मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फोटो ओळखा.

खंडेराव · · भटकंती
नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल. उदाहरणार्थ -

वाचने 110893 वाचनखूण प्रतिक्रिया 303

In reply to by प्रचेतस

एस Sun, 05/07/2017 - 08:55
ओह! घनचक्कर पायथ्यापासून जीवधनसारखाच दिसतोय. घनचक्करवर गेलोय पण पायथ्याकडून पाहिला नव्हता. आणि रतनगडाचा खुट्टा फारच मोठा दिसतोय.

In reply to by प्रचेतस

एस Sun, 05/07/2017 - 08:55
ओह! घनचक्कर पायथ्यापासून जीवधनसारखाच दिसतोय. घनचक्करवर गेलोय पण पायथ्याकडून पाहिला नव्हता. आणि रतनगडाचा खुट्टा फारच मोठा दिसतोय.

In reply to by खंडेराव

अभ्या.. Wed, 03/06/2019 - 12:54
हे एक दुमडलेले फिक्क्या निळ्या रंगाचे डॉक्युमेंट आहे. त्यावर हिरवा अर्धगोल आणि एक बारका ढग आहे. डॉक्युमेंट च्याकडेला एक पांढरी तिरकी रेषा आहे. बाहेर एक स्पॉट आहे काळ्या रंगाचा. हे चित्र बहुधा फाईल ओपन हिट नसेल किंवा शेअरिंग नसेल तर येते असे आठवते.

In reply to by गवि

गोरगावलेकर Wed, 03/06/2019 - 13:39
माझाही एक प्रयत्न. मुंबई परिसरात असलेल्या लोकांसाठी एक सोपे ओळखा पाहू चित्र. फोटो दिसतो का दुमडलेले फिकट निळ्या रंगाचे डॉक्युमेंट?

In reply to by प्रचेतस

टर्मीनेटर गुरुवार, 03/07/2019 - 10:57
बरोब्बर! खजुराहो प्रमाणे शृंगार शिल्पे असलेल्या ह्या 'सहस्त्रबाहू' मंदिराच्या नावाचा अपभ्रंश होऊन 'सास-बहु' मंदिर म्हणूनही ओळखले जाते :)

In reply to by असंका

गोरगावलेकर Sat, 03/09/2019 - 10:54
झाडावर पारंब्यांच्या मागे अर्धवट लपलेला बोर्ड वाचण्याचा प्रयत्न केला. निदान परिसर तरी कळाला असता. पण नाही जमले.

चौथा कोनाडा Sun, 03/10/2019 - 20:26
ज्ञा पै आणि प्रचेतस, बरोबर. औंधच्या भवानी म्युझियमचा पायथा आहे हा. सुंदर दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या आहेत. अन हे सभव्य वटवृक्ष, त्याच्या पारंब्या वातावरण सुंदर बनवून टाकतात !