Skip to main content

कोळीगीत: शिडाशिडात भरारे वारा

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 03/04/2019 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
आता देशावरून आपण कोकणात जावूया अन एक कोळीगीत ऐकूया. शिडाशिडात भरारे वारा होड्या निघाल्या किनारा || धृ || फिरवा सुकाणू सारी जाली भरली मांदेली नगली करली तारली गावली गोळा करुन घोळ चिंबोरी अन पाला होड्या निघाल्या किनारा ||१|| घेवून दर्याची दौलत हाती विकून होईल कमाई मोठी पडो शिल्लक पैसा थोरा बरा होड्या निघाल्या किनारा ||२|| उभी आसलं माझी बाय पाहत वाट "कवा येईल धनी माझा परतून आज" तिच्या कालजीचा आज होईल उतारा होड्या निघाल्या किनारा ||३|| शिडाशिडात भरारे वारा होड्या निघाल्या किनारा || धृ || - पाषाणभेद कोळी ०३/०४/२०१९
काव्यरस
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2678
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

अरे वा मस्त जमली आहे. छान चालीत म्हणता येते आहे पैजारबुवा,