Skip to main content

मदत -मिपावर फोटो चिकटवणे.

लेखक गणपा यांनी बुधवार, 04/08/2010 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
नविन सदस्यांना बरेच वेळा भेडसावणारा प्रश्न म्हणजे फोटो (प्रकाशचित्रं ) कसा टाकावा. संपादक मंडळ बरेच वेळा मदत करते, आणि वाविप्र मध्ये ही याचा उलगडा केलाय. पण प्रत्येला का ते वाचुन जमतच असं नाही. जे आपण पहातो ते ऐकण्या पेक्षा जास्त चांगल लक्षात रहात, हा माझा स्वानुभव असल्याने या धाग्यात टप्या टप्याने फोटो कसा टाकावा ते सांगत आहे. गरजुंना याचा लाभ होईल अशी आशा करतो. पायरी १. प्रथम पिकासा/फ्लिकर वा तत्सम फोटो चढवण्याची सोय असलेल्या साईटवर आपल्याला हवा असलेला फोटो चढवावा. येथे पिकासाचे उदाहरण देत आहे. Upload वर क्लिकावे. पायरी २. हवा तो अल्बम निवडुन Browse या बटणावर क्लिकावे. तुमच्या संगणाकावरुन हवातो फोटो निवडावा. Start Upload क्लिकावे. पायरी ३. फोटो चढवुन झाल्यावर. त्याच फोटोवर क्लिकावे. पायरी ४. फोटो मोठा दिसायला लागल्यावर, त्यावर माउसचे उजवे बटण क्लिकुन आणि Properties वर क्लिकावे. पायरी ७. ५ URL चा पत्ता कॉपी करावा. पायरी ६. मिपावर येऊन प्रतिसादाच्या Insert/ edit Image या बटणावर क्लिकुन तेथे URL चा पत्ता पेस्टवावा. हवी असलेली साईझ द्यावी. पायरी ७. पुर्वपरिक्षण करुन प्रकाशित करावे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 172067
प्रतिक्रिया 191

प्रतिक्रिया

फोटोंचा पब्लिक अ‍ॅक्सेस काढला >>> हे असे ते लोक मुद्दाम करतात का ?

माझेही लेखातले काही फोटो आता दिसत नाहीत. याची कारणे - १) फोटो चढवलेली साइट बंद झाली. २) फेसबुक पोस्ट म्हणून फोटो टाकलेला, त्याची लिंक नंतर उडते. ३) फोटो टाकतेवेळी साइट फ्री होती पण आता पेड केली आहे व फ्रीसाइटची शेअरिंग लिंक चालणार नाही असे कळवले आहे. पण लिंलिवाचक उघडून फोटो पाहू शकतात. ४) सध्या गुगल_फोटो वापरत आहे परंतू अगोदर त्यांचे गुगल_प्लस होते, आणि या अगोदर पिकासा होते ते गुगलने बंद करून टाकले. त्यातले फोटो परत डाउनलोड करून गुगल_फोटोजवरून टाकणे गरजेचे होते. ५)फ्लिकर - यावर टाकलेल्या फोटोंचे भवितव्य सांगता येत नाही . फ्लिकर आता याहूकडे नाही, स्मगमग नावाच्या कंपनीने घेऊन त्यातले फ्री स्टोरिज १५ जीबीवरून १००० अपलोडस केले आहे.

In reply to by कंजूस

४) सध्या गुगल_फोटो वापरत आहे परंतू अगोदर त्यांचे गुगल_प्लस होते, आणि या अगोदर पिकासा होते ते गुगलने बंद करून टाकले. त्यातले फोटो परत डाउनलोड करून गुगल_फोटोजवरून टाकणे गरजेचे होते. गुगलचे "गुगल+" मोड्युल (त्याच्या सुरक्षाप्रणालीत तृटी असल्याने) बंद झाले आहे, पण "गुगल फोटो" मोड्युल उत्तम रित्या चालू आहे, त्याला समस्या नाही. "गुगल+" मोड्युल बंद झाल्यामुळे... १. (गुगल+ च्या मार्गे वापरली जाणारी) गृप्स बनवून, त्याच्यातील एक किंवा अनेक गृप्सबरोबर, एकाच वेळी, फोटो/अल्बम, शेअर/अनशेअर करण्याची सोय गेली आहे. म्हणून आता... २. अनशेअर्ड फोटो, दर वेळेस, एक किंवा अनेक काँन्टॅअक्टचे नाव/इमेल अ‍ॅड्रेस निवडून शेअर करता येतो, पण गृपशेअरचा सुगमपणा गायब आहे. ३. अल्बम बनवतानाच तो "पब्लिकली शेअर्ड" आहे की नाही हे ठरवावे लागते, व नंतर तो पर्याय बदलता येत नाही. ४. मिपासाठी सोपी युक्ती : अ) एक शेअर्ड अल्बम बनवा (जो आपोआप पब्लिकली शेअर्ड असतो) --> मिपावर टाकण्याचे सर्व फोटो त्यात अ‍ॅड करा --> तेथून मिळालेले इमेज अ‍ॅड्रेसेस मिपावर फोटो टाकण्यास वापरा. आ) मिपावर टाकलेल्या फोटोंची संख्या मर्यादीत असल्यास असा एकच अल्बम पुरेसा होईल. अन्यथा, एका/अनेक धाग्यामागे प्रत्येकी एक असे अनेक स्वतंत्र अल्बम बनवा. महत्वाचे : गुगल फोटोवर साठवलेल्या फोटोंसाठी, "ओरिजिनल रेझॉलुशन" ऐवजी "हाय रेझॉल्युशन" हा पर्याय स्विकारल्यास, त्यांनी व्यापलेली जागा तुमच्या १५ जिबी स्टोरेज लिमिटमध्ये धरली जात नाही... म्हणजेच, अमर्याद संखेने फोटो 'चकटफू' साठवता येतात ! "हाय रेझॉल्युशन" साठवणीतील फोटोंचे A४ साईझमध्येही उत्तम प्रिंट मिळतात, म्हणजे सर्वसाधारण उपयोगाला हा उत्तम पर्याय आहे. (व्यावसायिकरित्या फार मोठ्या रिझॉल्युशनमध्ये घेतलेले फोटो असल्यास, रुपये खर्चून गुगलवर जागा विकत घेऊन, "ओरिजिनल रेझॉलुशन"मध्येच साठवणे जास्त योग्य होईल.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद, डॉ सुहास म्हात्रेसाहेब, मलाही मिपावर फोटोज चदहावताना खूप अडचणी येत होत्या. आपण वेळोवेळी दिलेल्या टिप्समुळे फोटो चढवणे शक्य झाले. आपल्या मदतीकरिता मनापासून धन्यवाद ! - चौथा कोनाडा

फ्री साइट पेड होणे -
३) फोटो टाकतेवेळी साइट फ्री होती पण आता पेड केली आहे
हे 'फोटोबकेट' या साइटबद्दल आहे.

मीसुद्धा वरती एक प्रश्न केला आहे. (माझा प्रोफाइल फोटो धुरकट दिसत असल्याबद्दल) कृपया त्याचेही कोणीतरी निरसन केल्यास मी त्यांचा आभारी राहीन.

मूळ फोटोच धुरकट दिसतोय (ओव्हर लाईट झाला आहे, किंवा फोटोग्राफी इफेक्ट दिला आहे) खाली साईझ कमी करून टाकून पाहिलाय, पण धुरकटच दिसतोय. SKphoto

१) मिपाचे डेटाबेस रिफ्रेश/ तांत्रिक कामासाठी बंद ठेवून चालू केल्यावर डिपी फोटो उडतो असा अनुभव आहे. फोटो पुन्हा टाकावा लागतो. मुठीचा फोटो हा डिफॅाल्ट केला आहे ते फीचर ड्राप करणे नवीन फोटो 'सेट अॅज डिफॅाल्ट' टाकल्यास हा प्रश्न सुटेल असं वाटतं. २) मेमरीतले फोटो २-६ एमबीचे असतात त्याला ५६ गुणिले ५६ केबी करताना फोटो धुसर होतो.

In reply to by सतीशम२७

तुम्ही फोटोची प्रायव्हसी सेटिंग ओन्ली मी ठेवली असेल त्यामुळे कदाचित दिसणार नाही. गुगल ला शेयरिन्ग पब्लिक केल तरच फोटो दिसतात

तुमची फोटोची लिंक ऍड्रेसबारमधे चिकटवल्यावर चित्र दिसतंय.

In reply to by शाम भागवत

माझ्या लेखातले फोटोसुद्धा मला माझ्या मोठा फोनवर आणि लॅपटॉपवर दिसत होते, पण छोट्या स्मार्टफोन वर दिसत नव्हते. दिलेले रिसोल्युशन आणि कमांड मधले रिसोल्युशन जुळत नसावे. -(यातलं काहीही न समजणारा) डॅनी.

तुम्ही जी लिंक दिली आहे
https://photos.app.goo.gl/HPWtmGRW23vp3tNN8
ती या https://app.bytenbit.com/ साइटवर टाकून नवीन लिंक मिळवली.


https://lh3.googleusercontent.com/ZPVD8lYq-QyhUlhA_xaMXCqlAGnQE3d4PRqa3ROgiZ47INSl8ACU1c-hduti_HVqQNpPnempgT5ZjOJZ5aZ3sxxfQNg7KK9gTuAGWj0M0Ze9rdCoqVAlnedJo9t604iAIIevIbz6qQ
ती वापरली. शिवाय १) लेखात इमेज ट्यागला width दिलेली नाही. २) Picasa बंद झालं आहे,

हा मदतीचा धागा २०१० पासून म्हणजे जवळजवळ ११ वर्षे चालू आहे आणि तरीही सदस्यांना फोटो अपलोड करणे जमत नाही हे मिपाचे तांत्रिक अपयश म्हणावे काय ? एखादी साधी सोपी पद्धत शोधता येईल काय ?

In reply to by धर्मराजमुटके

या व आजवर इतर अनेक धाग्यांमधे हे सर्व सोपं करुन सांगितलं गेलंय. पब्लिक अ‍ॅक्सेस देऊन फोटो जालावर (फोटो शेअरींग साइट्स) प्रकाशित करणे व त्याचा दुवा मिपावर वापरण्यापूर्वी चालतोय की नाही तपासणे (त्या साईट्वर लॉग आउट करुन) या दोन बाबींची काळजी घ्यायला अनेकांना जमत नाही असे निरीक्षण आहे.

=))

मिसळपाव साईटवर फोटो देणे - जुलै २०२१

http://www.misalpav.com/node/48991

______________________________________________________________________________________________________________ Flickr या साईटवरून शेअर केलेले GIF चित्र चिटकवण्याचा प्रयत्न केल, पण फक्त पहिलेच चित्र दिसत होते, (काय इश्श्यू ते कळाले नाही, की फ्लिकर मधून असेच होते ?) म्हणून कंजूस सरांच्या वरील लिंकच्या मदतीने GIF फाइल Google Photo मधून शेअर करून चिटकावली, आता GIF मधली सर्व चित्रे दिसतात ! astr453df धन्यवाद कंजूस सर !

In reply to by चौथा कोनाडा

Flickr चे नियम बदली झाले आहेत. शिवाय शेअरिंग लिंकमधील योग्य भाग काढून वापरल्यास काम होते.

तुमचे जीमेल स्टोरेज काउंटिंग होते. त्यामुळे कमी वापरावे. त्याऐवजी फोटो स्लाइडशो करून यूट्यूबवर टाका. तिथे अनलिमिटेड स्टोरेज आहे. एक स्लाइडशो app Shortcut बरे आहे. करून पाहा. फक्त वाटरमार्क फ्री वर्शनला येत राहतो. चालेल. फ्लिकरने फ्री अकाउंटला फक्त हजार फोटो मर्यादा ठेवली आहे. तेही बादच आहे.

मिपावर देता येते. Flickr वरील ही gif file द्यायची असेल तर त्याखालच्या भागात ↓ डाऊनलोड चिन्हावर क्लिक करा. अशी खिडकी उघडेल. त्यातल्या ओरिजिनल साइझ वर राइट क्लिक करा. आणि ती लिंक कॉपी करा. ही लिंक साधारण अशी असेल. https:/&#47live.staticflickr.com/65535/49578161276_5389c2ea21_o_d&#46gif आता ही वरील लिंक img टॅग मधे अशी बंदिस्त करा <img src="https:/&#47live.staticflickr.com/65535/49578161276_5389c2ea21_o_d&#46gif"> बस्स.ही वरची img टॅग लावलेली लिंक मिपावर पेस्टवा.GIF दिसू लागेल. .

In reply to by सुमो

जीआयएफ चित्रे पायरी-पायरीने कशी जोडायची हे समजावून सांगितल्याबद्दल खुप खुप धन्यवाद, सुमो ! इथं जोडून पाहिलेलं आहे : dp12wedrfm007 थोडं ट्रिकी आहे हे कारण डाऊनलोड केल्यानंतर लिंक थेट मिळाली नाही "शो ऑल" क्लिकल्यावर दिसली (क्रोम/डाऊनलोडस् मध्ये) आणि गंमत म्हणजे ती लिंक ब्राऊझरमध्ये चिटकावल्या नंतर तिथं चित्र दिसतच नाही. पण इथे एम्बेड केल्यावर मात्र दिसते ! https://live.staticflickr.com/65535/52326522014_65b7b4b234_o_d.gif थॅन्क्स सुमो !

In reply to by चौथा कोनाडा

गंमत म्हणजे ती लिंक ब्राऊझरमध्ये चिटकावल्या नंतर तिथं चित्र दिसतच नाही.
हो कारण ती डायरेक्ट डाउनलोड लिंक आहे. ब्राउझर मधे बघायची असेल तर थोडीशी बदलावी लागते. शेवटचं _d काढून टाकायचं म्हणजे ती लिंक अशी होईल. https://live.staticflickr.com/65535/52326522014_65b7b4b234_o.gif आता ही लिंक ब्राउझर मधे दिसेल. आपल्याला एंबेडच करायचं असल्यामुळे ही लिंक बदलाबदली करायचं सुचवलं नव्हतं आधीच्या पोस्ट मधे. अजून एक सुचवतो. तुमच्या वरील पोस्टमधे तुम्ही हाईट ॲट्रीब्युट ४०० दिला आहे एंबेड करताना. मोबाईल वर मिपा बघणाऱ्या सदस्यांना इमेज अशी दिसते. म्हणून img टॅग मधे इमेज देताना हाइट आणि विड्थ दोन्ही ॲट्रीब्युट्स देऊ नयेत. मिपा दोन्ही ॲडजस्ट करून घेतं. ह्या खाली दिलेल्या gif ला मी दोन्हीही दिलेले नाहीत. मोबाईल आणि पीसी/लॅपटॉप दोन्हीवर व्यवस्थित दिसतं.

In reply to by सुमो

धन्यवाद, सुमो !
शेवटचं _d काढून टाकायचं म्हणजे ती लिंक अशी होईल.
चेक करतो, म्हणजे पुढच्या वेळी या माहितीचा उपयोग होईल ! आणि हाईट ॲट्रीब्युटचं लक्षात आलं नव्हतं माझ्या ( मी मोबाईलव्र मिपा क्वचित पहात असल्यामुळे आलं नसावं) तुम्ही खोचलेलं जीआयएफ मोबाईलवर सुद्धा व्यवस्थित प्रमाणबद्ध दिसत आहे मी खोचलेलं मात्र प्रचंड उभट. पुढच्या वेळी याची काळजी घेईन. सुमो, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद !

साधारण ०.२५ सेकंदात फोटो बदलत असल्याने, फोटो "पाहाणं" दूर, "दिसत"सुद्धा नाहीत.

In reply to by तुषार काळभोर

सॉरी, तुषार भाऊ. पुढच्या वेळेपासून GIF ऐवजी व्हिडिओ करून यू ट्यूब वरून शेअर करत जाईन, कंजूस साहेबांनी मार्गदर्शन केल्यानुसार.

प्रथम शेअरिंग झाले पाहिजे. लिंक काढून फोटो आला नाही तर नंतर शेअरिंग केले तरीही ती अगोदरची लिंक फोटो देणार नाही. नवीन लिंक काढावी लागेल.

In reply to by कंजूस

बरोबर कंजूस सर. सभासदांची शेअरिंग करताना गडबड होते... आणि शेअरिंग नीट झाले आहे की नाही हे लॉग आऊट करून खात्री करून घेणे गरजेचे असते... ते ही केले जात नाही घाईत, त्यामुळे प्रचि दिसत नाहीत आणि गोंधळून जायला होते. वेळ देऊन आणि शांतपणे करण्याचे हे काम आहे.

मी गूगल फोटोसाठी जे जीमेल अकाऊंट वापरतो ते मोबाईलच्या सेंटिंग्ज/सेटपमध्ये लावलेल्या जीमेल पेक्षा निराळे आहे. त्यामुळे दुसऱ्या ब्राऊझरमध्ये लिंक अड्रेसबारमध्ये टाकून फोटो आला नाही की मला समजते की शेअरिंग बरोबर झालेले नाही.