Skip to main content

चालू घडामोडी - डिसेंबर २०१८

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 01/12/2018 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या देशाच्या बहुतांश भागात निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तेलंगण राज्याचीही मुदतपूर्व निवडणूक पुढच्या आठवड्यात आहे. राज्यभरात आणि राजधानीत प्रचाराचा धुराळा उडालाय आणि सर्वचजण या धामधुमीत आपले हात धुवून घेत आहे असं चित्र दिसतंय. परराज्यातील एक प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेनेनेही अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहे, (किंवा अनेकजण शिवसेनेच्या बॅनरखाली स्वतः निवडणूक लढवत आहेत). अशाच एका उत्साही उमेदवाराच्या मिनिट्रकवर लावलेले हे प्रचारचित्र. a

वाचने 55979
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

प्रचारचित्र दिसत नाही. तेजप्रताप यादव यांच्या कर्तुत्वाने यादवी चव्हाट्यावर आली, यादव घराणे २०१९ आणि नंतरच्या बिहार स्थानिक निवडनुकांनंतर कालबाह्य होणार का?

जर तुमच्या माहितीत कोणता योग्य उमेदवार असेल तर त्याला खालील माहिती उपयोगी पडेल...

In reply to by टवाळ कार्टा

हिन्दी मधे... चांगले पंचेस मारलेत .त्यांच्या भाषणाचा परिणाम असा झाला की उतरभारतीय मंचाने रोजगारबद्द्ल ठोस पाऊले घेतली जात नाहित तो पर्यंत उतरभारतीय नेत्याना महाराष्ट्र प्रवेशबंदी केली आहे. https://www.loksatta.com/mumbai-news/up-bihar-mp-mla-ban-entry-in-mumba…

नोटबंदीचा काळ्या पैशावर काही फरक पडला नाही...हे मी नाही म्हणत मुख्य निवडणूक अधिकार्यांच म्हणणं आहे. बातमीनुसार यातील आजच्या घडीला प्रभावी लोक कोण असतील बरं?काय अंदाज?? https://www.loksatta.com/desh-videsh-news/demonetisation-never-impact-o…

रागा स्वतःच काँग्रेसमुक्त भारताच्या कल्पनेवर कार्यरत आहेत का ? असा प्रश्न उपस्थित करणारा स्रिमोय तालुकदार यांचा लेख फर्स्टपोस्ट मध्ये आला आहे. खरे म्हणजे एक पाय या डगरीवर एक पाय त्या डगरीवर असे काँग्रेसच्या सेक्युलॅरीझमचे स्वरुप राहीले आहे. नेहरु आणि म.गांधींच्या पलिकडे काँग्रेसींची सेक्युलॅरीझमला बांधिलकी साशंकीतच होती. पंप्र झाल्यावर योगा क्लासेस घेण्याची सुरवातीचे क्रेडीट मोदींना नव्हे तर इंदिराजींना जाते याची बहुतेकांना कल्पना नसते. एकीकडे लांगूलचालन करताना दुसरीकडे गाय-वासरु सारखे चिन्ह निवडणे ते मंदिरांना भेटीचे सॉफ्ट हिंदूत्व इंदिराजींनीही केले, राजीवजींनी काँग्रेस राजकारण राम आणि शहाबानो-माघारीत नेले तर राहुल गांधीही त्याच पावलांवर पावले कशी टाकताहेत या बद्दल तालुकदारांची मांडणी लक्षात घ्यावी लागते. तालुकदार म्हणतात
BJP’s real win lies in successfully setting the ground rules for parties to fight elections........It has ensured that no matter which way the mandate swings......political discourse will steadily shift away from pseudo-secularism to Hindutva as the new campaign metric. And parties will be judged (or so they might assume) by how close or distant they are to this theme.
This, as Yogi Adityanath has pointed out, is a total and complete ideological victory. When Rahul Gandhi is forced to flaunt his sacred thread and Brahminical parentage in a show of competitive Hindutva, the BJP is the winner. Fortunately for BJP, in its mission to replace the ‘idea of Congress’ that came to define the ‘idea of India’ during the past few decades of this independent nation, it has been ably supported by the new Congress president, who is working hard day and night to realise Modi and Amit Shah’s dream of making India 'Congress-mukt'.
..........However, it has completely escaped the Congress president that by trying to outdo the BJP at its own game and presenting Congress as ‘BJP 2.0’, he has hastened Congress’s identity crisis.
A political party is not merely an organised group of leaders, cadres and supporters that seeks to acquire and exercise power. It must have an ideological mooring to shape its policies and vision. A dislocation of that mooring has a ripple effect on the party that may reduce it to a cultish organisation centred around a clan or a dynasty. This system may keep the party temporarily afloat but eventually will be unable to prop up the party in a marketplace of ideas. By seeking to annul its belief in "secularism" (however cynical or subversive Congress’s idea may have been from the tenets of true secularism), Rahul has dislocated this ideological anchor. Congress has nothing to distinguish itself from its more powerful ideological opponent.
इंडियन एक्स्प्रेसच्या अग्रलेखातील एका वाक्याकडे ते लक्ष वेधतात
......The electoral rise of this new Congress may mark the final departure of the idea of the Congress — a move toward Congress-mukt Bharat indeed."

खोसला का घोसला ???? चीट फंड घोटाळयात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आरोपीच्या मुलाला हनीट्रॅपमध्ये अडकवून मुख्य आरोपींना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. लोकसत्ता ऑनलाइन | November 29, 2018 05:20 pm

In reply to by विशुमित

मी पूर्वीच बोललोय भाजप ला फक्त भाजपचं हरवू शकते . ही अतिउत्साही माकडे हिंदू धर्म बदनाम करत आहेत . महाराष्ट्रात ही आहेत असली माकडे !!! दुष्काळात जो शेतकरी स्वतःचे दोन वेळा नीट पोट भरू शकत म्हणून तो नाईलाजाने पशुधन विक्रीसाठी काढतो अशा शेतकऱ्याला ' भिकारी , कटोरी वाले ' अशी संभावना करणारे महाभाग आहेत इथे .

रविवार मटा- संजय सोनवणींच्या नवीन पुस्तकाबद्दल समीक्षा आली आहे. हिंदू वि वैदिक धर्म काही पुरावे आहेत म्हणे. २) मध्य प्रदेशात बहुमत नाही असं पंडित म्हणतात ,का य होईल?

In reply to by कंजूस

मध्य प्रदेश मधे मोदीजींची काहीच हवा नाहीये, परंतु शिवराज सिंग ची इमेज अजूनही चांगली आहे, १५ वर्ष सत्तेविरुद्ध अँटी इन्कमबंसी असूनही जर शिवराज कांटे टक्कर देत असेल, तर नक्कीच गडी स्वयंभू व तगडा आहे. १५ वर्ष सत्तेविरुद्ध अँटी इन्कमबंसी असूनही (ओपन- शट केस असताना) काँग्रेस विस्कळीत नेतृत्व विस्कळीत नॅरेशन असल्यामुळे फक्त टफ फाईट देतीये (साऊथ आफ्रिकन क्रिकेट संघा प्रमाणे चोकर्स... ). शिवराज सिंग बद्दल सहानुभती आहे, जिंकला तर मोदीजींमुळे , हरला तर स्वतःच्या नॉन परफॉर्मन्स मुळे ...

In reply to by कंजूस

संजय सोनवणींच्या नवीन पुस्तकाबद्दल समीक्षा आली आहे. हिंदू वि वैदिक धर्म काही पुरावे आहेत म्हणे.
संजय सोनवणींच्या मांडणी आणि निष्कर्ष पटोत अथवा न पटोत बर्‍यापकी नव्या मांडणीचे प्रयत्न अभ्यासपूर्ण असतात आणि त्यांच्या लेखनाची दखल घेतली पाहिजे असे वाटते. कुणि पुस्तक वाचले असल्यास स्वतंत्र चर्चा धागा काढण्यास स्कोप असावा असे वाटते.

आमच्या नजरेत पवार साहेब हे नेहेमीच पंप्र पदाचे उमेदवार. प्रॅक्टीकली आम्हाला नरसींहराव, वाजपेयी देखील आवडायचे. युपीएला दुसरी टर्म मिळाली आणि ममोंबद्दलही आम्हाला आनंद वाटला. मुख्य म्हणजे राहुल गांधींच्य रुपाने काँग्रेसला, देशाला तरुण नेतृत्व मिळेल याचं देखील बरं वाटलं. इकडे रागा फार डिसअपॉइण्ट करायला लागले पण तिकडे मोदि देशपातळीवर उदयाला आले त्याचाही आनंदच झाला. आता मात्र भाजपा परत सॅफ्रन होळी खेळायला लागल्याचं बघुन हळहळ होते आहे. एकीकडे युपीएची भेळपुरी नको वाटते. दुसरीकडे कडवट हिंदुत्वाचं पुनरुत्थान देखील नको वाटतं. केजरीबाबुंनी तसंही फार पुर्वीच निराशा केली आहे. तरुण तुर्कांमधे कन्हैय्या कुमार, मेवाणी वगैरेचा मेळावा बघुन तर डबल नको नको वाटतं. निकट भविष्यात रागा, योगी आदित्यनाथ, कन्हैय्याकुमार... असे ऑप्शन्स असणार का आपल्यापुढे??

In reply to by अर्धवटराव

फडणवीस पण आहेत की.. त्यांचा ही आवाज कायम चढलेलाच असतो म्हणा. वरच्या पट्टीत बोलणं हे राजकारण करण्याचं बेसिक qualofication आहे की काय देव जाणे.

In reply to by mrcoolguynice

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये झालेला हिंसाचार मुस्लिमांशी दंगल घडविण्याचा प्रयत्न होता. हा एक कटाचा भाग होता, असे करण्यात आलेल्या चौकशीत समोर आले आहे. याबाबतचा अहवाल अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. बी. शिरोडकर यांनी दिला.

VVIP chopper scam: Middleman Christian Michel extradited to India ३६०० कोटी अगुस्ता-वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील फार महत्वाचा फरार असलेला दलाल, क्रिस्तियन मायकेल, याला युएईच्या सरकारने सिबीआयच्या ताब्यात दिले आहे. त्याला काही तासांत भारतात आणणे अपेक्षित आहे. हा अगुस्ता घोटाळ्याच्या कायदेशीर कारवाईत मैलाचा दगड आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ऐव्हाना पोहोचला असेल ! NDA सरकार त्याच्या मागे लागलेल होत ! श्री अजित डोवाल यांच बारीक लक्ष ह्या केसवर होत. २०१७ साली क्रिस्चियन मायकेल ने वेष बदलुन युएईतुन पळुन जायचा प्रयत्न केला होता पण तत्पर ईमिग्रेशन मुळे त्याचा हा प्लॅन वेळीच पकडला गेला ! ह्याच्या वर युएईतही केस चालु आहेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

क्रिस्तियन मायकेल ब्रिटिश नागरिक आहे. त्याने संयुक्त अमिरातींच्या न्यायालयात, "ब्रिटिश नागरिकाला संयुक्त अमिराती भारतात प्रत्यावर्तित (एक्स्ट्राडाईट) करु शकत नाही" असा युक्तिवाद केला होता. संयुक्त अमिरातींच्या न्यायालयाने त्याला धुडकावून, मायकेलला सिबिआयच्या ताब्यात दिले आणि आता त्याला भारतात आणले गेलेही आहे. हा घटनाक्रम पाहून मल्ल्याची पाचावर धारण बसली नसती तरच नवल होते. त्याने, परत एकदा, "बँकांचे १००% पैसे परत करेन: अशी व्टिट्स करायला सुरुवात केली आहे. अर्थातच, मल्ल्याचा पूर्वेतिहास पाहता, हा (नेहमीप्रमाणेच) दिशाभूल करण्याचा प्रयत्न असण्याची शक्यता आहेच. पण, (अ) त्याच्या प्रत्यावर्तित करण्याच्या खटल्याच्या निकालाची तारीख जवळ येऊ लागली आहे, आणि (आ) ब्रिटनमधून प्रत्यावर्तित केलेल्या गुन्हेगारांसाठी भारतिय तुरुंग सुरक्षित आहेत असा निर्णय अगोदरच ब्रिटिश न्यायालयाने दिलेला आहे... हे पाहता, मल्ल्याकडून कर्जवसूली झाली तर आश्चर्यही वाटायला नको. Vijay Mallya offers to repay 100% of 'public money', says UK extradition to take own legal course.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

क्रिस्तियन मायकेल ला भारतात आणलेले बघुन राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेतच पण नेहेमी भाजपा, श्री मोदिजींवर कटाक्ष टाकणारे मिडीया कुमार ( रविश कुमार बाबु ) सुद्धा मलुल पडले ! दोन महीन्यापुर्वी रिपब्लिक टीव्हीने संयुक्त अमिरातींच्या न्यायालयाने क्रिस्तियन मायकेलला भारतात प्रत्यावर्तित (एक्स्ट्राडाईट) करण्याची परवानगी दिली आहे अशी बातमी ब्रेक केलेली होती. त्यावेळेला रविश कुमारला जोरदार हसु आलेल. आता जेंव्हा खरच क्रिस्तियन मायकेलला भारतात प्रत्यावर्तित केले गेले त्यावेळे ला म्हणे ह्या केस म ध्ये काही दमच नाही. ईटालीच्या कोर्टात ह्या केस मध्ये कोणालाच शिक्षा झालेली नाही . आताच सरकार ह्या क्रिस्तियन मायकेलला भारतात आणुन काय साधणार आहे वैगेरे वैगेरे !

In reply to by डँबिस००७

क्रिस्तियन मायकेलला भारतात आणणे ही फार महत्वाची असली तरी, ती फक्त पहिली पायरी आहे. क्रिस्तियन मायकेलच्या तर्फे "भारतिय कोर्टाला मान्य (अ‍ॅडमिसिबल) आणि निर्णय घेण्यास योग्य" असा पुरावा मिळविणे हे त्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे. ते जमल्यासच योग्य निर्णय मिळू शकेल. तसे होऊ नये यासाठी, काँग्रेसने अगोदरच फिल्डिंग लावली आहे. काँग्रेसशी संबंधित तीन वकील क्रिस्तियन मायकेलची बाजू मांडायला तयार झाले आहेत. त्यातल्या पहिल्याने पहिल्याच दिवशी मायकेलची न्यायालयाच्या संमतिने अधिकृत भेट घेऊन त्याच्यापर्यंत "योग्य ते संदेश" पोचवले आहेत. शिवाय, या नवख्या वाटणार्‍या वकिलांच्या गटामागे सिब्बल, संघवी, इत्यादी जान्यामान्या वकिलांची गुप्त फळी बसलेली आहेच. या पार्श्वभूमीवर, या अटीतटीच्या खेळात, सरकार कोणती आणि कश्या प्रकारे, आपली रणनिती वापरेल हे पाहणे रोचक असणार आहे.

ऊ प्र च्या एका जिल्ह्यात अजमल कसाबला डोमिसाईल सर्टीफीकेट देण्यात आल होत ! कलेक्टरच्या लक्षात येताच तत्परतेने ते सर्टीफीकेट रद्द केल व सर्टीफीकेट देणार्या अधिकार्याला बडतर्फ करण्यात आल ! कोणी हे सर्टीफीकेट बनवायला अर्ज केला होता हे अजुन समोर आलेल नाही ! पण त्याने मोठा गेम केलेला आहे ! ह्या केस मधला गलथान पणा किती महागात पडणार याची कल्पना ह्या केस मध्ये अडकलेल्याना नसेल ! एवढ्यात ह्या बातमीचा खुप फायदा करुन घेतला आहे !

पाकिस्तानने फायदा घेतला ! आधार कार्ड प्रत्येक बाबतीत वापरण किती महत्वाच आहे हे अधोरेखीत होत आहे !

दिल्लीमध्ये, संसदेचे विशेष सत्र चालू करावे (शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात) यासाठी केलेल्या किसान मोर्च्याच्या दरम्यान,मागण्या / प्रश्न, समजून घेण्यासाठी, अनेक राजकीय लोकांनी गाठी घेतल्या असे वाचले, परंतु कामाच्या व्यस्ततेमुळे असेल कदाचित, पण केंद्रीय सरकारमधील कोणी भेट घेतल्याचे वाचनात नाही. -------------- प्रियांका चोप्रा निक चा राजेशाही विवाहानंतर , त्यांनी दिल्लीत लग्नाचे रिसेप्शन दिले. पाहुण्यामध्ये, आपल्या कामाच्या व्यस्ततेतून वेळ बाजूला काढून, पंतप्रधान मोदीजी यांनीही उपस्थिती नोंदवली व वधूवरास शुभेच्छा दिल्या. गप्पा मारल्या, संवाद साधला. आपला दीर व (गेम ऑफ थ्रोन मधील सांसा ) सोफी टर्नर यांच्या आगामी विवाहाबद्दल, प्रियंकाने पंतप्रधानांना आवर्जून कल्पना दिली. -------------- दरम्यान दिल्लीमध्ये एका मुलाखतीत बोलताना, उपमुख्यमंत्री सिसोदिया म्हणाले, की दोन्ही (हिंदू व मुसलमान) जर होकार देतील, तर अयोध्येतील कोर्टवादातील जमिनीवर, युनिव्हर्सिटी व्हावी व तिथे हिंदू मुसलमान शीख इसाई दलित , भारतीय व विदेशी या सर्वाना शिक्षण मिळावे. का ? तर् म्हणे , भारताची रामराज्य कडे वाटचाल ही युनिव्हर्सिटीचे जाळे विणून होणार , मंदिर बांधून नव्हे. -------------- येडच्यापच आहे मनीष , काहीपण बोलतो, २१ व्या शतकातील युगात काय गरज आहे युनिव्हर्सिटीची ?

In reply to by mrcoolguynice

तिन्ही बातम्यांचे सार, जिथे गर्दी जमते, मतांची चांदी होते त्या त्या साठी राजकीय नेते गागा करतात आणि ज्यांचे त्यांचे भक्त आपापल्या हिरोचे कौतुक करुन मत रुपाने आशिर्वाद देतात.

In reply to by माहितगार

तिन्ही बातम्यांचे सार, जिथे गर्दी जमते, मतांची चांदी होते त्या त्या साठी राजकीय नेते गागा करतात
नाही नो नेव्हर ... त्रिवार नकार ... मोदीजींचे, तुम्ही इतर नेत्यांबरोबर कम्पेअर करू नका. मोदीजींची प्रत्येक कृती, त्यांनी घेतलेला व सोडलेला प्रत्येक श्वास व उच्छ्श्वास हा फक्त आणि फक्त भारतमातेसाठीच असतो. भारताची परदेशातील मान अधिकच उंचावी, म्हणूनच त्यांनी रिसेप्शनला वेळ दिला असावा. नाहीतर आपला बहुमूल्य वेळ ते रिसेप्शनतील शे दोनशेच्या गर्दीसाठी निवेश करतील असे मला वाटत नाही, शिवाय त्यात सासुरवाशीण व तिच्या सासरकडची मंडळी (अंदाजे निम्मे पाहुणे राउळे), भारतात मतदानास, पात्र किंवा उत्सुक असतील का ? परंतु सध्यातरी भारताची परदेशातील मान अधिकच उंचावी, म्हणूनच त्यांनी रिसेप्शनला वेळ दिला असावा, असे वाटते.
ज्यांचे त्यांचे भक्त आपापल्या हिरोचे कौतुक करुन मत रुपाने आशिर्वाद देतात.
कौतुक व आशिर्वाद......? कधीपासून व्हायला लागले असें भारतात ? २०१४ पूर्वी एक चपटी व थोडे पैसे टाकून निवडणुका जिंकण्यात यायच्या, शेवटी चपटी व पैश्यांचा, जनतेला उबग येऊन, जनतेने राष्ट्रप्रेमी मोदीजींना, मत रुपाने आशिर्वाद देऊन निवडून आणले.

In reply to by माहितगार

जिथे गर्दी जमते, मतांची चांदी होते त्या त्या साठी राजकीय नेते गागा करतात
शिवाय तुमच्याच तर्कने जायचे ठरवले, तर मोदीजी मोदीजी हे इतरांसारखे मताचे राजकारण करणारे नेते असते, तर ते जास्ती गर्दीच्या किसान मोर्च्यात गेले असते, रिसेप्शनला जाण्याऐवजी त्यांना पूर्ण कल्पना आहे, हे शेतकरी नेहमीच रडगाणी गात असतात. दोन दिवस मोर्चे काढतील, नंतर गपगुमान शेती करतील. शेतकऱ्याला शहरी टॅक्सपेयर पोसतात, ...शेतकरी नागरिकाना नाही, असा मोदीजींचा अभ्यास असणारच. आणि नाही केली शेतकऱ्यांने शेती, तर काय ? सोप्पंय सर्व अन्न धान्य आयात करायचे... त्यासाठीच आंतरराष्ट्रीय संबंध चांगले ठेवलेत मोदीजींनी ... त्यासाठीच ते रिसेप्शनला गेलेत ...

In reply to by mrcoolguynice

हे शेतकरी नेहमीच रडगाणी गात असतात. दोन दिवस मोर्चे काढतील, नंतर गपगुमान शेती करतील. शेतकऱ्याला शहरी टॅक्सपेयर पोसतात, ...शेतकरी नागरिकाना नाही, असा मोदीजींचा अभ्यास असणारच. आणि नाही केली शेतकऱ्यांने शेती, तर काय ? चांदीचा मुलामा गेल्यावर पितळ उघडं पडायला लागलेलं दिसतंय

In reply to by सुबोध खरे

खरे आहे. ते जे काही बोलतायत ते मोदी भक्त तर जाऊ द्या. एखादा सामान्य समजुतदार माणुस देखील बोलु शकणार नाही. आसो, किती दिवस चमकणार एखादा?

In reply to by आनन्दा

ते जे काही बोलतायत ते मोदी भक्त तर जाऊ द्या. एखादा सामान्य समजुतदार माणुस देखील बोलु शकणार नाही.
"समाजात 'मोदीभक्त' व 'सामान्य समजूतदार माणूस' , असे दोन समाजगट आहेत, व त्या दोन्ही समाजगटातील कोणीही असे बोलू शकणार नाही ...." असे आपल्या बोलण्यातून ध्वनित होतंय .... असो ...

In reply to by mrcoolguynice

हम्म.. बरोबर. तुम्ही दोन्ही गटात बसत नसल्यामुळे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल. पण ते वाक्य नीट वाचा, मोदीभक्त ते सामान्य हा त्या प्रतिसादाचा आवाका आहे. त्यापुढच्या लोकांसाठी माझी लेखणी थिटी आहे.. जसे की कुके, आणि तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण.

In reply to by आनन्दा

पण ते वाक्य नीट वाचा, मोदीभक्त ते सामान्य हा त्या प्रतिसादाचा आवाका आहे.
प्रतिसादाच्या अवाक्याच्या स्केल वर..... ‘मोदिभक्त’ ते ‘सामान्य’ या या स्केलवर , मी नाही हे वाचून हायसे वाटले. धन्यवाद ....

कोंबडीच्या पिलाला समज आली तर...! (संदीप वासलेकर रविवार, 2 डिसेंबर 2018) {{''https://www.esakal.com/saptarang/sundeep-waslekar-write-article-saptara…''}} हा लेखं एका भारतीय पेप्रात का छापून आलाय ? मी म्हणतोय ग्रीसचा किंवा ब्रेक्सिटचा , आणि आपला काय संबंध ??

In reply to by माहितगार

खरय. पवारांनाही सांभाळल आणि सत्ताधारी दुखावणार नाहीत याचीपण काळजी घेतली. २०१९ जवळ आलय. कुंपणावर बसणच बर असत. :)

In reply to by शाम भागवत

भागवतजी, राजकारण जरा बाजूला ठेऊ, एखादी कृती / धोरण देशहीतास अनुकूल नसेल तर देशहीतास अनुकूल नाही म्हणावे, सत्ताधारी/विरोधी पक्ष देशभक्तीचा हवाला देत असेलपण देशहीताच्या अपेक्षांवर खरा उतरत नसेल तर तशीही टिका करावी पण म्हणून देशभक्तीच्या संकल्पनेला गाडण्याची गरज कुणालाही का भासावी हे अनाकलनीय आहे. वासलेकरांनी दिलेल्या कोंबडीच्या पिलाच्या गोष्टीत कोणतेही बदल करुन ती कथ वाचता येऊ शकते सध्या त्यांनी ती एका दिशेने दिली तर ती इतर अनेक दिशांनी वाचता येऊ शकेल याचा आदमास घेण्याची गरज वासलेकरांना कदाचित भासली नसावी.
एका देशभक्ती-विरोधकाने कोंबडीचं नवीनच जन्मलेलं एक पिलू आणलं. देशभक्ती-विरोधक त्या पिलाला रोज वेळेवर, चांगला खुराक देत असे. त्यामुळे पिलू आनंदून जाई व देशभक्ती- विरोधाबद्दल त्याला आत्मीयता वाटत असे. नियमितपणे खुराक मिळाल्यामुळे पिलू मोठं होऊ लागलं. देशभक्ती-विरोधक दिसल्यावर आनंदानं नाचू लागलं. "हा देशभक्ती-विरोधकच आपलं सर्व काही' असं ते समजू लागलं. कोंबडीच्या पिलाला आयुष्यात देशभक्ती-विरोधकाशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. काही काळानं पिलू अगदी गुबगुबीत झालं. देशभक्ती-विरोधक नेहमीप्रमाणे आला. त्यानं खुराक दिला. पिलू देशभक्ती-विरोधकावरच्या प्रेमापोटी नाचू लागलं. देशभक्ती-विरोधकानं पिलाला हातात घेतलं. एवढ्या मोठ्या व्यक्तीनं आपल्याशी जवळीक साधली, हे पाहून पिलाला अतिशय आनंद झाला. देशभक्ती-विरोधकनं पिलाची मान मुरगळली. काही क्षणात पिलू मरण पावलं; पण शेवटच्या क्षणापर्यंत देशभक्ती-विरोधकाच्या मनातलं कारस्थान, त्यानं निर्माण केलेला प्रेमाचा आभास व त्याचा उद्देश हे काही पिलाला समजलंच नाही. मारलेलं पिलू देशभक्ती-विरोधकानं देशद्रोहीशक्तींन विकलं. गावातल्या पाच-सहा देशद्रोह्यांनी एकत्र येऊन त्या त्या पिलाची मेजवानी झोडली! वास्तविक, कोंबडीचं पिलू अवतीभवती पाहत असायचं. मधूनमधून गुबगुबीत झालेली पिलं नाहीशी होतात, हे त्याला कळायला हवं होतं; परंतु अमर्याद स्वार्थ व वास्तवतेपेक्षा देशभक्ती-विरोधकाने निर्माण केलेल्या आभासाची लालसा यामुळे सत्य काय आहे हे पिलाला समजलंच नाही.

In reply to by माहितगार

फारच छान प्रतिक्रिया ! फक्त तेवढ, २-४ देशभक्ती विरोधकांची नावे जाहीर करा नं प्लीज ... म्हणजे तुमच्या लेखी असलेले, देशभक्ती विरोधक नको हं ! असे की ज्यांनी जाहीरपणे , देशभक्तीला विरोध केलाय ... आजीबात देशभक्ती करू नका म्हणालेत ... आणि हो डॉक्टर्ड टेप च्या आधारे एखाद्याला देशभक्ती विरोधक ठरवण्याची , निसटती बाजूही तेव्हडी सांभाळून घ्यालच.

In reply to by mrcoolguynice

....आणि हो डॉक्टर्ड टेप च्या आधारे एखाद्याला देशभक्ती विरोधक ठरवण्याची , निसटती बाजूही तेव्हडी सांभाळून घ्यालच....
डॉक्टर्ड टेपचे बद्दल निर्देश पुन्हा पुन्हा करता येतात. पण इन डॉक्ट्रीनेशनने जे बिघडते त्याचे काय करणार ? तथाकथितांचा लाडका उमर खालीद चेन्नईत जाऊन काश्मिर भारताचा नसल्याचा अपप्रचार करतो त्याचे काय करायचे ? हा अख्खा युट्यूब डोक्टर्ड आहे कि इन-डॉक्ट्रीनेशन आहे ? हि एक युट्युब लिंक देतोय ज्यातील अँकर 'दुनियाकी सबसे बडी जम्हूरीयत काश्मिरमे कितनी खूबसुरत नजर आती है' म्हणतो अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीत ज्यांनी त्या वाक्यावर टाळ्या वाजवल्या त्यांना काय म्हणायचे ? देशप्रेमी ? काश्मिर मध्ये लोक्शाहीला डंख करणारा दहशतवाद आणि त्या मागे असलेले शांततेच्या धर्माच्या तत्वज्ञानावर पांघरूण घालायचे आणि मग 'दुनियाकी सबसे बडी जम्हूरीयत काश्मिरमे कितनी खूबसुरत नजर आती है' म्हणून टाळ्या मिळवायच्या ? टाळ्या वाजवणार्‍यांना खाल्ल्या थाळीत छेद करताना लाजा वाटत नाहीत ? त्यानंतरचे काश्मिरी प्राध्यापक स्त्रीचे भाषण काही देशप्रेमी नाही ती काश्मिरी आहे तिचे सोडून देऊ , पण अशा व्यासपिठावर बसलेल्या आणि काश्मिर भारताचा भाग आहे ह्या बद्दल ब्र सुद्धा न काढणार्‍या अर्बन नक्षलांना नेमके काय म्हणायचे ? जे एन यु मधील टेप डॉक्टर्ड असतील पण ज्या सुकुमाराचे नाव घेतले गेले त्याने ' स्वतःच्या बायकोचे नाव भारतमात ठेवतो ' म्हणत आपल्या टवाळीतून जे हिनत्व पुढे आणले त्याचे काय करायचे ? कलकत्याच्या जादवपूर विद्यापीठात सरळ सरळ '***मांगे आजादी' म्हणत मोर्चा काढणार्‍या विद्यार्थ्यांचे काय करायचे ? त्यांच्यात देशभक्ती जागृत करण्यास कमीपडलेल्या शिक्षक आणि प्राध्यापकांना उपकुलपतींना काय आदर्श शिक्षकाचे पुरस्कार द्यायचे ? आणि देशप्रेम पातळ असलेल्यांच्या निसटत्या बाजू सांभाळूंन घेणार्‍यांना नेमक्या किती दिव्यांनी ओवाळायचे ?

In reply to by माहितगार

असल्या लोकांवर कठोर कायदेशीर करवाई व्हावि ही आपेक्षा. आणि तसा आग्रह आपण सर्वानी गृह खात्याकड़े लावून धरायला हवाच. गृह खाते असल्यांच्या मुसक्या बांधायला काहीच हरकत नाही.

In reply to by mrcoolguynice

मोदींजींच्या देशात हे असे लोक अजुन उघड़पणे फिरतातच कसे ? त्यांच्यावर कारवाई न करण्यचा गलथानपणाचा आरोप आपण मोदीजीवर करत आहात काय ?

In reply to by mrcoolguynice

मोदींवर कशाला? कायदाव्यवस्थेवर करतो. हो, जर राज्यसभेत स्पष्ट बहुमत असते तर ही वेळ नक्की आली नसती.. तुम्हाला टीना साठी मुद्दा हवाय ना, हा घ्या लिहून. नुसते बहुमत उपयोगाचे नाही, तर पाशवी बहुमत हवे म्हणावं.

In reply to by आनन्दा

ओके ओके, महितिगार म्हनताएत त्या अर्बन नक्सल्यान्वर कारवाई, लोकसभेत व राज्यसभेत पाशवी बहुमत आल्यावरच केली जाइल म्हना कीं तुमच्या मते वेरी गुड पॉंईंट ... नोटेड नेक्स्ट पॉंईंट प्लीज़....

In reply to by mrcoolguynice

....त्यांच्यावर कारवाई न करण्यचा गलथानपणाचा आरोप आपण मोदीजीवर करत आहात काय ?...
मुळीच नाही, बहुधा मोदींना त्यांच्या मर्यादांची कल्पना असणार म्हणूनच त्यांनी त्याच्या उद्घोषणेतील पहिले दोन शब्द 'सबका साथ' ठेवले आहेत. गलथानपणाची जबाबदारी 'सब'चा घटक असलेल्या सर्वसामान्य नागरीकावर असते, देशभक्तीची उजवी बाजू लावून धरण्याची जबाबदारी विचारवंतांवर असते, संस्कार घडवण्याची जबाबदारी शिक्षक आणि प्राध्यापकांवर असते, प्राध्यापकांना आदर्श देण्याची जबाबदारी कुलगुरू आणि कुलपतींवर असते. भारत माता शब्दाच्या उपयोगासाठी नुसता आग्रह धरण्यापुर्वी गुटखा खाऊन थुंकण्यचे आणि कचरा टाकण्याचे थांबवा हे मोदी सांगत असतात पण ऐकणारे कानही बर्‍याचदा अनेकविध कारणांनी बधीर झालेले असतात. सोन्याच्या आयातीने भारतातील पैसा बाहेर देशात जातो हे भारतातील प्रत्येक अर्थशास्त्री, अर्थमंत्री ते पंतप्रधानाला माहित असते, एकीकडे आर्थीक स्थितींबद्दल दर घटकेला रडणारा भारतीय निर्लज्जपणे सोन्याच्या दुकानात रांगा लावतो अशा असंख्य वेळी आपले देशप्रेम पातळ असल्याचे प्रात्यक्षीक करून दाखवत असतो. गल्ली गल्लीत घरा घरात मना मनात माणसे देशहीताशी तडजोडी करत असतात त्या सगळ्यांवर खटले दाखल करून अख्खी प्रजा जेल मध्ये कोणत्याही नेतृत्वाला टाकता येऊ शकत नाही. सुज्ञ जनता हा लोकशाहीच्या चार महत्वाच्या आधारस्तंभांपैकी आहे तो कमकुवत असतो तो पर्यंत त्यांचे नेतृत्व कमकुवत असणे सहाजिक असते. एक बोट मोदींकडे असेल तर तीन बोटांची दिशा इतरत्र असते. तीन बोटे देशहिताशी तडजोडकरून स्वतःचे देशप्रेम पातळ करणार्‍यांकडे असतात, पोलीसांचे काम पोलीसांना करु न देणार्‍यांकडे असतात, संबंधीत राज्यसरकार कडे आणि कुलगुरु आणि विद्यार्थ्यांचे शिक्षक आणि प्राध्यापकांकडे असतात. असो.

In reply to by माहितगार

हुश्श्य.... उपाययोजने बाबत पण लिहा .... तुम्हीं यु ट्यूबच्या लिंका दिल्या.... पुढ़े काय...., तात्पुरते मान्य करु कि ते देशद्रोही ..... तुम्हीं किंवा मी यबाबत काय करु शकतो ? मोदीज़िंच्या मर्यादा अवगत आहेत तशा नागरिकांच्या पण असाव्यात अशी माफ़क आपेक्षा.... असो...

In reply to by mrcoolguynice

.... तुम्हीं किंवा ... यबाबत काय करु शकतो ? ....
उपरोक्त वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम मी या शब्दाने बदलतोय कारण मी स्वतः पुरते अधिक सहज सांगु शकतो. तुमच्या प्रतिसादातील तात्पुरतेपणामुळे तुमचे 'मी' सर्वनाम तात्पुरते वगळले . सर्व प्रथम महात्मा गांधींना त्यांच्या सभेत आपल्या सासर-माहेरच्यांच्या विरोधाची पर्वा न करता देशासाठी अंगावरील दागिने काढून देणार्‍या आज्जीने आमच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तन- मन- धनाने केलेल्या योगदानाशी प्रामाणिक राहू शकतो (तात्पुरते नव्हे नेहमीसाठी). तिच्यासारख्या सामान्य नागरीकांच्या वतीने स्वातंत्र्य लढा लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांशी प्रामाणिक राहू शकतो. 'भारतीय इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर भारतीयांना परत परत परकीय आक्रमणांना तोंड द्यावे लागण्यामागे देशाचे राजकीय एकीकरण नव्हते आणि यापुढे भारतीयांना परकीय दबावास बळी पडण्याच्या शक्यता कमी करुन हव्या असतील तर भारतीय उपखंड राजकीय दृष्ट्या एक असणे गरजेचे आहे हा स्वांतत्र्यसैनिकांचा कॉमन सेन्स समजून घेऊन भारत अखंड असण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी योगदान देऊ शकतो.' आणि हे समजावून देणार्‍या माझ्या शिक्षकांशी ते जवाहरलाल नेहरुंनी मांडलेल्या विवीधता असूनही एकता असलेल्या भारतीय सांस्कृतिक एकात्मतेच्या मला भावलेल्या संकल्पनेशी प्रामाणिक असू शकतो. देशाकडुन काही मागण्या आधी मी देशासठी काय केले हा प्रश्न मी माझा मला विचारायचा आहे ह्या स्वतःच्या भूमिकेशी प्रामाणिक असू शकतो. आणि माझ्या देशाशी असलेली माझा ह्या पवित्र बंधाबाबत प्रामाणिक भावना माझ्या आजूबाजूचे ते कोणतेही नेतृत्व माझ्या पसंतीस उतरले नाही तरी अक्षूण्णपणे कायम राहील हे मी बघू शकतो. अखंड भारताच्या नरेटीव्ह बदलून भारताचे तुकडे करु शकणार्‍या / इच्छिणार्‍या नॅरेटीव्हजना उघडेपाडू शकतो. अखंड भारताच्या नॅरेटीव्हची श्रेष्टता मांडू शकतो आणि एवढी वैचारीक मांडणीची क्षमता दिलेल्या सर्व आदर्श गुरुजन ते भारतीय विदुषी यांचे फुल नाही फुलाची पाकळी ऋण फेडून मला या स्वतंत्र भारतात जे स्वातंत्र्य लाभले ते तसेच माझ्या पुढील पिढ्यांना लाभेल हे स्वप्न अधिक आशादायीपद्धतीने पाहू शकतो. असो

In reply to by माहितगार

खरंच वासलेकर हुशारेत. मी त्यांच्या लेखांनी सुरुवातीस ज्याम इम्प्रेस व्हायचो, नंतर हा भाबडेपणा आहे लक्षात यायलां लागलं. एक मात्र आहे. ते विषय सोपासाधा करुन टाकतात आणि फार पल्हाळही लावत बसत नाहीत. छोट्या छोट्या मर्यादित समस्यांवरचे त्यांचे लेख प्रभावी आहेत, त्यांच्या सुचवण्या अंगिकारल्या तर खरंच मोठे बदल होऊ शकतील. पण मोठ्या समस्या भारतीय राजकिय परिस्थिती आणि लोकांची मानसिकता यामुळं बदल जवळजवळ अशक्य वाटतात. आणि इथं मि. कुलगायनाइस म्हणतात त्या नुसार ग्रीसचा किंवा ब्रेक्सिटचा , आणि आपला काय संबंध ??

In reply to by कंजूस

भारतीय लोकांना काँग्रेसशिवाय त्यातूनही नेहरू गांधी घराण्यातले कोणी पंतप्रधान असल्याशिवाय चैन पडत नाही. मोरारजी देसाई किंवा चंद्रशेखर, व्हीपी सिंग वगैरे यांचे सरकार सोडून द्या. पण नरसिंव्हराव जरी काँग्रेसचे पंप्र असले आणि जरी त्यांच्या काळात त्यांनी देशाला कसे वाईट परिस्थितीतून बाहेर काढले हे सुद्धा देशाने बघितलं आहे. पण त्यांना काय वागणूक दिली गेली हे सुद्धा देशाने बघितलं आहे. तसेच १९९१ च्या रिफॉर्म्स चे सगळे श्रेय केवळ ममोसिंगांना दिले जाते, ते का याचेही कारण सगळ्यांना माहित आहे. वाजपेयींनी कितीही अणुचाचणीसारखे धाडसी निर्णय घेतले असो, सुवर्ण चतुष्कोन, नदी जोड प्रकल्प सारख्या उपयोगी योजना आणूनही २००४ मध्ये त्यांना का परत निवडून दिलं नाही हे जनतेलाच माहित. त्यामुळे आत्तासुद्धा परत मोदी किंवा भाजप जरी बहुमत किंवा सगळ्यात मोठा पक्ष नसला तरी आश्चर्य वाटायला नको. लोकांना जर राहुल गांधी पंप्र म्हणून आवडत असतील तर असू दे. मी आधी पण एका धाग्यावर म्हणलं होतं, २००४ मध्ये वाजपेयी परत पंतप्रधान झाले नाही तर त्यांना काय फरक पडला? नुकसान कोणाचं झालं? २००६ साली पूर्ण होण्याचं टारगेट असलेला सुवर्ण चतुष्कोन प्रोजेक्ट विलंब होत होत २०१२ साली पूर्ण झाला. अतिरिक्त किंमत आणि अपहार यातून किती रुपयांचा बोजा आपल्यावर पडला असेल याची कोणी गणती केली नसेल. नद्याजोड प्रकल्प १९७० सालापासून संशोधनाचा विषय आहे. वाजपेयीनीं निदान त्याला हिरवा कंदील तरी दाखवला होता, पण २००४ नंतर परत तो बासनात गुंडाळला गेला. आता २०१४ नंतर धडाडीने काम करून २०१८ मध्ये मोदी सरकारने निदान देशांतर्गत जलवाहतूक तरी सुरु करून दाखवली. आत २०१९ मध्ये परत काँग्रेस किंवा काँग्रेसप्रणित सरकार आलं की हे सगळे प्रकल्प परत रखडतील. मग एक १०-१५ वर्षांनी परत जनतेला उपरती होऊन मग त्यावेळेला योगी किंवा जे कोणी असेल ते ५ वर्षांसाठी निवडून येतील. आणि हेच चक्र चालू राहील. २००२ मधेच अडकलेल्या लोकांना नंतर गुजराथ मध्ये एकही दंगल झाली नाही हे दिसत नाही. काँगेसच्या काळातली आणीबाणी, अगदी मुंबई, दिल्लीपर्यंत येऊन झालेले दहशतवादी हल्ले, विविध भागात झालेल्या हिंसक दंगली चालून जातात पण २०१४ नंतर देशात एकही दहशतवादी हल्ला झाला नाही तसेच एकही मोठी म्हणावी अशी दंगल झाली नाही हे मात्र लक्षात येत नाही. किंबहुना लक्षात आले तरी फक्त २००२ आठवते. दुसरीकडे लोकांना राहुल गांधी ४ वाक्य जरा बरी, थोडा अर्थ लागेल अशी, बोलला तर लोकांना त्याला पंतप्रधान करायची स्वप्न पडायला लागतात. शेवटी तुमचं लायकी असेल तसेच नेतृत्व तुम्हाला लाभते. त्यामुळे २०१९ मध्ये राहुल गांधी तरी पंप्र झाला किंवा मग ५ वर्षात ५ पंप्र बघायला मिळाले तरी आश्चर्य वाटायला नको. गुजराथ, तेथील इतरधर्मीयांसकट, मोदींना मुख्यमंत्री म्हणून सहज स्वीकारेल. नाही स्वीकारलं तरी मोदींना काय फरक पडणार आहे? त्यांना ना आगापिछा ना कुठले बंगले मेंटेन करायचेत. तसेही ६८ वर्षांचे झालेत, त्यांनी निवृत्ती स्वीकारणच बरं, पंप्र झाल्यामुळे पेन्शनची सोया झालीच आहे, नाही का?

In reply to by ट्रेड मार्क

+१०० लोकशाहीत लोकांना त्यांच्या लायकीचेच नेते मिळतात... चुकूनमाकून, एखादा परखडपणे व प्रामाणिकपणे काम करून लोकांना प्रगतीच्या मार्गावर नेणारा नेता मिळाला, पण लोकांना त्याचा परखडपणा व प्रामाणिकपणाच खुपू लागला तर, परत त्यांच्या डोक्यावर त्यांच्या लायकीचाच नेता येणार ! :(

In reply to by ट्रेड मार्क

पण काय आहे कि या देशाचे सर्वच नागरिक सदोदित अहिंदूंबद्दल तिरस्कार बाळगू शकत नाही. आणि अशा तिरस्कार बाळगण्याला देशप्रेमाचे नाव देऊ शकत नाही. या संस्थळावर असे अनेक मिपाकर आहेत कि ज्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक कारकीर्द काँग्रेसच्या राजवटीत गेली. त्याचा जेंव्हा उल्लेख ते करतात तेंव्हा ते सर्वस्वी त्यांचे कर्तृत्व असते. देशाच्या सरकारचे जणू त्यात काहीच योगदान नसते. आणि आता? देशातील सर्व काही चांगल्या गोष्टी फक्त आणि फक्त मोदी किंवा भाजपामुळे होत आहेत. देशाच्या प्रगतीची तुमची एक ठराविक फुटपट्टी आहे. ठराविक रस्ते, ठराविक योजना. त्या झाल्या नाही तर काहीच प्रगती झाली नाही. तर ते असो. पूर्वीचे दिवस फिरून येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे.

In reply to by सर टोबी

१)
....या संस्थळावर असे अनेक मिपाकर आहेत कि ज्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक कारकीर्द काँग्रेसच्या राजवटीत गेली. त्याचा जेंव्हा उल्लेख ते करतात तेंव्हा ते सर्वस्वी त्यांचे कर्तृत्व असते. देशाच्या सरकारचे जणू त्यात काहीच योगदान नसते. आणि आता? देशातील सर्व काही चांगल्या गोष्टी फक्त आणि फक्त मोदी किंवा भाजपामुळे होत आहेत.
२०१९ नंतर भाजपेतर सरकार आले तर वरील वाक्यात तुमच्या भाजपीय मिपामित्रांना खालील प्रमाणे बदलकरून वापरता येइल का? म्हणजे वरील स्टेटमेंटला पूर्णत्व येण्यास मदत होईल.
....या संस्थळावर असे अनेक मिपाकर आहेत कि ज्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक कारकीर्द अटलजी आणि मोदींच्या राजवटीत गेली. त्याचा जेंव्हा उल्लेख ते करतात तेंव्हा ते सर्वस्वी त्यांचे कर्तृत्व असते. अटलजी आणि मोदींच्या काळातील देशाच्या सरकारचे जणू त्यात काहीच योगदान नसते. आणि आता? देशातील सर्व काही चांगल्या गोष्टी फक्त आणि फक्त गांधी व अतेज्ञ राजकीय घराणी किंवा काँग्रेस मुळे होत आहेत.
२)
पण काय आहे कि या देशाचे सर्वच नागरिक सदोदित अहिंदूंबद्दल तिरस्कार बाळगू शकत नाही. आणि अशा तिरस्कार बाळगण्याला देशप्रेमाचे नाव देऊ शकत नाही.
वरील वाक्यातील स्टेटमेंट (अनवधानाने?) अपूर्ण राहील्यासारखे वाटते. खालील वाक्य अधिक नेमके करण्यास स्कोप असावा पण तरीही वरच्या आणि खालच्या पैकी कोणते वाक्य आधी आणि कोणते नंतर आल्यास स्टेटमेंटला पूर्णत्व येईल असे वाटते ?
पण काय आहे कि या देशाचे सर्वच अहिंदू नागरीक आणि धर्मनिरपेक्षतावादी, सदोदित हिंदूं संस्कृती (आणि अहिंदूंची धार्मिक-राजकीयता जपून हिंदूत्वा) बद्दल तिरस्कार बाळगू शकत नाही. आणि अशा तिरस्कार बाळगण्याला निर्भेसळ-सेक्युलॅरिझमचे नाव देऊ शकत नाही.

In reply to by सर टोबी

पण काय आहे कि या देशाचे सर्वच नागरिक सदोदित अहिंदूंबद्दल तिरस्कार बाळगू शकत नाही या विधानाचा माझ्या प्रतिसादाशी काय संबंध आहे? जर तुम्हाला चर्चा त्या दिशेला न्यायची असेल तर जरा खऱ्या धार्मिक "दंगली" कधी झाल्या आणि त्यावेळेला कोणती सरकारे होती याचा शोध घ्या. सध्या होणाऱ्या जमावाने मारहाण करण्याच्या घटना म्हणजे दंगली नव्हेत. आत्तापर्यंतच्या इतिहासात हे वारंवार सिद्ध झालं आहे की हिंदू हे अहिंदूंचा द्वेष करत नाहीत तर अहिंदूंच हिंदूंचा द्वेष करतात. मुस्लिम असो वा ख्रिश्चन विविध मार्गाने हिंदूंना बाटवण्याचे प्रकार कोण करतं? किती हिंदू इतरांना हिंदू बनवण्यासाठी नसत्या उठाठेवी करतात? एवढं होऊनही दुर्दैवाने हिंदूंना अजूनही जाग येत नाही. आपले वर्णन करायला परधार्जिणे हा योग्य शब्द आहे. वर्षानुवर्षे हिंदू इतर धर्मियांचे सण अगदी उत्साहाने साजरे करत आले आहेत. पण मुस्लिम व ख्रिश्चन आपली दसरा दिवाळी किंवा पाडवा साजरा करताना किती दिसतात? कधी दाखवण्यापुरते केले तर लगेच त्याचा उदोउदो होतो. काय बोलणार? जिथे मुस्लिमांच्या आक्रमणाविरुद्ध तेव्हाचे हिंदू राजे एकत्र येऊ शकले नाहीत. निदान एका प्रदेशात मुस्लिम आक्रमण झाल्यावर तिथली आणि तिथल्या लोकांची, विशेषतः स्रियांची, काय अवस्था झाली हे कळूनही इतरांना एकत्र येण्याची उपरती झाली नाही. ते आपल्या डीएनए मध्येच आहे त्यामुळे बदल होणे अवघड आहे. या संस्थळावर असे अनेक मिपाकर आहेत कि ज्यांचे शिक्षण आणि व्यावसायिक कारकीर्द काँग्रेसच्या राजवटीत गेली. म्हणूनच तर, ज्यांना तुलना करता येते त्यांनी ती करावी. फक्त अशांतता आणि दंगलींच्या फूटपट्टीवर बघितलं तरी काँग्रेसचा परफॉर्मन्स वाईट आहे. प्रगतीचं म्हणाल तर मी म्हणेन कि देशात यादवी माजू दिली नाही आणि बेअर मिनिमम प्रगती एवढंच काँग्रेसचं श्रेय म्हणता येईल. गरिबी हटाव चा नारा पहिला कधी दिला गेला बघा आणि नंतर ती हटवण्यासाठी काँग्रेसने काय प्रयत्न केला? पायाभूत प्रकल्पांचं महत्व यासाठी आहे कि त्यातूनच रोजगार निर्माण होतात तसेच त्या भागात प्रगती पण होते. सुवर्ण चतुष्कोन साठी वाजपेयी का यायला लागले? नदी जोड प्रकल्प १९७० पासून संशोधन होत असूनही ठोस काही व्हायला परत वाजयेयीच यायला लागले. पुढची १० वर्षे परत प्रकल्प बासनात गेला आणि मग आता मोदी आल्यावर देशांतर्गत जलवाहतूक पण सुरु झाली? मुळात प्रश्न काँग्रेस का भाजप यापेक्षा काँग्रेस म्हणजे राहुल गांधी... त्याच्यात पंप्र होण्याचे काय गुण आहेत? जाऊदे, प्रत्येकाचा आपला आपला दृष्टिकोन असतो. काहींची आवड राहुल गांधी असेल तर काय करणार? प्यार मे गधीभी परी लागती है अशी एक म्हण आहे.

पूर्वी भाजप च्या आश्रया ला असलेला अहमदनगर मधील श्रीपाद छिनंदम आता अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आला आहे . शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या , तड़ीपार असलेल्या छिंदमला सदसद्विवेक बुद्धिला स्मरुन मतदान करणाऱ्या व नकावर टीच्चुन निवडून आणणाऱ्या मतदारानां सलाम !!!!!

In reply to by ट्रम्प

आधी भाजपमधे असताना मोदीजींच्या मुळे ह्या माकडाला लोकांनी मते दिली ..... ह्यावेळी मात्र ह्याने चपटी व नोटा वाटल्या ... असणार नक्कीच ...