आजकालच्या आधुनिक युगात स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. किंबहुना कित्येकदा तर पुरुषांच्या पुढे निघून गेल्याचे निदर्शनात येत आहे. केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेली कित्येक क्षेत्रे स्त्रियांनी काबीज केली आहेत आणि त्यात कर्तृत्व गाजवत आहेत. काही ठिकाणी तर स्त्रियांचीच मक्तेदारी असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळजवळ सगळ्याच कार्यालयांमध्ये तसेच खाजगी व्यवसायामध्ये स्त्रियांची संख्या वाढते आहे. नोकरी, व्यवसाय करून सुपर मॉम किंवा सुपर वूमन बनून घर देखील समर्थपणे सांभाळत आहेत (सेकंड शिफ्ट सिंड्रोम). अर्थार्जन करून संसाराला हातभार लावत आहेत. त्यामुळे इडलीडोसाविनर किंवा प्राठा / भाकरीविनर ह्या पुरुषांच्या पूर्वपार भूमिकेचे महत्व दिवसेंदिवस कमी होते आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे.
लैंगिक समानतेच्या आजच्या जगात स्त्री पुरुषांना नोकरी व्यवसायामध्ये एकत्र काम करावे लागणे अपरिहार्य आहे. ती काळाची गरज आहे. कित्येक ठिकाणी स्त्री कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी टार्गेट्स दिलेली दिसून येतात. काही विशिष्ट परिस्थिति स्त्रिया पुरुषांपेक्षा चांगल्या रीतीने हाताळू शकतात किंवा पुरुषांपेक्षा चांगले मल्टाय टास्किंग करू शकतात. स्त्री प्रमुख असलेल्या व्यवसायाची प्रगती पुरुष प्रमुख असलेल्या व्यवसायापेक्षा अधिक जोमाने होते असे निरीक्षण असल्याने कित्येक गुंतवणूकदार स्त्री प्रमुख असलेल्या व्यवसायामध्ये तुलनेने जास्त गुंतवणूक करतात.
मात्र असे असले तरी अजूनही उच्चपदस्थ स्त्रियांची संख्या कमी दिसून येते. खालच्या श्रेणीमध्ये स्त्रिया भरपूर प्रमाणात असल्यातरी वरच्या श्रेणीमध्ये तितक्या प्रमाणात स्त्रिया दिसत नाहीत. कदाचित स्त्रिया संसार, मुलेबाळे यांना अधिक प्राधान्य देत असतील किंवा इतर काही परिस्थितीजन्य गोष्टींमुळे ( उदाहरणार्थ ग्लास सिलिंग, स्टीकी फ्लोअर?) असे होत असावे. त्यामुळे सगळ्याच पुरुष कर्मचाऱ्यांना स्त्री कर्मचाऱ्याबरोबर काम करण्याचा अनुभव असू शकतो, असतो परंतु वरिष्ठ स्त्री कर्मचाऱ्याबरोबर काम करण्याची संधी कमी मिळते. आणि त्याही पुढे जाऊन बाईसाहेब अक्का लेडी बॉस च्या हाताखाली प्रत्यक्ष काम करणारे / केलेले पुरुष कर्मचारी आणखी कमी असतील.
स्त्रिया ह्या निसर्गतः केअर टेकर असल्याने हाताखालील कर्मचाऱ्यांची काळजी घेणे, शिस्त लावणे, कामे करून घेणे (कमी बुलीइंग), एकाचवेळी अनेक गोष्टींचे व्यवधान राखणे करू शकतात त्यामुळे बऱ्याच पुरुष मंडळींना स्त्री बॉस च्या हाताखाली काम करायला आवडते असे दशावतारातील साडेनव्वा सर्वआंजाव्यापी, सर्वज्ञानी आंग्ल अवतार श्री. गोगलदेव सांगतो. मला स्वतःला माझ्या करियर मध्ये कधीही स्त्री बॉस बरोबर काम करायची संधी अजूनपर्यंत तरी मिळालेली नाही परंतु आपल्या पैकी कोणा पुरुष मिपाकराला अशी संधी मिळाली आहे का? असेल तर आपला अनुभव कसा आहे / होता हे समजून घ्यायला आवडेल. आता हे सांगू नका की कार्यालयात नाही परंतु घरी मात्र लेडी बॉस आहे ते ! हा अनुभव सार्वत्रिक असल्याने सर्व जण परिचित आहेत. मेन आर फ्रॉम मार्स अँड वूमेन आर फ्रॉम व्हीनस या सुप्रसिद्ध सिद्धांताप्रमाणे मंगळे विरुद्ध शुक्रे असा काही संघर्ष, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होतो का? बऱ्याचदा उच्चपदस्थ पुरुष बॉस मंडळी एम सी पी च्या आरोपाला घाबरून स्त्री कर्मचाऱ्यांना सौहार्दपूर्ण वागणूक देतात त्याप्रमाणे एखाद्या स्त्री बॉस कडून हाताखालील पुरुष कर्मचाऱ्यांना ब्लॅक विडो स्पायडरची वागणूक मिळते का? या आणि अशा अनेकविध गोष्टींबद्दल आपले अनुभव वाचायला / ऐकायला आवडतील. काळाची पुढची पावले ओळखण्यासाठी याचा कदाचित उपयोग होऊ शकेल.
वाचने
13223
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक. अनुभव वाचायला आवडतील.
+१ स्वानुभव नाही, पण इतरांचे अनुभव
In reply to रोचक. अनुभव वाचायला आवडतील. by यशोधरा
बाॅस हा फक्त बाॅस असतो. ..
मी स्त्री बॉसच्या हाताखाली
+1. . .
In reply to मी स्त्री बॉसच्या हाताखाली by जॉनविक्क
पण. ...शेतात स्त्री कामगार
In reply to +1. . . by मुक्त विहारि
भारताचे एक पाऊल चंद्रावरील जीवनशैलीत...
In reply to पण. ...शेतात स्त्री कामगार by जॉनविक्क
हम्म, एकूण बरेच पदर आहेत म्हणायचे की।
In reply to भारताचे एक पाऊल चंद्रावरील जीवनशैलीत... by मुक्त विहारि
काय राव ...तूम्ही पण. ...
In reply to हम्म, एकूण बरेच पदर आहेत म्हणायचे की। by जॉनविक्क
पदरात पडलं पवित्र झालं
In reply to काय राव ...तूम्ही पण. ... by मुक्त विहारि
.
महिला बॉस
ह्या डेंजर विषयाला आम्ही हात
तुम्हाला आया बहिणी नाहीत का
In reply to ह्या डेंजर विषयाला आम्ही हात by माझीही शॅम्पेन
तुम्हाला आया बहिणी नाहीत का
In reply to तुम्हाला आया बहिणी नाहीत का by जॉनविक्क
तुम्हाला बाप भाऊ नाहीत का? असा प्रतिसाद यायचा राहिलाय :)
In reply to तुम्हाला आया बहिणी नाहीत का by जॉनविक्क
अख्खा धागा वाचला. कुठेच काही
In reply to ह्या डेंजर विषयाला आम्ही हात by माझीही शॅम्पेन
थोडा मार्केटिंगचा जमाना आहे :
In reply to अख्खा धागा वाचला. कुठेच काही by यशोधरा
होता है, होता है!
In reply to थोडा मार्केटिंगचा जमाना आहे : by माझीही शॅम्पेन
इतरवेळी ठीक पण जर मनासारखे
टका भाऊ जाणूनबुजून पंगा
In reply to इतरवेळी ठीक पण जर मनासारखे by टवाळ कार्टा
क्षमा करा देवा पण
In reply to टका भाऊ जाणूनबुजून पंगा by चामुंडराय
जॉनविक्क साहब, आप PSPO नहीं जानते ?
In reply to क्षमा करा देवा पण by जॉनविक्क
कसली गुगली टाकताय थोडं मराठीत समजेल असं सांगकी :(
In reply to जॉनविक्क साहब, आप PSPO नहीं जानते ? by चामुंडराय
कसली गुगली टाकताय थोडं मराठीत
In reply to कसली गुगली टाकताय थोडं मराठीत समजेल असं सांगकी :( by जॉनविक्क
आता विशेष काही नाही
In reply to कसली गुगली टाकताय थोडं मराठीत by जॉनविक्क
अरे काय कोड्यात गप्पा चालू आहेत
In reply to आता विशेष काही नाही by झेन
इथे वाचा
In reply to अरे काय कोड्यात गप्पा चालू आहेत by जॉनविक्क
ओह असं आहे होय
In reply to इथे वाचा by संग्राम
Homo sapiens sapiens च्या अर्ध्या प्रजातीला पुढील प्रगती साठी