✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हेल्मेटसक्ती

प
प्रकाश घाटपांडे यांनी
गुरुवार, 11/13/2014 - 09:31  ·  लेख
लेख
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
136542 वाचन

💬 प्रतिसाद (360)

प्रतिक्रिया

आम्ही पुणेरी पगडी घालू पण

मदनबाण
Mon, 01/07/2019 - 19:34 नवीन
आम्ही पुणेरी पगडी घालू पण हेल्मेट नाही म्हणजे नाही ! =)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- हुस्न परचम... ;) :- ZERO
  • Log in or register to post comments

गाडी चालवताना हेल्मेट वापरणे

सुबोध खरे
Mon, 01/07/2019 - 20:32 नवीन
गाडी चालवताना हेल्मेट वापरणे सक्तीचे केले असले तरी डोके वापरणे अजूनही ऐच्छिकच आहे काळजी नसावी. एक पुणेकर ))=((
  • Log in or register to post comments

हेल्मेट सक्ती अशीही एक बाजू

चौकटराजा
Tue, 01/08/2019 - 18:44 नवीन
भारत देशांत फूटपाथ , अतिक्रमण ,खड्डे , अशास्त्रीय स्पीडब्रेकर , उघडे मॅनहोल , २४ तास सिग्नलची आवश्यकता , पोलिसांचा वाहतूक नियंत्रणात मनापासून सहभाग यावर सर्व जबाबदाऱ्या सरकारवर आहेत व त्या पार न पाडल्यास सरकारी नोकरांना अमुक एक शासन अशी काही सोय या निमिताने होण्याचे युग सुरू होईल अशी आशा आपण करू या ! कारण देश सर्वाचा आहे तो नुसत्या नागरिकांचा नाही सरकार व नोकर शाहीचा ही आहे !
  • Log in or register to post comments

उघडे मॅनहोल -- यात बरेच वेळेस

सुबोध खरे
Tue, 01/08/2019 - 20:10 नवीन
उघडे मॅनहोल -- यात बरेच वेळेस त्याची लोखंडी झाकणे चोरीस जातात. मग ते स्थानिक स्वराज्य संस्थेस कळवण्यात जितका उशीर लागेल तितका वेळ ते झाकण लावण्यात जातो. त्यातून त्या गोष्टींची कंत्राटे दिलेली असतात. हे कंत्राटदार आणि खुर्चीचे राखणदार यांचे साटे लोटे असतात. याला मुंबईत अँप निघाले आहे त्यावर तक्रार केल्यास काम बरेच लवकर होते असा अनुभव आहे. फुटपाथ आणि अतिक्रमण-- यावर कार्यवाही केली तर अतिक्रमण करणारा एक मोठा मतदार गट असल्याने कार्यवाही करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली होते तेंव्हा ते ठेविले अनंते तैसेचि राहावे या वृत्तीचे असतात. पोलिसांचा वाहतूक नियंत्रणात मनापासून सहभाग-- यात मुळात भारतात पोलिसांची संख्या हि तळाच्या ५ देशात इतकी कमी आहे. त्यातून एकंदर पोलीस संख्या २२.८ लाख असायला हवी त्यात ५.६ लाख पदे (२५ %) भरली गेलेली नाहीत. महाराष्ट्रात १ लाख लोकसंख्येसाठी १७० पोलीस आहेत. आणि १०० चौ किमी परिसरा साठी ६४ पोलीस आहेत. आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवायची हे अजून लफडं श्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या मुलीला ५२ सुरक्षा रक्षक पुरवले गेले होते https://indianexpress.com/article/india/maharashtra/rti-says-812-personnel-deployed-for-security-of-84-vips-in-maharashtra/ उरलेल्या तुटपुंज्या संख्येत वाहतूक नियंत्रण शाखेत किती पाठवणार? २४ तास सिग्नलची आवश्यकता-- २४ तास सोडा हो पुण्यात दिवसा ढवळ्या सिग्नल तोडणाऱ्या माणसांची संख्या एका महिन्यात लाखात जाईल. बाकी स्पीड ब्रेकर शास्त्रीय कि अशास्त्रीय हे कुणी ठरवायचे? आपल्या लोकांना शिस्त हि मूलतःच नाही. त्यातून गुन्हे सिद्ध करणे अवघड असते आणि सापडले तरी पोलिसांशी चिरीमिरी देऊन सुटल्यावर लाज वाटण्याऐवजी आपण शेखी मिरवणारे लोक आहोत.नियम पाळण्यापेक्षा तो तोडण्याकडेच आपला कल असतो. आपण आपले कर्तव्य करतंच नाही पण दोष दुसऱ्यावर ढकलण्यात मात्र सर्वात पुढे आहोत असे नाईलाजाने म्हणावे लागते.

आपल्या लोकांची अमर्यादित लोकशाहीची लायकी तरी आहे का?

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

सरकारवर वचक ठेवायला सशक्त,

डँबिस००७
Fri, 01/18/2019 - 13:57 नवीन
सरकारवर वचक ठेवायला सशक्त, धोरणी व सामाजीक जाणिव असलेला विरोधी पक्ष असावा लागतो, त्याच प्रमाणे सरकारी नोकरशाही सुद्धा नम्र, कार्यक्षम व सामाजीक भान असलेली असावी, पण प्रत्यक्षात मात्र हे दोन्ही पक्ष या किमान मर्यादेच्या जवळपास सुद्धा येत नाहीत , त्यापुढे त्या दोघांवर वचक / अंकुश असा कोणाचाच राहीलेला नाही , म्हणुनच सुप्रिम कोर्टाला सर्वात दखल द्यावी लागत आहे , ह्या वर उपाय म्हणजे जनतेने दबाव गट निर्माण केले पाहीजेत , सरकारवर विरोधी पक्षावर तसेच सरकारी बाबुंवर नजर ठेवली पाहीजे ! सरकार बदलणे तरी जनतेच्या हाती असते पण विरोधी पक्षाला काहीच अंकुश नाही म्हणूनच स्वतः बेल वर बाहेर फिरणारा युवराज देशाच्या पंत प्रधानांना चौकीदार चोर है अस म्हणु शकतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

ज्या कंपनीची बाईक आहे त्याच कंपनी ल सरकार हेल्मेट विकणे का सक्ती

Rajesh188
Fri, 01/18/2019 - 13:06 नवीन
लोकांच्या मनात सरकारच्या हेतू विषयी शंका आहे त्यामुळे हेल्मेट सक्तीला लोकांचं विरोध आहे . पहिली गोष्ट बाईक बनवणारी कंपनी हेल्मेट का बनवत नाही तशी सक्ती सरकार का करत नाही . हेल्मेट बनवणाऱ्या कंपनीशी सरकारच लागेबांधे आहेत हा अर्थ आहे का त्याचा ?खूप लोकांची शंका आहे दुसरा पॉइंट फक्त हेल्मेट नी दुचाकी स्वराचा जीव सुरक्षित असतो की डोक्या बरोबर पाय हात आणि बाकी अवयव सुधा त्याच्याच व्यक्तीच्या शरीराचे अवयव आहेत आणि महत्वाचे आहे त्यांच्या सुरक्षेचं काय . हेल्मेट न वापरलं तर फक्त न वापरणाऱ्या व्यक्तीचा जीव धोक्यात येतो बाकी लोकांचं नाही .त्यामुळे तो त्याचा personal प्रश्न आहे . हेल्मेट पेक्षा दारू पिवून गाडी चालवणे , Lane chi शिस्त न पाळणे अतिवेगाने गाडी चालवणे सिग्नल तोडणे. नो एन्ट्री मध्ये प्रवेश करणे . गाडी चालवण्याचा पूर्ण प्रशिक्षण नसताना गाडी चालवणे आणि आशा खूप कारण मुळे बाकी लोकांचं जीव धोक्यात येतो आणि हे सर्व गुन्हे खूप गंभीर आहेत . वरील सर्व कारण मधील ऐका कारणांनी जरी कोणाचा जीव गेला तर तो चालक फाशी सारख्या गंभीर गुन्ह्याचा आरोपी आहे हे न ठरवता . कोणाला कसलाच त्रास नसलेल्या हेल्मेट का निशाणा बनवला जातो आहे
  • Log in or register to post comments

कोणाला कसलाच त्रास नसलेल्या

विशुमित
Fri, 01/18/2019 - 17:05 नवीन
कोणाला कसलाच त्रास नसलेल्या हेल्मेट का निशाणा बनवला जातो आहे >>> ==>>आंखो देखी- हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वार, ट्रॅफिक पोलिसांसमोर सिग्नल तोडून गेला पण त्याच्यावर काही कारवाई केली गेली नाही. पण एक बिचारा त्याच सिग्नलला झेब्रा क्रोससिंगच्या पाठीमागे सिग्नल सुटायची वाट पाहत होता, त्याला मात्र मामांनी गपकन पकडलं. गयावया करत होता. "पेट्रोलला पैसे ठेवलेत. पुढचा पगार झाल्यावर नक्की घेणार आहे हेल्मेट." हुकमाचा तावेदार सोडतंय वय! असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

थोडंसं विषयांतर होत आहे पण गाडी शी संबंधित प्रश्न

Rajesh188
Mon, 01/21/2019 - 22:50 नवीन
आपल्या कडे गाडी चलवण्या साठी परवाना दिला जातो तसा तो जगात सर्वच देशात दिला जातो . पण प्रत्येक देशाचे वाहन परवाना देण्याविषयी आसले नियम वेगळे आहेत . आपल्या कडे वाहन परवाना देताना जुजबी वाहतूक चिन्ह ओळखणे ,थोडी गाडी चालवून दाखवणे आणि डोळ्यांची तपासणी ( पण ही प्रामाणिक पने केली जात नाही फक्त सोपस्कार म्हणून पार पडली जाते ) हयात कुठेच मानसिकता तपासली जात नाही .आता विज्ञान खूप पुढे गेलेले आहे त्याचाच वापर करून गाडी चालवताना ती व्यक्ती कसा विचार करू शकेल हे तपासता येवू शकत . कारण गाडी चालवताना ती चालवणाऱ्या व्यक्तीच्या मानसिकतेवर aacident होणे आणि नियम मोडणे अवलंबून आहे . Simulator var test घेवून आपण ते तपासू शकू .म्हणजे ऐका ठिकाण वरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेळेचं बंधन घालून ती प्रवास त्या व्यक्तीला पूर्ण करण्यास सांगणे आणि त्याच दरम्यान रस्त्या वर truck पासून पायी चालणाऱ्या व्यक्तीचे अडधाळे निर्माण करू त्या व्यक्तीचा मेंदू कसा प्रतिसाद देतो आहे आणि अपघात ल karnibhu होणारे निर्णय तो वेळेचं बंधन ही अट पूर्ण होण्यासाठी घेतोय का हे चेक करता येईल .आणि परवाना नाकारता येईल . आस्याच प्रकारची परीक्षा प्रश्न बदलून घेता येईल त्यामुळे चांगली mature मानसिकता असणाऱ्या लोकांचं परवाना मिळेल .आणि त्या व्यक्ती नक्कीच वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या असतील
  • Log in or register to post comments

हेल्मेट सक्तीच्या विरोधात पुणेकर

प्रकाश घाटपांडे
Sun, 01/27/2019 - 09:42 नवीन
  • Log in or register to post comments

व्वा...

मोदक
Wed, 01/30/2019 - 15:16 नवीन
व्वा... आता सीटबेल्टला विरोध, सर्वप्रकारच्या इन्श्युअरन्सला विरोध, गाडी चालवताना मुक्त मोबाईल वापर चळवळ आणि कोणतेही नियम पाळण्याला विरोध असे नवीन नवीन विरोध शोधून काढा आणि घोषणा द्यायला सुरू करा. व्हिडीओ दिसत नाहीये. सरकारचा हात असेल याच्या मागे. आणि हो.. सरकारी दडपशाहीला विरोध म्हणून इंटरनेट बंदी चळवळही सुरू करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा