
पाकिस्तान वार्षिक सका ल उत्पादन 404 अब्ज अमेरिकन डॉलर.
भारताचे वार्षिक उत्पादन.3663अब्ज अमेरिकन डॉलर .
अशा फालतू देशाची भारता बरोबर तुलना होवूच शकत नाही

उगा काहितरीच's picture

23 Aug 2019 - 2:30 pm | उगा काहितरीच

जर का समजा पाकिस्तान दिवाळखोर झाला तर नेमकं काय होऊ शकत ?

Rajesh188's picture

23 Aug 2019 - 2:41 pm | Rajesh188

जगातील सशक्त देश तेथील धर्म वेड्या लोकांचा उपयोग स्वतःच्या फायद्या साठी करून घेतील .
आणि विरोधी देशातील लोकांना आणि पाकिस्तानी धर्म वेड्या लोकांना स्वर्गाचे दरवाजे सताड उघडे ठेवायचा बंदोबस्त करतील

पाकिस्तानच्या हलाखीच्या परिस्थितीत आणखी भर पडून पाकिस्तानची ३ किंवा ४ शकलं होणं [ सिंध, बलूच, वझिरीस्तान आणि पश्चिम पंजाब ] हा एक परिणाम होऊ शकतो. त्याचे साईड इफेक्ट्स मात्र जॉनविक्क म्हणतात तसं काहीही होऊ शकतील, ज्यासाठी आपण तयार राह्यलं पाहिजे.

पाकिस्तान ची शकले झाली तर pok आपण घेऊ शकतो

पाकिस्तानी लोक कधीच सुधारणार नाहीत. गिरेंगे तो भी टांग उपर अशी लोकं आहेत.

स्वतः चे घर जळून खाक व्हायला आले तरी दुसऱ्याच्या घरातुन भाजी करपल्याचा वास येत आहे अशी गावभर दवंडी पिटण्यात व्यस्त आहे.
थोडक्यात सांगायचे तर 70 वर्षानंतर सुद्धा हि लोकं " काश्मिर बनेगा पाकिस्तान " या मानसिकतेतून मधून बाहेर पडत नाहीयेत.

मध्यन्तरी इम्रान खान चे भाषण ऐकले त्यात ते देशी कोंबड्या विकून अब्जावधी रुपये उभे होतील अश्या गप्पा मारत होते. आणि समोरचे पब्लिक येङयासारखे टाळ्या वाजवत होते. कधी कधी खरंच कीव येते ह्या लोकांची.

बहुतेक पाकिस्तान मध्ये मुल जन्माला आल्यापासूनच त्याच्या डोक्यात टोकाची धार्मिकता ( इस्लाम म्हणजेच सर्वकाही ), संपूर्ण भारत आणि त्याआधी काश्मीर ला मुस्लिम देश बनवणे (गझवा ए हिंद ), मुगल राजे, औरंगझेब, बाबर, निझाम इत्यादी कट्टर लोकांचा सार्थ अभिमान, हिंदू आणि इतर धर्मीय लोकं कसे मूर्ख आहेत इ सर्व गोष्टी भरवल्या जात असाव्यात.
पटत नसेल तर या लोकांची न्यूज चॅनेल पाहावीत.. छान मनोरंजन होते.

बाकी पाकिस्तान आता काळ्या यादीत गेल्यामुळे लवकरच त्या देशाचे तुकडे होतील असे वाटते. कारण आधीच कर्जबाजारी आणि पुन्हा कडक निर्बंध आले तर आर्थिक हालत अजुन खराब होईल. त्यामुळे अंतर्गत बंडाळी होऊन गृहयुद्ध होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान आपला शेजारी देश आहे आणि भारताचे कट्टर शत्रू राष्ट्र आहे .
फक्त शत्रू राष्ट्र असते पण आपला शेजारी नसतं तर पाकिस्तानची दुरवस्था होणे ही खूप आनंदाची गोष्ट ठरली असती .
मस्त सुंदर बंगल्या च्या बाजूला झोपडपट्टी असणे जसे त्रासदायक आहे तसाच हा प्रकार आहे .
पाकिस्तानची दुरवस्था झाला तर कट्टर पना अजुन वाढेल ,अण्वस्त्र अतिरेकी लोकांच्या हातात पडण्याची शक्यता वाढेल .
आणि हा देश .
आणि त्याचा सर्वात जास्त त्रास शेजारी म्हणून आपल्याला च होईल

सुबोध खरे's picture

24 Aug 2019 - 1:19 pm | सुबोध खरे

युद्ध करायचं झालं तरी त्याला लागणारी सामग्री पैकी कोणतीही पाकिस्तानात निर्माण होत नाही सर्वच्या सर्व गोष्टी आयात करायला लागतात आणि त्याला रोख पैसाच लागतो. त्याशिवाय प्रचंड प्रमाणात तेल सुटे भाग इ लागतात.

मुळात भिकारी असलेल्या देशाला कोणताही देश असे सुटे भाग, शस्त्रास्त्रे किंवा तेल उधारीवर देण्याची शक्यता नाहीच कारण युद्धात पाकिस्तान जिंकण्याची शक्यता शून्य आहे. तेंव्हा हि बुडीत खाती उधारी कोण करेल?

फार तर चीन पण ते त्याची किंमत दामदुपटीने वसूल करून घेतीलच.

हा आतबट्ट्याचा व्यवहार पाकिस्तान करण्याची शक्यता शून्य आहे. त्यातून त्याचा अणुबॉम्ब हा कागदी वाघ आहे हे श्री मोदींनी त्यांना दाखवून दिले आहे आणि वर भारत पाकिस्तानात घुसून मारेल अशी स्पष्ट धमकी हि दिली आहे.

वर श्री राजनाथ सिंह यांनी आम्ही "अण्वस्त्रांचा वापर प्रथम करणार नाही" या धोरणाचा पुनर्विचार केला जाईल असेही स्पष्ट केले आहे. म्हणजेच पाकिस्तान अण्वस्त्र वापरण्याची कुण कुण जरी लागली तरी भारत त्यांच्या वर प्रचंड शक्तीने अण्वस्त्र हल्ला करेल हि गर्भित धमकी आहे.

अशा अण्वस्त्राविरुध्द्व पाकिस्तानकडे कोणतीही बचाव यंत्रणा नाही.

भारताकडे अशी यंत्रणा कार्यान्वित होत आहे https://en.wikipedia.org/wiki/Indian_Ballistic_Missile_Defence_Programme

आणि रशिया कडून S ४०० Triumph हि सध्या जगातील सर्वात प्रगत अशी क्षेपणास्त्र बचाव प्रणाली आपल्याला २०२० पासून उपलब्ध होईल. त्यासाठी अमेरिकेच्या कोणत्याही धमकीला मोदी सरकारने अजिबात भीक घातलेली नाही. वर हा पैसे युरोमध्ये दिला जाईल त्यामुळे अमेरिकेचे नाक अजूनच चेचले गेले आहे.
https://www.businesstoday.in/current/economy-politics/s400-triumf-missil...

वनानी दहते वन्हे !
सखा भवति मारुतः !
स एव दीप नाशाय !
कृशे कस्यास्ती सौहृदं?
जेंव्हा जंगल जळत असते तेंव्हा वारा ती आग पसरवण्यास मदतच करतो
पण हाच वारा साधा दिवा विझवून टाकतो
तेंव्हा दुबळ्या माणसाचा कोणीही मित्र नसतो
हे त्रिकाल अबाधित सत्य आहे

मृणालिनी's picture

23 Aug 2019 - 8:21 pm | मृणालिनी

बरे झाले.
जय हिंद!

भंकस बाबा's picture

23 Aug 2019 - 8:26 pm | भंकस बाबा

पण भारतालादेखील दुष्परिणाम भोगावे लागतील. शकले होणे हे गुदगुल्या होण्यासारखे असले तरी निर्वासित पाकिंचा लोंढा भारताच्या दिशेने येऊ शकतो, ज्याला आपल्याकडील ओवैसी, कोंग्रेस, समाजवादी या सारखे लोक गोंजारु शकतात. हि स्थिति भारतासाठी भयावह असेल. भारतासाठीच कारण पाकिस्तानच्या या लोंकाना चीन , अफगनिस्तान, इराण, रशिया हे देश कधीच जवळ करणार नाहीत , ज्यांच्या सीमा पाकिस्तानला लागून आहेत.

डँबिस००७'s picture

24 Aug 2019 - 4:06 pm | डँबिस००७

खरे साहेब ,
जबरदस्त प्रतीसाद !!
पाकिस्तानला Economically
दुबळे करणे हा युद्ध नीतीचा भाग आहे,
पाकिस्तान जनतेला तिथल्या राजकारण्यांनी धर्मांधतेच बाळकडु ईतक पाजलेल आहे की ती जनता भारतात शामिल झाली तरी मनाने भारतीय कधीच होणार नाही. त्यापेक्षा चार तुकड्यात विभागलेला पाकिस्तान चार नविन देशात रुपांतरीत झालेला परवडेल !! पाकिस्तान पंजाबातली जनता ईतर जनतेपेक्षा वरचढ आहे. पाकिस्तान संरक्षण दलात, पोलिस दलात पंजाबीच वरचढ आहेत. त्यामुळे सिंध , गुजरात, बलुच लोक ह्या पंजाब्यांबरोबर रहाणार नाहीत !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Aug 2019 - 5:32 pm | डॉ सुहास म्हात्रे

APG ने पाकिस्तानचे नाव "करड्या यादीतून (gray list)" काढून "वर्धित काळ्यासूचीत (enhanced blacklist)" टाकल्यामुळे पाकिस्तानला रोजच्या खर्चांसाठी (जीवनावश्यक गोष्टी, इंधन, इ) कर्ज मिळणेही दुरापास्त होईल... मग अश्या डबघाईला आलेल्या देशाला युद्ध सुरू करणे तर अजूनच दूरापास्त होते. हा भारताने जागतिक स्तरावर जोमाने चालविलेल्या अतिरेकीविरोधी मोहिमेचा महत्वाचा उद्येश व मिळवलेला परिणाम आहे.

तडक युद्ध करून 'आक्रमक देश' असा ठप्पा स्विकारण्यापेक्षा, पाकिस्तानला जागतिक राजकिय-आर्थिक बाबतीत जेरीस आणून, त्याच्या कुरापतींना कह्यात ठेवणे, हेच सद्या तरी भारताच्या फायद्याचे आहे. मात्र, हताश झालेल्या पाकिस्तानने चिडून युद्ध सुरू केले, तर ते भारताच्या फायद्याचेच होईल. कारण "आक्रमक" पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल पाकिस्तानला "स्वसंरक्षणार्थ' हारवून भारताला अनेक फायदे मिळवता येतील. पूर्वी अनेकदा झाल्याप्रमाणे, "युद्धात जिंकले आणि तहात हारले" अशी अनावस्था या वेळेचे सरकार होऊ देणार नाही, याची खात्री आहेच.

ऑक्टोबर २०१९ च्या आसपास होणार्‍या FATF च्या सभेत तात्वीक पायावर पाकिस्तानला काळ्या यादीत टाकणे अपेक्षित आहे. पण तरिही, ते इतकेसे सरळपणे होईल असे वाटत नाही. कारण, चीनच्या Xiangmin Liu याने जुलै २०१९ मध्ये FATF चे अध्यक्षपद सांभाळले आहे.

(अ) पाकिस्तानला युद्धात तडक मदत करणे आणि सर्व जगाचा विरोध स्विकारणे चीनला सोईचे ठरणार नाही, आणि
(आ) पाकिस्तानच्या युद्धखर्चासाठी, परताव्याची खात्री नसलेली भरघोस मदत करणे, चीनसाठी आतबट्ट्याचा व्यवहार असेल... पण त्याचबरोबर,
(इ) छू म्हटले की (बर्‍याचदा छू नाही म्हटले तरी) भारतावर धावून जाणारा पाकिस्तानसारखा कुत्रा गमावणेही चीनला परवडणारे नाही.
त्यामुळे, FATF च्या अध्यक्षपदाचा फायदा घेऊन चीन काहीना काही काडीबाजी करणार व पाकिस्तानचे नाव काळ्या यादीत जाण्यास खोडा घालण्याचा (किमान, मसूद अजहर प्रकरणाप्रमाणे, वेळकाढूपणा करणार), हे गृहित धरूनच भारताला पुढची पावले उचलावी लागतील.

पाकिस्तान शी मैत्री करून चीन काय फायदा होत असेल .
भारत नाराज झाला तर उलट चीन ला जास्त नुकसान होईल आणि ते नुकसान पाकिस्तान शी मैत्री करून भरून येणार नाही .
हे चीन chya का लक्षात येत नाही

तसेच चीनही आपल्या बाबत वागतो. जो देश अमेरिकेस जुमानत नाही त्याला तुम्ही घाबवरवू शकत होता ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2019 - 11:57 am | डॉ सुहास म्हात्रे

पाकिस्तान शी मैत्री करून चीन काय फायदा होत असेल
हे म्हणजे, आजूबाजूला, अनेक दशके सतत रामायणाचे पारायण होत असताना, "रामाची सीता कोण?" असे विचारण्यासारखे झाले. ;) :)

अभ्यास वाढवा ! (यापेक्षा इतर काहीही करून, काहीही साध्य होणार नाही, म्हणून इतकाच सल्ला.)