आत्ताच काही मिनिटांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० रद्द करण्यासाठीचे बिल लोकसभेत सादर केले आहे. त्यात काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्रस्ताव आहे.
गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता, काश्मीर संदर्भात काही खास होणार आहे असे दिसत होते. ३५अ/३७० रद्दबातल करण्याच्या दृष्टीने आणि/किंवा जम्मूकाश्मीरचे विभाजन केले जाण्याच्या दिशेन पावले उचलली जातील, अश्या अनेक वावड्या उठत होत्या. मात्र, सरकारने या सर्व समस्येच्या मूळावरच घाव घातला आहे... ३७० कलम रद्द झाले की इतर सर्व गोष्टी आपोआप रद्दबातल/अनावश्यक ठरतील. १९४७ पासून भारताचे सर्वात मोठे दुखणे ठरलेल्या समस्येचा हा उपाय, कोणत्याही सरकारने १९४७ पासून आजतागायत केलेल्या कारवाईत सर्वात मोठी कारवाई व सर्वात मोठे राजकीय इच्छाशक्तीचे प्रदर्शन आहे, यात वाद नाही. आता येथून पुढे कोणता घटनाक्रम होईल हे पाहणे मोठे रोचक असेल.
हा भारतिय इतिहासातिल एक मैलाचा दगड आहे.
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
100028
प्रतिक्रिया
164
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाकिस्तान भारताला पूर्ण काश्मिर देणार नाहि.
In reply to ईंटरेस्टिंग! माझ्या वाचनात by राघव
पिओकेवर राजकीय ताबा मिळवण्यात
In reply to पाकिस्तान भारताला पूर्ण काश्मिर देणार नाहि. by अर्धवटराव
पिओकेवर राजकीय ताबा मिळवण्यात भारताला काहि इंट्रेस्ट नाहि.भारताने पिओकेवरचा हक्क सोडणे शक्य नाही... मग ते भाजपचे सरकार असो की अजून कोणा पक्षाचे. मात्र, भाजप सरकारने पुढच्या खेळ्या नीट खेळल्या आणि त्या यशस्वी झाल्या तर, "भारताच्या ताब्यातील पिओकेमधून चीनला व्यापारी वाहतूक करण्यास परवानगी" असा तोडगा निघू शकतो. पण, त्यासाठी चीनने पाकिस्तानला बांधावर बसवणे किंवा फार मोठी चूक करून पाकिस्तान नावाचे राष्ट्र नष्ट होणे, यापैकी काही एक होणे जरूरीचे आहे. चीन आणि भारताची सद्द्याची आर्थिक-व्यापारी-सामरिक-राजकिय चढाओढ पाहता, यापैकी कोणत्याही पर्यायाला तयार होणे चीनच्या सोयीचे नाही... कारण, स्वतः झटापटीत भाग घेण्याऐवजी, पाळलेले कुत्रे छू म्हणून प्रतिस्पर्ध्याच्या अंगावर सोडून आपण मजा पाहत बघणे केव्हाही जास्त चांगले. शिवाय, असे केले की, "माझा काही संबंध नाय बुवा", असा पवित्राही सहजपणे घेता येतो आणि "कुत्र्याला आवरायचे असले तर मला मान द्या" असे म्हणत वरचष्माही गाजवता येतो. सद्या अशी दोन कुत्री चीनने पाळली आहेत... अमेरिकेसाठी उत्तर कोरिया आणि भारतासाठी पाकिस्तान. तिच निती वापरून रशिया, सिरियाला अमेरिकेविरुद्ध वापरत आहे.भारताने पिओकेवरचा हक्क सोडणे
In reply to पिओकेवर राजकीय ताबा मिळवण्यात by डॉ सुहास म्हात्रे
असू शकते
Balakot हल्ला झाला होता
इथे स्वातंत्र्यदिनादिवशी
केवळ माध्यमांमधील देखावा
पाकिस्तानचे भाग
In reply to केवळ माध्यमांमधील देखावा by माहितगार
स्वावलंबी खेडे हा विचार खूप योग्य होता
स्वावलम्बी खेडे ...?
In reply to स्वावलंबी खेडे हा विचार खूप योग्य होता by Rajesh188
मग आणखी काय हवे ?
In reply to स्वावलम्बी खेडे ...? by चौकटराजा
पाकिस्तानचा संभाव्य पुढील डाव ?
हांग आश्शी. द्येवा नमस्कार
In reply to पाकिस्तानचा संभाव्य पुढील डाव ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काळजी कृ नये.
In reply to हांग आश्शी. द्येवा नमस्कार by गब्रिएल