माझा निबंध
प्रेरणा: जी. ए. कुलकर्णी यांची एक गोष्ट, बहुदा माझीही मोट असे काही तरी नाव असावे. एक शहरात राहणाऱ्या, स्वतंत्र विचारसरणीच्या मुलाला शाळेत निबंध लिहावा लागतो तोही त्याने न अनुभवलेल्या जीवनासंबंधी.
दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या आसपास एक गोष्ट हमखास पाहायला मिळते ती म्हणजे गहिवराचे कढ आणून लिहिलेल्या सुट्ट्यांच्या आठवणी. या वर्णनांमध्ये मामाच्या गावाला जरा विशेष स्थान असते. ते धूळभरल्या रस्त्यांनी कुठल्या तरी आडगावाला जाणे, मामानी स्वतः अथवा गड्याच्या मार्फत बैलगाडीने घरापर्यंत आणून सोडणे, आज्जी आणि/किंवा मामीने दारातच वाट पाहणे आणि नंतर भाकर तुकडा ओवाळून घरात घेणे हा झाला पहिला अंक.
त्या नंतर सुरु होतो तो प्रचंड कल्पना विलास. गावाकडच्या घरामध्ये दूधदुभत्याची रेलचेल असणे, गोठ्यामध्ये कपिला गाय असणे एकदम मस्ट. सध्या अशा नॉस्टॅल्जिक गोष्टी लिहिणारे किमान साठीच्या घरात असतील. त्यामुळे पहाटेच जात्याची घरघर आणि ओव्यामधून आपली सुटका होते अन्यथा अशा संस्कारी घरामध्ये आपला जन्म झाला नाही याची मला प्रचंड खंत वाटायची. तरीपण चुलाणावर दुधाचे स्वच्छ पितळी पातेले हवेच. आणि त्यातील दूध आज्जी किंवा मामी यांनी प्रेमानेच द्यायला हवे. हे दूध भेसळयुक्त नसल्यामुळे त्याची चव काहीतरी अमृतासारखी असते आणि नंतर उपड्या हाताने आपण मिशा साफ करतो (हि ओळ मुलीपण लिहू शकतात.)
असा हा संपन्न वाडा जिथे असतो तिथे उन्हाळ्यातही भरपूर पाणी असणारा डोह कमीतकमी असावा लागतो. नदी असेल तर वर्णन जास्तच जळाऊ क्षमतेचे होते. तिथे नंतर आपण जाऊन तासंतास डुंबायचे असते. नंतर घरी येऊन सुग्रास जेवण करायचे ज्यामध्ये घरातीलच अढी लावलेल्या आंब्याचा रस, वाफाळता भात वगैरे पदार्थ असतात. जोडीला आज्जीने निगुतीने केलेले लोणचे आणि वाळवण्याचे पदार्थ असतील तर फारच मज्जा (हे ब्राउनी पॉईन्टचे वाक्य आहे.) अजून ब्राउनी पॉईंट्स पाहिजे असतील तर गावाजवळ डोंगरावर करवंदाची जाळी असणे आवश्यक आहे आणि निदान या गोष्टीमध्ये तरी त्याला करवंद न म्हणता रानमेवा म्हणायला पाहिजे.
नंतर येतो तो म्हणजे एक्दम स्टिरिओटाईप प्रकार म्हणजे दुपारचे खेळणे. तेच ते लिंगोरच्या, रप्पा धप्पी वगैरे. असे करता करता सुटी कधी संपते ते कळतच नाही. मग येतो तो जाण्याचा दिवस. पोटात कालवाकालव होणे, आज्जीने तोंडावरून हात फिरवून निरोप देणे आणि पुढच्या सुट्टीची वाट पाहण्यासाठी घराची वाट पकडणे.
यातील बऱ्याच गोष्टी आमच्यासाठी (पन्नास वर्षापूर्वीचे नगर शहर ज्यांना माहिती आहे त्यांना हे समजू शकेल) कल्पनेतदेखील शक्य नव्हते. तरी आमच्या निबंधांमधील सकाळ हि झुंजुमुंजूच असायची आणि आमच्या चित्रात थेट डोंगरावरून वाहत येणारी नदी असायची!
याद्या
7133
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
इतकं उचकून लिहायला काय झाले?
माथेरान/महाबळेश्वरचा/आणि
त्याच गावी मामेभावंडं कशी मजा
लॉल हे असले निबंध लेखक लय
उन्हाळ्यात, दिवाळीत बायकोला
In reply to लॉल हे असले निबंध लेखक लय by एमी
मायबोलीवर अतुल ठाकूर यांचा
In reply to लॉल हे असले निबंध लेखक लय by एमी
मधाळ भाषा आणि ठराविक साच्याचे साहित्य
In reply to मायबोलीवर अतुल ठाकूर यांचा by एमी
व्हाईस वर्सा
हो ना!
नगरमध्ये नदी ... वाचूनच हसू
आणि सध्या ही परिस्थिती आहे -
In reply to नगरमध्ये नदी ... वाचूनच हसू by मनो
हीच आठवण मी विजय तेंडुलकरांनी
In reply to आणि सध्या ही परिस्थिती आहे - by एमी
नळाला मोटार लावण्याअगोदर
In reply to नगरमध्ये नदी ... वाचूनच हसू by मनो
हेहेहेहे
In reply to नगरमध्ये नदी ... वाचूनच हसू by मनो