एक गाणे अनेक कथा भाग १ :- चाहूँगा मैं तुझे हरदम
एक विनंती :- कृपया अक्षरास हसू नये...
वैधानिक इशारा :- हा धागा वाचकांनी आपल्या स्वत:च्या जबाबदारीवर वाचावा, परिणामांना धागाकर्ता किंवा मिपा व्यवस्थापन जबाबदार रहाणार नाही.
मित्रांनो एक गाणे अनेक कथा या माझ्या लेख मालेतले पहिले पुष्प तुमच्या पुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. अनेक अपरिचित गाण्यांचा आणि त्या गाण्यांच्या अनुषंगाने बनलेल्या विविध कथानकांचां परिचय मिपावरच्या रसिकांना करून देण्याचा या सदरात मी प्रयत्न करणार आहे
पहिले गाणे आहे “चाहूँगा मैं तुझे हरदम”
चाहूँगा मैं तुझे हरदम, तु मेरी ज़िन्दगी
माँगू रब से तेरी खुशियाँ, ये मेरी बंदगी
जुनून मेरा तुझे पाना, संग जीना संग मरना
यही है दिल्लगी
ओ मेरे सनम मेरे हमदम, चाहता रहूँ जनम जनम
सगळे गाणे इथे लिहीत नाही.... ते तुम्ही ऐकाच... नाही तुमच्या मनात घर करुन राहिले तर पैजारबुवा नाव लावणार नाही.
मित्रांनो तुम्हाला अमर अकबर अंथोनी या सिनेमातला तो प्रसंग आठवतो आहे का? ज्यात अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि ऋषी कपूर तिघे जण निरुपा रॉयला रक्तदान करतात. असले गुरुत्वाकर्षणाचा नियम न पाळणारे रक्तदान एकदा पाहिल्यावर कोणी कसे बरे विसरू शकेल?
असाच वैद्यकीय पेशातल्या अनेक नीतीनियमांच्या ठिकर्या उडवणार्या एका भावपूर्ण गाण्याचा व्हिडिओ आहे.
व्हिडिओ संपेपर्यंत संवेदनशील मनुष्याचे हृदय पिळवटून निघते.
अतिसंवेदनशील लोकांनी हा व्हिडिओ पाहू नये अशी नम्रतेची विनंती मी त्यांना या लेखाच्या माध्यमातून करतो.
ज्या कोणी हे कथानक रचले आहे तो मनुष्य मला कधी भेटला तयार त्याचे डोळेही मी अशाच पद्धतीने काढणार.
याच गाण्याचे दुसर्या पध्दतीने झालेले चित्रीकरण पहाताना पहिला व्हिडिओ फारच बरा होता असे अजाण दर्शकांना वाटू शकते. पण सुजाण लोक हा नक्कीच वेंजॉय करतील याची मला खात्री आहे.
पण ह्या व्हिडिओचा परमोच्च बिंदू खरतर याच्या शेवटात आहे. यातली हिरोईन शेवटी ज्या आर्ततेने हीरोला सांगते “वो मेरा भाई था” त्या वेळच्या अभिनयासाठी मी तिची शिफारस केवळ ऑस्कर करता करू शकतो.
आणि त्या नंतर हिरोचा अभिनय पहाताना मला सदमा मधला कमाल हसनने शेवटच्या सीन मध्ये केलेला अभिनय आठवला
तुमचा जास्त वेळ घेता नाही, पहाच हा पण व्हिडिओ
तिसरा व्हिडीओ थोडा मोठा आहे पण पहायला हवा असाच आहे ते म्हणतात ना “सब्रका फल मीठा होता हैं”
या व्हिडिओतला हिरो गरीब आणि अशिक्षित आहे, हे व्हिडिओत मोठ्या खुबीने दाखवले आहे पण त्याचे हिरवीणी वर अतिशय प्रेम आहे. हिरवीन पोळ्या करते ते दॄष्य पाहून माझ्या अंगाला दरदरुन घाम फुटला होता. पण त्यानंतर ती त्यापेक्षा भयानक चाळे करुन दाखवते.
सैराट मध्ये नागराज मंजुळे जिकडे कमी पडले त्या सगळ्या जागा इकडे दिग्दर्शकाने भरून काढल्या आहेत. हा व्हिडिओ पाहिला की तुम्ही सैराट विसराल.
यात काय नाही? प्रेमी जीव त्यांची ताटातूट करणारा जुलमी बाप. यात व्हीलनला काही सेकंद काम आहे पण त्याने त्या वेळात बहार उडवली आहे
यात हिरो शेवटी कारला आपटून मरतो. ( नीट वाचा हिरो कारला आपटून मारतो. इतर सिनेमात माणसांवर कार येऊन आपटते, पण इथेच तर दिग्दर्शक बाजी मारतो इथे हिरोच व्हीलनाच्या कारला धडक मारतो) या हीरोला पण मरणोत्तर ऑस्कर द्यावे अशी माझी खटपट सुरु आहे.
चौथे कथानक हे पहिल्या तीनपेक्षा भयानक आहे पण चकचकीत आणि प्रेक्षणीय आहे. कथानक समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ मला किमान १० वेळा पहायला लागला. यातही हिरवीणी च्या अभिनायासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. विशेषत: शेवटी तिने जो वेड लागल्याचा अभिनय केला आहे त्याला तोड नाही.
एवढे चार झाल्यावरही तुमच्यात पाचवा व्हिडिओ पहायची खुमखुमी असेल तर हा घ्या पाचवा
हा सहावा
एकापेक्षा एक भारी कथानके अभिनय चित्रीकरण आणि दिग्दर्शन आहे या कर्णप्रिय गाण्याचे .
हे कमी वाटले तर अजूनही आहेत पण हे सहा सगळ्यात भारी आहेत .
सावधान :- पुढच्या वेळी अजून वेगळे गाणे घेउन येणार आहे
पैजारबुवा
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
11074
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-)))
झबरदस्त
पैजारबुवा
असलं काही
नाही नाखु काका या सहा मधला एकही वरीजनल नाही
In reply to असलं काही by नाखु
आवं पैजारबुवा
आवं पैजारबुवा
ते एक सुपरमॅन चे गाणे होते
विजूभाउ, सुपरम्यान नाही इस्पायडर म्यान
In reply to ते एक सुपरमॅन चे गाणे होते by विजुभाऊ
हा हा हा
तुम्ही काही म्हणा ताहेर शाहचा
=))))))
In reply to तुम्ही काही म्हणा ताहेर शाहचा by सोन्या बागलाणकर
आणि त्यावरच्या कंमेंट्स तर
In reply to =)))))) by यशोधरा
कमेंट्स उद्या वाचते. रोज थोडं
In reply to आणि त्यावरच्या कंमेंट्स तर by सोन्या बागलाणकर
अरे हा इसम तर लैच भारी आहे.. अशक्य गाणी आहेत दोन्ही...
हो पैजारबुवा, आपल्याकडे अशा
In reply to अरे हा इसम तर लैच भारी आहे.. अशक्य गाणी आहेत दोन्ही... by ज्ञानोबाचे पैजार