✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान

अ — अज्ञात, Sat, 02/09/2019 - 19:48
हे दामोदरच्या सुता तुला कमळाचं वरदान एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान दिव्य तुझी संघभक्ती धन्य दाढी काया बालपणी गेलासी तू शाखेसी धराया हादरली ती जननी, थरथरले घरचे जन भाजपास येई मुर्छा लागे इलेक्शन अडवानीच्या रथावरती तुझे कलाकाम मंदिर प्रश्न उठवला, मिळे कमळा पंचप्राण मेक इंडियाच्या नावे रोम कधी लंका कुठे पिप्पाणी वाजवी, ड्रम कधी डंका सेल्फीची भरवी जत्रा अन हसती सर्व जन कोट तुला नऊ लाखांचा कुणी कधी घातला ? मश्रूमाचे सूप पिऊनी, झोला कुठे टाकला? खिशामध्ये अंबानी, अन अडाणी हे भगवान आले किती गेले किती संपले भरारा नेहरू गांधी सोडून काही उच्चारी चकारा गुलाबी आणल्या नोटा आम्ही झालो रे हैराण धन्य तुझे रामराज्य , धन्य संघसेवा पंधरा लक्ष बघता सारे उपाशी का देवा राहुल प्रियंका आले, आता काँग्रेसला मतदान ************************ ------------------------------------------- ओरिजिनल : अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेलासी तू सूर्याला धराया हादरली ही धरणी, थरथरले आसमान लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण तळहातावर आला घेऊनी पंचप्राण सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका तिथे रामनामाचा तू वाजविला डंका दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा धावत ये लवकरी आम्ही झालो रे हैराण धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा घे बोलावून आता कंठाशी आले प्राण -------------------------------------- **********************

प्रतिक्रिया द्या
18924 वाचन

💬 प्रतिसाद (20)

खतरनाक लिहिलंय राव काळ्या

प्रचेतस
Sat, 02/09/2019 - 19:59 नवीन
खतरनाक लिहिलंय राव काळ्या मांजरा. मजा आली.
  • Log in or register to post comments

एकदम भारी!

नावातकायआहे
Sat, 02/09/2019 - 22:14 नवीन
एकदम भारी!
  • Log in or register to post comments

फडतुस !! कॉपी करायची लिमीट

डँबिस००७
Sat, 02/09/2019 - 22:54 नवीन
फडतुस !! कॉपी करायची लिमीट आहे !!
  • Log in or register to post comments

पंधरा लाख, राहुल प्रियांका....

स्पार्टाकस
Sat, 02/09/2019 - 23:01 नवीन
धन्य तुझे रामराज्य , धन्य संघसेवा पंधरा लक्ष बघता सारे उपाशी का देवा राहुल प्रियंका आले, आता काँग्रेसला मतदान >>>>> अजून पंधरा लाखातच अडकला आहात का? त्याबद्दल इतके वेळा इतकं सारं स्पष्टं होवूनही पुन्हा तिथेच? साहेबांच्या लाडक्या 'सकाळ'मध्येही त्यावर खुलासा आला परवा. राहुल २०१४ मध्येही होताच ना?
  • Log in or register to post comments

जबरदस्त! सॉलिड!!!

व्ही. डी. सी.
Sat, 02/09/2019 - 23:03 नवीन
जबरदस्त! सॉलिड!!!
  • Log in or register to post comments

अरे.. व्ही सी डी..?? इकडे

बाप्पू
Sun, 02/10/2019 - 00:12 नवीन
अरे.. व्ही सी डी..?? इकडे कुठे?? आणि तुम्ही तर मोदीनां आणि रागा ला दोघांना पण सपोर्ट नाही करत ना?? मग इथे एवढे खूष का होताय???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्ही. डी. सी.

त्याचं काय आहे

नाखु
Sun, 02/10/2019 - 09:46 नवीन
बाप्पूराव पाग्याचा येळकोट जाईना! कपडा बदलला म्हणून आतला माणुस त्योच राह्यिल ना पावणं!! वाचकांची पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

बाप्पू

व्ही. डी. सी.
Sun, 02/10/2019 - 11:27 नवीन
आश्चर्य वाटायला काय झाले? राहुल गांधी वर असेच लिहिले तर त्याला सुद्धा माझी प्रतिक्रिया हि अशीच असणार, हे लक्षात ठेवा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

महसूस करिए दर्द उस महिला का

सुबोध खरे
Mon, 02/11/2019 - 00:15 नवीन
महसूस करिए दर्द उस महिला का जिसका बेटा नालायक हो, दामाद चोर हो और बेटी सास जैसी दिखती हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्ही. डी. सी.

माशाल्ला

रमेश आठवले
Mon, 02/11/2019 - 11:08 नवीन
बहुत खुब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माय नेम इज रागा

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 02/11/2019 - 13:02 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

माय नेम इज रागा

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 02/11/2019 - 13:03 नवीन
https://youtu.be/XxiEqDRZdTU राहुल गांधीवर सिनेमा येणार आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

वाह....

बाप्पू
Sat, 02/09/2019 - 23:05 नवीन
वाह.... या कलियुगात इतकी स्वामीभक्ती... डोळे पाणावले... खाल्या हाडकाला जागलीस ग काळी मांजर... !!!
  • Log in or register to post comments

काली मांजराणू

दीपक११७७
Sat, 02/09/2019 - 23:34 नवीन
जल्ला काली मांजराणू, ओरिजनलचं चांगल असा
  • Log in or register to post comments

कमांडो ब्लॅककॅट

रमेश आठवले
Sun, 02/10/2019 - 05:06 नवीन
राहुलच्या रक्षणासाठी कमांडो ब्लॅककॅट अवतरले देवा
  • Log in or register to post comments

प्रेरणा

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/10/2019 - 11:05 नवीन
http://www.misalpav.com/node/44075 ह्यांनी प्रेरणा दिली. हार तुला नवरत्नांचा ...... ह्याचे- कोट तुला नऊ लाखांचा झाले, आणि लगेच बाकीचेही तयार झाले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जबरा

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 02/11/2019 - 13:52 नवीन
हे व्हर्जनही आवडले रागा झाले नमो झाले ... आता पुढचा कोण? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

:D:D:D:D

खिलजि
Mon, 02/11/2019 - 16:51 नवीन
सहमत पै बु काकांशी .. पुढे कोण ?
  • Log in or register to post comments

पवारसाहेब ?

स्पार्टाकस
Mon, 02/11/2019 - 21:41 नवीन
पवारसाहेब ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

खुप छान

NAKSHATRA
Sat, 12/12/2020 - 10:13 नवीन
खुप छान
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा