Skip to main content

अडनिडी मुलं-३

लेखक जेडी यांनी सोमवार, 17/12/2018 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
दहावी होऊन मुलांना चांगले मार्क्सही मिळाले पुढे ११ वी साठी मुलांनी मिळेल तिथे ऍडमिशन घेतले . सीबीएस्सची कॉलेजेस जास्त नाहीत आणि स्टेट वाल्याना आदी प्रेफरेन्स म्हणून आणखीच गोंधळ . शिवाय त्यांची स्टेट बोर्डच्या सिलॅबस मुळे तिकडे मन असे रमतच नाही. लेकीला आर्ट्स विथ मॅथ्स घ्यायचे होते , पुण्यासारख्या शहरात ५ कॉलेज फक्त . एसपी , फर्ग्युसन ला मिळाले तरच आर्टस् ला घ्यायचे नाहीतर सायन्स असे ठरले . पण ते मिळाले नाही. एकाच कॉलेजला सायन्स आणि आर्ट्ससाठी नंबर लागला . मग सायन्स ला घेतले ऍडमिशन . चारच दिवसात म्हणे , मला इथे ऍडमिशन नकोय, तिकडे एसपी , फर्ग्युसन ला मिळतंय का बघ नाहीतर मी कॉलेजला जाणार नाही . किंवा इथेच आर्ट्सला घे . इथलया शिक्षकांना काहीच येत नाही , कसले फालतू कॉलेज आहे . मी म्हणाले, आगं फी भरलीय आता ती मिळणार नाही तर तू अकरावी सायन्स कर आणि मग आर्टस् ला घे तर म्हणे नाही मी काहीही अभ्यास करणार नाही, क्लासला तर मुळीच जाणार नाही . मी माझ्या मतावर ठाम आणि ती तिच्या . झाले , अकरावी कशी बशी पास झाली. रिझल्ट बघून मी म्हणाले आता आर्टस् ला घे. तर म्हणे जमणार नाही, काय व्हायचे ते होऊदे पण मी आता आर्ट्सला ऍडमिशन घेणार नाही आणि अभ्यासही करणार नाही . क्लास लावणार नाही. तूच शिकवायचे . मी म्हणाले तू क्लास लाव मला आता तुला मॅथ्स शिकवायला जमणार नाही . तर म्हणे दहावीपर्यंत कशी शिकवत होतीस आणि आता का नाही जमणार ? फेसबुक , मिसळपाव ह्यातून टाइम मिळेल तेंव्हा मला शिकवशील ना ? मला खरेच ते व्याप जमणार नव्हते म्हणून मी कशालाही भीक न घालता ठाम नकार दिल्यावर १ लाख भरून क्लासला ऍडमिशन घेतले पण कोणत्याच क्लासला ना नीट गेली , ना नीट अभ्यास केला. काही म्हणाले तर तूच सायन्स ला ऍडमिशन घ्यायला लावलय, माझी इच्छा नवहती , आता तू बघच . वर्षभर मी अक्षरशः भीतीच्या सावटात काढले. पोरीने काहीही अभ्यास केला नाही . सर्व करून पाहिले - प्रेमाने, धमकवून, पण काहीही उपाय नाही . फक्त एवढेच, तू नुसत्या अकरावीच्या फीचा एवढा विचार का केलास ? वाया गेली असती तर काय होणार होते? प्रॅक्टिकल कधी असायची ते हि माहीत नव्हते . इथले सर्व गावंढळच आहेत, त्यांना नीट इंग्लिशच बोलता येत नाही ... टीचर ला पण इंग्लिश बोलता येत नाही आणि मी कॉलेजलाही जाणार नाही आणि क्लासला हि जाणार नाही . अगदी कौन्सेलर ची मदत घेऊनही पहिली पण काहीच उपयोग नाही . अजून एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटतेय ती म्हणजे , माझी लेक कॉलेजला जायला नाही म्हणत होती कारण कोणीच बरोबर नवहते, सर्व कपल्स आहेत म्हणाली. माझ्या मैत्रिणींना पण आता बॉयफ्रेंड भेटलेत म्हणे . ते रोज कोठे ना कोठे फिरायला जातात , मी त्यांच्याबरोबर गेले कि माझी सिच्युएशन ऑकवर्ड होते . मी आपली समाजवात राहायचे , तू जा . त्यांच्यात मिक्स हो . एकदा सर्व पाषाण लेक ला गेले , तिथे माझी लेक एकटी बाहेर बसून राहिली. बाकी सर्व आत झाडी झुडपात जोडी जोडीने बसायला गेले . ती हताशपणे एकटी बाहेर बसून राहिली . बाकीच्या मुलींना त्यांचे बॉयफ्रेंड सिगारेट ओढायला लावत , नाही म्हणले कि , "बस क्या यार , इतना भी प्यार नाही करती क्या मेरेसे ?" असे म्हणत ." तेंव्हापासून तर लेकीने मित्र मैत्रीचे नावच टाकले . तिच्या वर्गात अजून एक शाळेपासूनची मैत्रीण होती. तिला एस वाय बीकॉम झालेला बॉयफ्रेंड मिळला . कॉलेजचे नाव सांगून त्यांच्यबरॊबर हि अकरावीची पोरगी नुसती फिरणार . बड्डे पार्टीला आपलय दोनच मैत्रिणी बोलावल्या मॅक डीला , त्यात माझी लेक आणि दुसरी एक मैत्रीण बाकी सर्व त्या मुलाचे मित्र . ह्या दोघी चार वाजताच निघून आल्या आणि हि त्या मुलांबरोबर कोठेतरी फिरायला गेली. तिच्या आईने फोन करून विचारल्यावर आमच्या घरी जात आहे असे तिने घरी सांगितले. तिच्या आईचा वाट पाहुन माझ्या लेकीला फोन . लेकीने सरळ सांगितले, आम्ही कधीच चार वाजतच घरी निघून आलोय म्हणून परत त्या मैत्रिणीचा लेकीला फोन, काहीही कर माझ्या आईला तू माझ्याबरोबर असल्याचे सांग. लेक अगदीच गोंधळून गेली. त्याच दिवशी त्या पोरीचा रात्री आठ वाजता छोटा अपघात झाला . सर्व ढोपरे फुटली. तिची आई माझ्या लेकीला झाप झाप झापली , कोठे गेला होतात म्हणून ? नंतर तिच्या वडिलांनी तिला बड्डे गिफ्ट महागडा फोन घेऊन दिला होता , ती कोठेतरी बॉयफ्रेंड बरोबर फिरायला गेली होती तेंव्हा तो हरवला . तिने आईला आमच्याकडे नोटबुक घ्यायला गेल्यावर बॅग स्कुटरला तशीच राहिली आणि त्यातून कोणी काढून घेतला असे सांगितले. तिच्या आईचा परत लेकीला फोन, तुमच्या सोसायटीत फोन हरवलाय तर आईला सांगून सीसी टीव्ही बघा म्हणे, वॉचमन असताना माझ्या लेकीचा फोन गेलाच कसा म्हणे ? माझ्या लेकीचे मला फोन वर फोन , तू लवकर घरी ये, मी तिच्या आईला खरे काय ते सांगतेय . होऊदे दे तिचे कॉलेज बंद . मी लेकीला म्हणले , तू थोडा वेळ थांब मी येऊन काय करायचे ते बघते . घरी गेल्यावर मी तिच्या आईला फोन केला आणि सांगितले कि तुमच्या मुलीचा फोन आमच्या सोसायटीत नाही हरवला . ती कोठेतरी बाहेर गेल्यावर हरवलाय पण भीतीपोटी तिने तुम्हाला मनघडत सांगितले आहे . तुम्ही तिला मारू नका पण नीट विचारलेत तर ती तुम्हाला सर्व सांगेल. बाप आय टी मध्ये मोठ्या पदावर . आई खास मुलींच्या शिक्षणासाठी घरीच. चांगल्या सोसायटीत फ्लॅट , कशाचीही कमी नाही. काय करणार आई बाप? मी तिच्या आईला , उद्या पॅरेण्ट टीचर मीट वेळी भेटू आणि मला तुम्हाला काही सांगायचे आहे असे सांगितले. मी गेले होते , सर्व तयारी करून पण पोरीने आईला माझ्याकडे फिरकून पण दिले नाही आणि आईही फिरकली नाही. काय बोलणार ? काय करायच्या या मुलांचे ? क्रमशः
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 25593
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

इथे लिहिलंत ते खरंच छान झालं. चर्चा चांगली चालू आहे. आमच्यावेळी अशी चर्चा वाचायला मिळाली असती तर जरा बरं झालं असतं. मोठं मूल या महिनाअखेरीस बत्तीस वर्षांचं होईल म्हणजे पालक म्हणून माझं तेवढं वय आहे. समस्या प्रत्येक बालक-पालक नात्यात येत असतात. समस्या संपते. आपण बाहेर पडतो तेव्हा आणखी बळकट व खंबीर झालेलो असतो. मार्ग नक्की निघेल. माझ्यामते मुलांना सगळं आपापलं काम करता येणं गरजेचं आहे. हातांनी रोजची सगळी कामं करता येणं हे एक आवश्यक कौशल्य आहे. स्पर्धेचं युग म्हणता म्हणता मुलं हे कौशल्य विसरत चालली आहेत हे मी आजूबाजूला पहाते आहे. अशी कुशल मुलं आव्हानांना चांगली सामोरी जातात, आनंदी असतात हेही एक निरीक्षण आहे. "तू प्राॅब्लेम नीट ऐकून घेत जा. मला कोणीतरी ऐकायला हवं असतं. ती माझी गरज आहे. मधेच थांबवून समस्या सोडवायची घाई करत जाऊ नकोस. ती सुटेल. तू फक्त ऐक थोडा वेळ." हा अगदी अलिकडेच धाकटीकडून मिळालेला अहेर. आपण असं करतो?? .हे सुरवातीला नाही पण नंतर पटलं. ...न ऐकण्याची चूक आता सुधारते आहे. :)

In reply to by पलाश

"तू प्राॅब्लेम नीट ऐकून घेत जा. मला कोणीतरी ऐकायला हवं असतं. ती माझी गरज आहे. मधेच थांबवून समस्या सोडवायची घाई करत जाऊ नकोस. ती सुटेल. तू फक्त ऐक थोडा वेळ." हा अगदी अलिकडेच धाकटीकडून मिळालेला अहेर. तुम्ही नशीबवान आहात. तुमची मुलगी प्रगल्भ आहे !

In reply to by पलाश

मोठं मूल या महिनाअखेरीस बत्तीस वर्षांचं होईल
हे वाक्य फार आवडलं! एका 80 वर्षांच्या आजींनी आपल्या साठीच्या मुलाला तो कार घेऊन परगावी जाताना विचारलं होतं की "जाशील ना रे बाबा नीट, की मी येउ सोबत?". त्याची आठवण आली! कितीही मोठं झालं तरी ते मूलच!

खूप आवडला प्रतिसाद. मुलं जेव्हा पाच सहा वर्षाची होतात तेव्हाच अवास्तव मागच्यांना प्रेमाने पण ठामपणे नकार दिला पाहीजे. पिअर प्रेशर हा अंत्यत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणी हे प्रेशर अगदी साध्या गोष्टी पासून सुरू होते. प्राथमिक शाळेत तर वेगळे कंपास खोडरबर अशा वस्तू पण मला तिच्यासारखी वस्तू हवीच आहे हे ट्रिगर करतात. वय वाढेल तस या गोष्टीची जागा सायकली;मोबाईल फोन ई वस्तू घेतात. काही हट्टांना वेळीच नाही म्हणणे आणी आपली आर्थिक परिस्थिती मुलांना समजावून सांगणे हे बहुतेक वेळा कामी येत

धागा आणि प्रतिसाद यातून उत्तम विचारमंथन सुरु आहे. जेडी यांच्या लेखनातून काही बाबी जाणवल्या १. मुलगी व आई यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. परंतु या संवादातून मुलीला घराच्या आर्थिक, व्यावहारिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीची योग्य जाणीव दिली गेली नाही. संवाद असेल तर ती अजूनही देता येईल. ही प्रेमातूनच येते. एकदा ही जाणीव मनात खोल रुजली की मुलांचा हट्टीपणा आपोआप मावळतो असा अनुभव आहे. २. मुलीला आर्ट्सला जायचे होते तर तिच्या इच्छेचा आदर करायला हवा होता. मग जितके गुण आहेत त्याप्रमाणे जे मिळेल त्या कॉलेजला प्रवेश घेणे अपरिहार्य आहे. हे तिला समजण्यात अडचण कसली ? ३. केवळ पुण्यातीलच कॉलेजेस हवीत असे असण्याची गरज नाही. जवळपासच्या गाव/शहरातील कॉलेजेससुद्धा शैक्षणिकदृष्ट्या उत्तम आहेत. ४. बॉयफ्रेंड वगैरे संस्कृती आवडत नसेल तर पुण्याबाहेरील कॉलेजमध्ये नक्कीच तसं वातावरण मिळू शकलं असतं. एकूणच असं वाटतं की टीन एजच्या मुलांवर काही लादता कामा नये. आजची पिढी आपल्यापेक्षा स्मार्ट आहे आणि त्यांना सोशल मिडियामुळे आजूबाजूच्या वास्तवाची नको इतकी तीव्र जाणीव आहे. तेव्हा आपण पालकांनीही त्यांच्या अडचणी मानसिकता नीट समजून त्यांना पर्याय दाखवावे. जेडी ताई , कृपया टीका असे समजू नये. काही वर्षांपूर्वी याच स्टेजमधून गेल्यामुळे रिलेट होऊ शकले आणि कहो सांगावेसे वाटले, इतकेच.

In reply to by सस्नेह

प्रतिसादासाठी धन्यवाद . आम्ही पुण्यातच राहत असल्याने पुण्याच्या बाहेर जाणायत पॉईंट नाही वाटला आणि हे सर्व अकरावीची ऍडमिशन घेतल्यावर चालू झाल्याने , आदीच पुण्याच्या बाहेरचा विचार करणे शक्य नव्हते

१. आपल वागण आणि बोलण यात अंतर पडत नसेल तर मुल आपल्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवतात असा माझा अनुभव आहे. २. आपण जर प्रत्येक बाबतीत आग्रही रहात असू तर मुलही हळूहळू तसच करायला लागतात. ३. बऱ्याच वेळेस मुल भितीपोटी खोट बोलतात. पालकांची भिती न वाटण महत्वाच. ४. घरचे संस्कार बळकट होण्यासाठी त्या संस्कारामागची कारणपरंपरा सांगता आली पाहीजे. ती माहीत नसेल तर तसे स्पष्ट केले पाहीजे. ५. वय वर्षे १२-१५ पर्यंत एखादी शंका पालकांच्या ऐवजी मीत्रमैत्रीणींना विचारली जात असेल तर तो धोक्याचा संदेश समजला पाहिजे.

पिराताई,
हा बॉयफ्रेंड वाला मुद्दा खरंच अवघड आहे.
सवाष्णींच्या कळपात कुमारिका अवघडायचीच की. हा मुद्दा उद्भवण्याचं कारण म्हणजे बॉयफ्रेंड असल्यावर मुली थोड्या वेगळ्या वागतात. हे जे वेगळं वर्तन आहे त्याची संगती लावणं कुमारिकेस कठीण जातंय. त्यामुळे तिला न्यूनगंड येत कामा नये इतकंच तिच्या मनावर ठसवलं गेलं पाहिजे. स्वत:चा बॉयफ्रेंड करणे हा सद्य परिस्थितीवर उपाय नव्हे. स्वत:त काही न्यून नाही हे तिला पटलं पाहिजे. आ.न., -गा.पै.

जेडी, (१) क्लासच्या कुबड्या न घेता स्वतहून अभ्यास करायची सवय तुमच्या मुलीला आहे. (२) 12वी पर्यंत सायन्स घेतल्याने तिला बरेच ऑप्शन्स ओपन आहेत (३) बॉयफ्रेंडबाबत विचार स्पष्ट असल्याने कोणत्याही भावनिक गुंत्यात ती अडकलेली नाही (४) तुमच्याशी असलेल्या तिच्या नात्यात मोकळेपणा आहे (५) तिला वाचनाची आवड आहे, कला अवगत आहे. (६) तुम्हाला नको तितकी वाटत असलं तरी ती व्यावहारिक आहे. (तिला फारश्या मित्र-मैत्रिणी नाहीत या पार्श्वभूमीवर ती आपल्यातल्या कलेचा उपयोग कोणाला संतुष्ट करण्यासाठी करून वेळ घालवत नाही. आपल्या कलेचं आणि वेळेचं रुपांतर पैशात कसं करायचं ही अजून एक दुर्मिळ कला तिच्याकडे आहे) या जमेच्या बाजू आहेत. तिचं जे काही चाललं आहे त्यातून ती नक्की मार्ग काढेल. तुम्ही फकत सोबत रहा. काय पर्याय आहेत, त्यातले खरे किती उपयुकत याची माहिती आजूबाजूकडूनही काढत रहा. तिला काय आवडेल, त्याची व्यावहारिकता यावर संवाद साधत रहा. प्रसंगी तिचं मत सपशेल चुकीच वा स्वप्नाळू वाटलं तरी थेट आणि ताबडतोब मोडीत काढू नका. (याचा परिणाम म्हणजे ते मत दृढ होतं) वर डॉ. खरेंनी म्हटल्याप्रमाणे उपदेशाचे बोल दोन मिनिटात संपवा. मी तुमच्याच नावेतली प्रवासी आहे आणि हे करायला मी ही शिकतेय. माझी मुलगी गेल्या वर्षी बारावी झाली. (१) नववी-दहावी - आर्टस घेऊन लिग्विंस्टिक्स करणार (२) दहावी – मला बॉटनी-झुओ खूप आवडतं. पण मी मेडिकल, पॅरामेडिकल नाही करणार. बीएससी करेन (३) अकरावी – सहामाहीनंतरब \\ लिहीते नन्तर

आजकाल बॉय फ्रेंड असणे हे नुसते फॅशनच नव्हे तर आवश्यक झाले आहे अशी स्थिती आहे. माझी मुलगी नववी / दहावीत असताना तिची पण मनस्थिती अशीच होती. नुसतंच बॉय फ्रेंड असणे यात गैर काय आहे असं नव्हे तर बॉय फ्रेंड असलाच पाहिजे अशी काही तरी विचित्र मनस्थिती होती. त्यामुळे तिची एका मुलाशी वाजवीपेक्षा जरा जास्तच मैत्री "होत" होती. (दुर्दैवाने या मुलाची आणि त्याच्या आईची मनोवृत्ती अशी होती कि मुलाला बऱ्याच मैत्रिणी असणे म्हणजे मुलगा स्मार्ट आहे पण मुलीला मात्र मित्र असू नये. आणि आमच्याकडे "पैसे आहेत" मग मुलाला गर्लफ्रेंड असणारच) मी शांतपणे तिला काही गोष्टी समजावल्या-- १ ) पहिली गोष्ट म्हणजे बॉय फ्रेंड असणे यात काही चूक नाही हे मी मान्य केले. (कारण ते तुम्हाला पटत असले/ नसले तरी ती चूकच आहे हे तुम्ही ठसवून सांगितले तर तुमचा संवाद बंदच होतो) २) तिला एक गोष्ट समजावून सांगितले कि अशा गोष्टीत मुलींची भावनात्मक गुंतवणूक(emotional investment) मुलांपेक्षा जास्त असते. येतेच मी मधू सप्रे आणि मिलिंद सोमण यांच्या ब्रेक अप नंतर मधू सप्रे या नैराश्याची शिकार झाल्या आणि मिलिंद सोमण आपल्या करियर मध्ये पुढे गेले याबद्दल विस्ताराने सांगितले. ३) जवळचा मित्र असणे हि अतिशय चांगली गोष्ट आहे परंतु तो मुलगाच असला पाहिजे असे नव्हे तर एखादी चांगली सरळ मनाची मुलगी असू शकते हे हि समजावून सांगितले ४) आयुष्याच्या या टप्प्यावर मैत्री असणे यापेक्षा शिक्षण जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे मैत्री केली तरी त्यासाठी आपले शिक्षण "पणाला लावणे" यासारखा मूर्खपणा नाही. तेंव्हा कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे (priority) हे आपल्याला समजले पाहिजे. तेंव्हा पूर्ण वेळ केवळ आपल्या बॉय फ्रेंड बद्दल विचार करत बसून मुली आपले नुकसान कसे करून घेतात हे सांगितले. ५) प्रेम करणे अजिबात चूक नाही पण टिनपाट मुलाबरोबर प्रेम करणे आयुष्यासाठी महागात पडू शकते. याचे एक नातेवाईकाच्या मुलीचे उदाहरण समोर ठेवले. यानंतर तिला त्या मुलाच्या आणि त्याच्या आईच्या "पुरुषप्रधान" मनोवृत्तीबद्दल हळूच सांगितले.(you are just an option for them) ६) तुझा प्रेमविवाह झाला तर मला आनंदच होईल पण मुलगा मानसिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सुसंस्कृत असला पाहिजे, बापाच्या पैशाचा माज असणारा नको हेही समजावले. ७) शेवटी हे तुझं आयुष्य आहे आणि आई बाप आयुष्याला पुरत नाहीत. भावनेच्या आहारी जाऊन वेडपट निर्णय घेतला तर त्याचे परिणाम दीर्घ कालपर्यंत भोगावे लागतील हे हि समजावून सांगितले. ८) स्मार्ट दिसण्यासाठी/असण्यासाठी किंवा केवळ "इन थिंग "म्हणून "बॉयफ्रेंड" असणे आवश्यक नाही. कारण टिनपाट मुलींना पण बॉयफ्रेंड असतो. एखादा चांगला मुलगा ज्याच्याशी काही "वैचारिक" पातळीवर संवाद होऊ शकेल असा मुलगा बॉयफ्रेन्ड असावा. केवळ पुरुष आहे म्हणून बॉय फ्रेंड असणे हे जनावरांच्या पातळीवरचे (शारीरिक पातळीवरचे) आहे. ९) वरील सर्व मुद्दे एका वेळेस एकच मुद्दा आणि तो सुद्धा दीड ते दोन मिनिटात संपवणे कारण जास्त बोलत राहिले तर मुले चक्क मनाची कवाडे बंद(shut off) करतात. १०) बायकोला गप्प बसण्यासाठी फार वेळा सांगायला लागले होते. (बायका भावनेच्या आहारी फार पटकन जातात पण त्याचा परिणाम उलट होतो असा अनुभव आहे) तेंव्हा थंड डोक्यानेच काम करावे लागते. हि प्रक्रिया ६-७ महिने चालली होती. सुदैवाने बाप सांगतो त्यात काहीतरी तथ्य आहे हे समजू लागल्यावर तिच्या वृत्तीत बदल झाला आणि हे प्रकरण पुढे गेलेच नाही. यानंतर मुलीला बॉयफ्रेंड असलाच पाहिजे हि संकल्पना भंपक आहे हे पटायला लागले. यानंतर अनेक मुलांशीआणि मुलींशी तिने निखळ मैत्री केली ती मुले घरीही येत असत / येतात. तारुण्यातील मुलगा किंवा मुलगी एखाद्या वेगवान एक्स्प्रेस गाडीसारखे असतात. एकदम "वळवायचा" प्रयत्न केल्यास मोठा अपघात होऊ शकतो एवढेच लक्षात ठेवावे.

In reply to by सुबोध खरे

सुदैवाने बाप सांगतो त्यात काहीतरी तथ्य आहे हे समजू लागल्यावर
अत्यंत महत्वाचा दुर्मिळ फॅक्टर.

In reply to by गवि

मुलांना मी मोठा आहे म्हणून तुम्ही माझे ऐकले पाहिजे हे फारसे पटत नाही. (याचे "न बोललेले" उत्तर असे असू शकते कि तुम्ही माझ्यापेक्षा काही वर्षे अगोदर जन्माला आलात त्यात तुमचे काय कर्तृत्व?) पण "कळकळीने" सांगितले कि मला तुमच्या पेक्षा चुका करण्याचा आणि त्यातून शिकण्याचा जास्त अनुभव आहे. (I HAVE MORE EXPERIENCE AT BEING WRONG THAN YOU) तर ते "कुठेतरी" पटते "भले ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसले नाही तरी". आणि मुले निदान तुम्ही काय बोलता आहेत त्याचा विचार करू लागतात. विचार केल्यावर बाप सांगतो त्यात काही तरी तथ्य आहे असे जाणवले तर अजून विचार होऊ शकतो खडकावर एकदम भरपूर पाणी ओतले तर त्यावर परिणाम होताच नाही आणि काही काळाने खडक "कोरडा" होतो. याउलट थेम्ब थेम्ब ठिबकत ठेवला तर काही काळाने खडक सुद्धा दुभंगतो.

In reply to by सुबोध खरे

पण "कळकळीने" सांगितले कि मला तुमच्या पेक्षा चुका करण्याचा आणि त्यातून शिकण्याचा जास्त अनुभव आहे. (I HAVE MORE EXPERIENCE AT BEING WRONG THAN YOU) तर ते "कुठेतरी" पटते
लाख बोललात. हेच नेहमी वाटतं.

In reply to by सुबोध खरे

माझ्या मुलाच्या बाबतीत पण असे झालेले! त्याच्या सर्व मित्र मैत्रींनींना घराचे दरवाजे उघडे असल्याने लपून छपून घराबाहेर फारसे काही घडायला वाव उरला नाही. मुलाला मी हेच सांगितलेले की शिकायच्या वयात शिकून घे. पैसे नंतर पुढे कमवायचेच आहेत.

पहिले दोन लेख मी दहावीचा रेसुलत लागल्यावर लगेचच ऐसी अक्षरे लिहिले होते पण पुढे काही लिहिणे झालेच नाही, वरचे सर्वच प्रतिसाद अतिशय मौल्यवान असून मी नंतरचा लेख तेंव्हाच का लिहिला नाही याचे मला वाईट वाटत आहे . मनापासून धन्यवाद , सर्वच प्रतिसादातून मला खूप काही शिकायला मिळत आहे, मिळेल . माझ्यासारख्या असंख्य पालकांना पण खूप शिकायला मिळेल . विशेष करून दोन्ही डॉक्टरांचे प्रतिसाद मी पुन्हा पुन्हा वाचले , माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी त्याचा कसा उपयोग करता येईल ह्यावर खूप विचार करतीय . ह्या दोन चार दिवसात काही प्रतिसाद मी तिला तसेच्या तसे वाचून दाखवलेत. तिच्या वागण्यात फरक होतोय हे मी अनुभवतेय . इथूनपुढेपण तिचे निरीक्षण करेन . पुन्हा ये रे मागल्या झालेच तर घोड्याला पाणयापर्यंत आणायची तयारीही ठेवेन . पूर्वी मला नुसत्या डोळ्यांना धारा लागत आणि तिचे मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस सुरु होई . आता तसे होणार नाही याची काळजी घेईन . यशोधरा ताई आणि सुधीर कांदळगावकर यांचेही प्रतिसाद मी बारकाईने वाचले आणि मी कोठे कमी पडले ह्यावर पुन्हा एकदा चिंतन केले . चुका झाल्याचं आहेत , सुधारण्याचा नक्की प्रयत्न कारेन . गामांची व्यावसायिक शिक्षणासाठीचा एखादा कोर्स करण्याविषयीच्या सूचनेचा पण विचार केला आहे . पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. इथूनपुढच्या लेखातही मी इतर अनेक मित्र मैत्रीचे किस्से सांगणार होते पण ते सांगावे कि नको ह्याबद्दल मनात संभ्रम आहे कारण ह्याच धाग्यात अतिशय उपयुक्त सूचना मिळालेल्या आहेत .

In reply to by जेडी

संवेदनशील विषय मांडला तुम्ही, मला व माझ्या सारख्या सूपातल्या पालकांना चर्चेचा खुप उपयोग होणार आहे. प्लिज पुढचा लेख नक्की लिहा . पुलेशु.

बाब म्हणजे.. हल्ली मुले अजिबातच एकमेकांच्या घरी जात नाहीत....सदैव 'बाहेर' भेटायचे ठरवितात...? असे का? घरी म्हणे तुम्ही 'स्टेअर ' करता, अनावश्यक (रीडः भोचक!) प्रश्न विचारता...इ. पण त्या मुळे आम्हाला मुलांचे मित्रच माहिती नाहीत. मी मुलाला व मुलीलाही कितीदा म्हणते...की अरे तुमच्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलवा..आपण चांगले काही खायला करु , तुम्ही वेगळे गप्पा मारत बसा हवे तर.. पण नाहीच! कुणी नाही येत म्हणे! तुमचा काय अनुभव?