✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मगं ! आज काय वाचताय ?

ध
धर्मराजमुटके यांनी
Wed, 07/17/2019 - 21:45  ·  लेख
लेख
नमस्कार, आज काय वाचताय ? हा प्रश्न जरी इतरांना उद्देशून असला तरी तो तितकाच स्वतःला देखील आहे. तर मग ! आज काय वाचलं ?  पुस्तकाचे नाव : द लास्ट माईल मुळ लेखक : डेव्हिड बॅल्डासी मराठी अनुवाद : सायली गोडसे प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी पुणे किंमत : मी वाचत असलेल्या प्रथम आवृत्तीची किंमत रु. ४५०.०० फक्त ---------------- द लास्ट माईल्स ही एका उदयोन्मुख फुटबॉलपटूची जीवन कहाणी आहे. मेलविन रॉय मार्स वयाच्या विसाव्या वर्षाच्या आतच अमेरिकेतील एक प्रसिद्ध फुटबॉलपटू बनतो. मात्र त्याच्या व्यावसायिक कारकिर्दिच्या सुरुवातीलाच त्याला आपल्या आई-वडीलांच्या हत्येप्रकरणी देहांताची शिक्षा होते. वीस वर्षे तुरुंगात घालविल्यावर जेव्हा त्याच्या देहांताची शिक्षा अंमलात आणण्याची वेळ येऊन ठेपते, त्याच्या काही सेकंद अगोदर कोणीतरी दुसराच ते खुन आपण केल्याची कबुली देतो आणि मेलविनची मृत्युच्या दारातून सुटका होते. मात्र टेक्सास राज्य आपल्याला तुरुंगाबाहेर जाऊ देणार नाही, काही ना काही कारण शोधून आपल्याला परत अटक करतील ह्या भितीच्या छायेखाली तो सतत जगत असतो. त्याच्या सुटकेची बातमी जेव्हा रेडीओवर ऐकवली जात असते तेव्हा ती नेमकी स्पेशल एजंट अ‍ॅमास डेकर याच्या कानावर पडते. तो या प्रकरणातील सत्य शोधण्याच्या कामी लागतो आणि तेथून पुढे ही कादंबरी वेगवेगळी वळणे घेत शेवटाला पोहोचते. मेलविन निरपराध असतो काय ? जर तो निरपराध असेल तर त्याला यात कोणी गोवले ? अगदी शेवटच्या क्षणी मेलविनने केलेल्या खुनाची जबाबदारी दुसराच कोणीतरी घेतो पण तोही खरा गुन्हेगार नसतो. मेलविनच्या आईवडीलांचा भुतकाळ रहस्यमय असतो, तो कशामुळे ? शेवटी अशा काही गोष्टी उजेडात येतात ज्याची मेलविन आणि तपास अधिकारी डेकर ने कल्पना देखील केलेली नसते. हे सगळे र हस्य जाणून घेण्यासाठी कादंबरी एक वेळा वाचण्याची शिफारस करतो. धन्यवाद !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
48881 वाचन

💬 प्रतिसाद (135)

प्रतिक्रिया

पुस्तकाचे नाव लिहिण्यात चुक झाली आहे

धर्मराजमुटके
Wed, 07/17/2019 - 21:50 नवीन
पुस्तकाचे नाव लिहिण्यात चुक झाली आहे. संपादक मंडळा पैकी कोणी दुरुस्ती करेल काय ? योग्य नाव "द लास्ट माईल'
  • Log in or register to post comments

मस्त विषय काढलात. ...

मुक्त विहारि
Wed, 07/17/2019 - 22:11 नवीन
मनापासून धन्यवाद. .. ह्या धाग्याची हजारीच नव्हे तर दशहजारी व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

मस्त विषय काढलात. ...

मुक्त विहारि
Wed, 07/17/2019 - 22:12 नवीन
मनापासून धन्यवाद. .. ह्या धाग्याची हजारीच नव्हे तर दशहजारी व्हायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

ह्या धाग्याची हजारीच नव्हे तर दशहजारी व्हायला हवी.

mayu4u
Tue, 08/20/2019 - 10:41 नवीन
+ १ लाख!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मी गेले काही दिवस कॉलिंग सहमत

यशोधरा
Wed, 07/17/2019 - 22:00 नवीन
मी गेले काही दिवस कॉलिंग सहमत वाचतेय. छोटेखानी पुस्तक आहे. राजी सिनेमा ह्या पुस्तकावरून प्रेरित होता, ते पुस्तक. खरं तर एका बैठकीत वाचून होईल हे पुस्तक पण काही ना काही कारणाने राहून जाते. आता ह्या धाग्यावर लिहायला म्हणून ( त्या मोटीवेशन ने) वाचून पूर्ण करेन.
  • Log in or register to post comments

सध्या. ..

मुक्त विहारि
Wed, 07/17/2019 - 22:07 नवीन
डॉ. बाबासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ, ह्यांची. ..."कृषी दैनंदिनी"...वाचत आहे. सर्व प्रकारच्या पिकांची थोडक्यात तोंडओळख आहे. आमच्या सारख्या अडाणी आणि वडीलोपार्जीत शेतकरी नसलेल्या लोकांसाठी उपयोगी आहे. नुकतीच सुरुवात केली आहे. त्यामुळे जमेल तसे पुस्तका बाबत सांगत जाईन
  • Log in or register to post comments

How to Stop Worrying and Start Living

मारवा
Wed, 07/17/2019 - 22:08 नवीन
How to Stop Worrying and Start Living हे डेल कार्नेगी चे पुस्तक पुन्हा एकदा वाचतोय Co-Operate With The Inevitable हा अप्रतिम धडा सध्या वाचतोय या विलक्षण समजुतदार प्रकरणात एका jujitsu मास्टर चे कोट "bend like the willow; don't resist like the oak." असे अनेक सुंदर कोट्स व विजडम या व एकुण पुस्तकात खचाखच भरलेले आहे. फार सुंदर समजुतदार जुन्या वळणाच्या विजडम चे बायबल
  • Log in or register to post comments

सध्या The Private Life of Plants

जालिम लोशन
Wed, 07/17/2019 - 22:23 नवीन
हे सर डेव्हिड अटेनबरोचे पुस्तक वाचतो आहे. त्यात वनस्पतीच्या बुध्दिमत्तेबद्दल ऊदाहरणासहित वर्णन आहे. त्यात मोजणे, बघणे. प्रवास करणे, स्वत:चा वंश वाढीचा प्रयत्न करणे, वगैरे अर्तक्य वाटतील अशा गोष्टींची तसबीरीसकट माहीती आहे.
  • Log in or register to post comments

वनस्पती स्वतःचा वंश वाढावा ह्याचा प्रयत्न करतात. ..

मुक्त विहारि
गुरुवार, 07/18/2019 - 18:16 नवीन
ही गोष्ट सत्य असावी. ... 1. बांबू मरण्याआधी बिया देतो. एरवी कोंब देतो. 2. मिरचीला पाणी कमी मिळाले की रोपं जास्त मिरच्या देतात, हा अनुभव मुरबाड मधील एका शेतकऱ्याने घेतला आहे. . पुस्तक वाचायला हवं ...पण आमचं इंग्रजी कच्चे आहे. ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जालिम लोशन

english सोपे आहे.

जालिम लोशन
गुरुवार, 07/18/2019 - 20:49 नवीन
जगभरातील वनस्पतींची त्यात माहिती आहे. आणी बर्‍याचश्या गोष्टी आपल्याला माहित असतात पण त्या दृष्टिकोनातुन आपण त्याकडे बघत नाही. ऊदाः गहु हा माणसांना वापरुन जगभरात सगळीकडे पसरलेली सगळ्यात यशस्वी अशी गवताची जात आहे. हे गहु खाद्य असलेली बी बनवुन साध्य करतो. ती बी मिळवण्यासाठी मनुष्य गव्हाची लागवड करतो. किंवा झाडे त्याचे बीज जो पर्यंत परिपक्व होऊन ऊगवणक्षम होत नाही तो पर्यंत त्यांचे फळ खाण्यायोग्य करत नाही. आणी बी तयार झाले की त्याचा लांब पर्यंत प्रसार करण्यासाठी फळाच्या रंगात, वासात आकर्षतता आणुन लांबपर्यंत त्याचा प्रचार करुन वानरे वगैरे प्राण्यांना आकर्षीत करुन लांब पर्यंत बियांचा प्रसार करतात. ऊदाः आंबा, पेरु व अनेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

इंग्रजी सोपे असेल तर वाचायला आवडेल. ...

मुक्त विहारि
गुरुवार, 07/18/2019 - 22:46 नवीन
शास्त्रीय परिभाषा असेल तर मात्र कठीण जाईल. .. उदा. मला बांबू समजेल पण. ...बांबूसा बांबूस...हे लगेच कळणार नाही... त्या पुस्तकात असे शास्त्रीय शब्द आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जालिम लोशन

ह्यात स्थानिक नावेच वापरली आहेत.

जालिम लोशन
Fri, 07/19/2019 - 23:51 नवीन
त्याच बरोबर लॅटिन शास्त्रीय नावे पण दिली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पुस्तकाची किंमत बघीतली. ....

मुक्त विहारि
Sun, 07/28/2019 - 23:27 नवीन
माझ्या सारखे गरीब शेतकरी हे पुस्तक विकत घेऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जालिम लोशन

ऊधार देवु शकतो!

जालिम लोशन
Sun, 07/28/2019 - 23:38 नवीन
हवे असेल तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मदतीबद्दल धन्यवाद. ...

मुक्त विहारि
Mon, 07/29/2019 - 00:05 नवीन
पण मी शक्यतो कुणाकडूनही पुस्तके परत बोलीवर घेत नाही आणि देत पण नाही. पुस्तक घराबाहेर पडले की परत येत नाही. त्यामुळे तुमच्या घरी येऊन फोटो काढीन आणि वाचीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जालिम लोशन

मी शक्यतो कुणाकडूनही पुस्तके परत बोलीवर घेत नाही आणि देत पण नाही

mayu4u
Tue, 08/20/2019 - 11:00 नवीन
मी पण! मित्रान्ना घरी बोलवून पुस्तक वाचायची ओफर देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मदतीबद्दल धन्यवाद. ...

मुक्त विहारि
Mon, 07/29/2019 - 00:05 नवीन
पण मी शक्यतो कुणाकडूनही पुस्तके परत बोलीवर घेत नाही आणि देत पण नाही. पुस्तक घराबाहेर पडले की परत येत नाही. त्यामुळे तुमच्या घरी येऊन फोटो काढीन आणि वाचीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जालिम लोशन

रोचक वाटते आहे. हे पुस्तक

यशोधरा
Sat, 07/20/2019 - 09:01 नवीन
रोचक वाटते आहे. हे पुस्तक घेईन मी. अमेझॉन वर बघते मिळते का. माहितीबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जालिम लोशन

या क्षणी सिंदबादच्या सात सफरी वाचतोय

जॉनविक्क
Wed, 07/17/2019 - 22:51 नवीन
उद्या पर्यंत संपवेन बहुतेक, परवाचे बघू परवा :)
  • Log in or register to post comments

दिवाळी नंतर सिक्कीम सहलीस

गोरगावलेकर
Wed, 07/17/2019 - 23:07 नवीन
दिवाळी नंतर सिक्कीम सहलीस जायचा विचार आहे. माहितीकरिता एक मराठी पुस्तक मागवले. छोटेसेच आहे पण छान माहिती दिली आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

'लव्हाळी'

पुंबा
गुरुवार, 07/18/2019 - 02:54 नवीन
'लव्हाळी' च्यायभले! उद्या ८ च्या ठोक्याला हाफीसला कडमडायचेय आणि हे पुस्तक हातातून ठेववत नाहीये!
  • Log in or register to post comments

रॉबिन कूकचे इंटरव्हेन्शन

प्रचेतस
गुरुवार, 07/18/2019 - 05:49 नवीन
रॉबिन कूकचे इंटरव्हेन्शन वाचतोय.
  • Log in or register to post comments

रॉबिन कुक चं ब्लाइंडसाईट

तुषार काळभोर
गुरुवार, 07/18/2019 - 07:58 नवीन
कॉलेजात असताना वाचलं अन आवडलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मायकेल कोनेली

तुषार काळभोर
गुरुवार, 07/18/2019 - 07:56 नवीन
बोकाशेठची स्केअरक्रो मालिका वाचून मायकेल कोनेली हे नाव बऱ्याच वर्षांपासून बादलीत होतं. मग स्केअरक्रोचा नायक जॅक McEnvoy असलेलं पहिलं पुस्तक द पोएट गेल्या आठवड्यापासून बशीत येता जाता वाचतोय.
Denver Post crime-beat reporter Jack McEvoy specializes in violent death. So when his homicide-detective brother kills himself, McEvoy copes in the only way he knows how: he starts work on an investigative report about police suicides. But soon his research reveals a sinister pattern—‘suicides’ by detectives in other cities that are strikingly similar to his brother's. McEvoy suspects a serial murderer is at work—a devious cop killer who's left a trail of poetic clues. It's the news story of a lifetime—except that ‘the Poet’ already seems to know that McEvoy is trailing him. . . .
  • Log in or register to post comments

क्रुपया ह घ्या

खिलजि
गुरुवार, 07/18/2019 - 08:26 नवीन
मी सध्या हैद्राबादी पेपर वाचतोकंआणि मिपा
  • Log in or register to post comments

आणि अकुकथा..

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/18/2019 - 12:01 नवीन
असे हवे का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

सध्या

जेम्स वांड
गुरुवार, 07/18/2019 - 12:15 नवीन
पुन्हा एक पारायण करतोय रारंगढांगचे. मला वाटतं ह्या पुस्तकाबद्दल लिहायची काही गरज नाही इतकं सुप्रसिद्ध पुस्तक आहे ते.
  • Log in or register to post comments

मी सध्या.

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 07/18/2019 - 12:20 नवीन
विनोबा भावेंची "गीता प्रवचने" वाचतो आहे. अत्यंत सोप्या भाषेत केलेले गीते वरचे निरुपण खरोखर वाचनिय आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

पुस्तक इल्ले

अभ्या..
गुरुवार, 07/18/2019 - 12:21 नवीन
काय नाय विषेष पेपरात. ऑटोमोबाईलच्या जाहीराती वाढल्यात. टू व्हीलरात सगळ्या गाड्या १०० सीसीच्या वर येण्याचा प्रयत्न करताहेत. प्रत्येकाची कॉम्बी ब्रेक सिस्टम कशी वेगळी हे सांगायचा प्रयत्न चालूय. तंत्र एकच आहे, नावे वेगवेगळी आहेत. सुधारलेले सस्पेन्शन हा एक मुद्दा सगळेच सांगताहेत. आधीचे मायलेज हा मुद्दा मागे पडलाय. फोर व्हीलरात डिस्काउंटाचा पाऊस सगळीकडेच आहे. एसयुव्हीचे वेड भारतीयांच्या मनात भरवायला इंडस्ट्री सफल झालीय. इथेही मायलेज हा मुद्दा बराचसा दुर्लक्षित होतोय जाहीरातीत. टाईम बदल रहा है, नये इंडीया हे साथ.
  • Log in or register to post comments

नुकतीच

माकडतोंड्या
गुरुवार, 07/18/2019 - 12:38 नवीन
बाराखडी वाचायला सुरुवात केली आहे
  • Log in or register to post comments

त्या मानाने

जेम्स वांड
गुरुवार, 07/18/2019 - 15:46 नवीन
बरीच प्रगती आहे म्हणायचं.... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माकडतोंड्या

सिंदबाद आत्ताच पूर्ण झाले खूप मस्त वाटले

जॉनविक्क
गुरुवार, 07/18/2019 - 16:30 नवीन
विशेषतः महाकाय समुद्री राक्षसाची गोष्ट अतिशय अदभुत व रंजक होती. उद्या 1984 पुन्हा एकदा वाचायचा विचार आहे, तो पर्यंत आज थोडं लिओ टोलस्टोय वाचावा म्हणतो.
  • Log in or register to post comments

सिंदबाद कुठले वाचताय?

प्रचेतस
गुरुवार, 07/18/2019 - 19:19 नवीन
सिंदबाद कुठले वाचताय? बर्टनच्या अरेबियन नाईट्स मधलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

नाही हो, डोकेच फिरतं ते वाचून

जॉनविक्क
गुरुवार, 07/18/2019 - 19:38 नवीन
म्हणजे ते लिखाण / भाषांतर लहानचं मोठं करतं कि मोठ्याचं लहान हेच समजेनासे होतं(वयाने). अकुशेठ आपल्याला झेपतात तरी पण बर्टनचे अरेबियन नाईट्स इस नाट मा कफोफ टी. बर्टनप्रेमी असाल तर त्याचे डेथ राईड्स द कॅमेल जरूर वाचा आत्मकथा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बर्टनचं संकलित अरेबियन नाईट्स

प्रचेतस
गुरुवार, 07/18/2019 - 20:25 नवीन
बर्टनचं संकलित अरेबियन नाईट्स अफाट आहे, फूटनोट्स जबरदस्त आहेत एकदम. बर्टनच्याच आत्मकथेवरून प्रेरित असलेलं बाळ भागवत ह्यांनी लिहिलेलं चरित्र मजकडे आहे पण अजून वाचलं गेलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

शापित यक्ष हे ते चरित्र

प्रचेतस
गुरुवार, 07/18/2019 - 20:27 नवीन
शापित यक्ष हे ते चरित्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शापित यक्ष हे हिमनगाचे टोक आहे

जॉनविक्क
गुरुवार, 07/18/2019 - 22:29 नवीन
तर डेथ राईड्स द कॅमेल हा आख्खा हिमनग आहे. माझ्या आयुष्यात जी इस्लाम बाबत जी काही चांगली मानसिकता निर्माण करणारे साहित्यवाचन झाले त्यात कॅप्टन रिचर्ड बर्टन याचा नंबर फार वर आहे. सिंदबाद प्रोजेक्ट गुटेनबर्ग वरच वाचले, अरेबियन नाईट्सकडे वेळ मिळाला तर आपल्या शिफारशी मुळे आता नक्कीच लक्ष देईन, अर्थातच आसपास कोणी चिमुकले नसताना :) धन्यवाद. अवांतर:- डेथ रैर्ड्स दि फास्टस्ट कॅमेल हि मध्यपूर्वेतिल मृत्यू संदर्भातील प्रसिद्ध म्हण आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भन्नाटच, नक्कीच वाचेन हे

प्रचेतस
Fri, 07/19/2019 - 12:05 नवीन
भन्नाटच, नक्कीच वाचेन हे पुस्तक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

आज हापिसात काम कमी असल्याने

जेम्स वांड
गुरुवार, 07/18/2019 - 23:30 नवीन
रारंगढांग पारायण झपाट्याने उरकले, हाती काहीच नसल्याने ऍमेझॉन वर किंडलोपयोगी बुके चाळत असताना "मॅन इटर्स ऑफ त्सावो अँड अदर ईस्ट आफ्रिकन ऍडव्हेंचर्स" असे सणसणीत नाव असलेले पुस्तक सापडले, ह्या नावात काहीतरी ओळखीचे वाटले पण काय ते आठवेना. मग मेंदूवर जबर जोर देऊन बसलो अर्धा तास तसे आठवले "घोस्ट अँड द डार्कनेस" नावाचा एक इंग्लिश सिनेमा पाहिला होता कैक वर्षे आधी, त्सावो नदीवर पूल बांधायला आलेला कर्नल जॉन हेन्री पॅटरसन नावाचा अधिकारी अन त्याने त्सावोच्या गवताळ प्रदेशात केलेली दोन नरभक्षक सिंहांची कथा दाखवली होती. हा तो सिनेमा :- Image removed. सिनेमात एकाच कथेभोवती कथानक फिरत असल्यामुळे असेल पण तो गडद वाटला, पुस्तक वाचायला आत्ता सुरुवात केलीये. उत्तम आहे, कर्नल पॅटरसन ह्यांची शैली अन अभिनिवेषहीन किंवा समकालीन इंग्रज लोकांइतका माज नसल्याने आलेल्या सहजपणातून बनलेले लिखाण आवडले. त्सावोच्या सिंहांची शिकार मोठा भाग असला तरी इतर सफारी, स्थानिक जीवनाच्या तपशीलवार नोंदी वगैरे मजेदार सुरस गोष्टी पुस्तकात सापडल्या आहेत (अनुक्रमाणिकेवरून तरी अदमास तसाच झालाय). हे पुस्तक पुढेमागे भाषांतरित करून मिपावर टाकायचे पक्के केलेच आहे ह्या निमित्ताने ग्रामीण लेखनाचा जॉनर सोडून इतर प्रयोगही करता येतील अन ते मिपाकरांना आवडतील अशी आशा आहे. :)
  • Log in or register to post comments

सॅव्होचे नरभक्षक सिंह हे

प्रचेतस
Fri, 07/19/2019 - 12:15 नवीन
सॅव्होचे नरभक्षक सिंह हे पुस्तक फार्फार वर्षांपूर्वी वाचलेले होते. अनुवाद बहुधा मनोहर दातार किंवा सुभाष भेंडे. नक्की आठवत नाही. आफ्रिकेतील रेल्वे कामगारांवर हे सिंह हल्ला करत असे वाचल्याचे स्मरते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

हो

जेम्स वांड
Sat, 07/20/2019 - 15:17 नवीन
आयाळ जवळपास नसलेल्या दोन नर सिंहांनी मिळून जवळपास गोरे काळे, कामगार मुकादम इंजिनीयर पाद्री डॉक्टर असे कैक लोक त्सावो मध्ये ठार मारले होते, शेवटी कर्नल पॅटरसन ह्यांनीच त्यांना गारद केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

द घोस्ट अँड द डार्कनेस

जॉनविक्क
Fri, 07/19/2019 - 14:48 नवीन
नावामुळे भुताचा पिक्चर म्हणून बघायला गेलो अन मंत्रमुग्ध बनून गेलो. ओंमपुरीला बघून सुखद धक्का बसला, भारतीय जातीव्यवस्थेवर एक खुसखुशीत मार्मिक टिपण यात आफ्रिकन व ब्रिटिश व्यक्तींच्या एका संभाषणातून केले आहे. वर्षातून एकदा हा चित्रपट रिपीट होतोच. तुमच्यामुळे पुस्तक परिचयही झाला याचे भाषांतर कराच हि आग्रहाची विन्नती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

नक्कीच प्रयत्न करतो :)

जेम्स वांड
Sat, 07/20/2019 - 15:10 नवीन
काल पुस्तक डाउनलोड केल्यापासून खाली ठेववत नाहीये इतकं जब्बर लिहिलं आहे, सुरुवातीलाच मोम्बासा बंदराचे वर्णन, त्याचा इतिहास वगैरे उत्तम तपशिलांसाहित मांडला आहे कर्नल पॅटरसन ह्यांनी. काम प्रचंड मोठं असणार आहे, नोकरीधंद्यातून कधी वेळ मिळेल ह्याचे नियोजन करूनच हात घालायला हवाय ह्या कामात पण प्रयत्न पूर्ण करणारच असा मूड होतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

वाट पहात आहे. त्यामुळे ऑनलाइन वाचायचे टाळतो.

जॉनविक्क
Fri, 07/26/2019 - 00:14 नवीन
डायरेक्ट मराठीच वाचू. रच्याकने घोस्ट आणि डार्कनेस हि त्या नरभक्षक सिंहाची नावे आहेत, भुत आणि काळोखाचा त्यात काही प्रत्यक्ष संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

शिकारी कथा

भंकस बाबा
गुरुवार, 07/25/2019 - 23:14 नवीन
भरपूर वाचल्या आहेत, पैटरर्सनच्या देखील , तरीही जिम कार्बेटचे 'देवळाचा वाघ' आणि 'कुमाऊँचा नरभक्षक' हि शिकारकथेवरिल पुस्तके भन्नाट आहेत. जिम कार्बेटची निरीक्षण शक्ति अफाट होती. अचूक आकलन करून निर्णय घेणे ही जिम कार्बेटची खासियत त्यांच्या लेखनातून पदोपदी जाणवते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

कॉर्बेट पण मस्त होता

जेम्स वांड
Mon, 07/29/2019 - 06:55 नवीन
काही लोक म्हणतात कॉर्बेट खूप जास्त गर्विष्ठ वगैरे होता, पण मला तरी असे काही लेखनात जाणवले नाही, नॉर्मलच वाटला कॉर्बेट मला तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

ही ३ पुस्तके

हेमंतकुमार
Fri, 07/19/2019 - 11:34 नवीन
ही ३ पुस्तके माझ्या संग्रही असून त्यातील काही भाग मी नियमितपणे पुन्हा वाचतो. १. एक शून्य मी - पुलं २. लक्ष्मणझुला - लक्ष्मण लोंढे ३. कोसला - नेमाडे
  • Log in or register to post comments

Jeffrey Archer च्या Clifton

संजय पाटिल
Fri, 07/19/2019 - 18:30 नवीन
Jeffrey Archer च्या Clifton Chronicles पैकी Mightier Than the Sword पर्यंत आलोय. कुणी वाचलेयत का? मला आवडले सगळे भाग! अजून दोन भाग शिल्लक आहेत.
  • Log in or register to post comments

क्लिफ्टन क्रॉनिकल्स अजून

प्रचेतस
Fri, 07/19/2019 - 19:36 नवीन
क्लिफ्टन क्रॉनिकल्स अजून वाचले नाहीत मात्र आर्चरची केन अँड एबल, नॉट अ पेनी मोअर नॉट अ पेनी लेस आणि प्रिझनर ऑफ द बर्थ ही पुस्तके भारी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

हि वाचून झालीयेत...

संजय पाटिल
Sat, 07/20/2019 - 10:04 नवीन
हि वाचून झालीयेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा