चालू घडामोडी - एप्रिल २०१९

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in काथ्याकूट
3 Apr 2019 - 11:24 am
गाभा: 

India gets custody of 2017 CRPF camp attack plotter from UAE

परदेशातून, विशेषतः युएईमधून, अतिरेकी व आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्याची प्रक्रिया जोरात चालू आहे. जेश ए मोहम्मद ता अतिरेकी संघटनेतील, निसार तांत्रे या एका महत्वाच्या अतिरेक्याला भारतात परत आणले गेले आहे. डिसेंबर २०१७ मध्ये जम्मूकाश्मीरमधील लेथपोरा येथील CRPF कँपवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा हा मुख्य सूत्रधार होता. त्या हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले होते आणि तीन अतिरेक्यांचा खातमा झाला होता.

प्रतिक्रिया

डँबिस००७'s picture

11 Apr 2019 - 1:10 pm | डँबिस००७

काय बिरुटे सा,

प्रा डॉ दोन्ही ड्रॉप केलेत ? अवार्ड वापसी ??

बाकी गेट वेल सुन बर का !!

ढब्ब्या's picture

11 Apr 2019 - 7:15 pm | ढब्ब्या

खरे तर ही विज्ञानाच्या द्रुश्तीने खुपच मोठी बातमी आहे, पण कदाचीत राजकीय धुराळ्यात आप्ल्याकडे दुर्लक्शीत राहील.

https://www.bbc.com/news/science-environment-47873592

ह्या लिंक वर बरेच डिटेल्स मिळतील, जसे डेटा कसा गोळा केला, एकत्र केला, आणी किती वेळ लागला

====
No single telescope is powerful enough to image the black hole. So, in the biggest experiment of its kind, Prof Sheperd Doeleman of the Harvard-Smithsonian Centre for Astrophysics led a project to set up a network of eight linked telescopes. Together, they form the Event Horizon Telescope and can be thought of as a planet-sized array of dishes.
====

म्हणजे ते ब्लॅकहोल पाच कोटी वर्षांपूर्वीचे आहे, आपल्याला आत्ता दिसतेय, बरोबर ना?
मग आत्ता काय स्थिती असेल तिथे?

सुबोध खरे's picture

11 Apr 2019 - 8:07 pm | सुबोध खरे

थोडं थांबा ( फक्त ५ कोटी वर्षे ) म्हणजे दिसेलच कि

बबन ताम्बे's picture

12 Apr 2019 - 3:51 pm | बबन ताम्बे

सुबोधरित्या खरे सांगीतले डॉ.
:-)

डँबिस००७'s picture

11 Apr 2019 - 1:42 pm | डँबिस००७

907 artists with bjp: ९०७हून अधिक कलाकार भाजपच्या बाजूने!!

महाराष्ट्र
मुंबई
ठाणे
पुणे
कोल्हापूर
अहमदनगर
नाशिक
जळगाव
नागपूर
औरंगाबाद
Hi Rams Fze
लॉग-आउट

महाराष्ट्र
लोकसभा निवडणूक
IPL
देश
फोटो धम्माल
थोडक्यात बातमी
विदेश
अर्थ
क्रीडा
संपादकीय
सिनेमॅजिक
करिअर
लाइफस्टाइल
इन्फोटेक
भविष्य
हसा लेको
लाइव टीव्ही
इतर
व्हिडिओ
निवडणूक
फोटोगॅलरी
इन्फोग्राफिक्स
सिटीझन रिपोर्टर
कार-बाइक
स्पेशल कवरेज
पर्यटन
पर्यावरण

ब्रेकिंग न्यूज़
जम्मू-काश्मीरमध्ये मतदानासाठी लांबलचक रांगा; लोकसभा निवडणुकीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा
लोकसभा निवडणुकीनिमित्त गुगलचं खास डुडल
Live TV
पाहा
907 artists with bjp: ९०७हून अधिक कलाकार भाजपच्या बाजूने
MT | Updated: 11 Apr 2019, 11:25 AM
नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, कोंकणा सेन शर्मा, लिलीएट दुबे, अनुराग कश्यप, अमोल पालेकर आदींसह सुमारे ६०० कलाकारांनी 'या निवडणुकीत भाजपला मतदान करू नये', असे आवाहन केल्यानंतर आता भाजपच्या बाजूनेही काही नामवंत कलाकारांसह ९०७ मान्यवर उभे राहिले आहेत.

maharashtra times
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, कोंकणा सेन शर्मा, लिलीएट दुबे, अनुराग कश्यप, अमोल पालेकर आदींसह सुमारे ६०० कलाकारांनी 'या निवडणुकीत भाजपला मतदान करू नये', असे आवाहन केल्यानंतर आता भाजपच्या बाजूनेही काही नामवंत कलाकारांसह ९०७ मान्यवर उभे राहिले आहेत. 'देश भ्रष्टाचारमुक्त करणारे, शेतकऱ्यांचे कल्याण करणारे व विश्वात देशाची प्रतिष्ठा वाढवणारे सरकार गेल्या पाच वर्षांत आम्ही पाहिले आहे. त्यामुळे भाजपलाच मतदान करावे', असे आवाहन पं. जसराज, शंकर महादेवन, राम सुतार, अर्जुन डांगळे, वामन केंद्रे आदींनी मतदारांना केले आहे.

ट्रम्प's picture

11 Apr 2019 - 6:40 pm | ट्रम्प

हे अगदी उत्तम झाले !!
प्रतिक्रिया उमटने गरजे चे होते !!!

लाभार्थींनी खाल्ल्या मिठाला जागू नये का?

शाम भागवत's picture

11 Apr 2019 - 4:43 pm | शाम भागवत

रात्री जागायला हरकत नाही. घेऊदे की कोणाचीही बाजू.
पण दिवसा खरं बोलायला काय हरकत आहे?
:)
मलाही तुमच्यामुळे विनोद सुचायला लागले आहेत.
:)

प्रसाद_१९८२'s picture

13 Apr 2019 - 10:29 am | प्रसाद_१९८२

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोणासाठी मत मागत फिरतायत ? त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीला उभा नाही मग ते नक्की प्रचार कोणासाठी करत आहेत हा प्रश्नच आहे.

बाप्पू's picture

13 Apr 2019 - 2:27 pm | बाप्पू

राज ठाकरे.. आता he नाव ऐकले तरी डोक्यात भडका होतो.
हाच राज ठाकरे अगदी काही महिन्यापूर्वी शरद पवार , राहुल गांधी (खान ), अजित पवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ यांच्यावर उघड उघड टीका करायचा. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पाढे वाचायचा.. तोंड वेडेवाकडे करून नकला करायचा.
त्याच्या सडेतोड भूमिकेला बघून अगदी बाळासाहेब ठाकरे यांची आठवण यायची.

पण गेल्या 3-4 महिन्यात याच राज ठाकरे ने जो काही U टर्न घेतलाय तो फक्त स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आहे हे कोणीही सांगेल.

त्याच्या सभांना होणारी गर्दी एनकॅश करण्यासाठी शरद पवार यांनी राज ठाकरे यांचा "वापर" करून घेतलेला दिसतोय. राज ठाकरे देखील मूर्खपणाने या कारस्थानात सहभागी झाले. उत्तर भारतातील आपली मते कमी होऊ नयेत म्हणून राज ठाकरे यांना लोकसभेसाठी फक्त प्रचारापुरते वापरून घ्यायचे आणि त्याबदल्यात त्यांना विधानसभेच्या वेळी सपोर्ट करायचा अशी काहीशी "डील" असेल . पण शरद पवार पाठीत खंजीर खुपसण्यात किती एक्स्पर्ट आहेत हे सर्वांना माहिती आहे. पण तरीही राज ठाकरे बिनदिक्कत अश्या भ्रष्ट लोकांच्या गोटात गेलेले कोणत्याही सच्या मनसैनिकाला आवडले नसणार.

यांची भाषणे देखील फक्त मोदी आणि भाजप वर टीका करणारी आहेत. आणि त्यासाठी ते अश्या लोकांचा प्रचार करतायेत ज्यानीं फक्त भ्रष्टाचार केला आणि कधीही न सुटणारे प्रश्न निर्माण केले. सध्यातरी राज ठाकरे म्हणजे - बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना...!!

ट्रम्प's picture

13 Apr 2019 - 4:00 pm | ट्रम्प

100 % खरे आहे !!!!
महाराष्ट्राला भावुबंदीकि नवीन नाही आणि ही सगळी जळमट त्यांचीच आहे ,
यांनी सत्ते साठी एकमेकांच्या चड्याची नाडी ओढायची आणि आम्ही मात्र आयुष्यभर काँग्रेस आणि राष्ट्रवादी चा विरोध आवळत बसायच . सगळेच राजकीय पुढारी महाचालू ,भ्रष्ट्र , गेंड्याच्या कातड़ी चे आणि राजकीय विचाराशी बांधीलकी नसणारे असतात पण राज ठाकरे नी निर्लज्जपणाचा कळस केला .आता राज ठाकरे ला ना काँग्रेस , ना राष्ट्रवादी काँग्रेस , ना जनता किंमत देणार .
या माणसाला स्वाभिमान म्हणजे क़ाय हे कळत नाही याचे आश्चर्य वाटते .
याला म्हणतात स्वतःच्या हाताने मुखभंग करून घेणे !!!!

मरता क्या न करता ...
तसं त्यांच्या अस्तित्वाची लढाई फार पुर्वीपासुन सुरु आहे :) मागच्या विधानसभा निवडणुकीत यदाकदाचीत भाजपसोबत त्यांची युती झाली असती तर आज परिस्थिती वेगळी असती. त्यांच्याजवळ एकमेव अस्त्र (?) म्हणजे त्यांची भाषा. मग ते माईकसमोर असो कि कॅन्व्हासवर. शिवसेना युतीमुळे भाजप त्यांना सोबत घेणार नाहि, आणि आघाडीसोबतसुद्धा ते गेले नाहि तर त्यांच्या तोंडाच्या वाफेला काहिच किंमत उरत नाहि. राजकारणात टिकुन राहायचं असेल तर त्यांना एक पर्याय निवडणे आवष्यक होतं.
असो.

शाम भागवत's picture

16 Apr 2019 - 3:48 pm | शाम भागवत

अमेरिकेने आपल्या नागरिकांना सल्ला दिलाय की, त्यांनी बलुचिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधे जाऊ नये.

धर्मराजमुटके's picture

18 Apr 2019 - 9:37 pm | धर्मराजमुटके

लोकप्रिय टीक टॉक अ‍ॅपला आज सर्वोच्च न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा दिली. त्यामुळे इंदोरीकर महाराज, भाऊ कदम, चैत्या आणि असे कित्येक लोक मायेस पारखे झाले.
ईश्वर मृतात्म्यास सदगती देवो !
आत्मा कब्बी बी मरता नही , वो एक शरीर से दुसरे शरीर मे प्रवेश करता है और हमेशा इस धरती पर मौजुद होता है !

भाजपाने भोपाळ मतदान क्षेत्रात कॉंग्रेसच्या दिग्विजय च्या विरुद्ध साध्वी प्रग्या सिंगला उभ केलल आहे !
हिंदु आतंक नावाच्या नविन शब्दाला जन्म देणार्या ह्रा राक्षसा विरुद्ध ८ वर्षे तो
अत्याचार सहन करणार्या प्रग्या सिंग यांचा हा संग्राम आहे !!
भाजपाच्या ह्या डावा मुळे काश्मिर मधल्या फारुख अब्दुल्ला व ओमार अब्दुल्ला पासुन भारतातल्या अर्बन नक्षल वाद्यांना पत्रकारांना बराच झटका बसलेला आहे !
कॉंग्रेसच्या दिग्विजय ला ह्य निवडणुकीत हरवण्याचा विडा साध्वी प्रग्या सिंगने उचललेला आहे !!

सुप्रिम कोर्टाच्या १० एप्रिलच्या निर्णाया वर स्वतःच निर्णय देऊन सुप्रिम कोर्टात चौकिदार चोर आहे हे साबित झाल्याच राहुल
गांधीनी निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान बोललेले होते. त्यावर भाजपाच्या मिनाक्षी लेखी ह्याम्नी सुप्रिम कोर्ट अवमानना केस दाखल
केलेली आहे. कोर्टाने राहुल गांधीना आज पर्यंतचा वेळ दिलेला होता.

राहुल बाबा ने सुप्रिम कोर्टापुढे शरणागती स्विकारलेली आहे.

निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान जोशा जोशात आपल्याकडुन असे बोलले गेले , मुळात मी सुप्रिम कोर्टाने दिलेला निर्णय वाचलेला
नाही. आजु बाजुला असलेल्या पक्ष कार्यकत्याकंडुन व ईतर लोकांकडुन जी माहीती मिळाली त्यावर मी माझे मत बनवलेल आहे.
कोर्टाने आपला निर्णय ह्या केस वर राखुन ठेवलेला आहे.

निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान चौकिदार चोर आहे अस म्हणुन मतदारांना मिसलीड केल्याने त्यांच्या वर अजुन निवडणुक
आयोगाक्डुन कारवाई होण्याची शक्यता आहे.

दरम्यान राहुल गांधीवर निवडणुक आयोगामध्ये चुकीची माहीती दिल्यामुळे कोर्टात केस केलेली आहे. आपले चुकीचे नाव, चुकीची नॅशनॅलिटी सांगीतल्याबद्दल कोर्टाने राहुल गांधीना शुक्रवारी समंस बजावलेल होत. शुक्रवारी राहुल गांधीचे वकिल कोर्टासमोर पोहोचले तेंव्हा कोर्टाने त्याम्ना तिच माहीती जेंव्हा विचारली तेंव्हा राहुल गांधींच्या वकिलाने सोमवार पर्यंतचा वेळ मागीतला !!

कोर्टासमोर, स्वतःचे व देशाचे नाव सांगायला ह्या माणसाला तिन दिवस लागतात ह्यावरुन हे काय प्रकरण आहे हे आपल्या लक्षात येईल

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Apr 2019 - 2:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

SC issues contempt notice to Rahul Gandhi for remarks on Rafale verdict

बेजबाबदार व्यक्तव्ये करण्याची राहूल गांधी यांची सवय त्यांना चांगलीच भोवली आहे, असे दिसते. राफालंसंबंधीची स्वतः कल्पित केलेले आरोप, सर्वोच्च न्यायालयाच्या नावावर थोपण्याच्या कृतीमुळे, सर्वोच्च न्यायालयाने रागांवर न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावली आहे.

निवडणूक रोखे या संबंधीचा दुवा

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/the-advantages...

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Apr 2019 - 1:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

Make list of defaulters public, SC tells RBI

सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व बँकेला कर्जपरतीत चालढकल करणार्‍यांची नावे खुलेपणाने जाहीर करण्यास सांगितले आहे. गेल्या वर्ष दोन वर्षांत कर्जबुडव्यांवरची कारवाई सुलभ व्हावी यासाठी केलेल्या कायद्यांमुळे कर्जपरतीचे प्रमाण वाढले आहे आणि हेतुपुर्र्सरपणे कर्ज न फेडणार्‍यांवर बर्‍यापैकी चाप आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या वरच्या सकारात्मक आदेशाप्रमाणे, कर्ज बुडव्यांची नावे, ठराविक कालखंडांत (उदा : दर तिमाही, सहामाही, इ) जगजाहीर होत राहिली तर लाजेकाजे खातर आणि/किंवा कंपनीचा ताबा हातातून जाईल या भितीने, हेतुपुर्र्सर कर्ज बुडवणे नगण्य इतके कमी होण्यास मदतच होईल... अर्थातच, अशी वाईट सवय असलेल्या लोकांना/कंपन्यांना सरळ मार्गावर आणणे बँका व आरबीआय यांना सोपे होईल.

गामा पैलवान's picture

27 Apr 2019 - 1:48 pm | गामा पैलवान

चांगला निर्णय आहे!
-गा.पै.

कपिलमुनी's picture

28 Apr 2019 - 12:01 am | कपिलमुनी

मालकांना फाट्यावर मारून नेहमीच्या आयडिंचा यशस्वी शो चालू आहे.

कपिलमुनी's picture

28 Apr 2019 - 12:01 am | कपिलमुनी

मालकांना फाट्यावर मारून नेहमीच्या आयडिंचा यशस्वी शो चालू आहे.

... तुमच्या लाडक्या केजरीवाल ने त्यांच्याशीच युती करण्याचे भरपूर प्रयत्न केलेत, याविषयी तुमच्या टिप्पणी ची वाट पहातोय.

ट्रेड मार्क's picture

30 Apr 2019 - 8:40 am | ट्रेड मार्क

मजकूर फारच उजवीकडे जाऊ लागल्याने तुमच्या या प्रतिसादाला आता इथे उत्तर देतो.

वर तुम्हीच म्हणालात "सध्या पं. प्र. त्यांनी ज्या काहि योजना सुरु केल्या होत्या त्याबद्दल काहिच का बोलत नाहित. फक्त पुलावामा हा एकच मुद्दा असतो त्यांचा."

म्हणून मी म्हणलं भाषणात योजनांविषयी पण बोलतात.

या सगळ्या योजनांचा reality check बघा जरा.

योजना यशस्वी नसतील तर लोक मतपेटीतून उत्तर देतीलच. पण जर मोदी निवडून आलेच तर मात्र तुम्ही काय करणार? ईव्हीएमला दोष देणार?

तुम्ही फक्त घोषणांवर समधानी आहात.

आम्ही डोळे, कान आणि मेंदू उघडं ठेऊन reality check केला आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. दुसरं म्हणजे मला तरी पप्पूला पंप्र झालेलं बघवणार नाही, त्यापेक्षा मोदी परवडले.

क्रुपया चुकीचे मुद्दे आणू नका ओ. कुठली १३० कोटी लोक कचरा रस्त्यांवर टाकतात आणि कोनाला रेल्वे रुळावर बसल्याशिवाय होतंच नाही.

तुम्हाला मुद्दा समजत नाही हे वारंवार सिद्ध करायची गरज नाहीये!

बालाकोटच्या कारवाईत नक्की किती दहशतवादी ठार झाले ???

३०० अतिरेकी मेले, विश्वास नसेल तर जाऊन मोजून या.

बालाकोट मध्ये कितीका अतिरेकी मरूदे, पण काश्मीरमध्ये मात्र जोरदार कारवाई चालू आहे. बरेच अतिरेकी मारलेत. दुसरीकडे पाकिस्तानची हालत फारच वाईट झालेली आहे हे वाचलेच असेल. टोमॅटो, कांदा वगैरे भाज्यांचे भाव प्रचंड वाढलेत. त्यांना कर्ज द्यायलाही कोणी तयार नाही.

पण ती आश्वासन पुर्ण झालेली दिसत नाहीत. त्याऐवजी जाहीरती करण्यात समाधान मानल.

ठीकेय, तुम्हाला नसेल दिसत. तसंही २३ मे ला कळेलच.

लोकशाही अंतर्गतच दुसर्या मॉडेलचा विचार व्हायला हवा जिथे फक्त समाजकारणाला महत्व् असावे व राजकारणाला वाव नसावा

राजकारणाला वाव नसावाच हे अशक्य आहे. पण समाजकारण व्हायला हवे हे बरोबर आहे. माझ्यामते काँग्रेस किंवा इतर कोणाहीपेक्षा भाजप सरकार समाजकारण जास्त करते. आणि हो समाजकारणात समाजाचा तेवढाच किंबहुना जास्त सहभाग अपेक्षित असतो.

गोंधळी's picture

30 Apr 2019 - 11:45 am | गोंधळी

मी रा.गा. चा समर्थकही नाहि आहे ना न.मो. चा विरोधक आहे. पण आपली लोकशाही प्रगल्भ व्हावी व देशाची जास्त प्रगती व्हावी ही ईच्छा आहे.

माफ करा. चर्चा भरकटत आहे त्यामुळे ईथेच थांबतो.