पाहता पाहता
काळ दारी आला
सारी वसुंधरा
संकटात….१
ऊतले मातले
गर्वात नाचले
बेफाम वागले
सान थोर….२
वाहनांची रीघ
जणू पाठशिव
हवेचाच जीव
घुसमटे….३
यंत्रांचा निघाला
धूर काळा काळा
प्लॅस्टिकचा मळा
त्यात फुले….४
विज्ञानाने केली
आपली प्रगती
आणि अधोगती
आपणच….५
पाहू एक स्वप्न
करूया प्रयत्न
जपूया हे रत्न
पृथ्वी नामे….६
कापडी पिशवी
प्लॅस्टिक ऐवजी
जमे ही सहजी
सुरूवात….७
मोटार गाडीला
ठेवुनी बाजूला
पायी पायी चला
शक्य तेव्हा….८
लावू झाडे, वृक्ष
माळरानी रूक्ष
मुलांचे भविष्य
तगवाया…. ९
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4091
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
+१
In reply to मस्त by लिखाळ
असेच म्हणतो
In reply to मस्त by लिखाळ
छान आहे
सुंदर
मस्तच रे संदीप!
यमकांत
In reply to मस्तच रे संदीप! by चतुरंग
फारच छान! - एक सुचना
धन्स
In reply to फारच छान! - एक सुचना by विकास
वेगळाच विषय
सहमत
In reply to वेगळाच विषय by धनंजय
+१
In reply to सहमत by श्रावण मोडक
छान कविता
कविता
कमाल!
मस्त.
वेगळी मस्त
मस्त
छान!!!
जागो
संदीप
हरकत नाही
In reply to संदीप by सहज
देवद्वार
भारी
.