लाज - स्पर्धेबाहेरची श श क

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
12 Feb 2019 - 9:51 am

दिवसभराच्या दगदगी नंतर राजबागेतून टिप्पूर चांदण्यातील फेरफटका हा षौक राजेसाहेबांना नेहमीच आनंद द्यायचा.
आजची धुंद रात्र काही वेगळीच होती. हवेत रातराणीचा मदमत्त गंध पसरला होता.
चालता चालता राजेसाहेब फुललेल्या रातराणीच्या जाळीजवळ जरासे रेंगाळले.
कोपर्‍यावरच्या झुडूपामागे काहीतरी खसफसले. थोडेसे जवळ जात राजेसाहेब ओरडले " कोण आहे रे तिकडे ".
झुडूपामागच्या बाकड्यावर एका युगूल दिसले. चेहरे ओळखीचे वाटले. प्रधानजी आणि राणीसाहेब.
क्षणभर तिघेही दचकले. राणीसाहेबानी चेहेर्‍यावर घुंगट ओढून घेतला.
अंधारात काहीच दिसले नाही अशा आविर्भावात राजेसाहेब तेथून दूर गेले.
त्याना मनाची नाही पण जनाची लाज नक्की होती .

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

12 Feb 2019 - 10:01 am | आनन्दा

मस्तंय

कुमार१'s picture

12 Feb 2019 - 10:13 am | कुमार१

छान !

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Feb 2019 - 12:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान कथा ! :(

मिर्च सिनेमा आठवला
https://en.m.wikipedia.org/wiki/Mirch

एकुलता एक डॉन's picture

16 Feb 2019 - 5:54 pm | एकुलता एक डॉन

ति पन्च तन्त्रत्लि गोष्त होति , उचललि

शलभ's picture

12 Feb 2019 - 9:24 pm | शलभ

राजबागेतून टिप्पूर चांदण्यातील फेरफटका हा षौक राजेसाहेबांना नेहमीच आनंद द्यायचा.

प्रधान आणि राणीला माहीत होतं राजा नेहमी येतो तरी ते ह्या वेळेला बागेत कसे. दया पता लगाव आखिर माजरा क्या है.

गवि's picture

12 Feb 2019 - 9:45 pm | गवि

छान.

स्वधर्म's picture

13 Feb 2019 - 12:36 pm | स्वधर्म

अावडली. स्पर्धेत पाठवली असती तरी चालली असती.

मराठी कथालेखक's picture

13 Feb 2019 - 1:44 pm | मराठी कथालेखक

छान

समीरसूर's picture

15 Feb 2019 - 3:01 pm | समीरसूर

आवडली. राजाला जे आवडतं ते राजा करतोय; राणीला जे आवडतं ते राणी करतेय...प्रधान मात्र फुकटचं लोणी खातोय... :-)

सत्य धर्म's picture

20 Feb 2019 - 1:40 am | सत्य धर्म

छान