Skip to main content

तीन चारोळ्या

लेखक दत्ता काळे यांनी शनिवार, 14/03/2009 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
१. पाण्यात पाय टाकून हसली तू लोभसवाणे कातळवेडे पक्षी दिसतात किती जीवघेणे . . २. डोळ्यात तुझ्या आभाळ किती रंगबावरे झाले जल भरुन संध्याकाळी पापण्यात थेंबही आले . . ३. पाण्यात लव्हाळे न्हाती थरथरते काया ओली हातात हात घालून हळूवार फुलेही भिजली . .

वाचने 2811
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

१ नंबर, ३, ४ ओळ्या

अतिशय सुरेख..! आपला, (फ्यॅन) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सुरेख, नाजुक भावना, उत्कट!

अप्रतिम चारोळ्या! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

चारोळ्या आवडल्या. :)

ती, ते, प्रेम इ. मध्ये बसणारं. बरं लिहिलंय, पण इतर विषयावरचंसुध्दा लिहा. राग वाटून घेऊ नका. पालीवर लिहिलेली कविता वाचली होती कांय ?