१. पाण्यात पाय टाकून
हसली तू लोभसवाणे
कातळवेडे पक्षी
दिसतात किती जीवघेणे . .
२. डोळ्यात तुझ्या आभाळ
किती रंगबावरे झाले
जल भरुन संध्याकाळी
पापण्यात थेंबही आले . .
३. पाण्यात लव्हाळे न्हाती
थरथरते काया ओली
हातात हात घालून
हळूवार फुलेही भिजली . .
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2811
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
कातळवेडे पक्षी
अतिशय
असेच
In reply to अतिशय by विसोबा खेचर
अप्रतिम!
मस्तच..
चारोळ्या
मस्तच.
हे एक 'स्व' काव्य