जननि कर्मभूमिश्च....
आई आणि मातृभुमी ह्या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत, अशा अर्थाचे सुवचन आपल्याला ठाऊक आहेच. पण मनात एक विचार येतो, जगात असेही काही लोक नक्कीच होऊन गेले असतील की ज्यांनी आपले तन आणि मन स्वतःच्या जन्मभुमीपेक्षाही वेगळ्या अशा कर्मभुमीसाठी वेचले असेल. हरगोविंद खुरानांपासून ते स्वाती दांडेकरांपर्यंत आणि मनमोहन सिंग-अडवाणींपासून ते मुशर्रफ यांच्यापर्यंत अनेक नावे डोळ्यापुढे तरळून गेली. अशी भारंभार नावे जमा होऊ लागली तेव्हा काही चाळण्या लावून नावे गाळून घ्यायची, असे ठरवले.
एकूण तीन निकष लावले -
१) सदर व्यक्तीने आपल्या कर्मभुमीसाठी काही तरी भरीव, ठाशीव असे योगदान दिलेले असावे. कर्मभुमीच्या उत्कर्षाचा ध्यास धरलेला असावा. आणि त्यांच्या ह्या योगदानाची त्यांच्या कर्मभुमीतील तत्कालीन समाजाला जाणिवही असावी. केवळ कर्मभुमीत जाऊन पैसा, नावलौकिक आणि मानमरातब मिळवला, असे नको.
२) सदर व्यक्तीची जन्मभुमी आणि कर्मभुमी हे स्वतंत्र देश असावेत (निदान त्या व्यक्तीच्या जन्मवेळेस तरी), एकाच देशातील दोन प्रांत, असे नको.
३) सदर व्यक्ती आता हयात नसावी.
वरील चाळण्यातून बाहेर पडलेली ही चार "गाळीव" रत्ने -
नेपोलियन बोनापार्ट (१७६९-१८२१)
फ्रान्सला साम्राज्य बहाल करणारा हा पहिला सम्राट. एकेक देश पादाक्रांत करीत ह्याने फ्रेन्च ध्वज दूरवर पोचवला. फ्रान्सला वैभवाच्या शिखरावर नेले. असा हा लढवय्या अस्सल फ्रेन्च असेल असा कोणाचाही समज होईल. पण गमतीची गोष्ट अशी की त्याचा जन्म फ्रान्सचा तर नव्हताच पण त्याची मातृभाषादेखिल फ्रेन्च नव्हती!
इटली आणि फ्रान्स यांच्या दरम्यान असलेले कॉर्सिका हे चिमुकले बेट. आज हे रुढार्थाने फ्रान्सच्या ताब्यात असले तरी पूर्वी ते तसे नव्हते. इटलीच्या जिनोवा राज्याच्या ताब्यातील हे बेट फ्रान्सने पुढे पैसे देऊन विकत घेतले असले तरी कॉर्सिकन माणूस हा मनाचे कधिच फ्रेन्चमन झाला नाही. इतालियन आणि फ्रेन्चची सरमिसळ असलेली कॉर्सिकन ही भाषा खरेतर फ्रेन्चपेक्षाही इटालियनला जास्त जवळची. कॉर्सिका ही नेपोलियनची जन्मभुमी आणि इटालियन ही त्याची मातृभाषा. तरीही नेपोलियनने आपले आयुष्य बहाल केले ते फ्रान्ससाठी!
लॉर्ड बायरन (१७८७-१८२४)
तलवारीपेक्षाही लेखणी ही अधिक धारदार असते, असे म्हणतात. परंतु याचे जळजळीत प्रत्यंतर बायरनचे चरित्र वाचल्याशिवाय येत नाही. इंग्लंडमध्ये जन्मलेला, वाढलेला बायरन ग्रीसमध्ये येतो काय, तुर्की राजवटीखाली पिचत पडलेला एकेकाळचा वैभवशाली ग्रीस पाहतो काय आणि आपल्या लेखणीद्वारे ग्रीकांमध्ये स्वातंत्र्यज्योत पेटवतो काय. सगळेच चमत्कारीक! अगदी - "गीत माझे माझिया हातातली तलवार आहे" असे सुरेश भटांना, बायरनची कथा वाचूनच स्फुरले असावे अशी शंका येण्याइतपत चमत्कारीक!
खुद्द इंग्लंडमध्ये बायरनचा पुतळा असेल की नाही याची शंका आहे पण ग्रीसने मात्र बायरनचे पुतळे उभारले आहेत!
(जगातील पहिली प्रोग्रॅमर म्हणून जिचे नाव घेतले जाते ती ऍडा, ही बायरनची कन्या)
अडॉल्फ हिटलर (१८८९-१९४५)
जर्मनीला जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र बनविण्याची इच्छा बाळगणार्या हिटलरबद्दल आणखी फार काही लिहावे असे नाही. पण जर्मनीला आपला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी झटलेला हिटलर होता ऑस्ट्रीयन!
ऑस्ट्रीया, भाषा जर्मनच पण स्वतःचे वेगळेपण कायमच जपलेला देश. पूर्व आणि पश्चिम जर्मनी एक झाले पण ऑस्ट्रीया त्यांच्यात गेला नाही. वेगळाच राहिला. सर्वसामान्य ऑस्ट्रीयन माणसालाही जर्मन माणसाबद्दल किंचित तिटकाराच. पण त्यांच्यातलाच एक ऑस्ट्रीयन आपले आयुष्य देतो ते जर्मनीसाठी!
अर्नेस्टो "चे" गवारा (१९२८-१९६७)
एक सोडून दोन-दोन कर्मभुमी असणार्या चे गवाराचे आयुष्यच सनसनाटी. जन्माने अर्जेंटीनाचा पण लढला क्युबाच्या स्वातंत्र्यासाठी, फिडेल कॅस्ट्रोच्या खांद्याला खांदा लावून. क्युबा स्वतंत्र झाल्यावर, कॅस्ट्रो सरकारात मंत्री! पुढे मंत्रीपद आणि क्युबा दोन्ही सोडून बोलिवियाच्या स्वांतंत्र्य लढ्यात उडी आणि शेवटी बोलिवियातच सी आय ए कडून हत्या!
असा हा माणूस विरळाच!
डिस्क्लेमर - येथे सदर व्यक्तीची वैयक्तिक, राजकीय, सामाजिक मते. त्यांच्या कृत्याची योग्यायोग्यता यांचा विचार केलेला नाही. थोडक्यात, सदर व्यक्ती ह्या सर्वार्थाने "आदर्श" असतीलच असे नाही.
वर्गीकरण
मस्त लेख ...
छान लेख . .
बाप
मस्त लेख
छान..
मस्त
आपल्याला तर
मस्त
In reply to मस्त by अवलिया
+१
मदर तेरेसा
डॉ. खानखोजे
डॉ. द्वारकानाथ कोटणीस
छान लेख
अल्बर्ट
चांगला लेख
छोटासाच परंतु माहितीपूर्ण लेख आवडला.
छान लेख.
चांगला लेख
ओह.. ऍडा ही
In reply to ओह.. ऍडा ही by भाग्यश्री
चार्ली चाप्लिन
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
लेख
चौकटीबाहेरचा विचार
चार्ली चॅप्लीन
In reply to चार्ली चॅप्लीन by मयुरा गुप्ते
होय तेही
आभार!
असाच एक पारशीबावा
अजुन एक