Skip to main content

[शशक' १९] - ग्लास

लेखक समीरसूर यांनी शुक्रवार, 01/02/2019 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
केशवने चार ग्लास भरले. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं. "आज जेवन झाल्यावर कोल्ड्रिंग पिऊ आपन...पोरांना आवडंल बघ. आपल्या गावात पानी नाय भेटत प्यायाला पण कोल्ड्रिंग लगेच भेटतयं! तेच पिऊन पाहू; कळंल तरी नुसतं प्यायासाठी आहे की पिकाला बी चालंल..." केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. गौरीने केशवकडे नुसतं पाहिलं आणि मुलांना हाक मारली. "आये, शुभमनं माझं सर्टिफिकेट खराब केलं." कल्याणी रडू लागली. "कसलं सर्टिफिकेट?" केशवने विचारले. “शाळेत गनिताची एक स्पर्धा झाली होती. त्याच्यात दुसरा नंबर आला माझा, बाबा!" केशव विचारात गुंतला. "गौरी, काहीतरी गोडधोड कर. ते कोल्ड्रिंग नाय प्यायचं.” गौरीने चमकून केशवकडे पाहिलं. केशव सगळे ग्लास मोरीत रिकामे करत होता.

वाचने 49528
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

In reply to by ज्योति अळवणी

मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.

+१

कथा म्हणून चांगली असली तरी मन विषण्ण करुन गेली. सकाळी सकाळी डोक्याल शॉट लागला पैजारबुवा,

उत्तम. शेतकरी आत्महत्येचा विषय खुबीने मांडल्यासारखा वाटला.

In reply to by प्रचेतस

+१

In reply to by प्रचेतस

आधी हा अर्थ न कळल्याने कथा पाणचट (!) वाटली होती. पण हे वाचलं अन् अंगावर काटा आला!! शक्य असतं तर +१००^१०० दिले असते, पण फक्त नियम म्हणून +१

In reply to by प्रचेतस

वल्लीशी शमत

आवडली

कथा आवडली :::::::::::::)))))))))

:(

दुसर्‍यांदा वाचली तेव्हा समजली. छान कथा. -दिलीप बिरुटे

+1

+१

कथा आवडली.

+1

+१

कथा आवडली

ओके कोल्ड्रिंक म्हणजे कीटकनाशक आणि ते संपूर्ण कुटुंब आत्म/हत्या करणार होते हे मला बर्याच उशिराने कळले... +१

छान

In reply to by दीपक सालुंके

मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.

+१

+1

कोल्ड्रिंक म्हणजे विष आणि केशवचा आत्महत्येचा विचार हे मला प्रतिसाद वाचल्यानंतरच कळाले. कथा चांगली असली तरी सहज समजणारी असायला हवी होती. (इतरही काही वाचकांनी ती उशिराने समजली वा प्रतिसाद वाचून समजली हे नमूद केले आहे). त्यामुळे हा फक्त प्रतिसाद...तुर्तास मत म्हणून मोजू नये.

In reply to by सुधीर कांदळकर

मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.

+१. सुखान्त शेवट आहे. म्हणून कथा आवडली. :-D तूर्तास इतकंच. -गा.पै.

+१ मला तरी लगेचच कळाली पण प्रतिसाद उशिरा देत आहे. लेखक महोदयांना उत्कृष्ट शशक वाचण्यास दिल्याबद्दल धन्यवाद. (लोकांना कथा कळली नाही याचा अर्थ लेखक तेच आहेत का? पळा आता...! ;)) Sandy

+१

दुर्दैवाने प्रतिसाद वाचून कथेचा अर्थ कळला पण तरीही +१

+१

+१

+1

+१

+१

+१

+१.. सकस कथा. कसले भारी लेखक आहेत मिपावर.. व्वा..

+१

मत ग्राह्य धरावे. चिन्ह टंकण्यास अडचण येत आहे.

+१

+१

आवडली!

+१ Sandy

+१

+१ सरबतांचे रहस्य प्रतिसादातून लक्षात आले त्यामुळे परिस्थितीतील दाहकता फार अंगावर आली. कथेतच सरबताचे रहस्य सूचकतेने उलगडले असते तर अधिक आवडले असते.

केशवने चार ग्लास भरले. ४ बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं. ५ "आज जेवन झाल्यावर कोल्ड्रिंग पिऊ आपन ६ पोरांना आवडंल बघ. ३ आपल्या गावात पानी नाय भेटत प्यायाला ६ पण कोल्ड्रिंग लगेच भेटतयं! ४ तेच पिऊन पाहू; ३ कळंल तरी नुसतं प्यायासाठी आहे. ५ की पिकाला बी चालंल..." ४ केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. ६ गौरीने केशवकडे नुसतं पाहिलं ४ आणि मुलांना हाक मारली. ४ "आये, शुभमनं माझं सर्टिफिकेट खराब केलं.६ कल्याणी रडू लागली. ३ "कसलं सर्टिफिकेट?" केशवने विचारले. ४ “शाळेत गनिताची एक स्पर्धा झाली होती. ६ त्याच्यात दुसरा नंबर आला माझा, बाबा!" ६ केशव विचारात गुंतला. ३ "गौरी, काहीतरी गोडधोड कर. ४ ते कोल्ड्रिंग नाय प्यायचं.” ४ गौरीने चमकून केशवकडे पाहिलं. ४ केशव सगळे ग्लास मोरीत रिकामे करत होता. ७ मी वरीलप्रमाणे मोजले त्याप्रमाणे १०१ शब्द होतात.

In reply to by ऋतुराज चित्रे

केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. ६......... यातला " किंचित" काढून टाका आणि... केशव खिन्नपणे गौरीशी बोलत होता...... असे वाचा.... हाका नाका!

In reply to by ऋतुराज चित्रे

सहमत.. नियमात जरा हुकली! चांगली आहे खरतर पण प्रतिसादातूनच विषय कळाला.. कथेत फारसे क्लु नव्हते विषय कळायला, असे माझे तरी मत...

+१

+1

+११

मस्तच !