मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पावसाविषयी असूया

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
काव्यरस
पावसाविषयी असूया पाहून माझे खुप हाल झाले पावसाने केले तुझे केस ओले गवतावर पडताच पाऊल शहारले अंग भान हरपले जगा विसरले भिजण्यात दंग पाऊस फिका पडला थेंब पडताच गाली तुझ्या केस झटकण्याने तुषार पडले खाली ओली करून साडी पाऊस मातलेला बरसतो पुन्हा झिम्माड तुझ्या अंगाला गिरकी घेतली, उड्या मारल्या, हात पसरले विषाद वाटला माझाच तु पावसाला कवेत घेतले पाषाणभेद ०७/०७/२०१९

वाचने 3293 वाचनखूण प्रतिक्रिया 5

चित्रगुप्त Wed, 07/10/2019 - 02:34
कविता बोले तो एकदम झकास, पण ... ...गिरकी घेतली, उड्या मारल्या .... . यावरून आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की या कवितेतली 'ती' म्हणजे एकादी श्वानीण आहे, की बया ? (आमचे डोके जरा तिरपे चालते )