Skip to main content

कट्टा

लेखक वरुण मोहिते यांनी शनिवार, 20/04/2019 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांना. खूप दिवस भेट झाली नाही. तर ह्या वेळी एक कट्टा करण्याचे ठरवले आहे. पुणे आणि मुंबई साठी मध्यवर्ती कर्जत बरे पडेल असे वाटते. माझ्या घरी. व्हेज - नॉनव्हेज पर्याय आहेतच. व्हेज जेवणासाठी फक्त मेनू सांगावा. नॉनव्हेज चे पर्याय माझ्याकडे आहेतच. जवळपास भटकता पण येईल. मोरबे धरण, एन डी स्टुडियो इत्यादी. अष्टविनायक चा बाप्पा पण 10 किलोमीटर वर आहे. बाकी ड्रिंक असेल तर खर्च ज्याचा त्याचा. घरची लोकेशन पाठवीन. बाबा डेरी पासून 1 मिनिटं वर. संपर्क करा. होऊन जाऊदे कट्टा एक. कुटुंबासाहित आलात तरी उत्तम. 25 किंवा 26 मे ला करायचा आहे. सूचनांसाठी धन्यवाद. बदल केला जाईल. भेटूया मग.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 17256
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

पार्थदादांचा विजय साजरा करण्याची पूर्ण तयारी झाली आहे असं दिसतंय येण्याचा नक्की प्रयत्न करेन

अरे व्वा, छान. भटकंती, खादाडी आणि फोटू सहित कट्टा वृत्तांत आलाच पायजेले. कट्टा आयोजक, लीला सह सहलीला जाऊ म्हणत येणारे कौटुंबिक (अँड अदर्वाइज अल्सो) मिपाकर्स, सडाफटिंग / बॅचलर् मिपाकर्स, बाळ गोपाळ चमू आणि केवळ वृत्तांत वाचून कट्टयाची मज्जा घेऊ असे म्हणणारे माझ्या सारखे इतर मिपाकर्स या सर्वांना कट्ट्यासाठी शुभेच्छा ! हे कट्ट्याचे आवताण एका मुंबईकराकडून आले असल्याने कट्टा पूर्णत्वाला न्यायला हा फक्त एक धागा पुरेसा होईल असे वाटते आहे :)

In reply to by कंजूस

पुण्याकडचे कट्टे हिट्ट होतात कि नाही माहित नाही (कारण कधी अटेंड केला नाहीय्ये) परंतु कट्टा धागे हिट्ट झालेले बघितले आहेत ते पण एका कट्ट्यासाठी एकाधिक धागे :) एक धागा एक कट्टा हा आहे पुण्याला बट्टा

'बाबा डेरी पासून 1 मिनिटं वर' हीच का ती जागा? २-३ वेळा येथून जाणे येणे झाले आहे. कट्ट्याला येणे बहुतेक जमणार नाही.

हां, हेच म्हणणार होतो. जरा अगोदर? २७ -२८ एप्रिलला नको. एसटीचे लाल डबे इलेक्शन ड्युटीला नेतील, बंद असतील.

In reply to by mayu4u

शनिवार असेल आणि तुम्ही असाल तर मी आहेच .. फक्त एक बारीकशी अडचण आहे. माझ्या गावावरून कर्जतला एस टी बस नाही ;)

सहकुटुंब कट्टा आहे की फक्त एकेकटे मिपाकर....कुटुंब बरोबर असल्यास ड्रिंकचा उल्लेख अस्थानी वाटला.... एक दिवस की रात्र कट्टा ?

सहकुटुंब चालेल. ड्रिंक असेल नसेल तरी काही हरकत नाही. डिटेल्स टाकतो काही दिवसात

In reply to by वरुण मोहिते

वाट बघत आहे... व्हॉटस अप वर मेसेज दिलात तरी चालेल.

९ मे नंतर या धाग्यावर काहिच नविन माहिती आली नाही आहे. या विकांताला आधी ठरलेला कट्टा रद्द झाला किंवा पुढे ढकलला गेला आहे का?

आज किंवा उद्या असेल ना कट्टा? कट्ट्यासाठी शुभेच्छा. सविस्तर वर्णन आणि फोटोंची प्रतीक्षा आहे.

आजचा कट्टा फायनल केलाच नव्हता. कुठे यायचे, नकाशा वगैरे. साधारणपणे थंडी /पावसातले कट्टे जमतात.

खूप थकलोय निवडणूक मुळे आणि दुसरी गोष्ट तात्या गेल्यावर मला लगेच कट्टा नाही आवडणार काही दिवसांनी पावसाळ्यात करू

मला या विकांताला आणखी एका ठिकाणी बाहेर जायचे होते. डोंबिवलीमध्ये रहात असल्यामुळे नवी मुंबई किंवा पुण्यापेक्षा रेल्वेने कर्जतला जाणे सोपे पडते. गेल्या दोन तीन वर्षात एकाही मिपा कट्ट्याला हजेरी लावायला न जमल्यामुळे निदान यावेळी तरी मिपा कट्टा चुकवायचा नाही असे मी आधीच ठरवले होते. ९ मे नंतर या धाग्यावर काहिच नविन माहिती आली नसल्यामुळे कदाचित हा कट्टा रद्द झाला किंवा पुढे ढकलला गेला आहे याची अगोदरच शंका आली होती. पण तरीही एकदा खात्री करुन घेतली. पावसाळ्यात मिपा कट्टा करायला नक्की आवडेल.

तीन वर्षांपूर्वी जुलैच्या पहिल्या आठवड्यात बोका ए आझम, अजया ताई, टकाश्री, मूवी यांनी वाशी, नवी मुंबई येथे कट्ट्याचे अतिशय चांगले आयोजन केले होते. (दुर्दैवाने बोकाभाऊ आज आपल्यात नाहीत.) कट्ट्याची जागा निश्चित करण्यानिमित्त माझे पती 'विपा', मी व माझी लेक कट्ट्यास हजर होतो. त्याच जागी परत कट्टा करण्यास उत्सुक असाल आणि कट्ट्याच्या आयोजनासाठी कोणी पुढे येत असेल तर आम्हा दोघांकडून संपूर्ण सहकार्य असेल. नवीन वाचकांसाठी 2016 ला झालेल्या कट्ट्याबद्दलच्या लिंक खाली देत आहे. http://www.misalpav.com/node/36460 http://www.misalpav.com/node/36559

In reply to by गोरगावलेकर

बिझी असल्याने, कट्टा नामक (हव्या-हव्याशा) व्यसना पासून दूरच रहावे लागत आहे.

तात्याच्या एक्झिटने रहित केलेला हा कट्टा आता होणे नाही . . . वमोपा मजा करा असाल तेथे