हेल्मेटसक्ती
अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हेल्मेट मुळे डोक्यावरचे केस
हेल्मेट मुळे डोक्यावरचे केस खुप झपाट्याने गळतात. हे खरे आहे का?-- असू शकते, कारण हॉलिवूड चित्रपटात हॅलमेटधारी बाईकर्स गॅंगचे जे सदस्य दाखवतात, त्यातले बहुतावंशी टकले असतात.बरेच लोक हेल्मेट घातल्यामुळे
अपघातप्रसंगी हेल्मेट नसल्यास
एखाद्या "माणसाच्या दीड
हे दीड शहाणे जेव्हा दारू पिऊन
हेल्मेट घातल्यामुळे जीव वाचला
याला म्हणतात विचित्र
हे पण आत्ता, इतक्या दळणानंतर,
हेल्मेट न घालण्यामुळे
अश्या बेजबाबदारपणाचा खर्च
म्हणजे, सरळ सोपा आणि तार्किक
हेल्मेट न घातल्यामुळे कुणाचा
आपल्याकडे लोकशाही म्हणजे
आपल्याकडे लोकशाही म्हणजे "स्वातंत्र्य" नव्हे तर "स्वैराचार" झाला आहे.+१०० हेच लोक "विचारवंत" परदेशांत जाऊन आले की, "काय भारी कायद्याचे राज्य आहे" म्हणून तोंड फाटेपर्यंत स्तुती करत असतात आणि, "आपल्याकडे कधीतरी असे होईल काय?" अशी खंत करत असतात... तिकडचे बहुसंख्य नागरिक कायदा पाळणारे असतात, कायदा पाळू नका असे सांगणार्या "तथाकथित विचारवंतांवर" कायदेशीर कारवाई होते आणि कायदा पाळला नाही तर कायद्याचा बडगा पाठीत बसतो, इकडे मात्र सोईस्करपणे दुर्लक्ष करतात ! आताच टीव्हीवर पुण्यातल्या हेल्मेटसक्ती* विरोधात उधळलेली विचारसुमने पाहून, माझे काही जगभराचा दीर्घ अनुभव असलेले मित्र (ज्यांच्या ज्या मताला मी विरोध करत असतो), "भारतिय लोक लोकशाहीला लायक नाहीत", असे म्हणत असतात, ते खरे आहे की काय, असा संभ्रम निर्माण झाला. :( जे आता हेल्मेटला विरोध करत आहेत ते, पुण्यात दुचाकीचालक गाडी किती धोकादायक पद्धतीने चालवत असतात, चौकात सतत चारचाकीला दोन्ही बाजूंनी कट मारून जात असतात, रहदारीतून कसे नागमोडी जात असतात, बेमुर्वतपणे दुचाकी फुटपाथवरून चालवत असतात, सिग्नल तोडून जातात, थांबलेच तर झेब्रा स्ट्राईप्सवर थांबतात आणि पादचार्यांना अडचण करत असतात, इत्यादी गोष्टींबाबबत पूर्णपणे अंध असल्यासारखे बोलत होते. त्यांच्यामते हेल्मेट घालणे हाच जगातला सर्वात मोठा जुलूम आहे ! "हेल्मेट नसल्यामुळे अपघात होऊन माणूस मेला/अपंग झाला तर आम्ही आमचे बघून घेऊ. सरकारला कशाला हवी त्याची काळजी?" असे मतही ठासून सांगितले जात होते. हे सगळे ऐकून हसावे की रडावे कळत नव्हते. :( याशिवाय, राजकिय पक्ष या घटनेचा आपल्या पक्षाचे नाव घेत पुरेपूर फायदा उठवत आहेत, हे उघडपणे दिसत आहे. आमच्या पक्षाने कशी याआधी हेल्मेटपासून लोकांची सुटका केली होती आणि आताही आमचा पक्ष अजून जोरदार आंदोलन कसे चालू ठेवेल, याबाबत वल्गना चालू होत्या. सर्वात वाईट असे की, एकट्या पुण्यात भारतातील २५% दुचाकी अपघात होतात, हे वार्ताहर सांगत होता तिकडे लक्ष द्यावे असे त्यांना वाटत नव्हते ! भारतात लोकांच्या बर्यावाईट भावनांना हात घालून, त्यांना आपल्या राजकिय उद्येशांसाठी 'कॅनन फॉडर' बनवणे, हे नेहमीचे झाले आहे. आणि काही लोकांनाही त्यातही मजा वाटते आहे ! :( ++++++++ * खरे तर याला हेल्मेटसक्ती म्हणणे हाच विपर्यास आहे, कारण, खरा प्रकार असा आहे की, "खूप जुन्या कायद्याची पोलिसांनी, असंख्य वेळा पुरेशी पूर्वसूचना देऊन, मगच अंमलबजावणी करणे सुरु केलेले आहे".* खरे तर याला हेल्मेटसक्ती
तुमचे उत्तर उपयुक्तते बाबत
प्र घा जी म्हणणे पटतय
मजबूत हेल्मेट पण वजनाला हलके
वाहतुकीचे अन्य नियम न
घरात फरशी वरुन पाय घसरुन
घरात फरशी वरुन पाय घसरुन पडल्याने ब्रेन हॅमरेज झाल्याने मृत्यू होतातच. प्रमाण कमी असेल पण आहे.आता याचा इथे चाललेल्या चर्चेशी ओढूनताणूनही काही संबंध आहे का? घाटपांडेसाहेब, असे काहीबाही लिहून, तुमच्या तर्कशास्त्रिय क्षमतेबद्दल, वाचकांच्या मनात, दाट संशय निर्माण करत आहात, हे आपल्या लक्षात येत आहे का? :)पुणेकर सहजासहजी कोणालाही डोक्यावर घेत नाहीत.....
योगायोग
कुमार केतकरांना योगायोगावर
चर्चेसाठी असा प्रकार घडला असे
हेल्मेटचा कायदा अनेक
मस्त
यात योगायोग काय आहे?
डॉक्टर, भरतीची निदान कल्पना
"एका फोन वरून हे काम होऊ शकतं
"एका फोन वरून हे काम होऊ शकतं
अभ्या सर, तुम्ही सांगितलेले
मराठी माणूस आणि धंदा यावर न
@ प्रकाश घाटपांडे आणि अभ्या..
नागरिकांनी दर वेळेस दुसरीकडे बोट दाखविण्याऐवजी आपण आपली जबाबदारी पाळायचे ठरवले तर भारतातले ९०% गैरप्रकार थांबतील व नागरिकांच्या म्हणण्याला वजनही येईल... एकमेकाकडे बोटे दाखवर राहिल्यास असे प्रकार वाढतच राहतील.याचे उत्तर वर दिलेले आहे. तरीही अजून जरा इस्काटून सांगायची गरज आहे असे वाटते... व्हॉटाबाऊटरी करून आपणही समस्येचा भाग होण्यामध्ये आपले बुद्धीचातुर्य खर्च करण्यापेक्षा, तेच बुद्धीचातुर्य वापरून, "आपण सुजाण नागरीक होऊन पोलीस व प्रशासनाला लाज वाटेल असे वागू " असे सांगताना "तथाकथित विचारवंत व जाणकार नागरिक" का दिसत नाहीत बरे ? सद्या, तथाकथित विचारवंतांचा हेतू, प्रश्न सोडविण्यापेक्षा जास्त, व्हॉटाबाऊटरी करून प्रश्न चिघळत ठेवून आपले नाव माध्यमांत झळकत ठेवण्याकडे आहे, असेच दिसत आहे. हेल्मेटसक्ती बंद झाली की हे विचारवंत गायब होतात आणि नंतर कोणी कायद्याची अंमलबजावणी सुरू केली की जोमाने पुढे येतात. या मधल्या भागात नागरिकांचे शिक्षण करणे त्यांची जबाबदारी नसते का? की फक्त नियमांविरुद्ध आंदोलने करून आपले नाव माध्यमांत झळकवणेच त्याचे उदिष्ट्य असते ?! त्यांच्याकडे प्रश्न असतात, व्हॉटाबाऊटरी तर जबरदस्त असते... पण, "स्वतःची/नागरिकाची जबाबदारी + सरकारची जबाबदारी" घेऊन बनवलेले समस्येचे उत्तर मात्र नेहमीच गायब असते ! "सरकारने/दुसर्याने त्याचे १००% काम करावे, मगच आम्ही आमच्या जबाबदारीचा विचार करू" ही रणनिती, समस्या अनंत काळासाठी चिघळत ठेवण्यासाठी, सर्वोत्तम उपाय असते, हेवेसांन. :( असे तथाकथित विचारवंत लोक सर्वच समाजात असतात. मात्र, जेव्हा त्यांची सोईस्कर री ओढून, आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुजाण म्हणवणार्या हुशार नागरिकांकडून केला जातो, तेव्हा ती स्थिती फारच चिंतनिय असते.मी गप्प कसा बसू ... ?
वरून पैसे खाऊन आम्हाला ऑर्डर
काहीही ढाका टाकता राव तुम्ही.
यात राजकारण आणणे हा भंपकपणा
जेवढी जास्त सक्ती /बंदी तेवढी
2014 नंतर वरुन दबाव पैसे खाणे
2014 नंतरच काही दिसलं की देव
आता आयांनीच चौकाचौकात उभे
हे बघा..
काही प्रश्न
चालु द्या ... अजुन काही वर्ष ..
जाता जाता
@सुक्या , शब्दाशब्दाशी सहमत.
प्रकाश घाटपांडे यांच्याशी
यातला उपहास बाजूला ठेवला तरी
+१००
आत्महत्येला परवानगी नाही अजून
मला वाट्ते आहे की, प्रसाद