खय्याम ... एक आदरांजली
जिस सुबह की खातिर जुग-जुग से,
हम सब मर-मर के जीते हैं
जिस सुबह की अमृत की धुन में, हम ज़हर के प्याले पीते हैं
इन भूखी प्यासी रूहों पर, एक दिन तो करम फ़रमायेगी
वो सुबह कभी तो आयेगी ...
पडद्यावर राज च्या मिठीत हुंदके देणारी मला सिन्हा ... जणू आपल्या स्वत:लाच समजावणारा... भविष्याचे आशादायी चित्र उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा राज कपूर , साहिर चे बोचरे शब्द .. मुकेश चा आवाज ... यासगळ्याला संगीतही तसेच तोलामोलाचे हवे. खय्याम या कसोटीवर पुरेपूर उताराला. संपूर्ण गाण्यात कुठेवी तालवाद्य नाहीत. कारण तालावर ठेका धरायची ही वेळच नाही. ही वेदना खय्याम यांने आपल्या संगीतात अचूक पकडली. नवोदित खय्याम यांना चित्रपट सृष्टीत नाव मिळवून दिले ते याच चित्रपटाने.
खय्यामच संगीत असच पडद्यावरचा भावनांना पूरक असायचं... भावसमाधी लावणार.. मग ते शंकर हुसेन मधला लताच “आप यूं फासलोंसे गुजरते रहे” असो किंवा लता रफीच सिमटी हुई ये घडीयां असो...
बहारो मेरा जीवन भी सवारों मध्ये बहारों नंतर पॉज घ्यावा तो खय्यामनीच
रझिया सुलतान या चित्रपटातील हे गाणं .. ऐ दिले नादाँ .. खरतर आधीचा चित्रपट पाहून आपण पुरेसे वैतागलेले असतो.. त्यात हे गाणं संपता संपत नाही .. लताच्या "ज़िंदगी जैसे, खोयी-खोयी है, हैरां हैरां है" या ओळींनंतर अचानक सर्व वाद्ये थांबतात.. संपूर्ण शांतता पसरते... संपूर्ण पडदा व्यापून टाकणारे वाळवंट .. ह्या शांततेला चिरत लताचा आवाज हलवून जातो ... ये ज़मीं चुप है आसमाँ चुप है... कॅमेरा निळ्या आकाशाला गवसणी घालतो ... फिर ये धाडकनसी चार सू क्या है ... वाद्य परत वाजू लागलेली असतात... गाण्याने पुन्हा आपली लय पकडलेली असते. हाच तो खय्याम टच
कभी कभी ... यश चोप्रांचा मॅग्नम ऑपस ... दोन पिढ्यांची कहाणी.. एकीकडे ऋषी-नितु या जोडीसाठी रोमँटिक गाणी तर दुसरीकडे अमिताभ राखी शशी हा त्रिकोण.. एकीकडे "तेरे चेहरेसे नज़र नही हटती" किंवा "प्यार कर लिया तो क्या प्यार है खता नही" अशी उडत्या चालीची गाणी तर दुसरी कडे "कभी कभी मेरे दिलमें खयाल आता है" हे गाणं ... या सगळ्यावर कळस म्हणजे "मैं पल दो पल का शायर हूँ" ... यात अमिताभ साठी चक्क मुकेशचा आवाज वापरला होता.. हे गाणं पडद्यावर बघताना ही निवड किती योग्य होती हे जाणवते .. हाच तो खय्याम टच. ह्याच चित्रपटासाठी खय्याम ना पहिले फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले होते.
उमराव जान ... या चित्रपटाशिवाय खय्याम यांचा सांगीतिक प्रवास पूर्णच होऊ शकत नाही. आशाताईंनी अजरामर केलेली उमरावजान ची गाणी तर आहेतच .. पण गुलाम मुस्तफा खाँसाहेबांनी गायलेली रागमाला जरूर ऐका (आमिरनं ते उमरावजान हा कायापालट ह्याच गाण्यात होतो)
पण या सगळ्यावर कळस म्हणजे "जिंदगी जब भी तेरी बझ्म में लाती है हमें " हे गाणं .. तलत अझिझ चा गंभीर आवाज योग्य परिणाम साधतो ... परत एकदा खय्याम टच
अशी अनेक गाणी आहेत ... खय्याम साहेबांनी आपल्यासाठी मागे सोडलेली
..... आदरांजली .......
वाचने
8138
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
आदरांजली .. छान लेख
खय्याम एक अत्यंत सुरेला
सुंदर लेख ! खय्याम यांची
+१
In reply to सुंदर लेख ! खय्याम यांची by चौथा कोनाडा
+1
In reply to सुंदर लेख ! खय्याम यांची by चौथा कोनाडा
सुंदर लेख. खय्याम साहेबांना
खय्याम साहेबांना आदरांजली __/\__
मस्तच!!
आदरांजली
त्यांचे न विसरत्या येण्याजोगे
मस्त
+१
In reply to मस्त by नाखु
+१
फारच त्रोटक श्रद्धाजंली !
सुंदर ! सोन्या बागलाणकर _/\_
In reply to फारच त्रोटक श्रद्धाजंली ! by सोन्या बागलाणकर
खरंय. टंकनदोष झाला. माफी
In reply to सुंदर ! सोन्या बागलाणकर _/\_ by चौथा कोनाडा
अब फरीश्तों को रागिनीयां सुनायेंगे खैय्याम साब !