सुरुवात अतिशय बेकार झाल्यावर न्यूझीलंड जरा अंमळ स्थिरावतंय की काय?
मुळात टॉस आणि त्यांची पहिली बॅटिंग, इथेच मूड गेला. पण एका बातमीनुसार याच मैदानावर छत्तीस (तीस सहा) वर्षांपूर्वी विश्व कप सेमीफायनललाच इंग्लंड आपल्याविरुद्ध टॉस जिंकला, त्यांनी प्रथम ब्याटिंग घेतली आणि तरी आपण ती मॅच घेतली हे वाचलं. त्यामुळे जरा धीर आलाय.
पॉप कॉर्न घेऊन बसलेल्या लोक्सनी इथे लाईव्ह चर्चा आणि अपडेट्स करा. कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना लाईव्ह स्कोर खूप ठिकाणी कळेल, पण मिपा स्टाईल टिप्पणीसहित प्रतिक्रिया गुगलही देऊ शकणार नाही.
तेव्हा इच्छुकांसाठी हा धागा सुरु केल्या गेला आहे.
आत्ता
125/2
34 षटके
न्यूझीलंड फायनल स्कोर वधारेत वधारे अंदाज 225. कसे?
| लेख वर्गीकरण |
|---|
वाचने
72876
प्रतिक्रिया
133
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॅप्टन गॉन?!
कॅप्टन गॉन?!
हो
In reply to कॅप्टन गॉन?! by गवि
धागा काढायला उशिर झाला नाहितर आधिच गेला असता ;)
बसवला टेम्पोत.. खरंच की..
In reply to हो by प्रशांत
बसवला टेम्पोत.. खरंच की..
लेकिन देर आये दुरुस्त आये, असं म्हणू. तुमचा काय अंदाज टोटल ?
२२२
In reply to बसवला टेम्पोत.. खरंच की.. by गवि
२२२
250
In reply to बसवला टेम्पोत.. खरंच की.. by गवि
250
धन्यवाद.
गविसेठ, विश्वचषक क्रिकेट चालू आणि मिपावर धागा नाही याचं आश्यर्च वाटलं होतं. पण आपण धागा सुरु केला आभार.
तीन बाद १३६ मला वाटतं. न्यूझीलंड २५७ करतील.
-दिलीप बिरुटे
आपण जिंकणार, विषय संपला.
आपण जिंकणार, विषय संपला. धन्यवाद.
ते तर झालंच, पण आत्तापर्यंत
In reply to आपण जिंकणार, विषय संपला. by यशोधरा
ते तर झालंच, पण आत्तापर्यंत झालेल्या विजयांप्रमाणे एकतर्फी आणि विनाचुरस सामना होणार की नखे कुरतडत बघावा लागणार हे महत्त्वाचे.
दहाच्या दहा नखे नाही कुरतडावी
In reply to ते तर झालंच, पण आत्तापर्यंत by गवि
दहाच्या दहा नखे नाही कुरतडावी लागणार बहुधा. तीन- चार बास होतील. =))
आज आपले हाल
होणार हे निश्चित, संध्याकाळी नियमित कोट्यापेक्षा जास्त मद्य घेऊन क्रिकेट पाहणा-यांनी आज टेंशन घेऊ नये. अशी सुचना द्यावी वाटते.
१४९/३-३८.४
-दिलीप बिरुटे
कोट्यापेक्षा जास्त मद्य घेऊन
In reply to आज आपले हाल by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोट्यापेक्षा जास्त मद्य घेऊन क्रिकेट पाहणा-यांनी >>
३८.४३.८४ होता, आता ३.८८ आहे.४ थी विकेट
In reply to कोट्यापेक्षा जास्त मद्य घेऊन by यशोधरा
धन्स. आता वाटतं २४० होतील.
१६३२/४
-दिलीप बिरुटे
पाऊस थांबला का?
पाऊस थांबला का?
पाऊस थांबला...
In reply to पाऊस थांबला का? by प्रचेतस
*वर्ल्डकप क्रिकेट अपडेट्स*
भारत न्युझीलंड उपांत्य सामना
सध्या पावसामुळे सामना थांबलेला आहे, जर पाऊस थोड्या वेळात थांबला व न्यूझीलंड पुन्हा फलंदाजीसाठी उतरला नाही तर, भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237 धावा करण्याचे आव्हान असणार आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार 4 ओव्हर कमी होणार आहेत. तसेच, जर सामना 20 षटकांचा झाला तर भारतासमोर 148 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडनं 4.5 च्या रनरेटनं धावा केल्या आहेत. त्यामुळं भारताला 6 च्या रनरेटनं धावा कराव्या लागणार आहेत.
आणि जर पाऊसामुळे आज सामना झालाच नाही तर बुधवारी सामना आजच्या स्थितीतच उद्या पुढे सुरू होईल.
आणि जर उद्याही पाऊसामुळे सामना झालाच नाही तर गुण जास्त असल्यामुळे भारत थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल.(चोप्य पस्ते)
-दिलीप बिरुटे
भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237
In reply to पाऊस थांबला... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ऑ?
46 ओव्हर्समधे फक्त 211 केल्यात ना त्यांनी? मग भारताला 46 ओव्हर्समधेच 237 टार्गेट कशापायी?
विकीवरून
In reply to भारतासमोर 46 ओव्हरमध्ये 237 by गवि
When overs are lost, setting an adjusted target for the team batting second is not as simple as reducing the run target proportionally to the loss in overs, because a team with ten wickets in hand and 25 overs to bat can play more aggressively than if they had ten wickets and a full 50 overs, for example, and can consequently achieve a higher run rate. The DLS method is an attempt to set a statistically fair target for the second team's innings, which is the same difficulty as the original target. The basic principle is that each team in a limited-overs match has two resources available with which to score runs (overs to play and wickets remaining), and the target is adjusted proportionally to the change in the combination of these two resources
होतो का नै म्याच् सुरु ?
काही नवीन अपडेट्स ?
-दिलीप बिरुटे
मॅच काय सुरू होईल असे दिसत नै
In reply to होतो का नै म्याच् सुरु ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मॅच काय सुरू होईल असे दिसत नै, शुरा
थोडंसं पुरुष मंडळींंना
थोडंसं पुरुष मंडळींंना जळवण्यासाठी whatsapp वरून चोप्यपस्तेः
*आज भारत वि.न्युझीलंड हा उपांत्य सामना असल्याने स्त्रियांनी घ्यावयाची काळजी....*
पती १) सायंकाळी आपल्या नेहमीच्या मालिका लावण्याचा आग्रह अजिबात धरु नये...
पती २) अधुनमधुन पतीदेवांना पाणी व चहा आणुन द्यावा....
पती ३) संघाची स्थिती वाईट असल्यास पतीस धीर द्यावा...
पती ४) संघ उत्तम स्थितीत असल्यास पतीच्या आनंदात सहभागी व्हावे...
पती ५) पती सातत्याने चिडचिड करु लागल्यास शांतता बाळगावी...
पती ६) तुम्ही नेहमी जरी नवऱ्याला रिमोटली कंन्ट्रोल करत असल्यात तरीही टि.व्ही चा रिमोट आज मात्र त्याच्याकडेच द्यावा...
पती ७) "भारतच जिंकेल" हे सातत्याने म्हणावे....
हे सगळं करताना तुमची घुसमट झाली तरी काळजी नको. तुम्हाला त्याचा वचपा काढायची एक खूप चांगली संधी वारंवार मिळेल आणि तेसुद्धा आजच. तिचा जरूर लाभ घ्या:
पत्नी १) सामना सुरू असताना तुमचा नवरा जेंव्हा केंव्हा स्टेडियममध्ये बसलेल्या सुंदर बायकांकडे डोळे भरून पहात असेल तेंव्हा खुशाल टिव्ही आणि त्याच्या मधोमध (त्याला टीव्ही दिसुच शकणार नाही असं) उभं राहून त्याच्या नजरेला नजर भिडवून पण अतिशय प्रेमाने हे सगळे प्रश्न विचारा: स्कोर काय झाला? आत्ता कोण बॅटिंग करतंय? या बॉलरचं नाव काय? किती ओव्हर झाल्या? रन रेट काय आहे? कोण चांगला स्पिनर आहे? विकेट कीपरच नाव काय?
मग टिव्हीवरची मॅच कोणीही जिंको... तुम्हाला निर्मळ आनंदाची अनुभूती येईल.
फॉरवर्ड पोहोचलं होतं.
In reply to थोडंसं पुरुष मंडळींंना by इरामयी
पण शेवटचा उतारा नव्हता. छान.
अवांतर : आमच्याकडे अजुनही सचिन तेंडुलकर टीम मधे असतो. धन्यवाद. ;)
-दिलीप बिरुटे
:)
In reply to फॉरवर्ड पोहोचलं होतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
आजची मॅच उद्यावर गेली.
आजची मॅच उद्यावर गेली.
आज काय वेदर रिपोर्ट ?
ज्या देशात पाऊस असतो तिकडे ठेवतातच कशाला हे सामने.
असो, आज काय वेदर रिपोर्ट ?
राहिलेल्या चार षटकात ४० धावा जरी आल्या तरी दोनशे एक्कावनच्या पुढे ते जात नै.
आणि ते आव्हान आपण लीलया पेलू शकतो. आपल्या संघाचं एक वैशिष्ट्य की आपण त्या त्या संघाच्या लेवलवर जाऊन खेळतो म्हणून दोनशे एक्कावनचं टारगेट साठी चार पाच फलंदाज कामी येतील असे वाटते.
भारतीय संघाला शुभेच्छा आहेतच.
अवांतर : धागा लेखकांनी वरचवर अपडेट टाकले पाहिजे. आग्रह नाही पण धाग्याचा रंगमंचं हलता ठेवला पाहिजे असे वाटते.
-दिलीप बिरुटे
(मिपा फलंदाज)
ते डकवर्थ लुईस नियमानुसार
In reply to आज काय वेदर रिपोर्ट ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ते डकवर्थ लुईस नियमानुसार जास्तीचे टार्गेट येणार होते तो मानसिक लोड उतरला. त्या नियमांचं लॉजिक काही पटलं नाही पूर्णपणे.
अमुक परिस्थितीत संघ अधिक आक्रमक खेळला असता, तमुक इतकी षटके असती तर तो रिलॅक्स खेळला असता वगैरे इतका तपशीलवार विचार करुन वाढीव टार्गेट ठरवायचं तर मग आणखी बऱ्याच बाजू निसटल्या असं म्हणता येतं. पाऊस पडू शकतो याची जाणीव असतानाही एक संघ तुलनेत स्लो खेळला, तर हे हेतुपुरस्सर असण्याची शक्यता आहे असं म्हटलं तर? त्याबद्दल त्यांना पेनल्टी द्यावी की फायदा? असो.
बाकी मिपाकर रंगमंच हलता ठेवतीलच.
डकवर्थ लुईस पद्धतीमध्ये काही
In reply to ते डकवर्थ लुईस नियमानुसार by गवि
डकवर्थ लुईस पद्धतीमध्ये काही सुधारणा करुन २०१४ पासून डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धत वापरात आहे.
हेच ते २ महान नग
In reply to ते डकवर्थ लुईस नियमानुसार by गवि
हेच ते २ महान नग
अपराधी!!! ए , हान् रे त्या
In reply to हेच ते २ महान नग by महासंग्राम
अपराधी!!! ए , हान् रे त्या दोगान्ला!
"चायनामन" कादंबरी मधून साभार:
In reply to ते डकवर्थ लुईस नियमानुसार by गवि
The Duckworth-Lewis method of resolving rain-affected games has divided the cricketing fraternity into those who do not understand it and those who pretend they do. Rumour has it that it involves calculus, astrology, quantum mechanics and the use of dice. Either way , the teams get screwed.
काल जिथे मॅच संपली
तिथूनच पुढे सुरु होणार आहे.
https://m.maharashtratimes
https://m.maharashtratimes.com/sports/cricket-news/ndia-vs-new-zealand-…
अरे देवा..
काळजी/पर्वा इल्ले !
In reply to https://m.maharashtratimes by गवि
काळजी/पर्वा इल्ले !
सामना पूर्ण झाला नाही तर लीग फेजमध्ये अधिक गुण असलेला भारत अंतिम फेरीत जाईल.
अजिबात होऊ न शकल्यास ते ठीक.
In reply to काळजी/पर्वा इल्ले ! by डॉ सुहास म्हात्रे
अजिबात होऊ न शकल्यास ते ठीक.
पण पावसाच्या अधेमधे अर्धवट काहीतरी सामना होऊन डकवर्थ लुईस पद्धतीने टार्गेट वाढवून मिळून उगीच पराभवाची भानगड नको.
सामना झालाच पाहिजे! हिट मॅन
In reply to अजिबात होऊ न शकल्यास ते ठीक. by गवि
सामना झालाच पाहिजे! हिट मॅन ची अजून एक सेंच्युरी हुकले ना! दुत्त दुत्त
घ्या गुरुजी. अता काय?
In reply to सामना झालाच पाहिजे! हिट मॅन by अत्रुप्त आत्मा
घ्या गुरुजी. अता काय?
थोड्याच वेळात मॅच सुरु होत आहे.
.
२१७/ ५, ४७, ४.६२
२१७/ ५, ४७, ४.६२
एकामागून एक दोन विकेटी
In reply to २१७/ ५, ४७, ४.६२ by यशोधरा
एकामागून एक दोन विकेटी तेवढ्यात.
अंपायरचे बोट ईश्वराच्या दिशेत.
बघ म्हणावे मांजराला, जडेजा
In reply to एकामागून एक दोन विकेटी by गवि
बघ म्हणावे मांजराला, जडेजा खेळतो बरं.
१० विकेट पडतील
१० विकेट पडतील
जोरात होणार असे दिसते आहे
दोन विकेटा पडल्या पण
पैजारबुवा,
भारतीय इनिंगच्या वेळी
भारतीय इनिंगच्या वेळी अँपायरच्या दोन्ही खिशांत फेविकॉल भरुन ठेवावे. हात खिशाबाहेर निघायला नकोत.
हवे तर पीडिलाईटची स्पॉन्सरशिप घ्यावी.
आठवा आऊट.
आठवा आऊट.
ढिंकचिका!!
ढिंकचिका!!
दोन यॉर्कर पाहिजेत बास
दोन यॉर्कर पाहिजेत बास
चायला. पुन्हा ईश्वराकडे
चायला. पुन्हा ईश्वराकडे अङ्गुलीनिर्देश?
असू देत. जास्ती विकेटस घेतल्या तर पुढे अडीअडचणीत फायदाच होईल.
काळजी नका करु
In reply to चायला. पुन्हा ईश्वराकडे by गवि
काळजी नका करु बिल देवुन या...
तुम्ही सायकलची पडलेली चेन
In reply to काळजी नका करु by प्रशांत
तुम्ही सायकलची पडलेली चेन बसवून या बघू ब्रेकमध्ये. :-(
५० ओव्हर्स संपली. हुश्श.
५० ओव्हर्स संपली. हुश्श.
८ बाद २३९
डिएलएस चा पराभव.
भारताचा विजय पक्का.
डिएलएस चा पराभव. तो कसा?
In reply to ५० ओव्हर्स संपली. हुश्श. by शाम भागवत
तो कसा?
टार्गेट अजून अवघड करता येणार
In reply to डिएलएस चा पराभव. तो कसा? by गवि
टार्गेट अजून अवघड करता येणार नाही ना.
:)
रोहित आऊट.
रोहित आऊट.
गेला रोहित.. शिंकली माशी.
गेला रोहित.. शिंकली माशी.
त्या मांजराला हाकला आधी! :/
त्या मांजराला हाकला आधी! :/
कोहली आऊट
कोहली आऊट
रिव्ह्यू ची मागणी केलीय.
दोन आऊट ५
दोन आऊट ५
बसवला xxx. काय खरों नसा.
In reply to दोन आऊट ५ by शाम भागवत
बसवला xxx.
काय खरों नसा.
चायला विराटचा रिव्ह्यू.
चायला विराटचा रिव्ह्यू.
कोहली पण आऊट
काय खरं नाही
२३९ खूपच जास्त वाटायला
२३९ खूपच जास्त वाटायला लागल्येत.
धोनी खेळेल.
धोनी खेळेल.
मी बंद केला टिव्ही.
मी बंद केला टिव्ही.
काम करतो जरा घराबाहेरची.
:))))
भाजी आणतो जरा. गुड डे.
In reply to मी बंद केला टिव्ही. by शाम भागवत
भाजी आणतो जरा. गुड डे.
तिसरा आउट
तिसरा आउट
देवा...
दोन विकेट्स गेल्या आता तुमची जवाबदारी.
५/२ -३ ओव्हर्स
-दिलीप बिरुटे
तिसरा निवर्तला. आता आपण जरा
In reply to देवा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तिसरा निवर्तला. आता आपण जरा दीर्घश्वसन करु.
टिव्ही बंद करेपर्यंत तिसरा
टिव्ही बंद करेपर्यंत तिसरा गेला.
(डोक्याला हात लावलाय.)
आपणच जिंकणार आहोत म्हणजे आहोत
आपणच जिंकणार आहोत म्हणजे आहोत.
मेरे करन अर्जुन आयेंगे.. ??
In reply to आपणच जिंकणार आहोत म्हणजे आहोत by यशोधरा
मेरे करन अर्जुन आयेंगे.. ??
जिद नै छोडने का रे मामु!
In reply to मेरे करन अर्जुन आयेंगे.. ?? by गवि
जिद नै छोडने का रे मामु!
बाकी काही नाही. तिने मळवट जरा
In reply to मेरे करन अर्जुन आयेंगे.. ?? by गवि
बाकी काही नाही. तिने मळवट जरा एका बाजूला (ऑफसेट) भरलाय... फॅशन म्हणून. :)
==)) ==)) ==))
In reply to मेरे करन अर्जुन आयेंगे.. ?? by गवि
गवि साहेब आपले कारण अर्जुन आले वाटतं .. सिक्स मारला कि करणने
मी गप हापिसच्या कामात लक्ष घालते.
नाहीतर अकुनी नवीन पाडलेली कविता वाचते. तेवढाच मूड चेंज :D
भ्रमनिरास
In reply to मी गप हापिसच्या कामात लक्ष घालते. by श्वेता२४
आज सगळीकडून भ्रमनिरास व्हायचा दिवस दिसतोय
काहीही होवो
भारत हहा सामना जिंको वा हिरो सध्याची टीम ही विनर टीम नाही हे मी पहिल्या सामन्या पासून सांगत आहे ! ३ ४ ५ ६ ची बोंबी आहे व त्या खाली क्लब स्टॅंडर्ड ची ही फलंदाज नाहीत !
तुमचे म्हणणे खोटे पाडण्यासाठी
In reply to काहीही होवो by चौकटराजा
तुमचे म्हणणे खोटे पाडण्यासाठी पहिले तिघे आऊट झाल्येत.
;)
प्रशांत ब्लॉक कर रे यांना.
In reply to काहीही होवो by चौकटराजा
आजच्या दिवस तरी. ;)
-दिलीप बिरुटे
+१ टू चौराकाका
In reply to प्रशांत ब्लॉक कर रे यांना. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चौरा काका म्हणतात त्यात तथ्य आहे. इथपर्यंत केवळ नशिबाने पोचलो आहोत.
आज न्युझीलंड प्रयत्नांची पराकाष्ठा करणार.
माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल.
पैजारबुवा,
एकटा मांजऱ्या पुरे नव्हता का
In reply to +१ टू चौराकाका by ज्ञानोबाचे पैजार
एकटा मांजऱ्या पुरे नव्हता का की आता तुम्ही पण असं बोलताय ते! दु दु पैबु काका!
मधल्या फळीच्या फलंदाजांना --
मधल्या फळीच्या फलंदाजांना -- पन्त आणि कार्थिक -- आता आपापलं कर्तृत्त्व दाखवण्याची एक चांगली संधी मिळाली आहे.
सर्वानी भारतमाता कि जय १०८
सर्वानी भारतमाता कि जय १०८ वेळा म्हणा बघू .. एव्हढं करा नंतर पुढे दुसरा उपाय सांगतो ..
गोळ्या...
... कपाटात!
पावसाचे काही चिन्ह ?
काही यज्ञ किंवा पावसाचे काही स्तोत्र ?
-
तेवढा एकच ऑप्शन राहिलाय आता.
In reply to पावसाचे काही चिन्ह ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तेवढा एकच ऑप्शन राहिलाय आता.
==)) ==)) ==))
आहे ना सर ,, पण आधी सर्वजण १०८ वेळा भारतमाता कि जय बोलले का ?
चला... हरलो
२४ वर ४
बाय ऑल. परिस्थिति सुधारली तर येईल.
धागा आला नस्ता तर जिंकलो असतो. ;)
-दिलीप बिरुटे
और एक गया...
कार्तिक खपला
पैजारबुवा,
चला, काही बाऊंडरीज
चला, काही बाऊंडरीज
थोडे पॉझिटिव्ह वातावरण करुया.
आत्ताच सामना पहायला सुरुवात केली
4 विकेट जाऊनही पंत आणि पांड्या सकारात्मक अभिनिवेशात भासत आहेत हे चांगले चिन्ह आहे थोडं कर्तृत्वाची साथ हवीय, लेट्स सी
सूर सापडतोय. स्थिर होताहेत
सूर सापडतोय. स्थिर होताहेत बहुधा.
होणार, जिंकणार. आपण.
In reply to सूर सापडतोय. स्थिर होताहेत by गवि
होणार, जिंकणार. आपण.
फक्त 4 विकेट गेल्यामुळे कणा
फक्त 4 विकेट गेल्यामुळे कणा मजबूत राहिला नाही. एखादी आणखी विकेट गेली तरी खाडकन चित्र बदलेल.
घरी लवकर जाऊन सामना बघायची
घरी लवकर जाऊन सामना बघायची इच्छाच गेली राव.
शेवटी क्रिकेटमधे शेवटच्या बॉलपर्यंत काय होईल हे नाही सांगता येत पण आशा सोडून दिली आहे. :-(
१८० बॉल आणि १७० रन्स हव्यात.
१८० बॉल आणि १७० रन्स हव्यात. भरवश्याच्या आणखी दोन तीन जास्त विकेट्स हाती असत्या तर हे समीकरण पाहायला निवांत वाटलं असतं एरवी.
टीव्ही अनुपलब्ध.
टीव्ही अनुपलब्ध.
एक मेडन गेली की काय? असो.
जास्त चेंडू आणि कमी रन हव्यात इथून आता चेंडू आणि आवश्यक रन्स समसमान झाल्या.
आता गणित अधिकाधिक उलट होऊ नये बस्स.
जिंकु आपण. पण धोणीला पाठवायला
जिंकु आपण. पण धोणीला पाठवायला हवं होत वर अस वाटलं. अश्या सिचुएशनला तो बेस्ट होता
मी पाठीशी शिल्लक आहे, असा
In reply to जिंकु आपण. पण धोणीला पाठवायला by प्रीत-मोहर
मी पाठीशी शिल्लक आहे, असा दिलासा देऊन काहीसा मानसिक ताण कमी करण्यासाठी धोनी मागे राहिला असेल.
बेस्ट तर कोहली व व रोहित पण होते
In reply to जिंकु आपण. पण धोणीला पाठवायला by प्रीत-मोहर
अजून धोनी आउट व्हायचा आहे हा विचार मनाला जास्त आश्वस्थ करतो म्हणूनच तो खालच्या नंबरवर आहे, अन्यथा जिथे रथी महारथी कोसळले तिथे आम्ही काय टिकणार अशीही ओरड होऊन जाते
मंडळी
अगदी कमी देशात खेळला जाणारा हा " विचित्र" खेळ मी १९६६ पासून म्हणजे क्लाइव्ह लॉईड १९ वर्षांचा असल्यापासून पाहात आहे .इथे शेवटाचा चेंडू पडेपर्यंत काहीही होऊ शकते. पण ५ बाद झाल्यावर चमत्कार करणारे लान्स क्लूस्नर आज आपल्या संघात नाहीत . १७५ वाला कपिल देव नाही .पाकिस्तान मध्ये बॉलर्स जसे किलिंग इन्स्टीकट ने फलंदाजी करतात ती बॉलर्स ची परंपराच आपल्याकडे फारशी नाही, हार्दिक व पंड्या ना अनुभव कमी आहे ,धोनी २०१६ पासून मंदावला आहे. दिनेश कार्तिक चांगला खेळाडू असेलही पण आता यावेळी त्याची निवड चुकीचीच आहे .इंग्लंडात फिरकीला फारसा वाव नसतोच . धावा रोखल्या तरी विकेट मिळणे दुरापास्त असते. हे लक्षात घेऊन विजेता स्वप्न पाहावे.
दुरुस्ती
In reply to मंडळी by चौकटराजा
हार्दिक व पंत असे वाचावे !
रायडू खुश झाला असेल का ?
In reply to दुरुस्ती by चौकटराजा
गेला पंत... :-(
गेला पंत... :-(
मिडल ऑर्डर चे वांदे होतेच
In reply to गेला पंत... :-( by गवि
आज प्रात्यक्षिक दिसतंय... सुरुवातीचे 3 खेळाडूच काय ते पाया रचतात :(
काल किवींची अवस्था सेम होती 3 विकेट चटकन गेल्या होत्या
In reply to मिडल ऑर्डर चे वांदे होतेच by जॉनविक्क
पण ते किल्ला लढवत राहिले
१२५ चेंडूंत १५५ रन्स हव्यात.
१२५ चेंडूंत १५५ रन्स हव्यात. अधिकाधिक कठीण बनत चाललं.
फेडरर निशीकोरी मॅच बघत बसावी
फेडरर निशीकोरी मॅच बघत बसावी आता.
बोंबला.. शुभरात्री.
बोंबला.. शुभरात्री.
धोनी जाडेजा जोडी कौतुकास्पद.
धोनी जाडेजा जोडी कौतुकास्पद. स्थिर वाटतंय आता.
सिक्स फोर वगैरे अधेमध्ये चालू. चौदा एक्स्ट्रा रन्स. थिंक पॉझिटिव्ह.
लोड कमी झाला असेल थोडा
In reply to धोनी जाडेजा जोडी कौतुकास्पद. by गवि
लोड कमी झाला असेल थोडा
अरे मी इथे मंत्रपाठ करतोय
अरे मी इथे मंत्रपाठ करतोय म्हणून चांगली दशा सुरु झाली आहे .. मला तुमचेही पाठबळ हवे आहे .. त्या जडेजाला मी मंत्र फुंकुनच मैदानावर उतरवले आहे आता तुम्ही त्या धोनीला पाठबळ द्या
उत्कंठावर्धक सामना ...
उत्कंठावर्धक सामना ... जडेजाने मन जिंकलंय.. निकाल काहीही असू देत
अपेक्षांना अंत नाही !
अपेक्षांना अंत नाही ! पाकीस्तान बरोबर खेळताना चषक नाही जिंकला चालेल पण पाकीस्तानला हरवावे असे वाटते. आज इथपर्यंत आलोय तर जिंकूनच यावे असे वाटते.
भारत जिंकणार ! टेंशन नक्को !
शब्द गिळायची वेळ आली !
In reply to अपेक्षांना अंत नाही ! by धर्मराजमुटके
शब्द गिळायची वेळ आली !
जडेजा चुकीच्या वेळी गेला.
जडेजा चुकीच्या वेळी गेला. हुरहूर.
धागा उडवा आता !
शब्द गिळायची वेळ आली !
थोडक्यात गेली की. :(
थोडक्यात गेली की. :(
पण जडेजा आणि धोनी छान खेळले.
थोडक्यात नाही गेली
In reply to थोडक्यात गेली की. :( by यशोधरा
भुवनेश्वर कुमार व चहल पूर्ण ५० ओव्हर्स देखील खेळले नाही . अशावेळी मी जे किलिंग इन्स्टिन्क्त आपल्या ७ नंतरच्या खेळाडूंच्या अंगात नाही असे म्हणालो ते किती उचित आहे ते पहा !
चौरा काका, पुढच्या वेळी
In reply to थोडक्यात नाही गेली by चौकटराजा
चौरा काका, पुढच्या वेळी तुम्ही फक्त positive बोला हां काय. मग आपण हरणार नै.
पुढचा वर्ल्डकप
In reply to चौरा काका, पुढच्या वेळी by यशोधरा
२०२३ मध्ये मी सत्तरी ओलांडून जाईन . मग तर माझे कुणीच ऐकणार नाही ! माझा मुद्दा एवढाच टीम चान्गली खेळली पण १९८३ इतके टीमवर्क नव्हते !
१९८३ इतके टीमवर्क नव्हते >>
In reply to पुढचा वर्ल्डकप by चौकटराजा
१९८३ इतके टीमवर्क नव्हते >> मान्य. पण तेव्हापासून आतापर्यंत क्रिकेट किती बदलले आहे.
आता नेटकरी
आता नेटकरी अनुष्काची ऑनलाईन धुलाई करतील बहुतेक !
निकाल काहीही असू दे .....
निकाल काहीही असू दे खालील बाबी सिद्ध आहेत.
१) जर धोनीने निवृत्त होऊन पंत मधला पोरकट पणा काढला तर पंत एक उत्तम खेळाडू होऊ शकतो.
२) हार्दिक पंड्या हा खेळाडू फक्त आय पी एल च्या लायकीचा खेळाडू आहे . त्याला इतर भवितव्य नाही.
३) रवींद्र जडेजा व अश्विन हे अजूनही पोटेन्शियल असलेले खेळाडू आहेत .
४) २०१६ पासून धोनीच्या फटाक्यातला दणका हरवला आहे त्याने निवृत्त होणे उचित .
५) विजय शंकर चा अशोक मंकड ( फक्त इंडिया हिरो ) होण्याची शक्यता अधिक .
जाऊ दे ना वं !
In reply to निकाल काहीही असू दे ..... by चौकटराजा
जाऊ दे ना वं ! आज इथे कोणी चिरफाड च्या मुड मधे असेल असं वाटत नाहीये !
वाईट इतकंच आहे की
ज्या पाकिस्तानने किवींचा पराभव केला त्या किविंना आपण हरवू शकलो नाही. असो वेल प्लेड इंडिया.
बाय द वे....
क्रिकेट हा सांघिक खेळ असला त्यात सुरुवातीचे फलंदाज जवाबदार असले तरी प्रत्येक वेळी त्यांनी शतकं ठोकली पाहिजेत. मग हा महातारा धोनी टुचुटुचु खेळून आपला बीपी वाढवतो या xx ला अगोदर बलजबरीने निवृत्त करा. बस दुसरं काही नको. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
(जडेजाबरोबर टुचुटुचु खेळल्यामुळे म्हाता-या धोनीवर संतापलेला)
ओ काका, त्यानं एक बाजू लावून
In reply to बाय द वे.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ओ काका, त्यानं एक बाजू लावून धरली म्हणून.
आय पीएल असतं..
In reply to ओ काका, त्यानं एक बाजू लावून by यशोधरा
स्क्यूज् मी काकु, आयपीएलला हा म्हातारा धोनी जीवावर उदार होऊन खेळतो. आजच्या सामन्यात त्याने जड़ेजाबरोबर एक बाजू लावून धरली पण चेंडू किती खाल्लेत. कसलं टुचु टुचु खेळतो. अरे प्रसंग काय, तू काय खेळतो काय ? वय किती, खेळतो किती ? च्यायला, मला त्याचं तोंड बघायची इच्छा नै.
काकू तुम्ही त्याची बाजू घेऊन माझं ब्लडप्रेशर वाढवू नका. अगोदरच मला खुप कामाचा लोड आहे. बस आपल्याला त्याला रिटायर करायचंय. या गोष्टीसाठी,आपल्याला मिपावर एक ह्याशटॅग सुरु करायचंय. #''धोनीने निवृत्त व्हायलाच पाहिजे'' #
धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
धन्यवाद किवी
सेमिफायनलमधे match during चालले नाही.
Typo
सेमिफायनलमधे match fixing चालले नाही.
क्रिकेट अनिच्छतेचाच खेळ..
न्यूझीलंड आणि इंग्लण्ड या दोन्ही संघांनी विश्वचषक क्रिकेट अंतिम फेरीत धड़क मारली आणि कोण जिंकेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. इंग्लण्ड जिंकेल तर छुपा न्यूझीलंड बाजी मारेल असे वाटले. नाणेफेक ( टॉस) जिंकून न्यूझीलंडने पहिली बाजी मारली असे वाटले पण ठराविक धावसंखेच्या आणि ठराविक अंतराने बाद होणा-या संघाने फार मोठी धावसंख्या उभारली नव्हती. २४१ हे आव्हान समोर ठेवून उतरलेल्या रॉय रुट च्या बळावर इंग्लण्ड सहज जिंकेल असे वाटले होते पण चार फलंदाज बाद झाल्यानंतर सामना न्यूझीलंडकड़े फिरला होता. परंतु सामना शेवटच्या षटकापर्यन्त जाऊन टाय झाला. सुपर ओव्हर मधेही सामना टाय झाला. सामन्यात अधिक चौकार ज्याने मारले असतील तो संघ विजयी या मुर्ख नियमामुळे इंगलंडला विश्वविजेता ठरविण्यात आले. एका रोमहर्षक सामन्याचा असा शेवट पाहुन न्यूझीलंडचा समर्थक म्हणून आम्ही हळहळन्याशिवाय काय करू शकणार होतो. इंग्लण्डचं अभिनंदन.
-दिलीप बिरुटे
सामन्यात नाही
In reply to क्रिकेट अनिच्छतेचाच खेळ.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सामन्यात अधिक चौकार ज्याने मारले असतील तो संघ विजयीसुपर ओव्हरमध्ये बहुतेक.
सामना आणि सुपर ओव्हर
In reply to सामन्यात नाही by फुटूवाला
पूर्ण कालच्या सामन्यात आणि सुपर ओव्हर्स मधे इंग्लडने एकूण २४ चौकार ठोकले तर न्यूझीलंडने १६ चौकार ठोकले.
-दिलीप बिरुटे
इंगलंड जिंकेल हा अंदाज आधिच आला होता
माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल.
पण सामना इतका अटीतटीचा होइल असे वाटले नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना बर्याच कळापर्यंत लक्षात राहिल. दोनही संघांनी जिगरबाज खेळ केला त्यात इंग्लंड थोडे जास्त नशिबवान ठरले.
पैजारबुवा,
इंगलंड जिंकेल हा अंदाज आधिच आला होता
माझा अंदाज फायनल इंलंड आणि न्युझीलंड मधे होउन वर्ल्डकप इंग्लंड घेउन जाईल.
पण सामना इतका अटीतटीचा होइल असे वाटले नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना बर्याच कळापर्यंत लक्षात राहिल. दोनही संघांनी जिगरबाज खेळ केला त्यात इंग्लंड थोडे जास्त नशिबवान ठरले.
पैजारबुवा,