काचेच्या अलिकडून
बहुतेक वेळेला मी मान फिरवूनच घेतो
किंवा लक्ष नाही असं दाखवतो
नाहीच जमलं दुर्लक्ष करणं
तर मानेनेच नाही म्हणतो
आणि कधीकाळी दिलेल्या
दहा रूपड्याचं गणित मांडून
स्वतःचच समर्थन करतो...
पण खरं सांगायचं तर,
आत एक द्वंद्व चालू असतं
कारण मला पक्कं ठाऊक असतं की,
नकार,
अपमान,
एकटेपण,
तिरस्कार,
नाकारलेपण,
संघर्ष,
या शब्दांचे अर्थ
मला नाही कळणार कधीच....
ते कळतील
फक्त
गाडीच्या बंद काचेबाहेर असणा-या
आणि बेदरकार नजरेने आयुष्याशी दोन हात करत असणा-या
....त्या हिजड्याला
उत्तम रचना
सुरेख!
याची एक शशक होवू शकेल.
चाणाक्या...
छान कविता आहे , जरा हटके....
लेखन आवडले.
मागच्या आठवड्यात झी मराठी
अप्रतिम !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- RAW - Romeo Akbar Walter | Official Trailer |कविता मनाला भिडली
ह्म्म्म्म...
सुरेख!