Skip to main content

बिल देऊन आलो..

लेखक गवि यांनी सोमवार, 01/07/2019 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
सांगावयास गेलो, ऐकून काय आलो? सुनावलेस तू, मी बिल देऊन आलो.. सैराट पावसाने पुरता.. भिजून आलो. त्या गोठल्या दुपारी बिल देऊन आलो.. हात होता तुझा अन कानशील माझे लोकां उमजण्याआधी बिल देऊन आलो. चालते होणे त्वरे सोपे गेले तुला वेटराने हटकले, मी बिल देऊन आलो. डोळे भरून आले.. पावसाच्या भरवशावर ना रोखले तयांना, अन बिल देऊन आलो.
लेखनविषय:

वाचने 24868
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

चार दिवसांत चार कवींना विडंबन करण्यास प्रवृत्त करणारी प्रेरणा जबरदस्तच म्हणायला पाहिजे :) मजा आली वाचायला.

भावना सखोल पोचल्या, अर्थात या नंतर निराश न होता तुम्ही नव्या दमाने कामाला लागला असाल याची खात्री आहेच. पैजारबुवा,

In reply to by गवि

पावसाळा कट्टा करू आमच्या औरंगाबादला या तुम्ही तुमचे मित्र घेऊन.बील देण्यात येईल. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गविंच्या मित्रांमध्ये आमचा समावेश असला तर आम्हीही येउ. (वेरूळला जाउ).

In reply to by प्रचेतस

उगीच माझ्या नावावर बिल फाडू नको. त्यांना डायरेक विचार फ्रेंडशिप देतात का ते.

In reply to by गवि

ओळखलंत का सर मला मिपावर आला कोणी द्याल का हो फ्रेंडशिप मला लावून तूप लोणी

तुम्ही, ज्ञापै, नाखु, गड्डा झब्बू सगळ्यांनी प्राचीतैला रॉयल्टी द्यायला हवीये खरतर! वर्षभराचा तिच्या आवडीच्या कॉफीचा पुरवठा करा तिला! =))

In reply to by यशोधरा

कुठले कुठले आजार उद्भवतात याची यादी शोधायला घेतली आहे. तरीही आपल्या जबाबदारीवर कॉफी घेणे कॉपीराइट बाहेरचा वाचकांची पत्रेवाला नाखु

लेखनावर किती प्रतिसाद आले ते बघायला आलो होतो, किती अवांतर. आमच्या वेळी असं नव्हतं. अशा अवांतर प्रतिसादामुळे लेखकाला खुप त्रास होतो. रात्री अपरात्री आपल्या लेखनावर कोणी छान छान म्हटलंय, कौतुक केलंय हे बघायला यावं आणि अवांतरमुळे लेखकाचा लिहिण्याचा मूड जातो. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या वेळी असं नव्हतं.
म्हणजे साठ सत्तर वर्षांपूर्वी ना? कसं होतं तेव्हा, ? सांगा ना सर.

In reply to by यशोधरा

जन्मल्यापासून मिपा वाचत असल्यास सत्तर वर्षांचे, नाहीतर अधिक काही (?दहा-पंधरा) वर्षे वाढवावी लागतील. यु सी. ;) :)