खय्याम ... एक आदरांजली

अमर विश्वास's picture
अमर विश्वास in जनातलं, मनातलं
21 Aug 2019 - 2:32 pm

खय्याम ... एक आदरांजली

जिस सुबह की खातिर जुग-जुग से,
हम सब मर-मर के जीते हैं
जिस सुबह की अमृत की धुन में, हम ज़हर के प्याले पीते हैं
इन भूखी प्यासी रूहों पर, एक दिन तो करम फ़रमायेगी
वो सुबह कभी तो आयेगी ...

पडद्यावर राज च्या मिठीत हुंदके देणारी मला सिन्हा ... जणू आपल्या स्वत:लाच समजावणारा... भविष्याचे आशादायी चित्र उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा राज कपूर , साहिर चे बोचरे शब्द .. मुकेश चा आवाज ... यासगळ्याला संगीतही तसेच तोलामोलाचे हवे. खय्याम या कसोटीवर पुरेपूर उताराला. संपूर्ण गाण्यात कुठेवी तालवाद्य नाहीत. कारण तालावर ठेका धरायची ही वेळच नाही. ही वेदना खय्याम यांने आपल्या संगीतात अचूक पकडली. नवोदित खय्याम यांना चित्रपट सृष्टीत नाव मिळवून दिले ते याच चित्रपटाने.

खय्यामच संगीत असच पडद्यावरचा भावनांना पूरक असायचं... भावसमाधी लावणार.. मग ते शंकर हुसेन मधला लताच “आप यूं फासलोंसे गुजरते रहे” असो किंवा लता रफीच सिमटी हुई ये घडीयां असो...
बहारो मेरा जीवन भी सवारों मध्ये बहारों नंतर पॉज घ्यावा तो खय्यामनीच

रझिया सुलतान या चित्रपटातील हे गाणं .. ऐ दिले नादाँ .. खरतर आधीचा चित्रपट पाहून आपण पुरेसे वैतागलेले असतो.. त्यात हे गाणं संपता संपत नाही .. लताच्या "ज़िंदगी जैसे, खोयी-खोयी है, हैरां हैरां है" या ओळींनंतर अचानक सर्व वाद्ये थांबतात.. संपूर्ण शांतता पसरते... संपूर्ण पडदा व्यापून टाकणारे वाळवंट .. ह्या शांततेला चिरत लताचा आवाज हलवून जातो ... ये ज़मीं चुप है आसमाँ चुप है... कॅमेरा निळ्या आकाशाला गवसणी घालतो ... फिर ये धाडकनसी चार सू क्या है ... वाद्य परत वाजू लागलेली असतात... गाण्याने पुन्हा आपली लय पकडलेली असते. हाच तो खय्याम टच

कभी कभी ... यश चोप्रांचा मॅग्नम ऑपस ... दोन पिढ्यांची कहाणी.. एकीकडे ऋषी-नितु या जोडीसाठी रोमँटिक गाणी तर दुसरीकडे अमिताभ राखी शशी हा त्रिकोण.. एकीकडे "तेरे चेहरेसे नज़र नही हटती" किंवा "प्यार कर लिया तो क्या प्यार है खता नही" अशी उडत्या चालीची गाणी तर दुसरी कडे "कभी कभी मेरे दिलमें खयाल आता है" हे गाणं ... या सगळ्यावर कळस म्हणजे "मैं पल दो पल का शायर हूँ" ... यात अमिताभ साठी चक्क मुकेशचा आवाज वापरला होता.. हे गाणं पडद्यावर बघताना ही निवड किती योग्य होती हे जाणवते .. हाच तो खय्याम टच. ह्याच चित्रपटासाठी खय्याम ना पहिले फिल्म फेअर अवॉर्ड मिळाले होते.

उमराव जान ... या चित्रपटाशिवाय खय्याम यांचा सांगीतिक प्रवास पूर्णच होऊ शकत नाही. आशाताईंनी अजरामर केलेली उमरावजान ची गाणी तर आहेतच .. पण गुलाम मुस्तफा खाँसाहेबांनी गायलेली रागमाला जरूर ऐका (आमिरनं ते उमरावजान हा कायापालट ह्याच गाण्यात होतो)
पण या सगळ्यावर कळस म्हणजे "जिंदगी जब भी तेरी बझ्म में लाती है हमें " हे गाणं .. तलत अझिझ चा गंभीर आवाज योग्य परिणाम साधतो ... परत एकदा खय्याम टच

अशी अनेक गाणी आहेत ... खय्याम साहेबांनी आपल्यासाठी मागे सोडलेली

..... आदरांजली .......

चित्रपटप्रकटन

प्रतिक्रिया

भावना कल्लोळ's picture

21 Aug 2019 - 5:02 pm | भावना कल्लोळ

आदरांजली .. छान लेख

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Aug 2019 - 5:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

खय्याम एक अत्यंत सुरेला संगितकार म्हणून कायम स्मरणात राहील. आदरांजली !

चौथा कोनाडा's picture

21 Aug 2019 - 5:50 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेख ! खय्याम यांची रसिकांच्या काना-मानात रुजलेल्या गाण्यांचा प्रवास सुंदर रेखाटलाय !

अमर विश्वास _/\_

मूकवाचक's picture

21 Aug 2019 - 7:03 pm | मूकवाचक

_/\_

जॉनविक्क's picture

22 Aug 2019 - 1:21 pm | जॉनविक्क

_/\_

पद्मावति's picture

21 Aug 2019 - 6:42 pm | पद्मावति

सुंदर लेख. खय्याम साहेबांना आदरांजली __/\__

जिंदगी जब भी तेरी बझ्म में लाती है हमें +१

जव्हेरगंज's picture

22 Aug 2019 - 12:25 am | जव्हेरगंज
मित्रहो's picture

22 Aug 2019 - 12:42 am | मित्रहो

उमराव जान एकापेक्षा एक गाण्याचा खजिना आहे. मला जास्त आवडते तु इन आँखो की मस्ती हे आणि तलत अझीझचे जिंदगी जब भी

मराठी_माणूस's picture

22 Aug 2019 - 1:19 pm | मराठी_माणूस

त्यांचे न विसरत्या येण्याजोगे , फुटपाथ मधील "शाम ए गम की कसम" हे गाणे.
(त्या काळात नवीन असलेले इलेक्ट्रॉनिक वाद्य , सोलो वॉक्स चा वापर ह्या गाण्यात केलेला होता)

नाखु's picture

22 Aug 2019 - 2:03 pm | नाखु

आदरांजली.
त्रिशूल सिनेमातील गाणी सुद्धा श्रवणीय संगीत असलेली आहेत.
आणि थोडीसी बेवफाई मधील किशोरच्या आवाजातील " हजार राहे जो मुडके " हे गाणे अगदी अफलातून आहे.

विविध भारती श्रोता वाचकांची पत्रेवाला नाखु

चौथा कोनाडा's picture

22 Aug 2019 - 5:32 pm | चौथा कोनाडा

+१

सोन्या बागलाणकर's picture

23 Aug 2019 - 4:21 am | सोन्या बागलाणकर

फारच त्रोटक श्रद्धाजंली !

खय्याम यांचं म्युझिकल करिअर खूप महान आणि समृद्ध आहे.
अतिशय गुणी पण थोडासा दुर्लक्षित असा हा संगीतकार. लाला रुख मधील "है कली कली के लबपर" हे तडफदार गाणे असो वा "ठहरिये होश में आलू" यासारखं धुंद करणारं रोमँटिक गाणं असो, खय्याम यांनी आपलं वेगळंपण नेहमीच दाखवून दिलं.

वाद्यांचा कमीत कमी पण सुरेख वापर करून गाणे मेलोडियस करण्याचे कसाब खय्याम साहेब सोडून फार कमी लोकांनी दाखवलं. "वो सुबह कभी तो आएगी" मधे याची पहिली झलक लोकांना पाहायला मिळाली पण याचा अधिक सुरेल आणि अधिक परिणामकारक उपयोग पाहायचा असेल तर "जाने क्या ढूंढती रहती है ये आँखे मुझमें(शोला और शबनम)" हे गाणे ऐकायलाच पाहिजे. अर्थात याचे बरेचसे श्रेय रफीसाहेबांनाही आहे. याशिवाय फिर सुबह होगी याच चित्रपटातील "चिनो अरब हमारा" या गाण्यातही गायकाच्या आवाजाला प्राधान्य देऊन वाद्यांचा वापर कमी ठेवला आहे. याशिवाय मराठी माणूस यांनी वर उल्लेखलेलं "शाम-ए-गम की कसम" हे नितांतसुंदर गाणंही याच पठडीतलं!

नवीन गायकांना चान्स देण्याचही धाडस खय्याम साहेबांएवढं फार कोणी केलं नाही मग ते "बुझा दिए है खुद अपने हाथो (शगुन) - सुमन कल्याणपूर" असो किंवा "तुम अपना रंज-ओ-ग़म (शगुन) - जगजीत कौर" असो अथवा "फिर छिड़ी रात रात फूलो की (बाज़ार) - तलत अज़ीज़" असो. नवोदित गायकांना घेऊनही सुपरहिट गाणी देण्याचा रेकॉर्ड मला वाटतं फक्त खय्याम यांच्याच नावावर असावा.

केवळ फिल्मी नव्हे तर खय्याम यांच्या नॉन-फिल्मी गझलाही केवळ अप्रतिम. मग ते "ग़ज़ब किया तेरे वादे पे" असो किंवा "नुक़्त चिन है ग़म-ऐ-दिल" असो रफीसाहेबांच्या मधाळ आवाजाने आणि खय्याम यांच्या संगीताने कायल केलं नाही तर तुम्हाला संगीत कळलं नाही असं खुशाल समजा. याशिवाय "पाओं पडू तोरे शाम ब्रिज में लौट चलो" किवा "तेरे भरोसे रे नंदलाला" यासारखी सुंदर भजनंही त्यांनी रफीसाहेबांच्या आवाजात अजरामर केली.

अशा हरहुन्नरी आणि अतिशय विनम्र स्वभावाच्या संगीताच्या बादशहाला साश्रू श्रद्धांजली!

चौथा कोनाडा's picture

23 Aug 2019 - 6:35 pm | चौथा कोनाडा

सुंदर ! सोन्या बागलाणकर _/\_

पण "आलू" च्या जागी आलूँ असं हवंय का ?

सोन्या बागलाणकर's picture

26 Aug 2019 - 4:10 am | सोन्या बागलाणकर

खरंय. टंकनदोष झाला. माफी असावी.

खैय्याम म्हणजे खासा संगीतकार असून संगीत देतांना वाद्यसाथीला 'लेस इस मोअर' तत्व लावणारा, नजाकतदार सुरावटी देणारा आणि गाण्यात तो प्रसिद्ध 'पॉझ' घेणारा माणूस !
(आठवा:- आप यूं फासलों से मध्ये 'एक नदी' म्हणतांना किंवा ऐ दिले-नादान मध्ये 'ये जमी चुप है' नंतरचा पॉझ)

खैय्याम म्हणजे नवीन कंठांना सोनसंधी देणारा सुरांचा जादूगार ! सोन्या यांनी म्हटल्याप्रमाणे नॉन-फिल्मी रचनांमध्ये तर खैय्यामच्या प्रतिभेला बहर येतो नुसता.

आणि हे सगळं करूनही ज्याचा एकेरी उल्लेख करण्याजोगा आपलेपणा वाटतो असा माणूस म्हणजे खैय्याम.

आपले कान-मन तृप्त केल्यानंतर अब फरीश्तों को रागिनीयां सुनायेंगे खैय्याम _/\_