[शशक' १९] - ग्लास

समीरसूर's picture
समीरसूर in स्पर्धा
1 Feb 2019 - 11:31 pm

केशवने चार ग्लास भरले. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं.

"आज जेवन झाल्यावर कोल्ड्रिंग पिऊ आपन...पोरांना आवडंल बघ. आपल्या गावात पानी नाय भेटत प्यायाला पण कोल्ड्रिंग लगेच भेटतयं! तेच पिऊन पाहू; कळंल तरी नुसतं प्यायासाठी आहे की पिकाला बी चालंल..." केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. गौरीने केशवकडे नुसतं पाहिलं आणि मुलांना हाक मारली.

"आये, शुभमनं माझं सर्टिफिकेट खराब केलं." कल्याणी रडू लागली.

"कसलं सर्टिफिकेट?" केशवने विचारले.

“शाळेत गनिताची एक स्पर्धा झाली होती. त्याच्यात दुसरा नंबर आला माझा, बाबा!"

केशव विचारात गुंतला.

"गौरी, काहीतरी गोडधोड कर. ते कोल्ड्रिंग नाय प्यायचं.”

गौरीने चमकून केशवकडे पाहिलं. केशव सगळे ग्लास मोरीत रिकामे करत होता.

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

1 Feb 2019 - 11:44 pm | ज्योति अळवणी

आवडली कथा

जव्हेरगंज's picture

2 Feb 2019 - 12:00 am | जव्हेरगंज

मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.

भिंगरी's picture

2 Feb 2019 - 5:17 am | भिंगरी

+1

सुचिता१'s picture

2 Feb 2019 - 12:53 am | सुचिता१

+१

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Feb 2019 - 9:24 am | ज्ञानोबाचे पैजार

कथा म्हणून चांगली असली तरी मन विषण्ण करुन गेली.
सकाळी सकाळी डोक्याल शॉट लागला
पैजारबुवा,

प्रचेतस's picture

2 Feb 2019 - 9:27 am | प्रचेतस

उत्तम.
शेतकरी आत्महत्येचा विषय खुबीने मांडल्यासारखा वाटला.

यशोधरा's picture

2 Feb 2019 - 9:50 am | यशोधरा

+१

तुषार काळभोर's picture

2 Feb 2019 - 1:12 pm | तुषार काळभोर

आधी हा अर्थ न कळल्याने कथा पाणचट (!) वाटली होती.
पण हे वाचलं अन् अंगावर काटा आला!!

शक्य असतं तर +१००^१०० दिले असते, पण फक्त नियम म्हणून +१

प्रशांत's picture

11 Feb 2019 - 1:01 pm | प्रशांत

वल्लीशी शमत

मतदान नंतर केले जाईल, तुर्तास नोंद घेतली आहे

ज्योति अळवणी's picture

2 Feb 2019 - 11:00 am | ज्योति अळवणी

आवडली

खिलजि's picture

2 Feb 2019 - 1:15 pm | खिलजि

कथा आवडली :::::::::::::)))))))))

चुकून स्माईली टाकली गेली . :(

प्रसाद_१९८२'s picture

2 Feb 2019 - 1:25 pm | प्रसाद_१९८२

:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2019 - 1:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुसर्‍यांदा वाचली तेव्हा समजली. छान कथा.

-दिलीप बिरुटे

वकील साहेब's picture

2 Feb 2019 - 1:54 pm | वकील साहेब

+1

बबन ताम्बे's picture

2 Feb 2019 - 2:09 pm | बबन ताम्बे

+१

नंदन's picture

2 Feb 2019 - 2:22 pm | नंदन

कथा आवडली.

यश राज's picture

2 Feb 2019 - 2:50 pm | यश राज

+1

मोहन's picture

2 Feb 2019 - 2:53 pm | मोहन

+१

लोथार मथायस's picture

2 Feb 2019 - 3:01 pm | लोथार मथायस

कथा आवडली

ओके कोल्ड्रिंक म्हणजे कीटकनाशक आणि ते संपूर्ण कुटुंब आत्म/हत्या करणार होते हे मला बर्याच उशिराने कळले...
+१

यशोधरा's picture

2 Feb 2019 - 5:22 pm | यशोधरा

सहमत.

दीपक सालुंके's picture

2 Feb 2019 - 4:17 pm | दीपक सालुंके

छान

जव्हेरगंज's picture

2 Feb 2019 - 10:32 pm | जव्हेरगंज

मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.

सिरुसेरि's picture

2 Feb 2019 - 4:19 pm | सिरुसेरि

+१ . छान .

जव्हेरगंज's picture

2 Feb 2019 - 7:09 pm | जव्हेरगंज

पर्फेक्ट!!

+१

नावातकायआहे's picture

2 Feb 2019 - 7:43 pm | नावातकायआहे

+१

रीडर's picture

2 Feb 2019 - 8:13 pm | रीडर

+1

मराठी कथालेखक's picture

2 Feb 2019 - 9:25 pm | मराठी कथालेखक

कोल्ड्रिंक म्हणजे विष आणि केशवचा आत्महत्येचा विचार हे मला प्रतिसाद वाचल्यानंतरच कळाले. कथा चांगली असली तरी सहज समजणारी असायला हवी होती. (इतरही काही वाचकांनी ती उशिराने समजली वा प्रतिसाद वाचून समजली हे नमूद केले आहे).
त्यामुळे हा फक्त प्रतिसाद...तुर्तास मत म्हणून मोजू नये.

दोन शब्दामधला, दोन ओळीमधला अन्वयार्थ समजून घ्यावा लागतो. शशक आवडली. धन्यवाद.

जव्हेरगंज's picture

2 Feb 2019 - 10:33 pm | जव्हेरगंज

मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.

गामा पैलवान's picture

2 Feb 2019 - 9:52 pm | गामा पैलवान

+१.

सुखान्त शेवट आहे. म्हणून कथा आवडली. :-D

तूर्तास इतकंच.

-गा.पै.

चांदणे संदीप's picture

3 Feb 2019 - 8:02 am | चांदणे संदीप

+१
मला तरी लगेचच कळाली पण प्रतिसाद उशिरा देत आहे. लेखक महोदयांना उत्कृष्ट शशक वाचण्यास दिल्याबद्दल धन्यवाद. (लोकांना कथा कळली नाही याचा अर्थ लेखक तेच आहेत का? पळा आता...! ;))

Sandy

पलाश's picture

3 Feb 2019 - 8:30 am | पलाश

+१.
कथा आवडली.

किसन शिंदे's picture

3 Feb 2019 - 9:29 am | किसन शिंदे

+१

दादा कोंडके's picture

3 Feb 2019 - 5:37 pm | दादा कोंडके

दुर्दैवाने प्रतिसाद वाचून कथेचा अर्थ कळला पण तरीही +१

नीळा's picture

3 Feb 2019 - 8:12 pm | नीळा

+१

उपेक्षित's picture

3 Feb 2019 - 8:25 pm | उपेक्षित

+१

वास्तवदर्शी.

मौनी's picture

3 Feb 2019 - 9:16 pm | मौनी

+१

स्मिता.'s picture

4 Feb 2019 - 12:20 am | स्मिता.

+1

राजाभाउ's picture

4 Feb 2019 - 11:18 am | राजाभाउ

+१

गौतमी's picture

4 Feb 2019 - 12:08 pm | गौतमी

+१

कुमार१'s picture

4 Feb 2019 - 12:57 pm | कुमार१

+१

चिगो's picture

4 Feb 2019 - 2:36 pm | चिगो

+१.. सकस कथा.

कसले भारी लेखक आहेत मिपावर.. व्वा..

रिम झिम's picture

4 Feb 2019 - 3:45 pm | रिम झिम

+१

नरेश माने's picture

4 Feb 2019 - 4:46 pm | नरेश माने

छान कथा! +१

ही एक सोडली तर बाकी सार्‍या शशक तद्दन भिकार आहेत.

लौंगी मिरची's picture

6 Feb 2019 - 12:03 pm | लौंगी मिरची

हाहाहा . छान जोक मारता राव . =))

लौंगी मिरची's picture

5 Feb 2019 - 2:51 am | लौंगी मिरची

छान . +१