Skip to main content

फोटो ओळखा.

लेखक खंडेराव यांनी गुरुवार, 05/03/2015 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल. उदाहरणार्थ -

वाचने 111073
प्रतिक्रिया 303

प्रतिक्रिया

In reply to by विनोद१८

टर्मिनल ३, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली असू शकते असा अंदाज पाहताक्षणी आला. पण नीट पाहिले असता अधिक खुणा जाणवल्या नाही. त्या विमानतळावरून बरेचदा प्रवास केला असुनही हे शिल्प प्रत्यक्षात आजवर पाहिले नाही. सुर्यनमस्कारावर आधारित शिल्प खरंच कल्पक वाटत आहे.

In reply to by यसवायजी

विनोद १८ यांनी अंदाज व्यक्त केल्यामुळे मी माझा अंदाज जोडला. आत्मविश्वासपूर्ण उत्तर नव्हते. आता बहुतांश फ्लाईट्स टर्मिनल ३ वरूनच असतात. जुन्या डोमेस्टिक टर्मिनलवरून काही बजेट एअरलाइन्सच्या फ्लाईट्स सुटतात. २००९ मध्ये जेव्हा टर्मिनल ३ चे उद्घाटन झाले होते तेव्हा जगातली सर्वात लांबलचक सलग इमारत म्हणून विक्रम झाल्याचे वाचले होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

यस्स. इतरही बर्याच कलाकृती मस्त आहेत. हत्ती, योगा वगैरे. फोटो चुकून डिलीट झाले. आणि परत दिल्लीचा योग आला नाहीए.

लगेच बरोबर उत्तर मिळेल हा विश्वास वाटतो. Guess

In reply to by प्रचेतस

पण उत्तरानंतरच्या '?' मुळे जरा हिरमोड झाला :-) .

In reply to by श्रीरंग_जोशी

अगदी किंचित राजगडाचीही शंका होती. राजगडावर पण दारूचे कोठार वनविभाग अशी पाटी पाहिल्याचे पुसटसे आठवत होते.

In reply to by प्रचेतस

दारूचे कोठार ऐवजी मी दारुगोळ्याचे कोठार असा शब्दप्रयोग केला असता. दारु म्हंटलं की मद्याखेरीज दुसरे काही वाचणार्‍याचा मनात येईल असे वाटत नाही ;-) .

In reply to by विनोद१८

शंकराचार्य मंदिर, श्रीनगर. तीन वर्षांपूर्वी गेलोय पण फोटो लांबचा असल्याने खात्री वाटत नव्हती.

Highway Varun disate. Aurangabad kiva nasik jawal?

In reply to by खंडेराव

हायवेवरूनच दिसतं पण औरंगाबाद किंवा नाशिकचा काहीच संबंध नाही.

In reply to by कपिलमुनी

हे बांधकाम वर्षानुवर्षांपासून तसंच अर्धवट आहे. हा फोटो मी आठ वर्षांपूर्वी काढलाय. कुणाला ठाऊक आहे का की हे असे अर्धवट का राहिले?

In reply to by श्रीरंग_जोशी

चांदबिबीचा महाल वाटला मला.

का राहीले हे बांधकाम अर्धवट

जुन्या मंदिराला पिवळा रंग देत आहेत का?

In reply to by श्रीरंग_जोशी

मी जालावर शोध घेऊन या फोटोचं ठिकाण ओळखलं आहे. पण जी मंडळी प्रत्यक्ष भेट देऊन आलेली आहे त्यांची संधी हिरावली जाऊ नये असे वाटते. अवांतर: फोटो प्रकाशित करताना घ्यायची काळजी
  • फोटोचा दुवा त्यावर राइट क्लिक करून 'कॉपी इमेज युआरएल' या पर्यायाद्वारे हमखास मिळतो (क्रोम ब्राउझर). JPEG फॉरमॅट मध्ये बहुतांश फोटोज असल्याने दुव्याचा शेवट '.jpg' ने होतो.
  • आपला फोटो पब्लिकली शेअर्ड आहे की नाही हे तपासण्यासाठी जिथे अपलोड केला आहे (उदा. पिकासा, फ्लिकर इत्यादी) तेथून लॉग आउट करून त्या फोटोच्या दुव्याद्वारे तो फोटो दिसतोय की नाही हे बघावे.

In reply to by श्रीरंग_जोशी

मी ही प्रोसेस करतो. १) फोटो imgur वर अपलोड केला. २) मिळालेल्या ६ लिंक मधुन HTML लिंक कॉपी केली. ३) मिसळपाव मधे अपलोड फोटोला गेलो. ४) ती लिंक पेस्ट केली. ५) आकार ६४० * ६४० टाकला. ६) नाव अंदाजे दिले. यात, कधी फोटो दिसतात, कधी नाही. खाली एक फोटो टाकला आहे. काही चुका आहेत का वरच्या प्रोसेस मधे? काही बदल केला पाहिजे? Photo

In reply to by खंडेराव

मिळालेल्या ६ लिंक मधुन HTML लिंक कॉपी केली.
संपूर्ण लिंक इथे फोटोसाठी वापरल्याने घोळ होतोय. या फोटोचा प्रत्यक्ष दुवा केवळ एवढाच आहे - http://i.imgur.com/605Yk1x.jpg याखेरीज इतर काही असले की समस्या येणारच. केवळ रुंदी ६४० टाकणे अपेक्षित आहे. मुळ प्रतिच्या लांबी-रुंदीच्या गुणोत्तरानुसार लांबी आपोआप सेट केली जाते. धाग्यावर थेट प्रतिसाद टाकताना कमाल रुंदी ६४० असावी. नाहीतर चित्र सीमारेषेच्या बाहेर जाते. उपप्रतिसादात तर अधिकच कमी असावी. मिपाच्या पूर्वपरिक्षणात फोटो दिसत असल्याखेरीज तो प्रकाशित करू नये.

In reply to by खंडेराव

कुठे आहे ते माहीत नाही पण ही देवळ बघुन यांची आठवण झाली Matroshka फोटु अंजावरुन साभार पैजारबुवा,

In reply to by कपिलमुनी

धाम जागेश्वर, उत्तरांखंड. बरीच मंदिरे आहेत तिथे अशी, रशियन बाहुल्यांसारखी वेगवेगळ्या आकाराची.

आपल्या पैकी काही लोक रोज या इमारतीसमोरून जात असतील... Guess

In reply to by प्रचेतस

नाणेघाट, जीवधन, दाऱ्या घाट, ढाकोबा शिखर, दुर्ग टेकडी, आहुपे घाट, मच्छिंद्रगड. खालच्या टोकावडे किंवा पाने गावातून घेतलेला पॅनोरमा आहे. यात डावीकडील नानाचा अंगठा दिसत नाहीये बहुतेक.

In reply to by एस

शेंडी गावच्या पुढे मुतखेल गावच्या पुढून हे छायाचित्र घेतले आहे. डावीकडे आणि समोर घनचक्करची रांग आणि सर्वात उजवीकडे रतनगड. त्याचा खुट्टा उठून दिसतोय.

In reply to by प्रचेतस

ओह! घनचक्कर पायथ्यापासून जीवधनसारखाच दिसतोय. घनचक्करवर गेलोय पण पायथ्याकडून पाहिला नव्हता. आणि रतनगडाचा खुट्टा फारच मोठा दिसतोय.

In reply to by प्रचेतस

ओह! घनचक्कर पायथ्यापासून जीवधनसारखाच दिसतोय. घनचक्करवर गेलोय पण पायथ्याकडून पाहिला नव्हता. आणि रतनगडाचा खुट्टा फारच मोठा दिसतोय.

In reply to by खंडेराव

हे एक दुमडलेले फिक्क्या निळ्या रंगाचे डॉक्युमेंट आहे. त्यावर हिरवा अर्धगोल आणि एक बारका ढग आहे. डॉक्युमेंट च्याकडेला एक पांढरी तिरकी रेषा आहे. बाहेर एक स्पॉट आहे काळ्या रंगाचा. हे चित्र बहुधा फाईल ओपन हिट नसेल किंवा शेअरिंग नसेल तर येते असे आठवते.

In reply to by गवि

माझाही एक प्रयत्न. मुंबई परिसरात असलेल्या लोकांसाठी एक सोपे ओळखा पाहू चित्र. फोटो दिसतो का दुमडलेले फिकट निळ्या रंगाचे डॉक्युमेंट?