✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोदींनी मॅन व्हर्सेस वाइल्ड मध्ये जाण्याचं काय प्रयोजन असावं?

A
alokhande यांनी
Tue, 07/30/2019 - 13:46  ·  लेख
लेख
डिस्कव्हरी हा एक जागतिक दर्जाचा चॅनल असून तो जगभर बघिताला जातो. आणि त्याच चॅनल वर जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान या जगप्रसिद्ध शो मध्ये जाऊन काय सांगू इच्छितात. किंवा जगभरातील देशांना कोणता संदेश देत असावेत. का हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट म्हणायचा
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
13295 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

मोदींना भटकायची आवड आहेच.

कंजूस
Tue, 07/30/2019 - 13:58 नवीन
मोदींना भटकायची आवड आहेच. साधू बनून ते हिमालयात राहणार होते. वाराणसीतल्या त्यांच्या गुरूने 'मना' केलं. "तू या अध्यात्मात वेळ घालवू नकोस."आता चांगला गाईड शोधला आहे. (( फक्त एकच प्रश्न - त्यांच्याबरोबरचे ओफिसरही हे करणार का?)) -----
  • Log in or register to post comments

मोदि साहेब पंढरपुरच्या

चौथा कोनाडा
Tue, 07/30/2019 - 14:10 नवीन
मोदि साहेब पंढरपुरच्या येत्या कर्तिकी यात्रेलापण आळंदी ते पंढरपुर पायी चालत येणार आहेत असे ऐकले !
  • Log in or register to post comments

तुम्ही ha प्रश्न ओबामा ना

बाप्पू
Tue, 07/30/2019 - 14:14 नवीन
तुम्ही ha प्रश्न ओबामा ना विचारला का?? मोदी प्रधानमंत्री जरी असले तरी त्यांनी कोणत्या शो मध्ये सहभागी व्हावे कोणत्या नको हे ठरवण्याचा अधिकार त्यांना आहे.
  • Log in or register to post comments

ओडिसा मध्ये पूर वगैरे असताना

हस्तर
Tue, 07/30/2019 - 15:07 नवीन
ओडिसा मध्ये पूर वगैरे असताना असे जाणे ह्याचे विरोधक भांडवल करत आहेत
  • Log in or register to post comments

>>> जगातील सर्वात मोठ्या

वामन देशमुख
Tue, 07/30/2019 - 15:21 नवीन
>>> जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान या जगप्रसिद्ध शो मध्ये जाऊन काय सांगू इच्छितात.
नमो ही व्यक्ती पंतप्रधान आहेत, अनेक खात्यांचे केंद्रीय मंत्री आहेत, खासदार आहेत, मतदार आहेत भारत गणराज्य देशाचे नागरिक आहेत. यांपैकी कोणत्या भूमिकेतून ते बेअर ग्रिल च्या कार्यक्रमात सहभागी झालेत ते पाहावं त्यानंतर ते सहभागी होण्यातून काय काय सांगू इच्छितात ते पाहावं.
>>> किंवा जगभरातील देशांना कोणता संदेश देत असावेत.
एक किंवा अनेक संदेश असू शकतात, ते त्या कार्यक्रमातून कळेलंच. BTW, या जगात, निळ्या रंगाचे शरीर असलेले, शेळीच्या स्तनातील दूध पिणारे, खारीक खाणारे, लहान मुले आवडणारे, देशासाठी कोलू ओढणारे, काथ्या कुटणारे ... इ. प्रकारचे अनेक प्रसिद्ध नेते होऊन गेले आहेत, त्या यादीत अजून एकाची भर... सर्वांनीच काही ना काही संदेश दिलेत. कुणाच्या संदेशाचे अध्याय झालेत, कुणाच्या संदेशाचे समग्र खंड झालेत तर कुणाच्या संदेशाचे रेडिओ कार्यक्रम झालेत त्यात अजून एकाची समृद्ध अडगळ!
>>> का हा निव्वळ पब्लिसिटी स्टंट म्हणायचा
हवं तर पब्लिसिटी स्टंट म्हणा, राजकारण्यांना पब्लिसिटी हवीच असते, स्टंट मधून किंवा अजून कश्यातून, त्यात सद्य परिस्थितीत चूक / बरोबर असं काही नाही.
  • Log in or register to post comments

आधीक

नाखु
Tue, 07/30/2019 - 17:06 नवीन
माहितीसाठी पंधरा वर्षे राज्यात आणि पाच वर्षे केंद्रात मॅन व्हरसेस वाईल्ड अनुभव असल्याने आता खर्या जंगलातला अनुभव घेतला तर काय हरकत आहे. सगळ्यांनाच श्रमपरिहार करण्यासाठी बॅंकॉक येथे जाण्याची सवय नसते. खुलासा पटलाच पाहिजे असा आग्रह नाही,आपण रडत राउतगीरी करु शकता. शिक्का मोर्तब झालेला पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु
  • Log in or register to post comments

पब्लिसिटी आहेच

जॉनविक्क
Tue, 07/30/2019 - 18:03 नवीन
पण निव्वळ पब्लिसिटी स्टंट म्हणणे याक्षणी धाडसाचे ठरेल विशेषतः आत्ता त्याची गरज प्रकर्षाने नाही. बाकी संदेश फार सोपा देत आहेत मोदी, तो म्हणजे he is man of substance. मोदी म्हणजे कणखर व्यक्तिमत्व हे अधोरेखित करायला हा कार्यक्रम नक्कीच चांगला आहे.
  • Log in or register to post comments

हेही आहे. त्यासोबतच जगभर हा

राघव
Wed, 07/31/2019 - 14:25 नवीन
हेही आहे. त्यासोबतच जगभर हा कार्यक्रम बघीतला जाण्याने पर्यटनाच्या अनुषंगाने देखील बराच फायदा होण्यासारखा आहे. जगभरातील लोकांपर्यंत मोदींचं नाव पोहोचवण्यासाठी हा मार्ग खूपच उपयुक्त आहे. तसेच मोदी म्हणजे हटके.. काहीतरी वेगळं.. हे बिंबवायला देखील मदत होते. धक्कातंत्राच्या बाबतीत मोदी खूप पुढे आहेत सगळ्यांच्या एवढे मात्र नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

मोदी भले लोकांना नाराज करत असतील

धर्मराजमुटके
Tue, 07/30/2019 - 18:07 नवीन
मोदी भले लोकांना नाराज करत असतील पण आम्ही तुम्हाला नाराज करणार नाही. तुम्हाला कसे प्रतिसाद आवडतील ? मोदींना शिव्या घालणारे की तारीफ करणारे ?त्या प्रमाणे प्रतिसाद पाडून देऊ.
  • Log in or register to post comments

मोदी पौरुष प्रतिमा अधोरेखीत करत असावेत

मारवा
Tue, 07/30/2019 - 20:02 नवीन
सर्वसाधारण पारंपारीक असे जे " हिंदु मानस " आहे त्या ला मोदी फार व्यवस्थित अपील होतात उदा. १- मोदीं चे आई ला अधिक महत्व देणे पत्नी ही दुय्यम स्थानावर ठेवणे हे एक २- मोदींची फकिरी वृत्ती भिरकावुन देण्याची वृत्ती ( म्हणजे बोलण्यात तरी ) हम तो फकीर है ........हिंदु मानस याने फार इम्प्रेस होते. ३- मोंदीची गुढ साधना योग साधना तब्येत स्टॅमिना इ. सॅक्रेड सोर्स मधुन त्यांना मिळणारी पॉवर ४- या सर्वाला जोडुन आता " निर्भय" "साहसी" पौरुषत्व असणारे मोदी या ला आता बहुधा यातुन चालना देण्यात येइल. सिमीलर उदाहरण म्हणजे पुतिन ते तायक्वांडो च्या डावात प्रतिस्पर्धी चित करतांना , बर्फात आंघोळ अशा टाइपच्या इमेजेस चालवतात हे त्यासारखे प्रथमदर्शनी तरी भासते.
  • Log in or register to post comments

तायक्वांडो पुतीनचे

अभ्या..
Tue, 07/30/2019 - 22:39 नवीन
व्लादिमीर पुतीनच्या इमेज बिल्डिंग बद्दल जरी शंका असल्या तरी पुतीन ज्युडो चा ब्लॅक बेल्ट तोही 8 डॅन आहे. फार थोड्या लोकांना हा मिळाला आहे. त्याचा सराव हा पुतीनच्या जीवनशैलीचा भाग आहे. फिटनेसवरूनही ते दिसून येते. त्यात स्पेशल इमेज मेकिंग फोटोग्राफीसाठी काही केलेय असे नसावे. बर्फाळ पाण्यातली आंघोळ मात्र ऑर्थोडॉकस ख्रिश्चन प्रथेसाठी केली. त्यात कदाचित राजकारण असेलही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

पुतीन

झेन
Wed, 07/31/2019 - 09:46 नवीन
व्लादिमीर पुतीनच्या राजकारणाचे माहिती नाही पण फिटनेस रीयल वाटतो कॅमेरासाठी ईमेजबिल्डींग वगैरे नाही वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+1 पूर्णपणे सहमत.

जॉनविक्क
Wed, 07/31/2019 - 16:56 नवीन
पूतीन एक KGB अधिकारी होते राजकारणात येण्यापूर्वी त्यामुळे ज्यूडो वगैरे नक्कीच त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग असावा. 8 दान मिळवणे2 हि फार मोठी कमिटमेंट आहे. पूतीन यांनी ज्या अवघड परीस्थितीत सत्ता मिळवली व देश सांभाळला त्याचे काहीही झाले तरी कौतुकच आहे त्यामुळे मला मोदिंमधे त्यांचीही छबी दिसतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सॅक्रेड सोर्स मधुन त्यांना

महासंग्राम
Wed, 07/31/2019 - 09:46 नवीन
सॅक्रेड सोर्स मधुन त्यांना मिळणारी पॉवर च्यायला मी चुकून सॅक्रेड गेम्स वाचलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

शूटींग?

कपिलमुनी
Tue, 07/30/2019 - 22:08 नवीन
शूटींग कधी केले म्हणे याचे ?
  • Log in or register to post comments

बहुदा पुलगामा हल्ल्याच्या

कानडाऊ योगेशु
Wed, 07/31/2019 - 07:28 नवीन
बहुदा पुलगामा हल्ल्याच्या वेळी ! फारच गदारोळ झाला होता तेव्हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

तो बिअर ग्रिल्स जिवंत अळ्या,

तेजस आठवले
Tue, 07/30/2019 - 22:11 नवीन
तो बिअर ग्रिल्स जिवंत अळ्या, सरडे, साप काय वाट्टेल ते चावून खातो आणि भूक भागवतो. मोदींनी बरोबर जंगलात हांडवो फाफडा नेला असणार. नाहीतर निर्जळी. :D
  • Log in or register to post comments

मोदींनी अक्खी काँग्रेस

हस्तर
Wed, 07/31/2019 - 12:45 नवीन
मोदींनी अक्खी काँग्रेस खाल्लीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

खरं आहे. सगळ्या पक्षांतले

इरामयी
Wed, 07/31/2019 - 13:37 नवीन
खरं आहे. सगळ्या पक्षांतले असंतुष्ट नेते भाजपात येऊन भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण करतील अशी शक्यता वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

तरी पण कोणीही बोलणार नाही

हस्तर
Wed, 07/31/2019 - 13:51 नवीन
तरी पण कोणीही बोलणार नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरामयी

काय तुमीबी !!! आवो मोदी

गब्रिएल
Wed, 07/31/2019 - 10:17 नवीन
काय तुमीबी !!! आवो मोदी हेटर्सना खोट्याचा ख्येळ करत टीका कराय्ला कित्ती कित्ती तकलिफ व्हते. त्ये बगून मोदीना त्येंची कीव आली आसनार आनी मग त्येनी हेटर्सना कायतरी आराम पडावा म्हनून ह्यी योजना काडली हाये. लय दीस गप पडल्येले किती मोदी हेटर आत्ता हिते तल्वारी घ्येऊन भायेर पडल्येत त्ये बगा. 'सबका साथ सबका विकास आनी शेवटच्या मान्सापत्तूर आणंद' आशी योज्ना हा ही. =)) =)) =)) ;)
  • Log in or register to post comments

ते विचारवंत ४१

नाखु
Wed, 07/31/2019 - 16:41 नवीन
आणि इथलेच १४ फारसा फरक नाही, अगदी आवर्जून शिव्या द्यायला पुढे,ते ४१ जसं बाकी समाजाच्या अन्यायाविरुद्ध मिठाची गुळणी धरून बसतात तसं या १४ चे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

त्याचं काय आहे, मोदींच्या असं

इरामयी
Wed, 07/31/2019 - 13:34 नवीन
त्याचं काय आहे, मोदींच्या असं लक्षात आलं की त्यांना आजवर बहुतेक सगळ्या टिव्ही चॅनल्सनी प्रसिद्धी दिली आहे. एक डिस्कव्हरी चॅनल शिल्लक राहिलं होतं. मग आता तेसुद्धा!
  • Log in or register to post comments

बहुदा काही "प्राण्यांना"

कानडाऊ योगेशु
Wed, 07/31/2019 - 14:36 नवीन
बहुदा काही "प्राण्यांना" सुध्दा पक्षात घ्यायचे असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरामयी

मोदीजी

भंकस बाबा
Wed, 07/31/2019 - 18:37 नवीन
केदारनाथ गुहेत जाऊन बसल्यानंतर त्या गुहेचे बुकिंग मिळत नाही आहे. कोणाचा फायदा झाला? जऱ उद्या पर्यटनाला फायदा होऊन देशात रोजगार वाढला तर फायदा कोणाला? नक्कीच भाजपाला! मग अशा वेळी विरोधकांच्या पोटात दुखणारच! कारण हेच लोक तर बोंबा मारत होते ना कि रोजगार बुडाला?
  • Log in or register to post comments

्यूज चॅनल्स देखना बंद कर दिया

एकुलता एक डॉन
गुरुवार, 08/01/2019 - 22:58 नवीन
  • Log in or register to post comments

्यूज चॅनल्स देखना बंद कर दिया

एकुलता एक डॉन
गुरुवार, 08/01/2019 - 22:58 नवीन
्यूज चॅनल्स देखना बंद कर दिया था सिर्फ डिस्कवरी देखते थे, वहां भी मोदी आ गया भड़का हुआ मोदी विरोधी....
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा