डान्सबार !!!!
लेखनप्रकार
बीप बीप ..पाटील आज फुल्ल करते
बीप बीप ..आज आनेवाले हो ना ?
"आकाश अपडेट देना में निकाल राहा हू "
गाडी नंतर काढू च्यायला तो पर्यंत नेहमीच्या ठिकाणी बसू.
रोजचं झालंय ह्या ऑफिस च्या ड्रायवर ला काही कळत नाही ."ठीक है चलो. पार्क करो और निकलो. "दोस्त आ राहा मै उसकी गाडी से जाऊंगा पता है ना आपको ."
आप" ऋषी के गाडी से आओगे मै थोडी रुक पाऊंगा. "
"हाहाहा "
नेहमीसारखी लेट कारणं मंत्रालयाची ..आम्ही काय पागल बसलोय का ऋषी .
१ व्हॅट ६९ और ४ माईल्ड बोलना.
चला ऑर्डर दिली . ऋषी यायला १०-१५ मिनिट आहेत. आकाश ला काय काम करायचं सांगून आलोय . ड्रायवर घरी जाईल आता निवांत मी .
आज मी काहीतरी करायला हवं
५-७ लाख महिन्याभरात जाऊन अजून फोन नंबर नाही म्हणजे काय ?
आपण मागे पडतोय कुठेतरी .साले रोज येतात अंकल लोग ५०-५० हजार घेऊन करायचं काय होतकरू मुलांनी .आधीच सिलेक्टड एन्ट्री आणि इतकी उडवणारी लोकं अरे मला काही स्कोप आहे का नाही??
आले साहेब .. अरे रिपीट ऑर्डर .
"चलो मोहिते "
"काय करणार ऋषी बोर होतंय आता पैसा जातोय तरी काही हातात नाही .किमान इज्जत तर राहायला हवी बार मध्ये" .
देखते पाटील कुछ आयडिया .
बघू भानुशाली ने पण मेसेज केलाय आज फुल्ल असं .
भानुशाली आणि सालियन माझे ग्रुप मेम्बर .आठवड्यातून एकदा बसणं आणि त्याच वेळी सगळ्यात मिळून किमान ३०-४० हजार उडवणं हा कार्यक्रम .
माझ्या प्रयत्नांना महिनाभर यश येत नव्हतं . पैसे तरी देऊन देऊन किती देणार .असायला तर पाहिजे तितके.
शेवटी मी जाणारच नाही असा आग्रह धरल्यावर एक आयडिया निघाली .
बिन तेरे क्या है जिया .....गाणं चालू ..गाण्यासाठी एका १० हजार मोजलेले आलो कि तेच गाणं हवं म्हणून .बाकी वेळेवर गाण्यांचे रेट लागू १ हजार ते १० हजार . स्वतःची इच्छा असेल तर उडवायला अमर्याद .
गाणं झालं माझ्या हातात एका नामवंत शो रूम मधून घेतलेली सोन्याची अंगठी होती . तिला बोलावलं हातात अंगठी दिली .म्हटलं आपके लिये .तो एकच क्षण सगळे अमर्याद पैसे उडवताना मॅडम आमच्यावर फिदा .
आय २० घेऊन यायची ती . स्वतः चालवत .अजून काही होत्या स्कोडा पासून स्वतः चालवत गाड्या आणायच्या मुली .थोडे दिवस खोटं नाव सांगण्यापासून ते खरं नाव काय यात गेले .पण नंतर काही समजलं ते ग्रेट होत .
सुलतानपूर नावाच्या उत्तर प्रदेश मधील जिल्ह्यातून बाईसाहेब होत्या . घरी आजवर १२ वि पास झालेला माणूस नाही . महिन्याची कमाई २ लाख कमीतकमी .काडीची अक्कल नाही .बाहेर जाताना एकदा बाईसाहेबांकडे आयडी कार्ड पण न्हवतं. आजपण नसेल .विमानाने प्रवास दिल्ली, लखनौ इथे आय कार्ड म्हणून रेशनिंग कार्ड .आल्या तेव्हा मुंबई एअरपोर्ट नजीक एका हॉटेलात काम करायच्या . आल्या त्या वेळी ह्या सगळ्या मुलींना भांगेची एक गोळी दिली जायची . त्यामुळे चेहऱ्यावर सतत हसू . लोकं पण खुश . भावड्या बघ माझ्याकडे बघून हसतेय . भाई मेरे पास हि देख रही.. अश्या टाईप ची.
हॉटेलं पण एक्सक्युझीव त्यामुळे शरीराची मागणी लगेच व्हायची नाही . आवडतं गाणं किंवा नाच ह्यावरच थांबायचं पुढे इच्छा असेल तर तोपर्यंत ३-५ लाख सहज निघून गेले असायचे .
(क्रमशः )
वाचने
14391
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
ह्यो नाद लै बेक्कार. :(
In reply to ह्यो नाद लै बेक्कार. :( by अभ्या..
+१
In reply to +१ by तुषार काळभोर
मला हे पैसे उडवणं लै
ही गोष्ट कोणत्या सालातील?
चालू आहेत हो खूप ठिकाणी
हे काही तरी वेगळंच जग आहे.
हम्म
लिहा हो...पटापट
डान्स बार मध्ये बरेचसे
मस्त सुरवात. इथे डान्स बार
In reply to मस्त सुरवात. इथे डान्स बार by संपत
स्ट्रीपबारमध्ये "हाताला"
Vachun omg zale.
डान्स बार...
In reply to डान्स बार... by समीरसूर
धन्यवाद
In reply to धन्यवाद by अभ्या..
खरं आहे...
In reply to खरं आहे... by समीरसूर
आचरट वैग्रे नाही हो
In reply to आचरट वैग्रे नाही हो by वरुण मोहिते
अपमान नाही
In reply to अपमान नाही by समीरसूर
.
In reply to . by चांदणे संदीप
थांबतो...
In reply to डान्स बार... by समीरसूर
पुरुषांच्या मनोरंजनासाठी
In reply to पुरुषांच्या मनोरंजनासाठी by जॉनविक्क
सोप्पयं
In reply to सोप्पयं by समीरसूर
अवघड आहे
In reply to अवघड आहे by जॉनविक्क
ठीक आहे...
In reply to सोप्पयं by समीरसूर
तुमच्या मताचा आदर आहेच. पण
१७ नंतर एकदम १९
@ससु
In reply to @ससु by जॉनविक्क
प्रॉब्लेम
In reply to प्रॉब्लेम by समीरसूर
आपला जो आवेश आहे त्यापुढे मी
In reply to आपला जो आवेश आहे त्यापुढे मी by जॉनविक्क
थांबतो...
In reply to थांबतो... by समीरसूर
तुम्ही तुम्हाला नाही सनी लिओनीला थांबवा.
अटॉम् साँग
खरा व खोटा तमाशा
वरुण मोहिते यांना श्रध्दांजली