Skip to main content

वैद्यक नोबेल-संशोधन भाग ८: MRI तंत्र

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 07/12/2018 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 26251
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

MRI वगैरे निदानयंत्रे म्हणजे वैद्यकात अभियांत्रिकीची मुसंडीच की हो. MRI साठी त्या बोगद्यात जातांना जग मागे राहिल्याची भावना तर होतेच शिवाय प्रचंड यांत्रिक / खाडखूड आवाज येतो. त्यावर काही संशोधन होत असेलच ? लेख आवडला.

उत्तम लेख. सीटी स्कॅन प्रमाणे MRI करतानाही पिगमेंट चे इंजेक्शन देतात का?

अनिंद्य, तत्पर प्रतिसादाबद्दल आभार. खरंय, या यंत्राच्या बोगद्यातून जाताना बऱ्याच जणांची घाबरगुंडी होते. आवाजविरहित संशोधनाबद्दल कल्पना नाही. @ टर्मिनेटर, होय, काही वेळेस Gadolinium contrast media या रसायनाचे इंजेक्शन दिले जाते. धन्यवाद !

In reply to by हेमंतकुमार

खरंय, या यंत्राच्या बोगद्यातून जाताना बऱ्याच जणांची घाबरगुंडी होते. आवाजविरहित संशोधनाबद्दल कल्पना नाही. कसले चित्रविचित्र आवाज काढतं हे यंत्र, https://www.misalpav.com/node/20657

In reply to by मार्मिक गोडसे

या घाबरवणाऱ्या बोगद्याचा अजून अनुभव नाही. पण वरच्या लिंकवरचा लेख मस्त खुसखुशीत आहे. पुढे कधी स्वतः वर वेळ आल्यास मनाची तयारी करता येईल. ☺️

शंकानिरसना साठी धन्यवाद. हे रसायन मसुरक्षित असते का? की ह्याचेही काही दुष्परीणाम होतात मानवी शरीरावर?

हम्म ! हे रसायन मेंदूत साठून राहते असे काहींचे मत आहे. तसेच रुग्णास मूत्रपिंड विकार असल्यास त्याने त्रास होऊ शकतो. या विषयावर मतभेद आहेत. एका अमेरिकी अभिनेत्याने त्याच्या बायकोस यामुळे त्रास झाला म्हणून दावा लावला आहे.

रे भिडू ! बरोबर.

अजून एक सुंदर माहितीपूर्ण लेख ! या वेळेस MRI या आतापर्यंत सर्वामुखी झालेल्या तंत्रज्ञानावर लेख असल्याने बर्‍याच जणांची उत्सुकता, शंका-कुशंकांचे निरसन होईल. क्ष-किरण व CT या दोन्हींमध्ये रुग्णावर किरणोत्सर्ग होतो. जर त्याचा दीर्घकाळ मारा झाला तर त्यातून किरणोत्सर्गाचे धोके संभवतात. हा मोठा धोका टाळणारे करणारे हे संशोधन वैद्यकीय तपासण्यांच्या विकासक्रमातील मैलाचा दगड आहे.

लेख अप्रतिम. लेखमालेतील आणखी एक उत्कृष्ट आणि तेवढेच महत्त्वाचे पुष्प. हा लेख देखील मिपाला जीवनाशी थेट जोडणारा. अनेक, अनेक धन्यवाद. डॉ. म्हात्रेंनी सुरक्षाविषयक गुणधर्माचा अचूक निर्देश केलेला आहे. त्यांना देखील अनेक, अनेक धन्यवाद.

नेहमी प्रमाणेच उत्तम लेख ही मालिका छान रंगत आहे. तुम्ही निवडलेले नोबेलचे विषय दाद देण्याजागे आहेत यात शंका नाही. मी तुमच्या लेखाची आतुरतेने वाट पाहत असतो. डॉक्टर, आता तुम्ही 2003 पर्यंत पोचला आहात. म्हणजे मालिकेचा शेवट जवळ येत असावा. पण ती लवकर संपवू नये ही विनंती ! पु भा प्र हेवे सां न...

@वन, तुम्ही दाखवलेल्या आस्थेबद्दल आभार. या लेखमालेचे अजून २ भाग लिहायचा विचार आहे.शेवटी लेखन मर्यादा हवीच.

तीन महिन्यांपूर्वी घरात एक एमाराय केलं होतं तेव्हा मूत्रपिंड तपासणी करून पिगमेंट इंजेक्शन वापरलं होतं. सुदैवाने तपासणीत काही आढळलं नव्हतं. माझ्या उजव्या हाताच्या दोन्ही हाडांत स्टीलचे रॉड आहेत. मग माझ्या MRI ची वेळ आली तर कसं करतील?

मी या वैद्यकशाखेचा तज्ञ नाही. माझ्या सामान्य वाचनानुसार खालील माहिती मिळाली: साधारणपणे अस्थीरोगतज्ञानी बसवलेल्या धातूच्या रोपित गोष्टी एम आर आय साठी चालू शकतात पण ते रोपित केल्याचा कालावधी दीड महिन्यांहून जास्त असावा. अशा रुग्णांत एम आर आय आवश्यक असेल तर काही वेळेस आधी क्ष किरण काढून परिस्थिती नीट बघतात. शेवटी, रुग्णाचा डॉ व या तंत्राचा डॉ यांच्या समन्वयाने निर्णय घेतात. धन्यवाद.

In reply to by हेमंतकुमार

विमानतळावर कधी डिटेक्ट झाले नाहीत, म्हणजे बहुधा MRI मध्ये प्रॉब्लेम येणार नाही.

मग काय, बिनधास्त राहा. MRI करायची वेळच न येवो यासाठी शुभेच्छा देतो ☺️

१९७७ चे सुमारास पुणे विद्यापीठाच्या रसायन विभागात एक यंत्र बसविण्यात आले होते . ते मला जवळून पाहायला मिळाले. त्याला ते एन एम आर म्हणजे न्यूक्लिअर मॅग्नेटीक रेसोनांस मशीन म्हणत. कोणत्याही पदार्थाचा एक अतिसूक्ष्म कण त्यात ठेवला तरी त्याचे अनेक गुणधर्म स्पेक्ट्रम सह दाखवीत असे. त्याचा या तंत्राशी काही संबंध असावा काय ?

दोन्ही तंत्रांचा जरूर संबंध आहे. वर लेखात म्हटल्याप्रमाणे या तंत्राचा भौतिकशास्त्रा त वापर १९५०पासूनच होत होता. तेच तंत्र आता एम आर आय च्या रुपात मानवी उपयोगात आले.

हा लेख अनुक्रमणिकेस जोडावा ही वि. सर्व वाचकांचे आभार.

M R I तपासणीसाठी लागणारा वेळ हा रुग्णास त्रासदायक वाटतो. तो कमीतकमी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. स्वीडनचे दोन संशोधक यात आघाडीवर आहेत. तो वेळ जेमतेम १ मिनिटापर्यंत खाली आणता येईल असा त्यांचा दावा आहे. बऱ्याच आजारांत M R I प्रतिमांची सुष्पष्टता गरजेची नसते पण कमी वेळ महत्वाचा असतो. अशा वेळेस हे झटपट तंत्र वापरता येईल.

उत्तम लेख. मालिका छान रंगली आहे. तुम्ही निवडलेले विषय आणी त्याबद्दलची माहिती नेहेमीच उपयोगी असते. सध्या भारतात (पण MNCs साठी) चालू असलेल्या सन्शोधनात MRI आणि AI यान्च्या सन्युक्त वापराने Image Interpretation for better diagnosis हा ही भाग वाढतो आहे.

धन्यवाद आणि सहमती.

आज (८ नोव्हेंबर) हा जागतिक प्रतिमातंत्र दिन असतो. या दिनांकाला १८९५ मध्ये क्ष-किरणांचा शोध रोन्टजेन यांनी लावला. त्यांना अभिवादन !

जगातले पहिले पोर्टेबल MRI यंत्र तयार झाले आहे ! बातमी: https://www.medgadget.com/2020/02/worlds-first-portable-mri-cleared-by-… त्याच्या सुटसुटीत आकारामुळे ते रुग्ण दाखल असल्याठिकाणी नेता येईल, हा मोठा फायदा आहे.

कोविद-१९ मध्ये मेंदूवर देखील परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारच्या पहिल्या रुग्णाचे निदान मेंदूचा CT आणि MRI करून करण्यात आले. बातमी : https://www.diagnosticimaging.com/ct/brain-images-reveal-possible-covid…

अशी महामारी जरी १०२ वर्शानन्तर आली असली तरी आज तरी तिची तुलना १९१८ शी होउ शकत नाही. पण विषाणू हा काही राजकीय पुढारी नव्हे की नोकरशाह की त्याने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मान्डावी. त्यामुळे हे सन्कट नक्की किती मोठे आहे हे कुणालाच ठाउक नाही. आपले बजेट मधे अशा नॉन इन्विसिव्ह यन्त्राचे उत्पादन सब्सिडाईज करता आले तर .....