✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चालू घडामोडी - मार्च २०१९

व
वामन देशमुख यांनी
Fri, 03/01/2019 - 23:14  ·  लेख
लेख
एकीकडे भारतीय उपखंडात दाटून आलेले युद्धाचे ढग अजून निवळलेले नसताना, दुसरीकडे पश्चिम आशियात भरलेल्या इस्लामी देशांच्या सहकार्य परिषदेच्या उदघाटन समारंभात भारत सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहिला आहे. याप्रसंगी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांनी प्रभावी भाषणातून इस्लामी जगताशी मैत्री, सहकार्य आणि परस्पर सहजीवनाचा संदेश दिला आहे. भाषणाचा मजकूर इथे आणि विडिओ इथे आहेत. २०१९ वर्ष हे राष्ट्रीय व जागतिक पातळीवर निश्चितच मोठ्या उलथापालथीचं ठरेल असं मला व्यक्तिशः वाटतं. १. या महिन्यातच (३१ मार्चपर्यंत) भारताकडून पाकिस्तानला अजून एक धक्का दिला जाईल - अ. मौलाना मसूद अझरला पकडणे / मारणे आ. सर्जिकल स्ट्राइक ३.० इ. अजून असंच काहीतरी २. श्री नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येऊन पुन्हा पंतप्रधान बनतील. - महाराष्ट्रातील विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणूका लोकसभेच्या निवडणुकीसोबतच होतील. ३. या वर्षाअखेरीपर्यंत पाकिस्तानचे किमान दोन तुकडे होतील. ४. इझ्रायल चे पंतप्रधान श्री.बेंजामिन नेतान्याहू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कदाचित पंतप्रधानपद सोडावे लागेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
94263 वाचन

💬 प्रतिसाद (180)

प्रतिक्रिया

असे प्रतिसाद आणि प्रतिसाद्क

सर टोबी
Sat, 03/16/2019 - 22:53 नवीन
जेंव्हा मिपावर टिकून राहतात तेंव्हा ते संपादक मंडळाच्या सचोटीवर प्रश्न चिन्ह उपस्थित करतात. तसेही संपादक मंडळ अधून मधून जे इशारे देत असते ते केवळ वैधानिक स्वरूपाचे असतात हे एव्हाना सर्वांना समजले असेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा

तथाकथित पुरोगम्या नां चर्चे

ट्रम्प
Mon, 03/18/2019 - 07:02 नवीन
तथाकथित पुरोगम्या नां चर्चे साठी आमंत्रण होते ते !!! पण कुंद , ढगाळ वातावरण असल्या शिवाय मैदानात उतरायचे नाही ही त्यांची खासियत आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

सर टोबी

भंकस बाबा
Mon, 03/18/2019 - 09:17 नवीन
आत्ताच वाट्सएपवर एक फेसबुक कंटेंट वायरल झाले आहे त्यात मनोहर पर्रिकर यांचे देहावसान झाल्याच्या बातमीला आपले शांतिप्रिय समाजाचे तरुण हसण्याची पोस्ट टाकून आपली लायकी दाखवत आहेत. त्यामुळे संपादक मंडळाने क़ाय करावे ह्याचा सल्ला देणे सोडून आपला शांतिप्रिय समाज व त्याला प्रोत्साहन देणारे पप्पू यांची चिंता करावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर टोबी

कॉंग्रेसने उत्तर प्रदेशात ७ जागा सपा , बसपा व

डँबिस००७
Sun, 03/17/2019 - 20:17 नवीन
कॉंग्रेसने उत्तर प्रदेशात ७ जागा सपा , बसपा व रा लो आ साठी सोडल्या आहेत !! महागठबंधन झालेल नसताना असा उदारपणा कश्या साठी ?
  • Log in or register to post comments

मतांची बेरीज

गामा पैलवान
Mon, 03/18/2019 - 00:41 नवीन
डँबिस००७, रालोआसाठी जागा सोडल्या म्हणजे काँग्रेसही मोदींना सामील वाटते? पण सप, बसपना जागा सोडतांना नफा ना तोटा तत्त्वावर असाव्यात. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

कॉंग्रेस, उत्तरप्रदेशातील

डँबिस००७
Mon, 03/18/2019 - 15:46 नवीन
कॉंग्रेस, उत्तरप्रदेशातील सर्व लोकसभा जागावर आपले उमेदवार उतरवायला मोकळे आहेत !! मायावतीने कॉंग्रसला सुनावले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

काँग्रेस ला

ट्रम्प
Mon, 03/18/2019 - 21:11 नवीन
सुनावले नाही , खाड़कन थोबाडित मारली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

गोव्याचे मुख्य मंत्री श्री

डँबिस००७
Sun, 03/17/2019 - 20:19 नवीन
गोव्याचे मुख्य मंत्री श्री मनोहर पर्रीकर यांचे वयाच्या ६३ दुःखद नीधन ! श्रद्धांजली !!
  • Log in or register to post comments

श्रद्धांजली

ट्रेड मार्क
Sun, 03/17/2019 - 21:30 नवीन
एक प्रामाणिक, अभ्यासू आणि तितकाच साधा नेता हरपला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

कॉंग्रेसची आयटी सेल प्रमुख

डँबिस००७
Sun, 03/17/2019 - 20:24 नवीन
कॉंग्रेसची आयटी सेल प्रमुख असलेल्या दिव्या स्पंदना ने सगळ्याच सिमा रेषा ओलांडलेल्या आहेत ! मा. श्री मोदीजींना आपले अमुल्य मत देणार्यात २/३ मुर्ख लोक आहेत , युद्ध सुरु व्हायच्या अगोदरच हार मानुन मोकळे झालेली दिसत आहे !!
  • Log in or register to post comments

स्वतःची कबर खणत आहेत

ट्रेड मार्क
Sun, 03/17/2019 - 21:44 नवीन
काँग्रेस प्रवक्ते पावन खेरा यांनी एका चर्चेत आक्षेपार्ह विधान केले. मोदी मधला म = मसूद अझर, ओ = ओसामा, द = दाऊद आणि आय = आयएसआय असे म्हणाले. तिथल्यातिथे प्रेक्षकांनीसुद्धा आक्षेप घेऊनही त्यांनी ना माफी मागितली ना आपले विधान मागे घेतले. काँग्रेसींनी स्वतःचीच कबर खणायचा विडा उचललेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

मोदींना मौत का सौदागर म्हणणे

बाप्पू
Mon, 03/18/2019 - 00:40 नवीन
मोदींना मौत का सौदागर म्हणणे मागच्या वेळेला काँग्रेस ला खूप महागात पडले होते.. यावेळीही अश्या बिनबुडाच्या आरोपांमुळे मोदींनाच फायदा होईल. Pavam khera हा पुन्हा एकदा हिंदूंच्यावर इंडिरेक्टली दहशतवादी असा ठपका लावू पाहतोय आणि त्याद्वारे मुस्लिम मातांना आकर्षित करतोय... पण खरंच हिंदू दहशतवादी असतें तर हि हिरवी जाहिरीली पिलावळ 1947 नंतर इथे वासाला पण शिल्लक ठेवली नसती असो. हिंदू मतदार हा असला अपमान सहन करणार नाहीत आणि याचे उत्तर मतपेटी तुन देतील हि अपेक्षा. त्याचबरोबर सुशिक्षित आणि लिबरल मुस्लिम्स देखील या विचाराचे खंडन करतील हि अपेक्षा. बाकी झोपलेल्या हिंदू कडून आणि मदरसा छाप मुस्लिम लोकांकडून काहीही अपेक्षा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

देशाचे माजी संरक्षण मंत्री

बाप्पू
Mon, 03/18/2019 - 00:44 नवीन
देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री श्री मनोहर पर्रीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. !
  • Log in or register to post comments

पररीकरांना श्रद्धांजली

गामा पैलवान
Mon, 03/18/2019 - 13:45 नवीन
पररीकरांना श्रद्धांजली ! अकाली वयात गेले. ६३ हे जाण्याचे वय नाही. :-( त्यांना शांती लाभो. -गा.पै.
  • Log in or register to post comments

बारामती चे जाणते राजे बालाकोट

ट्रम्प
Mon, 03/18/2019 - 20:22 नवीन
बारामती चे जाणते राजे बालाकोट सर्जिकल स्ट्राइक नंतर पप्पू, माया ,ममता च्या सूरत सुर मिसळून " पुरावे कुठय !! " विचारताना सर्वानीं पाहिले होते . तेच जाणते राजे काल पिंपरी मध्ये पुतण्याच्या प्रचराचा शुभारंभ कार्यक्रमा ला हजर होते , त्या वेळी " सर्जिकल स्ट्राइक चा सल्ला मीच दिला होता " असे सांगून ऐकणाऱ्या कार्यकर्त्या च्या पोटात गोळा आणला . आता कार्यकर्त्यानां प्रश्न पडला असेल ' सर्जिकल स्ट्राइक झालीच नाही ' अस प्रचारात सांगायचे कसे कारण की आपल्या नेत्यानेच पुन्हा एकदा यू मारला आहे . बर चला जाणत्या राजा चे सोडून देवूया !!! सेने तुन भावुबंदीकि चे भांडण करुण बाहेर पडलेला वाघ , ज्या मध्ये तमाम महाराष्ट्र बाळासाहेबांना पाहतो तो वाघ , इतर पक्षातील गाढवां सामोर मोदींवर अर्वाच्य भाषेत हल्ले करतोय कशासाठी तर ठगबंधन च्या अघाडीत घ्यावे म्हणून . त्या वाघाच्या पक्षाला लोक मतदान करत नव्हती !! पण एक निर्भिड नेता म्हणून तमाम महाराष्ट्रियांच्या मनात आदर होता तो त्याने घालवला . एक वेळेस मोदी विरोध समजू शकलो असतो पण , चोरांच्या मांडीला मांडी लावून बसन्या साठी कुठल्या थराला आपण चालालोय हे त्याला समजत नसल्याने त्याचा राजकीय आत्मघात निश्चित वाटतो .
  • Log in or register to post comments

हे पण वाचा

महेश हतोळकर
Mon, 03/18/2019 - 21:23 नवीन
https://www.loksatta.com/maharashtra-news/media-misinterpreted-me-says-sharad-pawar-1859575/ अर्धा तास तरी स्वतःच्या वक्तव्यावर ठाम रहा ओ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

बाळाचे बोबडे बोल पत्रकारांना

स्वलिखित
Mon, 03/18/2019 - 22:06 नवीन
बाळाचे बोबडे बोल पत्रकारांना कळले नसतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

तरी ही प्रश्न राहतोच !!!!

ट्रम्प
Mon, 03/18/2019 - 22:28 नवीन
" भारतीय सैन्याचा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले याची चर्चा व्हायला नको असं मत शरद पवार यानी व्यक्त केलं आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर संरक्षण विषयक कारवाईचे राजकारण होऊ नये असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. " हे त्यांनी पप्पू , केजरी,ममता , माया, यांना का नाही सांगितले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश हतोळकर

राज ठाकरे यांनी आता

बाप्पू
Tue, 03/19/2019 - 00:17 नवीन
राज ठाकरे यांनी आता राजकारणातून निवृत्ती घेऊन स्वतःची एखादी खळ्ळ खट्याक गुंड कंपनी काढावी किंवा गल्लो गल्ली नक्कला करायचे कार्यक्रम घ्यावेत. त्यांची भाषणे फक्त ऐकायला गोड गोड वाटतात पण आजपर्यंत त्यांनी कोणत्याही भूमिकेवर कधीच फर्म भूमिका घेतली नाही. मग ते टोल, मराठी चा मुद्दा, पाकिस्तानि कलाकार विरोध किंवा अजुन कोणतेही आंदोलन असो. प्रत्येक वेळेला राज ठाकरे यांची भूमिका संशयास्पद आहे. काही वर्षांपूर्वी नाशिक येथे सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून मनसे आले तरीही एक रोल मॉडेल जिल्हा अशी ओळख बनवण्यात ते सपशेल फेल झाले.. ज्या छगन भुजबळ ला शिव्या घालून निवडून आले त्यांच्याच आसपास मनसे नगरसेवक घुटमळत राहिले. आत्ता पण लोकसभा निवडणुकीआधी राज आणि राष्ट्रवादी यांच्या अनेक गुप्त वाटाघाटी अयशस्वी झाल्या, आणि ते आघाडीत सामील होता होता राहिले. आता माझ्यामते निवडणूक न लढवता फक्त बाहेरून पाठिंबा देऊन फक्त मोदी आणि भाजप विरुद्ध वातावरण तयार करण्याची सुपारी राज ठाकरे आणि कंपनीने घेतलीये..!! राज ठाकरे किंवा मनसे हे नाव ऐकले तरी आता आमच्या कोल्हापूरकडच्या दोन म्हणी आठवतात 1) भेळ तिकडे खेळ 2) खोबरं तिकडं चांगभलं... !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

नाशिक येथे सर्वात मोठा पक्ष...

अर्धवटराव
Tue, 03/19/2019 - 07:35 नवीन
मी मिपवरच कुणाची तरी कमेंट वाचली होती कि नाशीकमधे मनसेने बरच चांगलं काम केलं होतं म्हणुन. अर्थात, राज्यात-केंद्रात त्यांचं काहि वजन नसल्यामुळे नाशीकमधल्या कामाला आपसुक मर्यादा होत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

चांगलं काम केल तर माउथ

आनन्दा
Tue, 03/19/2019 - 07:38 नवीन
चांगलं काम केल तर माउथ पब्लिसिटी होतेच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

चांगल काम?? जसे कि ?? जरा

बाप्पू
Tue, 03/19/2019 - 11:01 नवीन
चांगल काम?? जसे कि ?? जरा स्पष्ट कराल काय?? MNS मोठा पक्ष असला तरी लवकरच जवळपास निम्मे नगरसेवक bjp, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या गोटात गेले. हे मनसे चे अपयश म्हणावे लागेल.. राष्ट्रवादी काँग्रेस वर टीका आणि छगन भुजबळ यांची नक्कल करून सत्तेत आलेल्या पक्षाने शेवटी त्यांच्याच हातात हात घेऊन राजकारण केले. बाकी काम म्हणायचं झाले तर फक्त गोदा पार्क एवढेच काय ते नवीन झाले.. बाकी सर्व जैसे थेच आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

London court issues arrest

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 03/18/2019 - 21:21 नवीन
London court issues arrest warrant against Nirav Modi
  • Log in or register to post comments

मै हु चौकीदार.

अर्धवटराव
Tue, 03/19/2019 - 07:37 नवीन
नीरव, मल्या वगैरे मंडळींच्या बाबतीत काहि ठोस घडलं तर 'चौकीदार' प्रचाराला बरच पाठबळ मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

ठोस म्हणजे अजून काय पाहिजे?

ट्रेड मार्क
Tue, 03/19/2019 - 21:03 नवीन
निरव मोदीच्या भारतातील आणि परदेशातील मालमत्ता ED ने ताब्यात घेतल्या आहेत. तसेच वर डॉ. साहेबांनी दिलेल्या लिंकप्रमाणे लंडन कोर्टाने अटक वॉरंट काढलंय. मल्ल्याच्या जवळपास १२,००० कोटींच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या आहेत. मल्ल्याला पण भारतात पाठवावे असे इंग्लंडच्या जजने सांगितले आहे. म्हणजे या दोघांनी जे आर्थिक घोटाळे केले त्यापेक्षा जास्त किमतीच्या असेट्स जप्त केल्या आहेत. एवढेच नव्हे तर ब्रिटन आणि भारत यांच्यात अश्या भारतीयांना इंग्लंडमधून परत पाठवायचा कुठलाही करार नाहीये. खरं तर २००२ पासून भारताने २८ फुजिटिव्हना परत पाठवायची मागणी केली पण त्यातील फक्त एकाच व्यक्तीला परत आणता आले. १० वर्षात ममो सरकारला नीट पाठपुरावा सुद्धा करता आला नाही. तिथे मोदी सरकारने या दोन मोठ्या अपराध्यांना कोर्टाकडून परत पाठवायची ऑर्डर मिळवली. याचं काहीच श्रेय मोदी सरकारने केलेल्या पाठपुराव्याला द्यायचं नाही? तसेच बाकी आर्थिक घोटाळे करणाऱ्यांच्या मालमत्ता किती जप्त केल्या ते इथे बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ठोस म्हणजे काय??

अर्धवटराव
Tue, 03/19/2019 - 21:47 नवीन
मल्या आणि निरव मंडळी तिहारमधे बसलेले बघणं. रिकव्हरी आकडेवारी काहिही असली तरी 'चौकीदार' प्रचारावर त्याचा परिणाम होणार नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

माझं मत

ट्रेड मार्क
Tue, 03/19/2019 - 22:23 नवीन
मल्या आणि निरव मंडळी तिहारमधे बसलेले बघणं. व्यक्तीला नुसतं जेलमध्ये टाकण्यापेक्षा पैसे वसूल होणं जास्त महत्वाचं आहे. विलफुल डिफॉल्टर असेल तर दोन्ही व्हायला पाहिजे. उद्या समजा एखाद्याने १०-१५००० कोटी बुडवले आणि नंतर हात वर केले. तर त्याला जेल मध्ये टाकून तुम्हाला बदला घेतल्याचे समाधान मिळेल पण पैसे गेले ते गेलेच ना? या दोघांच्या केस मध्ये दोन्ही होतंय ना? मालमत्ता तर जप्त केलीच आहे. वर त्यांना जेलमध्ये टाकायचे पण पूर्ण प्रयत्न केले आहेत. रिकव्हरी आकडेवारी काहिही असली तरी 'चौकीदार' प्रचारावर त्याचा परिणाम होणार नाहि. काही झालं तरी आपल्याला चौकीदार नकोच आहे. गंगा की बेटी चा भाऊ आहे ना, आपल्याला तर तोच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

तसं बघितलं तर...

अर्धवटराव
Tue, 03/19/2019 - 22:46 नवीन
व्यक्तीला नुसतं जेलमध्ये टाकण्यापेक्षा पैसे वसूल होणं जास्त महत्वाचं आहे
त्यापेक्षा अशा भामट्यांना वेळीच ओळखुन त्यांच्यावर पायबंद घालणं आणखी जास्त महत्वाचं असावं ना? गेले कि दोघेही सरकारच्या हातावर तुरी देऊन. कितीही कारणं द्या, पण ते व्हिजीलन्सचं, पर्यायाने सरकारचं फेल्युअर आहे हे तरी मान्य व्हावं.
या दोघांच्या केस मध्ये दोन्ही होतंय ना? मालमत्ता तर जप्त केलीच आहे. वर त्यांना जेलमध्ये टाकायचे पण पूर्ण प्रयत्न केले आहेत.
परत सांगतो. त्या प्रयत्नाचा 'चौकिदार' प्रचारावर परिणाम व्हायचा असेल तर त्यांना प्रत्यक्ष बिहाण्ड द बार्स दाखवायला लागेल.
काही झालं तरी आपल्याला चौकीदार नकोच आहे. गंगा की बेटी चा भाऊ आहे ना, आपल्याला तर तोच पाहिजे.
त्यावर आमचा काहि कंट्रोल नाहि. तसं आम्हाला फुल मेजॉरटीतले बारामतीकर काका पाहिजे. पण त्यांचं संख्याबळ दोन आकडे देखील पार करत नाहि :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

गोलपोस्ट बदलताय

ट्रेड मार्क
गुरुवार, 03/21/2019 - 04:59 नवीन
तुमचा मूळ मुद्दा निरव आणि मल्ल्याला शिक्षा होणं हा होता. त्यासाठी काय काय केलं आहे हे मी तुम्हाला पुराव्यांसहित दाखवून दिलं आहे. आता तुमचा पुढचा मुद्दा असा आहे की अश्या लोकांना वेळीच ओळखून उपाययोजना करणे. तर पहिली गोष्ट म्हणजे मुद्दाम घोटाळे करणारे आणि काही कारणाने आर्थिक अडचणीत येऊन डबघाईला आल्याने कर्जफेड करता न येणारे असे दोन प्रकारचे लोक वेगळे काढायला लागतील. तर मुद्दाम घोटाळे करणाऱ्यांत, म्हणजे नियमातील त्रुटींचा गैरवापर करून वा बँक अधिकाऱ्यांना हाताशी धरून घोटाळे करणाऱ्यांमध्ये निरव मोदी मोडतो. मिपावरील या लेखात आणि त्यावरील प्रतिसादांमध्ये तुम्हाला बरीच माहिती मिळेल. हे घोटाळे मुख्यतः बँक अधिकाऱ्यांना किंवा सरकारी बाबूंना हाताशी धरून केले जातात. पण निरव मोदीच्या केसमध्ये हे प्रकरण २०११ मध्ये चालू झालं. त्याने बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून Letter of credit चा गैरवापर चालू केला. ही रक्कम वाढतवाढत ११००० कोटींपर्यंत गेली. आता इतके वर्ष निवांत घोटाळा चाललेला असताना एकदम निरवला पळून जायची का वेळ आली? मल्ल्याची केस तर अजूनच वेगळी आहे. माझ्यामते तरी त्याने घोटाळा असा केला नव्हता, कदाचित चुकीच्या निर्णयांमुळे व परिस्थितीमुळे तो गाळात गेला. पण तो पूर्णपणे वेगळा आणि मोठा विषय आहे. मिपावरच कुठेतरी मी एक प्रतिसाद लिहिला होता, पण आता शोधायला लागेल. मुख्य मुद्दा उपाययोजना केली आहे का? KYC नियम अधिक कडक केले आहेत. विशेषतः Ministry of Corporate Affairs ने DeMo मधील संशयास्पद आणि इतर उत्खनन करून ३ एक लाख कंपन्या रडारमध्ये आणल्या आहेत. पण मला विचाराल तर देशातल्या प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. "मै भी चौकीदार" म्हणजे लगेच बिल्डिंगखाली जाऊन रखवाली करणे नसून जे बघताय, ऐकताय, अनुभवताय तिथे सजग रहाणे आहे. माझ्या बँकेतल्या अनुभवावरून मी सांगू शकतो की ९० टक्के घोटाळे बँक अधिकारीच थांबवू शकतात. अगदी सुरूच होऊ न देणे ही जवळपास अशक्य कोटीतली गोष्ट आहे पण निदान वाढू तरी नये याची काळजी तर घेऊच शकतो. घोटाळे करून पळून गेलेल्यांसाठी आणि भविष्यात असेल कोणी पळून गेले तर उपाय म्हणून २०१८ मध्ये मोदी सरकारने Fugitive Economic Offenders Act आणला. थोडं गुगलून तुम्हाला अधिक माहिती मिळेल. आता पुढचा प्रश्न येऊ शकेल म्हणून आधीच उत्तर देतो. निरव मोदीला पळून का जाऊ दिलं? तर एकूण टाइमलाईन बघितलीत तर निरव जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच भारताबाहेर गेला होता. तोपर्यंत त्याच्याविरोधात कुठलीही ऑफिशिअल कम्प्लेंट नव्हती. २९ जानेवारीला पीएनबीने तक्रार दाखल केली आणि हे समजल्यावर निरव भारतात यायलाच तयार झाला नाही. तो इंग्लंडला यासाठीच गेला की आत्तापर्यंत इंग्लंडच्या स्थानिक कायद्यांचा वापर करून असे अपराधी सहज स्वतःला वाचवत होते. फेब्रुवारी २०१८ पासून ते मार्च २०१९ या १३ महिन्यांत निरवविरुद्ध सगळे पुरावे गोळा करून त्याची सगळी संपत्ती जप्त करणे आणि त्याला इंग्लंडमध्ये अटक करवणे ही कामगिरी तुम्हाला चांगली वाटत नाही? विशेषतः २००२ पासून २८ लोक तिथे उजळमाथ्याने वावरत आहेत, ज्यांना उच्चविद्याविभूषित इंग्लंडमध्येच शिकलेले पंतप्रधान काहीच करू शकले नाहीत या पार्श्वभूमीवर ही कामगिरी अधिकच चांगली वाटते. म्हणजे मला तरी वाटते, प्रत्येकाला आपले मत असते आणि ते विरोधी पण असू शकते. तसेच मोदी द्वेष करण्याचा लोकशाहीने हक्क दिलेलाच आहे. नरेंद्र मोदींनी हे २०१९ च्या निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून केलं असं म्हणलं तरी ११००० कोटी निरवकडून आणि १२००० कोटी मल्ल्याकडून जप्त झाले आहेत आणि त्यांना दोघांनाही अटक करवून भारतात आणण्याची सोय पण झाली आहे हे कोणीच नाकारू शकत नाही. त्याचबरोबर पुढील घोटाळेबहाद्दरांना पण संदेश मिळालाच असेल. आता रागाला किंवा बारामतीच्या काकांना आणून परिस्थिती परत २०१४च्या आधीची आणायची का कसे हे आपण आपले ठरवा. बाकी बारामतीच्या काकांना एकही सीट जरी नाही मिळाली तरी ते पंप्र होऊ शकतात हे नमूद करू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

तुम्ही आमच्या वाक्यांचे अर्थ काढायला मुखत्यार आहातच.

अर्धवटराव
गुरुवार, 03/21/2019 - 18:22 नवीन
माझा मुळ मुद्दा "नीरव, मल्या वगैरे मंडळींच्या बाबतीत काहि ठोस घडलं तर 'चौकीदार' प्रचाराला बरच पाठबळ मिळेल." इतका साधा होता. खरं तर त्यात 'मुद्दा' म्हणण्यासारखं फार कहि क्रिप्टीक नाहि. निवडणुकीच्या हंगामात एखादं प्रचारतंत्र कसं इफेक्टीव्ह होतं याचा सिंपल अंदाज आहे तो. आर्थीक घोटाळे ओळखण्यातल्या मर्यादा, उपाययोजना, वगैरे साठी सरकारने काय केलं याचं इथे कितीही विवेचन केलं तरी हीच सगळी जंत्री 'चौकीदार' प्रचाराच्यामागे भक्कमपणे उभी केली जात नाहि, कारण जोपर्यंत नीरव साहेब भारतातल्या गजाआड जात नाहि तोपर्यंत त्याचा काहि उपयोग नाहि हे सरकारलादेखील माहित आहे (हा आमचा अंदाज). तिच गोष्ट निरव देशाबाहेर कसा गेला याबाबतीत देखील खरी आहे. माल्याजींचं देशांतर हे मोदी सरकारचं अपयश आहे असं मला आजही वाटतं. राहिला मुद्दा राजकारण्यांवर राग-लोभ-द्वेषाचा... जनतेकरता भलेही या भावना असतील, पण राजकारण्यांसाठी ते भांडवल असतं. पब्लीकने आपलं रक्तं कोणासाठी आणि किती आटवायचं हे आपलं आपण ठरवावं (ते मॅनेज करण हा देखील राजकार्‍यांचा आवडता उद्योग) बारामतीकर काका फॉर्मेलिटी म्हणुन पंप्र बनु नयेत... सरकार चालवताना ते टिकवायची कटकट त्यांच्या डोक्याला नसावी. त्यांचं डोकॅलिटीचं पोटेन्शीअलचं उगाच खर्च होतं अशाने. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

बारामतीकर काका

ढब्ब्या
गुरुवार, 03/21/2019 - 19:00 नवीन
बारामतीकर काका आणी पंप्र ... गेले ते दिवस, राहील्या त्या आठ्वणी ;) ४-५ (किंवा अजुन कमीच) सिटा मिळवून कोणी पंप्र बनेल असं वाटत नाही. दिदी, बहन आणी बाबू ना नक्कीच ह्यांच्यापेक्शा जास्त सिटा मिळतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

ठोस म्हणजे नक्की काय?

ट्रेड मार्क
Fri, 03/22/2019 - 02:49 नवीन
माझा पण ठोस म्हणजे नक्की काय हाच तर प्रश्न आहे. एखाद्या प्रकरणात कारवाई करताना प्रत्येकाला कामं आखून दिलेली आहेत. जसं की जो व्हिक्टीम आहे त्याने तक्रार दाखल केली पाहिजे, ती पण वेळेत केली तर आरोपीला पटकन पकडता येतं. तक्रार दाखल केल्यावर शोधकार्य, पुरावे गोळा करणे वगैरे पोलिसांकडे आहे. नंतर त्या पुराव्यांच्या आधारे शिक्षा करणे कोर्टाच्या हातात आहे. निरव काय किंवा मल्ल्या काय, दोन्ही केस मध्ये बँकांनी तक्रार दाखल करायला पण उशीर केला. भारताबाहेरही उद्योगधंदे असलेल्या दोघांना तक्रार नसताना कोणत्या कलमाखाली परदेशात जायला अडवायला पाहिजे होते? लगेच प्रतिष्ठित बिझनेसमनना उगाच त्रास दिला जातोय आणि सरकार फॅसिस्ट आहे म्हणून आरडाओरडा नसता झाला? असो. एकदा तक्रार रुजू झाल्यावर त्यावर कारवाई करणे हे सरकारी संस्थांचे काम होते, ते त्यांनी व्यवस्थित केले. त्यात सरकारने कुठेही हस्तक्षेप केला नाही किंवा अडथळा आणला नाही. उलट जिथे हे लोक कायद्यातील त्रुटींचा वापर करून सुटू शकले असते तिथे कायदे बदलले. त्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी नवीन कायदे बनवणे, इतर देशांशी बोलणी करून त्या देशांना पण या लोकांना जेरबंद करण्यासाठी मनवणे हे सर्व केले. आता या पुढची कारवाई कोण करणार आहे? तर कोर्ट. सगळे पुरावे अभ्यासून दोन्ही बाजू ऐकून त्यावरून निवाडा करणे हे कोर्टाचे काम आहे ना? पण उद्या निरव किंवा मल्ल्याची केस कपिल सिब्बल किंवा प्रशांत भूषण सारख्या वकिलांनी घेऊन हिकमती करून यांना सोडवले तर त्याला मोदी जबाबदार? निरव तसाही इंग्लंडमधल्या जेलमध्ये आहे. पण निवडणुकीच्या आधी भारतात आणून त्याला इथल्या जेलमध्ये बघितलं तरच मोदींनी काहीतरी केलं म्हणेन. किंवा न्यायालयीन कोठडीत असेल तर त्याला जेव्हा कोर्ट शिक्षा सुनावलं तेव्हाच, किंवा मी त्याला तिहार जेल मध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेला बघीन तेव्हाच मानीन की मोदींनी काहीतरी केलं. असं असेल तर मग राहूच दे... माझ्या मते सरकारने आणि सरकारी संस्थांनी त्यांच्या परिघात जेवढे करायचे होते ते केले आहे. आता लोकांना जर ते समजत नसेल किंवा समजून घ्यायचे नसेल तर नसेल. नुकसान कोणाचं आहे? त्याहीपुढे जाऊन अश्या प्रकरणांमुळे एकूणच बिझनेस करणाऱ्यांच्या मनात काय येत असेल? तसेही सर्वसामान्य लोकांना बिझनेसमन म्हणले की फसवणूक करणारे वाटतात. पण खरंच सगळे तसे आहेत का? तुम्ही आम्ही व ८०% नोकरी करणारी लोकं ही कोणीतरी बिझनेस चालू करतो आणि आपल्याला नोकरी देतो म्हणून तर आपल्या गरज भागतात. अगदी ९-६ जे नेमून दिलेलं आहे काम करून घरी जाणे हे कुठल्याच बिझनेसमन ला शक्य नाहीये. त्याचा धंदा करण्यासाठी, वाढवण्यासाठी त्याला ज्या गोष्टी करायला लागतात त्याला पर्याय नाहीये. पण म्हणून जर सगळे बिझनेसमन चोर आणि जेवढा मोठा बिझनेस तेवढा मोठा चोर अशी मानसिकता तयार होत असेल तर ते खूप धोकादायक आहे. नितीन गडकरींचा हा व्हिडीओ बघा, याच विषयावर त्यांनी भाष्य केलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

डोळे लक्ख उघडले माझे

अर्धवटराव
Fri, 03/22/2019 - 08:09 नवीन
एखाद्या प्रकरणात कारवाई करताना प्रत्येकाला कामं आखून दिलेली आहेत. जसं की जो व्हिक्टीम आहे त्याने तक्रार दाखल केली पाहिजे, ती पण वेळेत केली तर आरोपीला पटकन पकडता येतं. तक्रार दाखल केल्यावर शोधकार्य, पुरावे गोळा करणे वगैरे पोलिसांकडे आहे. नंतर त्या पुराव्यांच्या आधारे शिक्षा करणे कोर्टाच्या हातात आहे.
चौकीदारी प्रचाराच्या शिडात अजुन म्हणावं तसं वारं का शिरलं नाहि हे कळत नव्हतं... आता कळलं... प्रत्येकाला आखुन दिलेल्या कामात चौकीदाराला वगळण्यात आलं. त्यामुळे तो बसला बिचारा विडी ओढत. अवांतरः हिकमती वकीलांची लिस्ट थोडी त्रोटक वाटली. आमच्या फेव्हरेट लिस्ट मधे बारामतीकरांनंतर अगदी काहि नंबरांनी गडकरी साहेब पण येतात. किंबहुना बारामतीकरांच्या पदचिन्हांचा मागोवा घेणार प्रत्येक यात्री कधीना कधी आमच्या फेवरेट लिस्टमधे येतोच. त्यात मोदिही आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

नुसते डोळे लख्ख उघडून काय होणार...

ट्रेड मार्क
Fri, 03/22/2019 - 22:37 नवीन
डोळ्याकडून संदेश जिथे जातो ते अर्धवट उघडलं असेल तर उपयोग कसा होईल? बाकी तुम्ही चौकीदाराच्या काळजीने खंगू नका हो. चौकीदार आणि त्याचा साथीदार लै ड्याम्बीस आहेत, कुठे काय करतील याचा भरवसा नाही. तुम्ही आपली बारामतीकरांची काळजी घ्या, वय झालंय त्यांचं. त्यांना पंप्र बनवण्यासाठी पूर्ण फिल्डिंग लावा की. अवांतर मध्ये - हिकमती वकिलांची लिस्ट अशी नव्हती दिली, फक्त उदाहरणादाखल दोन नावं दिली. पण त्रोटक वाटत असेल तर तुम्ही नावं जोडायला माझी हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

धन्यवाद

अर्धवटराव
Fri, 03/22/2019 - 23:00 नवीन
आपल्या मार्गदर्शनासाठी मंडळ आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

तेच तर.. त्यांनी बुडवलेल्या

बाप्पू
Tue, 03/19/2019 - 22:56 नवीन
तेच तर.. त्यांनी बुडवलेल्या पैशाच्या दहापट जरी वसुली झाली तरी खांग्रेस वाले आणि गुलाम लोक हे " चौकीदार चोर है " असेच बोंबलत बसणार. आणि कोर्टात सिद्ध करायची वेळ आली कि xxx ला पाय लावून पाळणार.. मला असा वाटतंय कि काँग्रेस आणि एकूणच विरोधी पक्ष लोकांना आश्वासने किंवा समस्यांचे सोल्युशन देण्यापेक्षा मोदींची नकारात्मक इमेज बनवून मते मिळवू पाहतायेत. अगदी याउलट 2014 मध्ये मोदींचा प्रचार हा मुख्यतः जनतेला अश्वस्त करणे आणि समस्यांचे सोल्युशन देणे यावर बेस्ड होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

" चौकीदार चोर है "

अर्धवटराव
Wed, 03/20/2019 - 00:01 नवीन
चौकीदाराच्या चोरीची टिवटिव मी प्रत्यक्ष फॉलो करत नाहिए. पण जे काहि थोडंफार वाचण्यात येतं त्यामधे तरी या चोरीचा प्रतिवाद रिकव्हरी/जप्ती चे आकडे जोरकसपणे मांडुन केलेला दिसत नाहि. बाकि रेटुन बोलायची गुजराथी स्कील २०१४ मधे भरपूर बघितली आहे. २०१९मधे विरुद्धबाजुने त्याचा पुनःप्रत्यय आल्यास नवल वाटायला नको. शिवाय, सध्याच्या विरोधीपक्षाला त्याचा काहि फायदा होईल असं वाटत नाहि... झालं तर नुकसानच होईल. कुंपणावरचे, युपीएकडे सरकलेले लोकं परत मोदिंकडे वळल्याची काहि उदाहरणं स्वतः बघतोय. अर्थात, ति प्रातिनीधीक म्हणावी इतकी मोलाची नाहित :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

सेना भाजप युती व कोहिनूर जोड

गामा पैलवान
Tue, 03/19/2019 - 18:50 नवीन
लोकहो, अमित शहांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना व भाजप युतीची घोषणा केली. फारसे आढेवेढे न घेता चटकन युतीची घोषणा झाली. अमित शहांनी इतक्या सफाईदारपणे काम तडीस नेलं याबद्दल त्यांचं कौतुक आहे. घोषणेच्या वेळेस उद्धव ठाकऱ्यांच्या उजव्या बाजूस मनोहरपंत जोशी होते. गेल्या अनेक वर्षांपासून पंतांना शिवसेनेत काहीच काम नसतं असं लोकं म्हणतात. तरीपण या प्रसंगी त्यांना पाचारण करण्यात आलं. यावरून पंतांनी युतीसाठी पडद्याआड महत्त्वाची भूमिका बजावलेली असावीसं दिसतंय. ही भूमिका काय असावी याच्या विचारात होतो. तर जाणवलं की अमित शहांनी बहुधा निवडणुकीसाठी पैसा पुरवण्याची हमी घेतली असावी. नोटाबंदीनंतर अमित शहांच्या बँकेत बरीच रक्कम गोळा झाली होती असा आरोप केला जातो (संदर्भ : https://aajtak.intoday.in/story/amit-shah-bank-director-demonetisation-highest-amount-banned-notes-deposit-dat-1-1011145.html). तर तो खरा असण्याची शक्यता आहे. या तर्कास वरकरणी धक्का देणारी घटना काल घडली. पंतांचे चिरंजीव उन्मेष जोशी हे अन्यांसह हमीदार असलेल्या कोहिनूर शैक्षणिक न्यासाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ६८ कोटी रुपयांची कर्जफेड करता आली नाही म्हणे. पंतांसाठी सत्तरेक कोटी हा अत्यंत किरकोळ आकडा आहे. त्यामुळे उपरोक्त जप्ती ही लुटुपुटूची कारवाई वाटते. युतीमध्ये असा हा कोहिनूर जोड (= कनेक्शन) आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

निरव मोदीला लंडन मध्ये अटक !!

डँबिस००७
Wed, 03/20/2019 - 15:50 नवीन
बुधवार सकाळी निरव मोदीला लंडन मध्ये अटक करण्यात आलेली आहे. अटक झाल्यावर आता त्याला लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी हालचाली सुरु झालेल्या असतील ! ह्या बातमीने काँग्रेसच्या तोंडच पाणी पळालेल असेल !! https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/pnb-scam-nirav-modi-arrested-in-london/articleshow/68496764.cms
  • Log in or register to post comments

आझाद साहेब !

अर्धवटराव
Wed, 03/20/2019 - 18:53 नवीन
गुलामनबी आझाद साहेबांनी प्रतिक्रीया दिली आहेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

तोंडाला येईल ते बडबडणे हा आता

सुबोध खरे
Wed, 03/20/2019 - 19:02 नवीन
तोंडाला येईल ते बडबडणे हा आता काँग्रेसच्या नेत्यांचा स्थायीभाव झाला आहे. जर प्रत्यार्पणानंतर निरव मोदी भारतात आले तर ते तुरुंगातच असणार आणि त्यानंतर न्यायालयाच्या परवानगी शिवाय त्यांना देश सोडता येणार नाही. हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ असताना इतका धडधडीत खोटं बोलताना या माणसाला लाज कशी वाटत नाही याचेच आश्चर्य वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

तो गुलाब नबी आझाद नसून

बाप्पू
Wed, 03/20/2019 - 19:45 नवीन
तो गुलाब नबी आझाद नसून गुलाम - नाही आझाद आहे.. एखाद्या कुटुंबाची गुलामगिरी पत्करली कि मग त्यांचा अजेंडा पुढे नेण्यासाठी मग अशी विधाने करावी लागतातच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

समझोता एक्स्प्रेस स्फोट प्रकरणः सर्व आरोपींची मुक्तता

mayu4u
Wed, 03/20/2019 - 18:04 नवीन
समझोता एक्स्प्रेस स्फोट प्रकरणः स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता; पंचकुला येथील विशेष एनआयए न्यायालयाचा निर्णय
  • Log in or register to post comments

PNB scam: Nirav Modi arrested

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 03/20/2019 - 20:07 नवीन
PNB scam: Nirav Modi arrested in London, remanded in custody till March 29 कोर्टाने जामीन न स्विकारल्यामुळे नीरव मोदी आता पोलिस कस्टडीत आहे व त्याला पळून जाणे शक्य नाही.
  • Log in or register to post comments

"लंडनच्या कोर्टाबरोबर

तेजस आठवले
Wed, 03/20/2019 - 20:33 नवीन
"लंडनच्या कोर्टाबरोबर गुप्तपणे सेटिंग करून स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी निरव मोदीला भारतात आणण्याचा हा मोदींचा आंतरराष्ट्रीय कट आहे." बाकी, रागाने राफेलचा मुद्दा सोडला का अजून धरून ठेवलाय? बहेनजी आपल्या बरोबर नाहीत म्हणून खऱ्या बहेनजींना सोबत घेतलंय.अपयश आले तर खापर फोडायला कोणीतरी पाहिजे.
  • Log in or register to post comments

फासे कसे हि पडो.. रागा आणि

बाप्पू
गुरुवार, 03/21/2019 - 00:02 नवीन
फासे कसे हि पडो.. रागा आणि गुलाम स्क्रिप्ट घेऊन तयारच आहेत. निरव मोदी ला जेल झाली तर : मोदी लंडन कोर्ट आणि तेथील सरकार बरोबर सेटिंग करून निवडणुकीच्या तोंडावर असे निर्णय घेतायेत जेणेकरून मते मिळवता येतील. निरव मोदी सुटला किंवा काही कारवाई झाली नाही तर : मोदी सरकार निरव मोदीला वाचवतेय. बोलो चौकीदार चोर है... !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

अजमत अली हा समझोता एक्स्प्रेसच्या स्फोटातला प्रमुख संशयित आहे

गामा पैलवान
गुरुवार, 03/21/2019 - 01:34 नवीन
समझोता एक्स्प्रेस मधल्या ध्वमस्फोटाचा संशयित अजमत अली या पाकिस्तानी नागरिकास पोलिसांनी सोडून दिलं. याची कथा इथे आहे (इंग्रजी दुवा) : https://www.indiatvnews.com/news/india-samjhauta-express-blast-how-officials-connived-to-ensure-prime-accused-pakistani-national-was-let-off-despite-evidence-387479 या प्रकरणात पुढे असीमानंद, कर्नल प्रसाद पुरोहित व इतर हिंदूंना अडकवण्यात आलं. हिंदू आतंकवादाची भाकडकथा सोनिया गांधींच्या इशाऱ्यावरच रचलेली आहे. त्यांनीच अजमत अलीस मोकळं सोडलं हे वेगळे सांगणे नलगे. काँग्रेसला मत म्हणजे दहशतवादास प्रोत्साहन. -गा.पै.
  • Log in or register to post comments

तरी सुद्धा आज काँग्रेस चे

ट्रम्प
गुरुवार, 03/21/2019 - 20:19 नवीन
तरी सुद्धा आज काँग्रेस चे बोलके वकील कपिल सिब्बल यांनी ' हिंदू दहशतवादी निर्दोष आहेत तर बॉम्बस्फोट कोणी केले ? ' असा प्रश्न विचारुन पेटवायचा प्रयत्न केला व पाकिस्तानी मीडिया नी सिब्बलची री ओधुन भारतीय न्याय व्यवस्थेवर प्रश्नचीन्ह उभे केले .
  • Log in or register to post comments

धारातीर्थी पडलेल्या कोंग्रेसला

भंकस बाबा
गुरुवार, 03/21/2019 - 20:28 नवीन
संजीवनी बुटिची फार गरज आहे. सिब्बल साहेब असाच काहीतरी अंधारात तीर मारून बघत आहेत. एकतर साहेबाना अवघड जागेचे दुखणे झाले आहे, म्हणजे रागा हो! जो सहन होत नाही आणि सांगताही येत नाही. पण मानले पाहिजे यांच्या धाडसाला! नाहीतर अल्पसंख्यक कार्ड आजकाल जे फ्लॉप झाले आहे ते चालवायला बघत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

हिंदुस्थानात फक्त 15-20%

बाप्पू
गुरुवार, 03/21/2019 - 21:06 नवीन
हिंदुस्थानात फक्त 15-20% मातांना आकर्षित करण्यासाठी खांग्रेस या देश्याच्या मूळ संस्कृती, परंपरा, इतिहास, भूगोल या सर्वांना अजुन किती खड्ड्यात घालणार आहे??? कपिल सिब्बल यांनी हिंदू दहशतवादी हा शब्द वापरला?? अरे पण तुमच्याच मते दहशत वादाला धर्म नसतो ना?? ओह्ह... आत्ता लक्षात आले.. सॉरी हा खांग्रेसजण . ते वाक्य तुम्ही फक्त "त्या " धर्मासाठी राखीव ठेवले आहे हे लक्षातच आले नही . षंढ हिंदूनां अजूनही हा कावा लक्षात येत नसेल तर त्यांनी आत्तापासूनच पुस्तक पाठ करायला घ्या.. नाहीतरी तुमच्या पुढच्या पिढी ला मदरशात मागे पुढे डुलत तेच पाठांतर करावे लागणार असे वाटतेय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा