डायना जेव्हा तिच्या प्रियकरासोबत (दोडी अल फयाद) कार अपघातात वारली, तेव्हा तिच्याबद्दल साऱ्या जगभरात हळहळ व्यक्त झाली होती. एका करारी बेधडक राजस्नुषेचा मृत्यू चटका लावणारा होता. विचार करा, जिच्या साम्राज्यावर कधीही सूर्य मावळत नव्हता अशी ख्याती असलेल्या इंग्लडच्या राणीची सून होणं किती कठीण गोष्ट असेल. राजघरण्याची प्रतिष्ठा सांभाळणं आणि ते टिकवण्यासाठी कित्येक मुखवटे राजघराण्यातील व्यक्तींना चढवावे लागतात. पण आपल्याला जे दिसतं ते सारंच खरं नसतं, अश्याच राजेशाही चेहऱ्यांची करुण कहाणी म्हणजे मीना प्रभूंचं 'मुखवट्यांमागचे चेहरे- डायना आणि चार्ल्स' हे पुस्तक !
पुस्तक सुरू होते ते डायनाच्या माहेरापासून! पुढे युवराज चार्ल्सचं सर्वस्वी वेगळं जग, त्याला पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या, डायनाचा राजवर्तुळात होणारा प्रवेश, यामुळे लग्नापूर्वीची बेधडक डायना लग्नानंतर पूर्णतः बदलून जाते. राजसुनेला पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांचं डायनावर आलेलं दडपण, त्यातून तिची होणारी फरफट, चार्ल्स सोबत वाढत जाणारे ताणतणाव, तरीही चार्ल्सचं तिला सांभाळून घेणं, या सर्वांची हृदयद्रावक कहाणी यात गुंफली आहे. इंगलंड बाहेरच्या मीडियात डायनाबद्दल बरीच कणव आणि चार्ल्स बद्दल राग असला तरी, डायनाचं सर्वस्वी वेगळं रूप यातून आपल्यासमोर उभं राहतं.
मागच्याच आठवड्यात डायनाचा धाकटा मुलगा प्रिन्स हॅरी आणि मेगन यांचा यांना 'आर्ची' नावाचं पुत्ररत्न प्राप्त झालं. सध्या या नव्या सुनेविषयी बरेच प्रवाद आहेत आणि राजघराण्यात सगळंच आलबेल नाहीये असं म्हणतात. इंग्लिश समाज आपल्या रूढी परंपरांविषयी कायमच आग्रही राहिला आहे. असे असतांना डायनाच्या त्या वेळेसच्या वर्तनाने तत्कालीन समाज आणि राजघराण्यावर काय परिणाम झाला असेल, याची किंचितशी कल्पना या पुस्तकातून आपल्याला येते. किंचितशी या करता म्हणतोय कारण हे पुस्तक फार वरवरचं अगदी पेज ३ टाईप वाटत राहतं. विशेषतः दोडी अल फयाद बरोबरचं तिच्या प्रेमप्रकरणाबद्दल, आई म्हणून मुलांसोबतच्या तिच्या नात्याबद्दल फारसं भाष्य केलेलं नाही. मला तरी या पुस्तकातून डायनाचं अंतरंग उलगडलेलं असेल असं वाटलं होतं पण ती अपेक्षा अगदीच धुळीस मिळाली.


वाचने
4136
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
मीना प्रभू देत असलेली माहिती
तै त्यांनी डायनाबद्दलच्या
In reply to मीना प्रभू देत असलेली माहिती by यशोधरा
हो, तेच की.
In reply to तै त्यांनी डायनाबद्दलच्या by महासंग्राम
मला तर बुवा ति बाई
मीना प्रभूंचं प्रवासवर्णना