महिला वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ?

माझीही शॅम्पेन's picture
माझीही शॅम्पेन in काथ्याकूट
15 Feb 2015 - 10:32 pm
गाभा: 

स्त्री वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ?

मुलाखत आणि नोकरी वरून कमी करणे हे विषय आणि त्या वरील प्रतिक्रिया वाचून बरेच दिवस मनात रेगन्ळेल्या विषयाला हात घालू पाहतोय. ध्याग्याचा उद्देश एकांगी टीका करण्याचा नाही तर अनेक जुन्या आणि जाण्यात्या मित्रांशी चर्चा करताना हा विषय नेहमी चर्चेत येतो आणि उलट-सुलट वाद होतात , माझे अनुभव सांगतोय ह्या अनुषंगाने तुमचे अनुभव तुम्ही मांडू शकता.

१. पहिला अनुभव - आय टी क्षेत्रात एकदम नवीन होतो , प्रोजेक्ट मध्ये काम केल्या केल्या सोबतच्या सहकार्यांने सावध केले कारण माझ रेपोर्टिंग सलग दोन थरांतील महिला वर्गातील होत्या , सुरुवातील एकदम छान वाटायचं कारण नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळायच्या नवीन फंडे ऐकायला मिळायचे. काही दिवसांनी लक्षात आल कि त्या दोघांपैकी जी वरिष्ठ महिला होती ती निव्वळ टाईम पास करायची ऑफिस मध्ये बसल्या बसल्या सर्व स्वत:ची खाजगी काम करायची. अगदी दर तासाने फोन स्पीकर वर ठेवून मुलगा आणि नवरा काय करतो चेक करत रहायची
हळू हळू लक्षात आले त्यांची पोच वर पर्यंत होती त्यामुळे सर्व जण टरकून असायचे. केवळ ह्याच कारण्यासाठी मी पण मी बरा माझ काम बर अस चालू ठेवलं. एक दिवशी त्यांनी त्यंची टाईम शिट भरण्याच काम माझे मागे लावून दिल (हे अजून एक , आधीच बरीच काम करायचो) . त्यानंतर एक महिन्यांनी फ्लोर मिट होती त्यात त्यांनी सरळ ठोकुन दिल जशी मी टाईम शिट वेळे वर भरते तशी तुम्ही सर्वांनी भरा ... मी आवाक झालो. नंतर काही दिवसांनी ऑन साईट हवी म्हणून सरळ ऑन साईट ला निघून गेलो. नंतर हळू-हळू त्रास कमी झाला.

२. दुसरा अनुभव : उत्तरे कडील खास करून बंगाली + महिला हे समीकरण खूप त्रासदायक असते असे ऐकून होतो पण अनुभव नव्हता , एका प्रोजेक्ट साठी कन्सलटनट म्हणून निवड झाली होती. मी माझ काम सुरु करून एक दिवस झाला नव्हता तर अशीच एक सहकारी सरळ इमेल वर ५७ काम दिली , त्यातील बरीचशी माझ्या कार्य-कक्षेच्या बाहेरील होती. वरून दर ४ तासाने फोलो अप. मीटिंग अगोदर फैलावर घ्यायचं आणि नंतर व्यवस्थित समजावलं तर दुर्लक्ष्य करण अस चालू होत. नंतर काही सहकार्यांशी चर्चा केली तर ते पण फुल-टू टरकून होते. एकाने तर सरळ सांगितले बाबा तिच्या बरोबर एकटा मीटिंग करून नको. . . तुझ्या अगोदर एक जण होता त्याच्या बद्दल तिने sexual harassment ची तक्रार केली होती आणि HR ने त्याला उचलला होता. नंतर ज्याला काढल होतो त्याच्याशी फोन वरून बोललो त्याने अपेक्षित असेच सांगितले , त्याने वरिष्ठ अधिकार्यांना ह्या अकार्यक्षम सहकारयाची तक्रार केली होती. कुठून तरी हिला कुण -कुण लागली होती. नंतर काही दिवस शांत पणे दिवस-रात्र काम चालू ठेवलं नंतर सरळ कस्टमरने तिच्या बद्दल जोरदार तक्रार केली आणि प्रोजेक्ट बंद केला.

३. तिसरा अनुभव :- महिला सहकारी manage करत असलेल्या जवळच्या प्रोग्राम मध्ये एकाच महिन्यात सहा राजीनामे आले , बर सर्वांनी ही महिला वरिष्ठ नको अस HR ला स्पष्ट पणे सांगितले अधिक खोलात गेल्या वर कळले हा micromanagement चा असह्य त्रास होता. नवल म्हणजे राजीनामा दिलेल्या पैकी दोन मुली होत्या , त्यांना पण विचारले कि खरच अस आहे का ? त्याचं पण तेच म्हणण होत सतत भुणभुण ह्याचा त्यांना कंटाळा आला होता. शेवटी हाता पाया पडून चौघांना थांबवलं , Program Manager बदलला मग पुढे अस काही झाल नाही

Disclaimer : असो कदाचित हे सर्व one off (दूर्मिळ) अनुभव असतील , तसे बरेच अनुभव आहेत , बरोबर च्या काही महिलांनी पण हे सांगितलाय कि त्यांना पण महिला वरिष्ठ म्हणून नकोय , दुसर्या बाजूने पुरुष वरिष्ठ असतील तर स्त्री सहकाऱ्यांना भयंकर अनुभव असतील पण अस काही असू शकत हे मांडण्य्साठी हा प्रपंच

प्रतिक्रिया

झकास's picture

15 Feb 2015 - 10:37 pm | झकास

you have opened pandora's box !

थोडं एकांगी वाटतंय. इतरांच्या प्रतिक्रियांची वाट पहातो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Feb 2015 - 11:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

महिला वरिष्ठ पदावर असण्याचा अनुभव नाही पण एच.आर. मधल्या आणि अ‍ॅन्युअल गोल सेटींग, गोल अ‍ॅसेसमेंट आणि इन्क्रिमेंट निगोशिएशन्स वगैरे करणार्‍या बी.ए. आर्ट्स/ एम.बी.ए. एच.आर. असणार्‍या मुलींचे दोन वेळा अतिशय वाईट अनुभव आलेत.

१. अनुभव क्रमांक एकः माझा कार्यानुभव जेमतेम १ वर्ष ३ महिने वगैरे असतानाची ही घटना आहे. आमच्या इकडे काही सायकल टाईम रिडक्शनचे प्रोजेक्ट्स चालु होते. अश्या प्रोजेक्ट्ससाठी प्रोसेस टाईम, प्रोसेस पॅरामीटर, टुलिंग डेटा वगैरेचा सखोल अभ्यास लागतो. काही आठवड्यांचा तरी डेटा लागतो. ह्या बैची अपेक्षा अशी की हा प्रोजेक्ट परफॉर्मन्स अ‍ॅसेसमेंटच्या आत पुर्ण व्हायला हवा. माझ्या सिनिअर इंजिनिअरवर सुद्धा तिनी दबाव आणायला सुरुवात केली. त्या एका विशिष्ट इन्क्रिमेंटच्या वेळेला फक्त ८०० रुपये पगारवाढ मला आणि ३२००~३५०० पगारवाढ त्या सिनिअर इंजिनिअरला दिली. आमची सटकली. सरळ कॉर्पोरेट ऑफिसवाल्या एच.आर. मॅनेजरकडे प्रकरण घेउन गेलो. तिथे बोलवुन त्या पोरीची यथेच्च अक्कल काढली. टेक्निकल गोष्टींमधे नाक खुपसु नको म्हणुन सुनावुन झालं. तेव्हापासुन मात्र कंपनीमधे इंजिनिअर ग्रॅज्युएट आणि एम.बी.ए. एच.आर. पार्श्वभुमीच्या लोकांना गोल सेटींग वगैरे कामाला लावलं जायला लागलं. पगारवाढ मात्र अपे़क्षित मिळाली नाही तेव्हा.

दुसरी घटना संपुर्ण इथे लिहु शकतं नाही. पण एवढं मात्र सांगीन. फक्त अधिकार हातामधे एकवटलेल्या आणि कंपनी पॉलिसित बसतं नाही ह्या एका वापरुन वापरुन गुळगुळीत झालेल्या वाक्याचा वापर करुन एका सिनिअर अधिकार्‍यानी केलेल्या डेटा चोरीचा आणि त्याच्याशी अफेअर असणार्‍या एच.आर. पोरीचा मात्र भयानक त्रास झाला होता. नोकरी रहाते का जाते अश्या तणावाखाली २ आठवडे काढलेत. :(

तेव्हापासुन मात्र कंपनीमधे इंजिनिअर ग्रॅज्युएट आणि एम.बी.ए. एच.आर. पार्श्वभुमीच्या लोकांना गोल सेटींग वगैरे कामाला लावलं जायला लागलं.

म्हणजे हे सगळे इंजिनिअर ग्रॅज्युएट आणि एम.बी.ए. एच.आर. पार्श्वभुमीचे लोक पुरुषच असू शकतात असंच ना? कारण तसं नसेल तर धाग्याचा आणि या अनुभवाचा काहीच संबंध उरत नाही....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2015 - 1:40 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

माझा ह्याच्याखालचा प्रतिसाद वाचा :)

धागा स्त्री वरिष्ठ असा निघाला आहे म्हणुन मी तसं बोललेलो आहे. मी लिंग, वय, धर्म, जात आणि अ‍ॅपिअरन्स वरुन कुठल्याही व्यक्तीविषयी माझं मतं बनवत नाही. माझा आक्षेप त्या कामामधली अजिबात माहिती नसताना डेडलाईन ठरवण्याला आहे. मग तो पुरुष जरी असता तरी हेचं बोललो असतो. किंबहुना त्याला तिथल्या तिथे "फाट्यावर मारायला" सुद्धा कमी केलं नसतं.

वाचलाय हो तुमचा खालचा ही प्रतिसाद...

माझा आक्षेप त्या कामामधली अजिबात माहिती नसताना डेडलाईन ठरवण्याला आहे. मग तो पुरुष जरी असता तरी हेचं बोललो असतो.

हेच तर मी म्हणतोय ना.... गल्ली चुकलीये आपली. इथे वरीष्ठांच्या चुकांचा पाढा वाचायचा नसून, वरीष्ठ व्यक्ती ही महिला असल्यामुळे होणार्‍या चुकांचा पाढा वाचायचाय..... ;-)
आपल्या मनात काहीही नसलं तरी, या धाग्यावर आल्यामुळे असंच दिसतंय की वरीष्ठ पदावरील व्यक्ती ही महिला असल्यामुळेच ह्या चुका झाल्या आहेत, असं आपल्याला म्हणायचंय..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2015 - 6:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अशी समजुत होण्यासारखी त्रुटी माझ्या प्रतिसादात राहिली असेल तर क्षमस्व.

सतिश गावडे's picture

15 Feb 2015 - 11:01 pm | सतिश गावडे

मी ही आयटीत काम करतो. तुम्हाला आलेले अनुभव दुर्दैवी आहेत. माझ्या सुदैवाने मला खुपच चांगला अनुभव आला. आठ वर्षांपूर्वी मी एका नामांकीत कंपनीत संगणक अभियंता म्हणून रुजू झालो. त्याआधी मला छोटया कंपन्यांमधला जवळपास दिड वर्षांचा अनुभव होता.

पुढची चार वर्ष त्या कंपनीत मी त्याच मॅनेजरला रीपोर्ट करत होतो. तिने अक्षरशः माझी व्यावसायिक कारकिर्द घडवली. खेडयातून आलेल्या एका लाजाळूचे घर असणार्‍या मुलाला तिने कधी समजावून सांगत तर कधी अक्षरशः ओरडत एक competent software engineer बनवलं. त्याबद्दल मी माझ्या त्या मॅनेजरचा आयुष्यभर ऋणी असेन.

खुप पूर्वी मी माझ्या ब्लॉगवर त्याबद्दल एक पोस्ट टाकली होती.

त्या ब्लॉग पोस्टमधूनः

...सहज म्हणून कधी मागे वळून पाहतो. उलटून गेलेल्या भुतकाळाच्या पानांवर खुप काही दिसतं. तीन वर्षांपूर्वी जेव्हा ही कंपनी जॉईन केली तेव्हा मी एक गोंधळलेला, आत्मविश्वास नसलेला मुलगा होतो. आज कंपनीचा यू एस रीटर्न्ड सिनियर सॉफ्टवेअर ईंजिनीयर आहे. तेव्हा डोळ्यांत स्वप्नं होती पण त्या स्वप्नांना दिशा नव्हती. कारण दिशा देऊ शकेल असं आजूबाजूला कुणीच नव्हतं. ती पोकळी वैशालीने भरून काढली. कधी रागावत तर कधी समजावून सांगत तिने मनामध्ये आत्मविश्वास भरला, स्वप्नांना दिशा दिली. तिचं हे देणं मी कधीच चुकतं करू शकणार नाही...

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2015 - 11:08 pm | पिलीयन रायडर

तुम्हाला आलेले अनुभव वाचुन वाईट वाटलं.. पण त्यातुन निष्पन्न काहीच होत नाही.. मलाही वरच्या उदाहरणांप्रमाणे अक्षरशः ३ किस्से माहित आहे जिथे असाच त्रास पुरुष देत आहेत/होते. पण मला अनेक असेही पुरुष वरिष्ठ माहित आहेत ज्यांनी वर सतिश गावडे म्हणत आहेत त्याप्रमाणे कारकिर्द घडवली आहे.
मी स्वतः कधी अजुन महिला मॅनेजरला रिपोर्ट केलेले नाही पण ज्या महिला अधिकार्‍यांशी कामानिमित्त संबंध येतो त्यांचा तरी अनुभव चांगलाच आहे.

हे जर एखाद्याचे "अनुभव" असतील तर ते एकांगी आहेत असं दुसर्‍या कुणीतरी म्हणणं हे वरवरचं मत दिल्यासारखं वाटतं. आणि अर्थात, वेगवेगळ्या व्यक्तींचे वेगवेगळे अनुभव असू शकतात.
परंतु, त्याचबरोबर, इथे हे पुढील मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात:
१. माझीही शॅम्पेन यांचे पुरुष वरीष्ठ असतानाचे अनुभव वेगळे आहेत का? असल्यास, त्यांनी ते का मांडले नाहीत (थोडक्यात, त्यांनी ते सोयिस्करपणे वगळले का?)
२. त्यांना पुरुष वरीष्ठांचे या प्रकारचे वर्तन समजले नाही का (ते तसे वर्तन जाणण्यात कमी पडले का?)

रच्याक्ने, माझा स्वतःचा स्री वरीष्ठांबद्द्लचा आजवरचा अनुभव समाधानकारक आहे.

विशाखा पाटील's picture

15 Feb 2015 - 11:28 pm | विशाखा पाटील

एकदोन व्यक्तींचे बरेवाईट अनुभव आले की त्या व्यक्तीच्या वयाच्या, लिंगाच्या, राज्याच्या, वर्गाच्या, इत्यादी इत्यादीच्या सर्व व्यक्ती तशाच असतात असा चष्मा लावायची फ्याशनच आलीय...

तुम्हाला असे अनुभव आले त्याचे वाईट वाटते. टेक्निकल व एच आर ब्याग्राऊंडमुळे मीही एकेकाळी या क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न केला होता. अत्यंत बिनडोक एच आर व अत्यंत हुशार एच आर अशा दोन्ही प्रकारातील महिला पहायला मिळाल्या.
माझ्या नवर्याच्या म्यानेजर बाई त्यांच्या विषयात पारंगत तर होत्याच पण अवघड प्रसंगी आमच्या दोघांच्याही सल्लागार होत्या. नवर्‍याचा पुरुष म्यानेजरही काही बाबतीत चांगला मार्गदर्शक ठरला होता.
स्त्री, पुरुष व त्यावरून बीनडोकपणा, कंट्रोलींग बिहेवियर , मायक्रो म्यानेजमेंट यावरून मते बनवणे मान्य नसले तरी १०० टक्के अमान्याही करत नाहीये. आपल्याला क्ष व्यक्तीचा आलेला वाईट अनुभव व दुसर्या व्यक्तीला क्ष व्यक्तीचा आलेला अनुभव वेगळा असू शकतो. मात्र अमुक एका मनुकष्याचा/ स्त्री चा फक्त वैतागाचा अनुभवही सगळ्यांना आलेला असू शकतो.
त्या स्त्री, पुरुषाची कामाची प्रेशर्स, वैयक्तिक अडचणी, त्याच्या म्यानेजराने लावलेला कामाचा दट्ट्या, स्त्री असल्याने तिचे वेगळे , पुरुष असल्याने त्याचे वेगळे प्रश्न असू शकतात व त्यांच्या वाईट वेळेचे आपण बळी असू शकतो. उदाहरणच विचारायचं झालं तर मिपाच्या जुन्या संपादक मंडळाला विचारा. सदस्यांच्या वैयक्तिक समस्यांमुळे कितीतारीवेळा उगीच त्यांच्या रागाचे बळी बनावे लागलेले असते व ते सिद्ध करता येत नसते, त्रास मात्र होत असतो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2015 - 8:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत.

@बाकीचे प्रतिसादकर्ते:

मी वरिष्ठ किंवा एचआर स्त्री आहे म्हणुन ही तक्रार केलेली नाही. माझं म्हणणं एवढचं होतं, "बाई, तुम्ही आर्ट्स बॅकग्राउंडवाल्या, त्यातुन एच.आर., तुम्हाला शॉपफ्लोअर वरच्या टेक्निकल गोष्टींबद्दल काही माहिती आहे का? सायकल टाईम रिडक्शन ज्या मास प्रोड. लाईनवर करायचं त्या लैनबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? किती दिवसाचा डेटा लागेल ह्याचा तुम्हाला अंदाज आहे का? ट्रायल अँड एरर नीचं काम करुन फायनल सेटींग्स फ्रिझ करतात हे तुम्हाला माहितीये का? मग आमच्याशी किमान चर्चा करुन डेडलाईन ठरवायला काय हरकत आहे? वरुन बेअक्कल बाई नॉन-परफॉर्मर चा शिक्का कायम हातात घेऊन बसलेल्या. :(

दुसर्‍या केसमधे एका एच.आर. आणि तिच्या अफेअर वाल्या माणसाच्या वैयक्तीक फायद्यासाठी माझी आणि माझ्या एका कलिगची वाट लागली असती त्याचं काय? आमचा बळी गेला असता मधल्या मधे नाहक. आमचं नशिब चांगलं म्हणुन आमचा शॉप फ्लोअर मॅनेजरनी आमच्या दोघांची बाजु उत्तम पणे सांभाळली. पण त्या दोन आठवड्यामधे किती दबावाखाली होतो ते माझं मला माहितीये. :(

संदीप डांगे's picture

16 Feb 2015 - 12:53 am | संदीप डांगे

कुठल्याही क्षेत्रात दहा प्रकारचे लोक असतात, किंवा शेकडो प्रकारचे म्हणा… लिंग, जात, वय, भाषा, धर्म, शिक्षण, आर्थिक स्थिती यातून कुठल्याही प्रकारचे विशिष्ट लोक बघितले नाहीत. आयटीमधेच काम करताना सुमारे १५०० लोक ३ मजल्यावर काम करताना पहिले आहेत. एक छोटा भारतच तिथे नांदत होता असे म्हणू शकतो. लागेबांधे असलेले, प्रचंड मेहनती असलेले, निव्वळ वेळकाढूपणा करून पगार खाणारे वरिष्ठ, कुशाग्र बुद्धीचे, इत्यादी माणसांचे (स्त्री-पुरुष दोन्ही) शेकडो प्रकार पाहिले आणि अनुभवले. त्यामुळे कुठल्याही प्रकारे सरसकटीकरण कधीच पटत नाही.

धागाकर्त्याने मांडलेले वैयक्तिक अनुभव असतील त्यामुळे त्यात सत्य असेलच पण म्हणून स्त्री किंवा पुरुषांना कुठल्याही पूर्वग्रहदुषित दृष्टीकोनातून बघू नये. कॉफी मशीनजवळच्या फुटकळ गप्पा काही नकारात्मक लोक करत असतात. त्यांच्यात हा दृष्टीकोन बघितलेला आहे.

शॅम्पेन भाय मॅनेजरकडे नुसता मॅनेजर म्हणुन पहा. स्त्री पुरुष देश जात अन धर्म सोडून माणस नुसती माणस असतात हे लक्षात घ्या. तुम्ही वर सांगितलेल्या उदाहरणातली व्यक्ती बेसीकली मॅनीप्युलेटींग आहे. स्पिकरफोनवर ती ज्या पद्धतिने एकसारख नवरा मुलाला मॉनिटर करते यातच समजून घ्या की ऑफीसच काय पण घरीसुद्धा अश्या व्यक्ती नुसत्या उत्पात घडवत असतात. सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त यांच्याच मनासारख्या व्हायच्या असतात. मी तर अक्षरशः असल्या व्यक्तीमुळे सनसेट पॉईंट्लाच सनसेट बघायचा म्हणुन चक्क गुडुप अंधारात पोहोचलेय. मस्तवाल असतात असले लोक, पण तोंड इतक घाण असत की बोलायला होत नाही असल्यांच्या बरोबर.
मी फक्त इतकच सुचवेन की चष्मा नका चढवु लगेच. ही व्यक्ती अशी आहे अस ठरवा. नाहीतर काय होतं तुमच्या बनवलेल्या बायस मध्ये तुम्हीच कैद होता.

आगाऊ म्हादया......'s picture

16 Feb 2015 - 7:46 am | आगाऊ म्हादया......

तसं विशेष वेगळं वाटत नाही पण, anticipation चा त्रास होतो फार. समोरचा असंच बोलेल असं स्वत:च imagine करून आधीच react होतात.
यांनी थोडं ऐकूनही घेतलं पाहिजे असं वाटत,कारण बऱ्याचदा 'नाही.....नाही .....नाही....ते तसच असलं पाहिजे' हा attitude तापदायक वाटतो. आणि कालची आपलीच suggestions यांना उद्या चुकीची वाटतात अन ती आपलीच आहेत हे हि विसरायला होतं. (अनेक कारणांमुळे यांना private life आहे कि नाही असा प्रश्न पडायचा)ही एक category.

दुसरा एका बाईचा अनुभव असा की वरिष्ठ होती, वरील गोष्टी कमी प्रमाणात होत्या,पण कामाच्या बाबतीत प्रचंड focused. काम करायला मजा यायची. एक घाव दोन तुकडे. अन घरून फोन वगैरे आला तर माफक बोलणार, मुद्दा संपवून पुन्हा कामाकडे.पण आपण फोन केला कामाच्या वेळेव्यतिरिक्त तर १८ मिस्ड call नंतरही फोन नाही उचलणार. ही दुसरी category.

अनुप ढेरे's picture

16 Feb 2015 - 9:53 am | अनुप ढेरे

महिला बॉसचा विषय पाहून अ फ्यू गूड मेन सिनेमातला जॅक निकल्सनचा एक प्रसंग आठवला .

माझीही शॅम्पेन's picture

16 Feb 2015 - 10:18 am | माझीही शॅम्पेन

थोडासा disclaimer टाकलेला आहे तरी पण परत स्पस्ट करतो ,

मी कुठलाही चष्मा वैगरे लावलेला नाही , मी स्वत: जेव्हा भरती समितीत असताना पाहिले आहे कि एन्ट्री लेवल ला मुली जबरदस्त काम करतात , पुढे middle management पर्यंत जबरदस्त काम करताना रोज पाहतो पण त्या
पुढे साधारण पणे घराच्या जबाबदाऱ्या ,
+ ऑफिस मधील काम वाढल्याने
+ सातत्याने स्व:तला अपग्रेड करत न राहिल्याने
+ वरील बाबींमुळे स्व:ताचे अपयश झाकण्यासाठी
हात खालच्या लोकांना महिला आणि पुरुष manager मध्ये निश्चित फरक जाणवत असणार
हे जे अनुभव आहेत ते प्रातिनिधिक आहेत , सर्व साधारण पणे बऱ्याच लोकांशी बोलताना कधी कधी हा विषय निघतो. . . मिपाकरांचे काय मत आहे हे जाणून घेण्य साठी हा प्रपंच

मृत्युन्जय's picture

16 Feb 2015 - 10:35 am | मृत्युन्जय

धागाकर्त्याने दिलेली तिन्ही उदाहरणे पुरुष वरिष्ठांना पण लागू होउ शकते. निव्वळ छळवाद पुरुष वरिष्ठ बघितले आहेत (माझ्या वाट्याला नाही आले. पण ते इतरांचे बॉस होतेच / आहेतच). ऑफिसातील हाताखालील महिलांवरुन अश्लील विनोद करणारे पुरुष देखील बघितले आहेत. दुर्दैवाने असे लोक कधीच पुरावा मागे ठेवत नाहित. नाहितर तक्रार पण केली असती. असो. तो एक वेगळाच विषय आहे.

बाकी असे वाटते की कधीकधी महिलांचा अक्रस्ताळेपणा हा थोडास इनसिक्युरिटीमधुन येतो. शिवाय हाताखालचे पुरुष "तिला काय कळते" या भावनेतुन कधीकधी तिच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात, अथॉरिटी डावलतात, तिच्य वरचढ होण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे टाळण्यासाठी कधीकधी महिला जास्त डॉमिनेट करायचा प्रयत्न करत असाव्यात,

विविध प्रशासकिय कामे करुन घेताना,अगदी महसुल,शिक्षण अथवा पोलिस खात असु द्यात्,महिला अधिकारी काम चटकन समजुन घेतात्,व विना विलंब करतात्,किंवा सौजन्यही महिला अधिकारी जास्तच दाखवत्,उलट पुरुष अधिकारी असेल फुकटचा माज दाखवत असतो असेच आतापर्यंत जाणवले आहे.सगळ्यात महत्वाचे तुलनात्मक कमी लाचखावु असतात.जर काम सरळ होत नसेल किंवा अगदीच नियमाच्या बाहेर जावुन करायचे असेल आणी आपला वैयक्तिक फायदा असेल तरच महिला अधिकार्‍याला लाच मागताना पाहिले आहे,मला तरी आजपर्यंत कुठल्याही महिला अधिकार्‍याला कधीही लाच द्यावी लागली नाही.याच्या अगदी उलट पुरुष अधिकारी जमात साले वखवखलेल्या कुत्र्यापेक्षाही वाइट अवस्था असते यांची.

...जर काम सरळ होत नसेल किंवा अगदीच नियमाच्या बाहेर जावुन करायचे असेल आणी आपला वैयक्तिक फायदा असेल तरच महिला अधिकार्‍याला लाच मागताना पाहिले आहे,मला तरी आजपर्यंत कुठल्याही महिला अधिकार्‍याला कधीही लाच द्यावी लागली नाही. ...

मुल्य हा व्यक्तीगत आचरणाचा भाग आहे. यात स्त्री, पुरुष, लहान, मोठा, वर्ण, धर्म, जात, प्रांत असं कै नसतं हो, टेबलाखालून घेणारे सगळे एका माळेचे मणी असतात. तुम्ही वर प्राणी वाचक शब्द वापरलात तेवढा वापरत नाही. ३ स्त्रींयाच्या अतीहावरटपणामुळे मला माझा ३ महिन्यांचा पगार माझ्या घरी देता आला नव्हता कारण माझ्या कंपनीकडून पैसे मिळे पर्यंत त्यांची थांबण्याची तयारी नव्हती. कहर म्हणजे त्यांना त्यांच्या ऑफीसमध्ये केव्हाही भेटण्यास जा प्रत्येकीच्या हातात आपापल्या धर्माचे धर्मग्रंथ असायचे एक हिंदू होती एक ख्रिश्चन एक मुस्लीम होती. एक प्रायव्हेट कंपनीत होती एक सरकारी कार्यालयात आणि एक सेवाभावी संस्थेत.

हाडक्या's picture

16 Feb 2015 - 5:06 pm | हाडक्या

भारी हो..
३ वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी ३ धर्माच्या ३ स्त्रीयांमुळे तुम्हाला ३ महिन्याचा पगार घरी देता आला नव्हता.

स्त्री, पुरुष, लहान, मोठा, वर्ण, धर्म, जात, प्रांत

आता या ३ जणी ३ राज्यातून आलेल्या, ३ वर्णाच्या असल्या म्हणजे सगळेच कवर होईल. ;)

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2015 - 5:17 pm | पिलीयन रायडर

आणि प्रत्येकीच्या हातात आपाप्ल्या धर्माचा धर्मग्रंथ होता!!! क्या बात है!!
अमर अकबर अ‍ॅन्थनी मधल्या ग्रुप रक्तदानानंतर हाच प्रतिसाद!!!

.अत्यंत उत्सुकता ताणणारा प्रतिसाद.

..नेमकं कसं घडलं असावं?

हातात ताकद आली की ती कशी वापरावी याबद्दल प्रत्येक व्यक्ती आपापलं गाठोडं आणि आपापली विचारधारा घेऊन येते. पॉवर सामायिक आहे. तिचा चांगला अथवा वाईट उपयोग सामायिक आहे. स्त्री वा पुरुष याने फरक पडत नाही.

संघर्ष करुन अत्यंत उच्च अधिकारपदावर पोचलेल्या मिळालेल्या स्त्रिया तश्याच प्रकारे आलेल्या पुरुष काउंटरपार्टपेक्षा जरा जास्त कडक वागणूक ठेवतात असं पाहिलं आहे. कदाचित अधिकच्या संघर्षातून आणि जबाबदारीचा जास्त (कदाचित स्युडो) जाणिवेतून हा स्ट्रिक्टनेस येत असावा, पण त्यात वाईट किंवा नुकसानकारक काही जाणवलं नाही. कंपनीसाठी ते उत्तमच. माझी स्वतःची कंपनी असती तर मी आवर्जून सर्वोच्च पदी स्त्रीची नेमणूक केली असती.

आणि पद, पॉवर मिळाली म्हणून गैरफायदा घेणारे पुरुष आणि स्त्रिया, दोन्ही पाहिले आहेतच.

पिलीयन रायडर's picture

16 Feb 2015 - 11:39 am | पिलीयन रायडर

अगदी..

एखादी व्यक्ती जशी आहे तशी का आहे ह्याचं कारण ती स्त्री/पुरुष आहे किंवा मराठी/बंगाली आहे किंवा ब्राह्मण्/मराठा आहे किंवा देशस्थ/कोकणस्थ आहे... वगैरे वगैरे कधी असु शकतच नाही.. सगळ्याच गोष्टींचा परिपाक म्हणुन एखाद्या व्यक्तिचा स्वभाव बनतो.. त्यामुळे सरसकटीकरण करता येऊ शकत नाही..

टवाळ कार्टा's picture

16 Feb 2015 - 12:12 pm | टवाळ कार्टा

अपवाद - पुण्यातील लोकं??? :)

नाही माझ्या मतात थोडा फरक आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना मल्टिटास्किंग अ‍ॅबिलिटी जास्त असते. त्यामुळे बर्‍याच वेळेस पुरुष वरिष्ठ जर एखादी गोष्ट सांगून विसरून जात असेल्, तर तसे स्त्रियांचे होत नाही. अजून एक गोष्ट मी स्त्रियांच्या बाबतीत पाहिलेली म्हणजे स्त्रिया एखाद्याच्या बोलण्यातील वाक्यन वाक्य लक्ष्यात ठेवू शकतात. अश्या प्रकारची विशेष स्मरणशक्ती ही दुधारी तलवारीसारखी असते.

मी स्त्री वरिष्ठांच्या बाबतीत हे दोन "गुण", जे काही वेळा अतिरेकामुळे दुर्गुणात परिवर्तित होताना पाहिले आहेत. परंतु मला "वाईट" अनुभव काहीही नाही. कदाचित "कामास काम आणि राजकारणापासून दूर" असे राहिल्यामुळे असेल.

मुळात काही प्रमाणात आजुबाजूला जाणवणारी एक वृत्ती .. जी कदाचित बर्‍याचजणांना मान्य होणार नाही, पण स्त्री आपल्या वरिष्ठपदी आहे, बॉस आहे ही भावना पुरुषांना अजिबात आवडत नाही. आणि तिने विदिन नॉर्मल रेंज जरी काही जाब विचारला अथवा कामाची चिकित्सा केली (जी पुरुष बॉसबाबत पचून गेली असती) ती स्त्री बॉसने केल्यामुळे पुरुषाच्या इगोला धक्का बसून "ती अशीच आहे" "ती स्वतःला काय समजते" वगैरे सुरु होतं आणि तोच तोच प्रचार सर्वत्र होऊन स्त्री बॉसचं नाव खराब होतं.

हाडक्या's picture

16 Feb 2015 - 5:23 pm | हाडक्या

ह्म्म्म सहमत.. हे खरंच आहे गवि पण अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की भारतात तितक्याश्या प्रोफेशनली गोष्टी हाताळल्या जात नाहीत.
भारताबाहेर तुम्ही तुमच्या महिला मॅनेजर बरोबर एखादी बीअर पित असाल किंवा एखादी गोष्ट पटली नाही तर वाद घालत असाल ती गोष्ट तितक्यास सहजपणे होते जशी एखाद्या पुरुष मॅनेजरबरोबर होईल.
पण भारतात एखाद्या वेळेस वाद झालाच तर महिला मॅनेजरशी तसेच भांडता येत नाही जसे एखाद्या पुरुष मॅनेजरशी भांडले जाईल (तसेच भांडलो तर मिटवतापण येत नाही सहजपणे म्हणा ;) ). अर्थात हे ज्याच्या त्याच्या अनुभवावर आहेच.

तुझ्या अगोदर एक जण होता त्याच्या बद्दल तिने sexual harassment ची तक्रार केली होती

ही एक गोष्ट नेहमीच असते की "sexual harassment" या गोष्टीचा हत्यार म्हणून वापरण्याचे प्रमाण आपल्याकडे तसे खूप आहे. याची वैट गोष्ट ही की ज्याना त्रास होतो त्यातल्या जितक्या जणी तक्रार करतात त्या तुलनेत हे हत्यार (अगदी फक्त धमकी असेल) म्हणून वापरणे याची जास्त वारंवारिता असते. (आणि हो, आपल्याकडे तरीही वखवखलेले ढीगभर असतातच)

ते 'सेक्शुअल हॅरासमेंट इज अबाउट पॉवर' वगैरे कल्पना कालबाह्य झाल्यात का आता? कारण वरती लेखात, 'ज्युनिअर' वर सेक्शुअल हॅरासमेंट केस केल्याचा उल्लेख आहे ...

पदाचा गैर वापर करणारे पुरुष व महिला दोघेही पाहण्यात आले आहेत. पण महिलांचा विषय आहे तर माझे २ पैसे …
१ आणि २ . मी दोन वेगळ्या वेगळ्या कंपन्यांमध्ये असताना, अकाऊण्ट म्यानेजर पदी महिला होत्या. दोघीही अत्यंत कार्यक्षम आणि बघताक्षणी रिस्पेक्ट वाटेल अशा होत्या. आणि दोघींच्याही अखत्यारीत त्यांची अकाऊण्टस चांगलीच विस्तारली होती. त्यांच्या पोझिशनला शोभेलसा दोघींचाही व्यवहार होता. त्यांचं महिला असणं कुठेही आड आलेलं पाहण्यात नाही.

३. एक स्त्री माझी प्रोजेक्ट म्यानेजर होती. हापिसच्या वेळात इतरांना कामे लावून ब्युटी पार्लरला जाणे, किंवा मर्जीतल्या मुलीसोबत शॉपिंगला जाणे असं खूप वेळा करायची. कोणी तक्रार करायचे नाही म्हणून तिचं फावलं होतं. पण त्यानंतर एकदम स्ट्रीक्ट अकाऊण्ट म्यानेजर आला. आणि तिची २ आठवड्यात कंपनी मधूनच हकालपट्टी झाली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Feb 2015 - 2:32 pm | कैलासवासी सोन्याबापु

फायर पासुन ते इथपर्यंत एकंदरीत मी जबरा लकी आहे असे म्हणायला हवे!!! कारण आमच्या धंद्यात् ओन्ली मेल कैंडिडेट्स बिलो २७ इयर्स ऑफ़ ऐज हे आधीच सांगतात!!!वरतुन बॉंड भरुन घेतात सो न स्त्री मेनेजर वगैरे चा फंडा न फायर वगैरे काही :D

आता तुमच्यात सुद्धा महिला येणार म्हणतात बॉ. काय हालचाली आहेत त्याबद्दल?

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Feb 2015 - 3:41 pm | कैलासवासी सोन्याबापु

म्हणतात खरे!!! पण सरकारी काम अंन आम्ही रिटायर होउस्तोवर थांब!!! ;) प्रत्यक्ष फील्ड वर शक्यतो नाहीत देत पोरी (आजकाल आर्मी वाले द्यायला लागलेत कॉम्बैट ड्यूटी त्यांस पण अजुन आमच्याकड़े नाही तसले)

बॅटमॅन's picture

16 Feb 2015 - 3:49 pm | बॅटमॅन

माहितीकरिता धन्यवाद!

टवाळ कार्टा's picture

16 Feb 2015 - 2:37 pm | टवाळ कार्टा

हैला...असे काय कर्ता तुम्ही???

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Feb 2015 - 3:47 pm | कैलासवासी सोन्याबापु

मी आपल्या देशाच्या एक सीमा सुरक्षा ड्यूटी असणार अर्धसैनिक बलात अधिकारी म्हणून कागदोपत्री अंन एक्चुअल मधे फील्ड वर हरकाम्या (डॉक्टर,कुक,मेलरनर, कदीमदी सैनिक) अश्या स्वरूपाचे काम करतो (नियमानुसार ह्याच्याहुन अधिक सांगायला परवानगी नाही सो क्षमस्व)

टवाळ कार्टा's picture

16 Feb 2015 - 3:49 pm | टवाळ कार्टा

हैला...ह्ये फिल्ड ध्यानातच नै आले...माझा १ मावसभाउपण होता त्यात

कपिलमुनी's picture

16 Feb 2015 - 4:22 pm | कपिलमुनी

तुमच्याकडं दंबूक आहे का

हाडक्या's picture

16 Feb 2015 - 5:26 pm | हाडक्या

तुमाला कशाला हो सगळ्यांची दंबूक पाह्यची अस्ते ती ? वैट नाद हो ..
टका तुमचा शांतपणे सत्कार आयोजित करेल मग. ;)

संदीप डांगे's picture

16 Feb 2015 - 6:07 pm | संदीप डांगे

:-)

टवाळ कार्टा's picture

16 Feb 2015 - 9:04 pm | टवाळ कार्टा

तुमचे तुम्ही बघून घ्या...मला कशाला मधे आणताय...माझ्याकडे दंबूक नै

मोदक's picture

16 Feb 2015 - 9:44 pm | मोदक

ठ्ठो..!!!! :))

बॉस कोणीही असो... पण निदान तो / ती माणुस असावा !
चांगले / वाईट २न्ही अनुभव घेतले आहेत...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल जिगर नझर क्या है... { Dil Ka Kya Kasoor }

जिन्गल बेल's picture

16 Feb 2015 - 4:21 pm | जिन्गल बेल

रटाळ विषय...रटाळ प्रतिसाद.. *dash1*

स्त्री वरिष्ठ असते तेव्हा हाताखालच्या पुरुष सबाऑर्डिनेट्सचा इगो सदैव फणा काढण्याच्या तयारीतच असतो अन यामुळेच त्यांच्याकडून कामकाज करून घेणे तिच्यासाठी जिकिरीचे असते. पुरुष बाॅसने पाणउतारा केला तरी पुरुष कर्मचारी ते दोनतीन दिवसात विसरून जातो पण त्याचठिकाणी स्त्री असेल तर आयुष्यभर विसरत नाही. पुरुष काय किंवा स्त्री काय, जबाबदारी ही खडतरच. पण स्त्रीने शिकवणे, चूक दाखवणे हे कोणत्याही पुरुषाला अंमळ कडूच लागते. अशावेळी सरळपणी काम करून घ्यायचे तर इगोच्या फण्याला गुंगीतच ठेवलेले बरे असा अनुभव आहे.
बाकी, स्त्रीच्या हाताखाली काम करण्याचा अनुभव माझ्या सबाॅर्डिनेट्सना एकदा विचारला पाहिजे खरंच +)

सुबोध खरे's picture

16 Feb 2015 - 8:37 pm | सुबोध खरे

सहमत नाही
आमच्या क्षेत्रात( डॉक्टरी) तुमचे वरिष्ठ स्त्री असो कि पुरुष त्याने काही फरक पडत नाही. वरिष्ठ डॉक्टर स्त्रिया आपल्या कनिष्ठाच्या चुकीसाठी पुरुषांसारखेच फैलावर घेतात आणी त्याबद्दल कोणत्याही पुरुष डॉक्टर कडून ती बाई आहे म्हणून इगो प्रोब्लेम झाला आहे असे पाहिलेले नाही.
आम्ही सुद्धा केलेल्या चुकांचा ओरडा खाल्लेला आहे कोणताही पूर्वग्रह न ठेवता. उच्च पदावर स्त्री आहे कि पुरुष आहे याने फारसा फरक पडलेला गेल्या ३० वर्षात तरी पाहिलेला नाही.
डॉक्टर स्त्रिया लष्करात महासंचालक(डायरेक्टर जनरल) पदापर्यंत पोहोचलेल्या मी पाहिलेल्या आहेत आणी कौतुकास्पद म्हणजे एखादी स्त्री जर स्त्री असल्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करीत असेल तर तिला फैलावर घेण्यातही त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. आणी अशा स्त्रिया पुरुष कनिष्ठांच्या अतीव आदरास पात्र होतात असा वैयक्तिक अनुभव आहे.

मेडिकल क्षेत्र अपवाद असावे. स्त्री-पुरुष डाॅक्टरांचा वचक सारखाच असतो हे अनेकदा पाहिले आहे. अभियांत्रिकी क्षेत्राबद्दल मात्र अजून असे म्हणता येत नाही.

ज्योति अळवणी's picture

16 Feb 2015 - 10:51 pm | ज्योति अळवणी

प्रत्येकाचे अनुभव वैयक्तिक असतात. त्यामुळे त्यावर भाष्य करणे अयोग्य. अनेकदा पुरुष सहकारी देखिल कुठलीही मदत करत नाहीत किंवा घरची कामें करतात... विशेषतः सरकारी ऑफिसमधील असा माझा अनुभव आहे.

वेल्लाभट's picture

17 Feb 2015 - 7:22 am | वेल्लाभट

असं सरसकटीकरण योग्य आहे की नाही हा एक मुद्दा.

परंतु माझा संबंध आजवर ज्या महिला वरिष्ठाशी आला आहे, तिच्याबद्दल मला अतिशय चांगला अअनुभव आहे.

चिकित्सक's picture

17 Feb 2015 - 9:22 am | चिकित्सक

आमची सध्या ची ऑनसाइट कोवोर्डिनेटर कडून त्रास होतो. तिला कुठली क्लाइंट मीटिंग जॉइन करायची असली तर रात्री २-३ वाजता फोन करून कुठले ही अजेंडा न देता मीटिंग जॉइन करायला लावते. आणि अश्या वेळेस क्लाइंट समोर पोपट होतो .
एक दोन दा तिला सांगून बघितल तर म्हणते -ही टेक्नालजी माझ्या स्कोप मधे बसत नाही तुलाच काय ते बघाव लागेल. मॅनेजर ला म्हणून पाहिल तर त्याने चक्क सांगितल कि ऑनसाइट ला जाताना तिन हे काम शिकेन म्हणून कमिट केल होत आणि आता तिला ह्या नव्या टेक्नालजी वर काम करणे जमत नाही कारण तो तिचा बॅकग्राउंड नाही आणि तो ह्या वर काही तोडगा काढू शकत नाही वर मला म्हणाला तिला सपोर्ट करायला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

17 Feb 2015 - 9:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

O_o

च्यामारी....आय.टी. भारी फिल्ड आहे की. येतं नसलेली गोष्ट शिकीन म्हणलं की डायरेक्ट ऑनसाईट. सालं आमच्या इकडे येतं असलेल्या गोष्टीत चांगलं असल्याशिवाय जॉबपण नै मिळत...ऑफशोअर मधली गोष्टचं सोडा... :(

(ई.सी.यु. प्रोग्रॅमिंगची माहिती नसल्यानी एका मोठ्ठ्या ऑटोमोबाईल कंपनी मधे संधी नं मिळालेला) अनिरुद्ध

अत्रन्गि पाउस's picture

17 Feb 2015 - 11:31 am | अत्रन्गि पाउस

लय गमती जमती अस्त्यात .. काय काय लोकस जातात धकून ...काय काय फसतात नैतर कुणाची तरी वाट लावतात ...

संदीप डांगे's picture

17 Feb 2015 - 12:00 pm | संदीप डांगे

कुणाची तरी वाट लावतात >>> कुणाशी तरी पाट लावतात... असे वाचले... :-)

अत्रन्गि पाउस's picture

17 Feb 2015 - 12:45 pm | अत्रन्गि पाउस

ते सुद्धा होतेच कि

'ऑनसाइट कोऑर्डीनेटर' ही आपली वरीष्ठ अधिकारी असते का? ती महिला असल्यामुळे प्रस्तुत प्रश्न उद्भवला आहे, असे आपले वस्तुस्थितीनिदर्शक मत आहे का?

अत्रन्गि पाउस's picture

17 Feb 2015 - 12:45 pm | अत्रन्गि पाउस

पण कष्टम्बर च्या ऑफिसात बसलेली व्यक्ती असल्यामुळे तिचा शब्द बहुतांश वेळा कस्टमरचाच शब्द धरला जातो ...

बाकी ऑनसाईट वर बसलेली व्यक्ती (किंवा ऑफशोअर ला बसलेली व्यक्ती) एकमेकांना ते जर त्यांच्या विषयात स्वतः ज्ञानी असतील तर नक्की अडचणीत आणू शकतात. फक्त त्यासाठी एका वेगळ्या पातळीवरून बोलण्याची कला अवगत हवी. ओसी नं जर जेटूईई आणि स्ट्रट्स वापरायची सूचना क्लायंटला केली असेल तर प्रोजेक्ट मध्यावर आला असताना "बीहाईव्ह वापरली असती तर रिसोर्स युटीलाय्झेशन कमी होवून प्रोजेक्ट वरचा खर्च कमी झाला असता" असं क्लायंट मीटींग मध्ये बोलावं. अर्थातच हे पत्रामध्ये टाकू नये. नाहीतर तुमच्या कंपनीला तुमच्या विरुद्ध प्रूफ मिळेल. बीहाईव्ह काय आहे अर्थातच बोलू नये. शोधू दे तिला. कायम आपण टेक्निकल एक्स्पर्ट बरोबर बोलत आहोत अशा रितिनं बोलावं. खास डोमेन आणि टेक्निकल शब्द वापरा जे फक्त त्यातल्या एक्स्पर्ट लाच माहिती असतील. जर त्याचं स्पष्टीकरण विचारलं तर ते सुद्धा अशाच वाक्य रचनेनं द्या जे नवीन असेच शब्द वापरेल. बाकी तिला अडचणीत कसं आणायचं हे शिकायचं असेल तर आमची शिकवणी लावा. ५९९ डॉलर फक्त.

अत्रन्गि पाउस's picture

17 Feb 2015 - 7:58 pm | अत्रन्गि पाउस

*YES* असे अजून काही नुस्खे आहेत !!

चिकित्सक's picture

17 Feb 2015 - 10:04 am | चिकित्सक

ती टेक्नालजी त्यावेळेस नवीन होती सहजा सहजी त्यावर काम करणारे लोक मिळत नव्हते . ऑनसाइट ला ही दुसर्या प्रॉजेक्ट वर जाणार होती पण तो प्रोजेक्टच गेला. हिन रडा-रड केली हिला चान्स देण्यात आल , सुरवातीचे थोडे दिवस हिला काम नव्हत, पण टीम मधे नवे लोक आले आणि हिन ऑफशोर कडून काम करवून घेण सुरू केल. बाई साहेबानची आता वर्ष भर तरी येण्या ची चिन्ह दिसत नाहीत असोत , आमचा स्लॉट वाया गेला ह्याच वाईट वाटत.

आपल्याला इंग्रजी फारच आवडतं नै? आपल्यासाठी एक खास इंग्रजी म्हण :

क्राइंग बेबी गेट्स द मिल्क.

हाडक्या's picture

17 Feb 2015 - 4:02 pm | हाडक्या

क्राइंग बेबी गेट्स द मिल्क.

ह्या ह्या ह्या ..
म्हणून हे पण इथं रडायलाच येतात असं वाटतं. कायम कोणीतरी यांच्यावर नायतर यांच्या मित्रमंडळींवर गेम केलेली असते.
यांच्या भोवतीची नालायक माणसे मॅनेजर आणि ऑनसाईट कोऑर्डिनेटर होऊन बसलेली असतात आणि चांगली माणसे फायर होत असतात.

एखादा परदेशी भारतात काम करायला यायचा विचार करत असेल आणि यांचे प्रतिसाद वाचेल तर पळूनच जाईल.

(बादवे एक अवांतर : याचा अर्थ भारत हा नालायक लोकांनी भरला असून त्यांनाच बढत्या (म्हणजे प्रमोशन हो) बक्षीसे मिळतात आणि प्रामाणिक पणे काम करणार्‍यांना बाबाजींचा ठुल्लू मिळतो असे काही आहे काय ? मग अशाने नालायक आणि कामचुकार बनू इच्छिणार्‍यांचीच वाढ होणार नाही काय? हेच सगळीकडे लागू होते काय ?

भारतातल्या कंपन्या आणि तिथल्या कामकाजाच्या सद्यस्थितीबद्दल काहीही कल्पना नसल्याने खरोखर हे प्रश्न विचारतोय. जमल्यास कोणीही उत्तरे द्यावीत)

अत्रन्गि पाउस's picture

17 Feb 2015 - 8:01 pm | अत्रन्गि पाउस

एखादा वेगळाच धागा काढा त्यापेक्षा ..अतिशय गंभीर विषय ...आणि लैच लोकांच्या जिव्हाळ्याचा

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Feb 2015 - 11:55 am | ज्ञानोबाचे पैजार

महिला वरिष्ठ पदी असेल तर काय वाटत ?

हापिस सुध्दा घर असल्यासारख वाटत.

(घरी आणि हापिसात कनिष्ठ पदावर काम करणारा) पैजारबुवा,

सस्नेह's picture

17 Feb 2015 - 12:02 pm | सस्नेह

वरिष्ठ पदप्राप्तीसाठी शुभेच्छा +))

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Feb 2015 - 12:59 pm | ज्ञानोबाचे पैजार

ते या जन्मी तरी शक्य नाही.

पुढचा जन्म बाईचा दे रे देवा

पैजारबुवा,

शलभ's picture

17 Feb 2015 - 12:21 pm | शलभ

:D