एक संवाद ..भाग १..( मी आणि ती)
एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभामध्ये होणार्या बायकोला घेऊन आलेल्या मुलाचा लग्नघरात तिच्याशी झालेला संवाद....
_____________
मगाशी भेटल्या त्या सगळ्या आत्या माझ्या..त्या बर्या आहेत..
म्हणजे?
भोचक प्रश्न कमी विचारतात..
असं होय? पण मला नाही हं सगळी माणसं लक्षात राहायची...
जमेल तशी थोडीथोडी ठेव लक्षात...
ओके..
तशी आमच्याकडे चक्रम माणसांची कमी नाही...
असू दे.. मला सवय आहे..
हे बघ, ती जी दिसतेय ती ...
कोण?
अगं, ती काय...पैठणी घातलेली...
हॅ..ती काय पैठणी आहे होय?
नसेल मग.. मला वाटलं, लग्नात घातलेल्या कुठल्याही झगमगत्या साडीला पैठणी म्हणतात.
काहीही काय?
बरं चुकलं..
पण कुठाय ती?
ती काय...मोरपंखी साडी...
ती होय? काय छान केस आहेत नाही तिचे?
कुठे? कापून तर ठेवलेत...
कापलेत?
हो..
कोण म्हणतोय्स तू ?
अगं..इकडे बघ..ती... आत्ता मोबाईल पर्समध्ये ठेवतेय..
ओह ती होय? तिची काय मोरपंखी साडी आहे होय?तो अंजिरी रंग आहे...
हा अंजिरी आहे?
मग ?..मोराच्या पंखांचा रंग असा असतो?
मग कसा असतो?
हा अंजिरीच आहे...
बरं बाई... अंजिरी काय मोरपंखी काय, तेच ते..
तेच ते?कमाल आहे हं...तू रंगांधळा नाहीस ना रे?
मग? तुला काय उगीच सिलेक्ट केली काय मी?
तू हलकट आहेस..
थँक यू..
अरे तिला कुठे तरी पाहिलंय.
कुठे? ती मुंबईत असते आता..तू कुठे पाहणार?
...हां..आठवलं... ही सीरियलमध्ये काम करते का रे?
ह्यॅsss.. काहीतरीच काय?
'अवघाचि...' मध्ये हिनं काम केलं होतं..
हे काय असतं?
सीरियल आहे...
त्या बांदेकर बाईंची का?
नाही नाही.. ती वहिनीसाहेब...
हं.. सगळ्या सारख्याच...
नाही हं.. 'अवघाचि ..'छान असते..
बरं बाई छान असते..
का ? एकदम माघार घेतलीस ते?
मग? होणार्या बायकोसमोर किती वाद घालायचा त्याला मर्यादा असतात..
आणि नंतर?
नंतरचं नंतर बघू..
पण आपण कुठे टिपिकल नवरा बायको होणार आहोत? आपलं प्रेम असणार ना एकमेकांवर?
हं...अगं इतपत आशावाद ठेवलाच पाहिजे..
पण तरी अवघाचि छानच असते..
असते ना... हो ना... मान्यच करतोय ना...
असं नाही.. खरं खरं मान्य करशील तू एक दिवस...
बरं बघू... मी मराठी सीरियल कशाला बघतोय?
मग काय बघतोस रे तू?
मी? .. बातम्या बघतो.. क्रिकेट बघतो... आणि रोडीज आणि स्प्लिट्सव्हिला
शी..!
शी काय? छान छान मुली असतात..दिल्ली आणि चंदीगडच्या... मज्जा येते..
मी कशाला मुली बघू?
तू मुलगे बघ ना त्यातले..
काही गरज नाहीये.. अरे ती बघ,निघाली वाटतं.. ... मी तिला भेटून येते ...
कशाला ? असूदेत..
का?
जाउदे ना..
पण का?
ती मोठी स्टोरी आहे...
मग सांग...
थोडक्यात सांगतो...ही तशी माझी चुलतबहीण लागते.. वडलांच्या मावसभावाची मुलगी...
म्हणजे सोमनाथकाकांची?
नाही... मोहनकाकांची...
मोहनकाका म्हणजे सुरतचे ना?
सुरतचे ब्रिजेशकाका..हे इथलेच..पुण्यातले.. त्यांची माझी चांगली दोस्ती आहे... यायचे घरी नेहमी... भेळ खायला न्यायचे.
हिचं सांग रे लवकर...
सांगतोय ..घाई नको.. माझी लिन्क तुटते...
बरं सॉरी..
तर ही लहानपणापासून स्वत:ला अति शहाणी समजायची..
खिखिखि...हा तुमचा कौटुंबिक प्रॊब्लेम आहे..
तेही खरंच... पण ही अफ़ाट होती... काकूने फ़ार लाडावलेली.. ही फ़ार हुशार आहे, फ़ार हुशार आहे असं उगीचच कौतुक..
मस्त..
बारावीला बोर्डात येणार , बोर्डात येणार अशी हवा नुसती... पंचावन्न टक्के मिळाले हिला...
वा !!.. पास तरी झाली...
बाकीच्यांना आश्चर्यच वाटलं..मला आधीच अंदाज होता..कारण तोपर्यंत तिला नाटकाचा किडा चावला होता.
म्हणजे?
कॊलेजात नाटकवाल्यांच्या गॆंगमध्ये सामील झाली... ते लोक हुशार होते,
का?
त्यांच्या मते तिला फ़क्त नेपथ्य जमायचं..
पण नेपथ्य सुद्धा चॆलेंजिंग गोष्ट आहे..
तेच..तेच सांगून त्यांनी तिला बरोबर चढवून ठेवलं...हिला कधीच मेन रोल नाही..भरपूर कामं करून घेतली नुसती....
च च..
तर काय? नाट्यकलेची सेवा म्हणे..
खिखिखि
म्हणून हिला वाटलं, आपण आर्किटेक्ट व्हावं..पण अभ्यास केलेलाच नाही..
ऍडमिशन कशाला मिळतेय मग?
बरोबर...मग हिचं करीअर हेलकावे खात राहिलं.. हिला व्हायचं होतं नितीन देसाई तर आता सीरियलमध्ये फ़ुटकळ रोल करते...
आई गं..
त्यात मी एन्ट्रन्सला बरे मार्क पाडून आर्किटेक्ट झालो... मग हिची माझ्यावर खुन्नस ..
ई sss.तुझ्यावर का?
कारण आम्ही छोट्या गावाचे..लहानपणापासून हुशार म्हणून प्रसिद्ध नाही...तरी आता आर्किटेक्ट आहे..आणि तिला नाही जमलं.
हं.
मग काकू आणि ही सारखे मी दिसलो की काहीतरी कॊमेंट मारतात...
काहीही काय?
हो..आधी लक्ष दिलं नाही...पण मग काकाच एकदा वेगळा भेटायला येऊन सॉरी म्हणून गेला...
पण असं का? जेलसी?
असेल... आणि ती भयानक इन्सिक्योर आहे.... काही झालं की तिला वाटतं लोक तिलाच बोलताय्त...
बाप रे..
त्यावरून तिची सारखी भांडणं होतात... कुठेही..कोणाशीही...
म्हणजे?
अगदी बसमध्ये..थिएटरमध्ये... रस्त्यावर..
चल..
खरंच...त्यात तिनं नुकतंच घरातून भांडून हट्टानं लग्न केलेलं.
काय सांगतोस?
तो मुलगा तसा खूप चांगला आहे..सद्गुणी...पण काकूला अमेरिकन जावईच हवा होता..
खिखिखि
हसतेस काय ? खरंच...
खिखिखि खिखिखि.. तसा चांगला म्हणजे?
कारण हिनं बेचाळीस वयाचा अभिनेता पकडला...बिजवर
मग तुमच्याकडे भूकंपच आला असेल...
काका म्हणाला, तुझ्या निर्णयाची जबाबदारी घे आणि लावून दिलं त्यानं लग्न....
ही कधीची गोष्ट?
आत्ता..दोन महिने झालेत.. त्यामुळं एकूण तिचं काय चाललं आहे, कोणालाच ठाऊक नाही..
असं आहे होय सगळं...
आता तिला भेटण्यापूर्वी हे तुला माहित नको का?
हो रे..पण तिचीही काही बाजू असेलच की..
असेल ना... तुला कळली तर मलाही सांग समजावून..
सांगेनच...
पण जपून बोल हं तिच्याशी... ती कधीही भांडू शकते. तिरसट आहे ती...
तू चल की इंट्रो करायला...एकटीच कशी जाऊ?
जा की..
बरं नाही दिसत रे..
तू कधीपासून अशी चिंता करायला लागलीस?
ई ssss मला काहीच प्रॊब्लेम नाहीये रे.. मला आपली तुझ्या रेप्यूटेशनची काळजी..
बरं मग असं कर ..त्या नेहाला घेऊन जा...
कोण नेहा?
आता नाही का भेटून गेली? भयंकर बोलून डोकं खाते ती..
ओह ती..
हां तीच.. तिला नेलंस की तीच बसेल बडबडत..मग तुला चिंता नाही..
ओके... पण तू स्वत:च्याच बहिणीला इतका घाबरत असशील असं नव्हतं वाटलं..
खिखिखि ..मला नको उचकवूस... मी नाही भेटणार तिला..तूच भेट जा..
क्रमशः
__________________________
आता पुढचा संवाद ती भांडखोर बहीण आणि होणारी बायको..
वाचने
13600
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
चालू द्या
In reply to चालू द्या by श्रावण मोडक
हाहाहा!!!!!
In reply to हाहाहा!!!!! by बिपिन कार्यकर्ते
हा आणखी एक
maastar
छान संवाद.
मास्तर लै
In reply to मास्तर लै by आंबोळी
अवांतरः
:)
In reply to :) by सौमित्र
'रामाग्रीन'
लै झ्याक...
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to सही by नंदन
सहमत! तीन
In reply to सहमत! तीन by घाटावरचे भट
+२,
मास्तर,
नाहि
छान
हॅहॅहॅ
In reply to हॅहॅहॅ by प्रकाश घाटपांडे
ह्याह्याह्याह्या
मास्तर लै
मजेशीर संवाद
छान चालल्यात गप्पा !!
मस्तच.
अफलातून....
!!
भडकमकर