Skip to main content

ग्लोबल वॉर्मिंग (देवद्वार छंद)

लेखक संदीप चित्रे यांनी सोमवार, 16/03/2009 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
पाहता पाहता काळ दारी आला सारी वसुंधरा संकटात….१ ऊतले मातले गर्वात नाचले बेफाम वागले सान थोर….२ वाहनांची रीघ जणू पाठशिव हवेचाच जीव घुसमटे….३ यंत्रांचा निघाला धूर काळा काळा प्लॅस्टिकचा मळा त्यात फुले….४ विज्ञानाने केली आपली प्रगती आणि अधोगती आपणच….५ पाहू एक स्वप्न करूया प्रयत्न जपूया हे रत्न पृथ्वी नामे….६ कापडी पिशवी प्लॅस्टिक ऐवजी जमे ही सहजी सुरूवात….७ मोटार गाडीला ठेवुनी बाजूला पायी पायी चला शक्य तेव्हा….८ लावू झाडे, वृक्ष माळरानी रूक्ष मुलांचे भविष्य तगवाया…. ९
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 4091
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

मस्त :) हवेचाच जीव घुसमटे….३ वा वा ... -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

हवेचा जीव घुसमटण्याची कल्पना आवडली. अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

आवडली कविता. आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!

सुंदर कविता. खरोखर अप्रतिमच. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

हवेचा जीव कल्पना आवडली! :) काही ठिकाणच्या यमकात थोडे प्रदूषण आहे ;) उदा. कापडी पिशवी प्लॅस्टिक ऐवजी जमे ही सहजी सुरूवात ऐवजी असे केले तर - कापडी पिशवी प्लॅस्टीक का हवी? सदा वापरावी हातोहात! चतुरंग

फारच छान कविता. मला वाटते हे काव्य अधिक लोकांपुढे जायला हवे. शक्यतोवर सकाळला पाठवा.

छान. (पण कवितेतून सामाजिक बदल सुचवताना प्रचारकी ढंग टाळणे फार कठिण असते ते जाणवले. "शेवटाची कडवी मी वेगळी कशी लिहिली असती" असा विचार करता, माझ्यापाशी सुचवणी नाही. तरी सरकारी कवितांमध्ये आणि तुमच्यासारख्यांच्या समर्थ कडव्यांमध्ये आणखी गुणात्मक फरक असावा, असेही वाटते.)

In reply to by धनंजय

मूळ मत आणि कंसातील मजकुराशी सहमत. अवांतर - विज्ञानाने केली, आपली प्रगती, आणि अधोगती, आपणच….५ - हे मला न उलगडलेले कोडे आहे. कायमचेच. विज्ञान आणि प्रगती-अधोगती यात आपण नेहमी विज्ञान माणसापासून वेगळे कल्पितो. प्रत्यक्ष ते तसे आहे का? तसे असेल तर प्रगतीचा दाता विज्ञान आणि अधोगतीचे निर्माता माणूस हे मान्य करावे लागेल. पण तसे नसेल तर... तर या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरतात. बाजू दोन आहेत म्हणून नाणी दोन ठरत नाहीत. लिन व्हाईट यांच्या 'द हिस्टॉरिकल रूट्स ऑफ अवर इकॉलॉजिकल क्रायसीस'ची नेहमी आठवण होते. त्यातील ख्रिश्चनिटीवरची टीका बाजूला ठेवून वाचल्यावर तर माणसाचा प्रभुत्त्वाचा सोस अधोरेखीत होत जातो. असो. हे अवांतरच आहे.

In reply to by श्रावण मोडक

कविता आवडलीच. मात्र श्री. मोडक यांचे विवेचन विशेष आवडले.

कविता आवडली... मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

हवेचा जीव घुसमटतोय, खरच एकदम सही कविता! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

वेगळी मस्त कविता... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

संदिप, कवितेचा विषय छान निवडला आहेस. कविता छानच :)

मस्त कविता अन चांगला प्रयत्न !!

आज याची तीव्र गरज आहे. अत्यंत उत्तम कविता तीही छदोबद्ध. छान. *चिरविजयी*

कवीता अतिशय आवडली. मिपाकरांनी संदेश म्हणुन तुमच्या नावसकट पाठवली तर हरकत नसावी ना?

In reply to by सहज

>> मिपाकरांनी संदेश म्हणुन तुमच्या नावसकट पाठवली तर हरकत नसावी ना? उलट आनंदच होईल :)

देवद्वार छंद मस्तच कविता आवडली.

संदीप......एकदम जबरी झालीये रे....... फार फार आवडली :) येऊ द्या अजून.

.